Thursday, December 25, 2025
Home Blog Page 729

SSC Result 2024 : 10 वीचा निकाल 95.81 % लागला, कोकण विभाग अव्वल; यंदाही मुलींची बाजी

SSC Result 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षेचा म्हणजेच दहावीचा निकाल (SSC Result 2024) आज जाहीर झाला आहे. दहावीचा निकाल 95.81 % लागला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.21 टक्के तर मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा 2.65 टक्के ने जास्त लागला आहे. महत्वाची बाब म्हणजे यावर्षी निकालामध्ये कोकण विभागानं बाजी मारली असून नागपूर विभाग मात्र शेवटला फेकला गेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज पत्रकार परिषद घेत दहावीच्या निकालाबाबत माहिती दिली.

विभागनिहाय निकाल– SSC Result 2024

पुणे – 96.44%
नागपुर – 94.73%
संभाजीनगर – 95.19%
मुंबई – 95.83%
कोल्हापूर – 97.45%
अमरावती – 95.58%
नाशिक – 95.28%
लातूर – 95.27%
कोकण – 99.01 %

कसा चेक कराल निकाल –

दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईट दहावीचा निकाल (SSC Result 2024) पाहता येईल. यासाठी खालील संकेतस्थळांचा वापर करा

https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org/

निकाल कसा पाहायचा

दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
त्यानंतर होम पेजवरील दहावीच्या निकालावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुमचे लॉगिन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचे नाव या सगळ्यांची नोंदणी करायची आहे.
हे सगळे केल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.
निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड देखील करता येईल, आणि प्रिंट देखील काढता येईल.

अजित पवार पुण्याला लागलेल्या वाळवीचे किडे; सामनातून हल्लाबोल

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यामधील कल्याणी नगर येथे झालेल्या पोर्शे कारच्या भीषण अपघातामध्ये (Pune Porsche Accident) दोघांना प्राण गमवावा लागल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली. दररोज या अपघातासंदर्भात नवीन अपडेट्स समोर येत आहेत. आता या प्रकरणावरून राजकारण सुद्धा तापलं आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अपघातप्रकरणी तब्बल ६ दिवसांनी प्रतिक्रिया दिल्याने शिवसेना ठाकरे गटाचे अजितदादांवर निशाणा साधला आहे. अजित पवार पुण्याला लागलेल्या वाळवीचे किडे असं म्हणत सामनातून घणाघात करण्यात आलाय.

सामना अग्रलेखात काय म्हंटल?

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे इतक्या मोठय़ा दुर्घटनेनंतरही नेहमीप्रमाणे गायब म्हणजे ‘नॉट रिचेबल’ होते. हा त्यांचा आवडीचा छंद आहे. “मी पुण्याचा पालकमंत्री आहे व मी सांगेन तेच होईल,” असा सुका दम देणाऱया अजित पवारांनी या अपघातानंतर संवेदना व्यक्त करणे सोडाच, पण दोन ओळींचे निषेधपत्रही काढले नव्हते. आता दुर्घटनेनंतर तब्बल सहा दिवसांनी अजित पवारांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ‘कितीही श्रीमंत बापाचा पोरगा असला तरी कारवाई होणारच,’ असे ते म्हणाले. मात्र ‘च’वर जोर देऊन हे सांगायला त्यांनी सहा दिवस का घेतले? या प्रकरणात अगदी सुरुवातीपासून राजकीय हस्तक्षेप दिसून आला असताना असा कुठलाही प्रकार नाही, असा निर्वाळा पुण्याचे पालकमंत्री सहा दिवसांनी का देत आहेत? असा सवाल सामनातून करण्यात आलाय.

पहिल्या दिवसापासून या घटनेकडे आपले लक्ष आहे असा खुलासा करायला त्यांना एक आठवडा लागला यातच सगळे आले. पुण्यात एकंदरीत घाशीराम कोतवालाचेच राज्य पुन्हा अवतरले असून सरकारने त्या घाशीरामी कारभाराची सूत्रे तेथील पोलीस आयुक्तांना दिलेली स्पष्ट दिसतात. ज्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत दारू पिऊन दोन तरुण जिवांचा खून केला तो अल्पवयीन वगैरे अजिबात नाही. त्याचे वय साडेसतरा इतके आहे. म्हणजे तो चांगला सज्ञान आहे. त्याच्यावर प्रौढ म्हणूनच खटला चालायला हवा व ‘निर्भया’ प्रकरणात तेच घडले आहे. पण जोपर्यंत फडणवीस यांचा हस्तक पोलीस आयुक्तपदी बसला आहे तोपर्यंत मृतांना न्याय मिळणार नाही.

धंगेकर यांनी आयुक्तांवर केलेले आरोप गंभीर आहेत. बिल्डरांच्या पाकिटावर आयुक्त काम करतात हा त्यांचा आरोप दुर्लक्षित करता येणार नाही. धंगेकर हे आमदार आहेत व इतर आमदारांप्रमाणे विकत घेतले जातील अशा वर्गात मोडणारे नाहीत. भाजप व अजित पवारांचे सर्व घाशीराम या प्रश्नी तोंड शिवून बसले असताना धंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरले व एका बेवडय़ा श्रीमंताने केलेले दोन खून सहज पचवले जाऊ नयेत म्हणून ते उभे ठाकले आहेत. पुण्याला वाळवी लागली आहे व अजित पवारांसारखे लोक त्या वाळवीचे किडे आहेत. पुण्यात बिल्डरांचे राज्य त्यांनीच निर्माण केले अशी जळजळीत टीका ठाकरे गटाने अजित पवारांवर केली आहे.

IPL 2024 Awards : नारायण ते कोहली .. कोणत्या खेळाडूला कोणता अवॉर्ड मिळाला? पहा Full List

IPL 2024 Awards

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर आयपीएल 2024 ची सांगता झाली. श्रेयश अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैद्राबादचा पराभव करत आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. सुरुवातीला २ बळी घेत हैद्राबादला बॅकफूटवर ढकलणाऱ्या मिचेल स्टार्कला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले तर आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासून गोलंदाजांवर तुटून पडणारा आणि घातक फिरकीने फलंदाजांना बांधून ठेवणारा अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणला प्लेयर ऑफ द टूर्नामेन्ट पुरस्कार जाहीर (IPL 2024 Awards) करण्यात आला. याशिवाय यंदाच्या आयपीएल मध्ये आपल्या दमदार कामगिरीने सर्वांची मने जिंकणाऱ्या इतर खेळाडूंनाही अनेक पुरस्कार मिळाले. आयपीएल 2024 च्या पुरस्कार यादीवर एक नजर टाकूया-

कोणाला कोणता अवॉर्ड मिळाला – IPL 2024 Awards

विजेता संघ – कोलकाता नाईट रायडर्स- 20 कोटी रुपये
उपविजेते – सनरायझर्स हैदराबाद- 12.5 कोटी रुपये
फॅन्टसी प्लेयर ऑफ द सीझन- सुनील नरेन – 10 लाख
इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन- नितीश रेड्डी- 10 लाख
सर्वोत्तम स्ट्राइक रेट- जेक फ्रेझर-मॅकगर्क- 10 लाख
कॅच ऑफ द सीझन- रमणदीप सिंग,- 10 लाख
सर्वाधिक चौकार – ट्रेव्हिस हेड – 10 लाख
सार्वधिक षटकार – अभिषेक शर्मा – 10 लाख
फेअर प्ले अवॉर्ड- सनरायझर्स हैदराबाद- 10 लाख
पर्पल कॅप – हर्षल पटेल-10 लाख
ऑरेंज कॅप – विराट कोहली- 10 लाख
खेळपट्टी आणि मैदानी पारितोषिक – हैदराबाद, -50 लाख रुपये.

दरम्यान, कालच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी कोलकात्यासमोर सफशेल नांगी टाकली. सलामीवीर ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा अवघ्या ६ धावांतच तंबूत परतल्याने सुरुवातीला हैद्राबादचा संघ बॅकफूटवर गेला. २० षटकात हैदराबादला अवघ्या ११३ धावाच करता आल्या. केकेआरने हे आव्हान अवघ्या १० षटकात गाठलं. रहमतुल्ला गुरबाजने ३२ चेंडूत ३९ धावा केल्या तर व्यंकटेश अय्यरने २६ चेंडूत ५२ धावा केल्या. या विजयाने कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा बहुमान (IPL 2024 Awards) पटकावला.

Home Remedies For Itchy Scalp | उन्हाळ्यात केसात कोंडा आणि खाज सुटत असेल; तर ‘या’ 5 घरगुती उपायांनी मिळावा सुटका

Home Remedies For Itchy Scalp

Home Remedies For Itchy Scalp | उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या आरोग्याला अनेक समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर त्वचा आणि केसा संबंधित देखील समस्या निर्माण होतात. उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये केसांमध्ये खाज सुटणे हा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. तुमच्या केसांना देखील खूप खास सुटत असेल किंवा केस गळत असतील, तर आज आम्ही तुम्हाला यावर काही उपाय सांगणार आहोत. ज्या उपायांचा अवलंब करून तुम्ही केवळ केस गळतीचा नाही तर कोंडा देखील दूर करू शकता. आता या सगळ्या गोष्टींची माहिती आपण जाणून घेऊया.

कांद्याचा रस |  Home Remedies For Itchy Scalp

डोक्यातील खाज दूर करण्यासाठी, त्याचप्रमाणे केस गळती थांबवण्यासाठी कांद्याचा वापर फायदेशीर असतो. तुम्ही जर कांद्याचा रस करून तो तुमच्या केसांमध्ये लावला. आणि बोटाच्या साहाय्याने मसाज केला, तर त्यानंतर तुमची केस गळती देखील कमी होईल. त्याचप्रमाणे केसांना खास देखील सुटणार नाही.

कडुनिंब आणि हिबिस्कस रेसिपी

डोक्याची खाज थांबवण्यासाठी कडुलिंब आणि हिबिस्कसची दोन्ही पाने 250 ग्रॅम घ्या आणि 500 ​​ग्रॅम पाण्यात उकळा आणि पाणी अर्धे कमी करा. याने तुम्ही तुमचे केस धुवू शकता. अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी युक्त हे पाणी डोक्याची खाज दूर करेल आणि केसांच्या वाढीसाठी देखील फायदेशीर ठरेल.

खोबरेल तेल आणि कापूर

खोबरेल तेलात कापूर मिसळूनही टाळूच्या खाज सुटू शकतात. आठवड्यातून दोनदा मसाज केल्यावर खाज हळूहळू दूर होत आहे आणि केसही निरोगी होतात. कापूरच्या मदतीने स्कॅल्प इन्फेक्शन देखील दूर केले जाऊ शकते.

दह्याचा वापर

दह्यामध्ये अनेक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात. याने टाळूला मसाज केल्यास खाज सुटतेच पण केसही चमकदार होतात.

पांढरे व्हिनेगर |  Home Remedies For Itchy Scalp

डोक्यातील खाज दूर करण्यासाठी तुम्ही व्हाईट व्हिनेगर देखील वापरू शकता. यासाठी तुम्हाला 10-15 मिली व्हिनेगर घ्यायचे आहे, ते एक लिटर पाण्यात मिसळून केस धुवावे लागतील. जर तीव्र खाज येत असेल तर तुम्ही हे पाणी केसांवर काही काळ सोडू शकता.

KKR च्या विजयानंतर गौतम गंभीरची खास पोस्ट; चर्चाना उधाण

Gautam Gambhir KKR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) सनरायजर्स हैद्राबादचा दारुण पराभव करत ट्रॉफीवर आपलं नाव कोरल. कर्णधार श्रेयश अय्यरचे कल्पक नेतृत्व आणि मेंटॉर गौतम गंभीरचे (Gautam Gambhir) मार्गदर्शन कोलकात्यासाठी महत्वाचे ठरले. या विजयानंतर मध्यरात्री गौतम गंभीरने सोशल मीडियावर एक खास अशी पोस्ट शेअर केली ज्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे. गंभीरची ही पोस्ट म्हणजे एक श्लोक आहे परंतु त्याने या पोस्टमधून खूप काही सांगायचा प्रयत्न केला आहे.

काय आहे गंभीरची पोस्ट –

गौतम गंभीरने X वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये “ज्याचे विचार आणि हालचाली सत्याच्या आहेत, त्याचा रथ आजही श्री कृष्ण चालवतो असं गंभीर म्हणाला. विशेष म्हणजे ही पोस्ट गंभीरने मध्यरात्री 2.33 वाजता शेअर केली. आता गंभीरला या वाक्यातून नक्की काय म्हणायचंय? गंभीरने ही पोस्ट कुणासाठी टाकली आहे? अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. मात्र गंभीरच्या या पोस्टवर जगभरातून चाहते कमेंटद्वारे कौतुक करत आहे.

KKR साठी गंभीर पुन्हा ठरला लकी –

दरम्यान, यापूर्वी गौतम गंभीरच्याच नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने २०१२ आणि २०१४ ला आयपीएल ट्रॉफी जिंकली होती… त्यानंतर आता १० वर्षांनी आयपीएल जिंकण्यात कोलकाताला यश आले. गौतम गंभीरला यंदा केकेआरने टीमचा मेंटॉर केलं आणि पुन्हा एकदा कोलकात्याची नशीब फळफळले… गौतम गंभीरने सुनील नारायणला पुन्हा एकदा सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय मोठा मास्टरस्ट्रोकी ठरला. नारायणने 15 सामन्यात 488 धावा केल्या. यामध्ये 1 शतक आणि 3 अर्धशतके त्याने झळकावली. सुनील नारायण हा यंदाच्या आयपीएल मधील प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ सुद्धा ठरला.

Benefits Of Lassi | उन्हाळ्यात लस्सी पिल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे; जाणून घ्या गुणधर्म

Benefits Of Lassi

Benefits Of Lassi | आज-काल मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत आहे. मे महिना संपत आलेला आहे, तरी देखील उष्णता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अशावेळी अनेक लोक तहान लागल्यावर शीतपेय किंवा अनेक एनर्जी ड्रिंक्स पित असतात. उन्हाळ्यामध्ये खूप कमी लोक लस्सी पितात. कारण अनेकांना ही लस्सी आवडत नाही. लस्सी घरी सहज बनवली जाते आणि आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असते. उन्हाळ्यामध्ये आपण जर लस्सी पिली, तर आपल्याला थंड देखील वाटेल. आणि आपल्या आरोग्याला देखील खूप फायदे होतील. लस्सी हे एक असे पेय आहे, जे प्रत्येक वयोगटातील माणसाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. लस्सी पिल्याने (Benefits Of Lassi) आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. लस्सी हे एक पंजाबी पेय आहे. पंजाबी लोक जेवणानंतर लस्सी पितात. आता उन्हाळ्यामध्ये जर आपण लस्सी पिली, तर आपल्या आरोग्याला कोणते फायदे होतात हे आपण जाणून घेणार आहोत.

ताजेपणा आणि थंडपणा | Benefits Of Lassi

लस्सी ही दहीचा वापर करून बनवली जाते. त्यामुळे आपल्या शरीराला खूप थंडावा मिळतो. उन्हाळ्यात जर लस्सी पिली, तर आपल्या शरीराला उष्णतेपासून आराम मिळतो आणि ताजेपणा देखील येतो.

पचन सुधारणे

लस्सीमध्ये आढळणारे प्रोबायोटिक्स पचन सुधारण्यास मदत करतात. यामुळे तुमची पचनशक्ती वाढते आणि पोटाशी संबंधित समस्याही कमी होतात.

जीवनसत्त्वे आणि खनिजे स्त्रोत

दही आणि लस्सीमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी सोबत इतर आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जी तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक असतात.

हायड्रेशन

उन्हाळ्यात शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी पिणे खूप गरजेचे आहे. पाण्यासोबत, लस्सीमध्ये पोटॅशियम देखील असते, जे तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

ऊर्जेचा स्रोत | Benefits Of Lassi

लस्सीमध्ये आढळणारी प्रथिने आणि कर्बोदके तुम्हाला ऊर्जा देतात आणि दिवसभराच्या थकवणाऱ्या कामासाठी तयार ठेवतात.

Monsoon Destinations : पावसाळ्यात अनुभवा आनंदयात्रा; राज्यातील ‘ही’ सुंदर ठिकाणे करा एक्स्प्लोर

Monsoon Destinations

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Monsoon Destinations) कडक उन्हाळ्याने सगळेच हैराण झाले आहेत. त्यामुळे सगळेच आ वासून चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने लवकरच राज्यातील तळ कोकणात मान्सून दाखल होणार असे सांगितल्याने एक वेगळाच हर्ष निर्माण झाला आहे. पाऊस येणार म्हटलं की, एक वेगळाच आनंद वाटतो. मातीचा सुगंध आणि बहरणारी हिरवळ हे पावसाचे वैशिट्य. एकंदरीत पावसाळा आला की, वातावरण प्रफुल्लित होते आणि पर्यटकांची पावले आपोआप हिरवाईकडे वळतात.

पावसाळ्यात बरेच लोक मस्त पिकनिक प्लॅन करतात. कुणी राज्यात तर कुणी देशभरातील विविध पर्यटनस्थळी फिरायला जातं. (Monsoon Destinations) तुम्हीही अशी ट्रिप प्लॅन करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी. कारण आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील टॉप ३ पावसाळी पिकनिक स्पॉटची माहिती देणार आहोत. जिथे पावसाळ्यात फिरायला जाणे खरोखरच आल्हाददायी आहे. चला तर जाणून घेऊया.

पाचगणी

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ म्हणजे पाचगणी. पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य प्रचंड वाढते. त्यामुळे पावसाळ्यात इथे येणाऱ्या पर्यटकांची गर्दी मोठी असते. हे एक हिल स्टेशन आहे. (Monsoon Destinations) जे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील पाच टेकड्यांनी वेढलेले आहे. इथे मस्त पावसाळ्यात फिरण्यासारखे बरेच स्पॉट आहेत. यामध्ये टेबल लँड, सिडनी पॉइंट, भिलार फॉल्स, पारसी पॉइंट आणि राजपुरी लेणी या ठिकाणांचा समावेश आहे.

ताम्हिणी घाट

पावसाळ्यात हिरवळ, डोंगर दऱ्या, धबधबे आणि धरणे पाहण्यासारखी असतात. असे अलौकिक नैसर्गिक सौंदर्य अनुभवायचे असेल तर ताम्हिणी घाटात जरूर जा. या घाटातील नैसर्गिक सौंदर्यता कमालीची आहे. (Monsoon Destinations) पावसाळ्यात येथील मनमोहक दृश्य तुमच्या ट्रीपला आनंदयात्रा बनवतील इतकं नक्की.

इगतपुरी (Monsoon Destinations)

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे ठिकाण देखील पावसाळ्यात फिरण्यासारखे आहे. या भागातील नैसर्गिक सौंदर्य मनाला भावणारे आहे. त्यामुळे जर तुम्ही यंदाच्या पावसाळ्यात ट्रीप काढायच्या तयारीत असाल तर इगतपुरीला नक्की जा. या ठिकाणाच्या आसपास अप्पर वैतरणा धरण, भंडारदरा धरण, सुंदरनारायण गणेश मंदीर, कुलंग, अलंग, मदनगड, कळसूबाई, रतनगड या उत्तुंग डोंगररांगा आहेत. तसेच सांदण दरी, रंधा धबधबादेखील अत्यंत सुंदर स्पॉट आहेत. ज्यांना भेट द्यायला विसरू नका.

Gupteshwar Mahadev Temple : महाभारतातील एक योद्धा ‘या’ प्राचीन शिवमंदिरात आजही करतोय मुक्तीची याचना

Gupteshwar Mahadev Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gupteshwar Mahadev Temple) आपल्या देशात अनेक अद्भुत, प्राचीन तसेच पुरातन मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराची काही ना काही खासियत आहे. प्रत्येक मंदिराचा एक इतिहास आहे. जो अत्यंत अलौकिक आणि प्रभावी आहे. यांपैकी एका मंदिरात आजही महाभारतातील एक योद्धा महादेवाच्या दर्शनासाठी येतो आणि आपल्या मुक्तीची याचना करतो, अशी मान्यता आहे. अर्थात या मंदिराचा थेट महाभारताशी संबंध असल्याचे आढळून येते. हे मंदिर नेमके कोणते आहे? आणि या मंदिरात येणार योद्धा कोण? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

आपल्या भारतात प्राचीन संस्कृती आणि परंपरेल विशेष महत्व आहे. तर ग्रंथ, पुराणांना अनन्य साधारण स्थान आहे. यापैकी एक म्हणजे महाभारत. अनेक युगे लोटली मात्र आजही महाभारताविषयी असणारी जिज्ञासा कमी झालेली नाही ही याची खासियत. (Gupteshwar Mahadev Temple) अशा महाभारतातील एक महान योद्धा आजही आपल्या मुक्तीच्या शोधात आहे. असे म्हटले जाते की, गेल्या ५ हजार वर्षांपासून दररोज न चुकता हा योद्धा पूजा करण्यासाठी आणि आपल्या मुक्तीची प्रार्थना करण्यासाठी एका शिवमंदिरात जातो. याच मंदिराविषयी आपण माहिती घेत आहोत.

महाभारताशी संबंध असणारे शिव मंदिर (Gupteshwar Mahadev Temple)

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या बुऱ्हानपूर जिल्ह्यात असिरगडावर एक शिवमंदिर आहे. हे मंदिर असिरेश्वर वा गुप्तेश्वर नावाचे प्रसिद्ध आहे. हा किल्ला बुऱ्हानपूरच्या उत्तरेस सातपुडा डोंगरांच्या शिखरावर आहे. पुरातत्व विभागाला मिळालेल्या अवशेषांवरून या मंदिराचा थेट रामायण आणि महाभारताशी संबंध असल्याचे सांगितले जाते. या मंदिरात महाभारतातील एक महान योद्धा दररोज न चुकता दर्शनासाठी येतो. हा योद्ध म्हणजे द्रोणाचार्य यांचा पुत्र ‘अश्वत्थामा’.

महादेवाचा परमभक्त – अश्वत्थामा

महाभारतात अनेक शूर तसेच पराक्रमी योद्धे झाले. ज्यामध्ये अश्वत्थामा यांच्या नावाचा समावेश आहे. अश्वत्थामा हा गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र आहे. त्यामुळे अश्वत्थामा हे युद्धशास्त्र आणि शस्त्रास्त्र कलेत पारंगत होते. मुख्य म्हणजे, ते महादेवाचे परम भक्त होते. महाभारतात त्यांनी कौरवांच्या बाजूने लढा दिला. अश्वत्थामाने पांडवांचे मनोबल खच्ची केले. त्यावेळी श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठीरला एक योजना सांगितली. (Gupteshwar Mahadev Temple) त्यानुसार, श्रीकृष्णांनी रणांगणात अश्वत्थामा मारला गेल्याची बातमी पसरवली. द्रोणाचार्यांनी याबाबत युधिष्ठीराला विचारले असता त्याने हे वृत्त खरे असल्याचे सांगितले. महाभारतात अश्वत्थामा नावाचा एक हत्ती होता. त्यामुळे मृत झालेला मानव होता की हत्ती हे मला माहित नाही, असे युधिष्ठिराने सांगितले.

अश्वत्थामा मारला गेल्याचे ऐकताच पिता द्रोणाचार्यांना धक्का बसला आणि पुत्रवियोगाने ते भावूक झाले. याचा फायदा पांचाल पुत्र धृष्टद्युम्न याने घेतला आणि द्रोणाचार्यांचा वध केला. पित्याच्या वधाची वार्ता अश्वत्थामाला समजली आणि त्याने सूड भावनेने पांडव पुत्रांचा वध करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने पांडवांचा संपूर्ण वंश नष्ट करण्यासाठी उत्तरेच्या गर्भात वाढत असलेल्या अभिमन्यू पुत्र परीक्षितालासुद्धा मारण्यासाठी गर्भावर ब्रह्मास्त्र सोडले. (Gupteshwar Mahadev Temple) आपल्या शक्तीचा दुरुपयोग करत असलेल्या अश्वत्थामाला श्रीकृष्णाने श्राप दिला आणि या या शापातून त्याची आजही मुक्तता झालेली नाही.

​श्रीकृष्णाने काय शाप दिला?

गर्भातील परीक्षिताचे रक्षण श्रीकृष्णांनी केली आणि अश्वत्थामाला त्याच्या कृतीचा धडा दिला. श्रीकृष्णांनी अश्वत्थामाला डोक्यावर भळभळती जखम दिली आणि ही जखम बरी करण्यासाठी तो हळद आणि तेल मागत युगानयुगे फिरेल असा शाप दिला. आजही मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात नर्मदा नदीवरील गौरीघाटावर अश्वत्थामा हळद आणि तेल मागत भटकतो, अशी येथील मान्यता आहे. (Gupteshwar Mahadev Temple)

​अश्वत्थामाची मुक्ती याचना

अश्वत्थामा निस्सीम शिवभक्त होता. त्यामुळे श्रीकृष्णांनी दिलेल्या शापातून मुक्ती मिळावी म्हणून तो नियमित महादेवाकडे याचना करण्यासाठी असिरगड येथील मंदिरात सकाळी पूजा करतो. मात्र, कोणालाही ही पूजा कोणी केली? ते दिसत नाही. स्थानिकांच्या मते, श्रीकृष्णांनी दिलेल्या शापामुळे अश्वत्थामा इथे भटकतोय. (Gupteshwar Mahadev Temple) अश्वत्थामा असिरगड किल्ल्यातील तलावात स्नानादी कार्ये उरकून नियमित सकाळी महादेवाच्या पिंडीवर ताजी फुल वाहून निघून जातात, असे म्हटले जाते. गावकऱ्यांपैकी काहींनी अश्वत्थामाला पाहिल्याचे धेंडंखील म्हटले जाते. मात्र, जो अश्वत्थामाला पाहतो त्याचे मानसिक संतुलन बिघडते, असा दावा स्थानिक करतात.

Tan Removal : टॅनिंग जात नाही? तुमच्या किचनमधील ‘हे’ पदार्थ वापरून बघा, त्वचा होईल तेजस्वी

Tan Removal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tan Removal) कडक उन्हात थोडावेळ जरी फिरलो तरी टॅनिंगची समस्या होते. थेट सूर्य किरणांच्या संपर्कात येणारी त्वचा काळी पडते आणि त्वचेचं सगळं तेज निघून जात. त्यामुळे घराबाहेर पडताना शरीर पूर्णपणे झाकण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय सनस्क्रीन, सन क्रीम आणि टॅनिंग रिमूव्हर क्रीम तर आवर्जून वापरण्याचा सल्ला दिला जातो. पण बऱ्याच लोकांना असे ब्युटी प्रोडक्ट्स परवडत नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला असे घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने टॅनिंग चुटकीसरशी गायब होईल.

तुमच्या स्वयंपाक घरात असे बरेच पदार्थ आहेत ज्यांच्या औषधी गुणधर्मांमुळे त्यांचा वापर आयुर्वेदातही केला जातो. (Tan Removal) अशाच काही चमत्कारिक पदार्थांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यांच्या सहाय्याने टॅनिंग आणि हट्टी डाग निघून जातील.

1. बटाटा

​त्वचेवरील टॅनिंग दूर करायचे असेल तर बटाटा एक अत्यंत प्रभावी घरगुती उपाय मानला जातो. यातील कॅटेकोलेज हे एंजाइम आपल्या त्वचेचा रंग उजळण्यास मदत करतो. यासाठी तुम्हाला केवळ बटाट्याची पेस्ट त्वचेवर लावावी लागेल किंवा कापलेला बटाटादेखील त्वचेवर चोळल्यास फायदा होईल.

2. टोमॅटो (Tan Removal)

टोमॅटो लाइकोपीन समृद्ध नैसर्गिक सनस्क्रीन असून युगातील अँटी ऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सच्या नुकसानाशी लढायला मदत करतात. त्यामुळे सूर्य किरणांमुळे टॅन झालेली त्वचा उजळायला मदत होते. उन्हातून घरी येताच काळ्या पडलेल्या त्वचेवर टोमॅटो लावा आणि २० मिनिटे तसेच राहू द्या. टॅनिंग लगेच कमी होईल.

3. कच्च दूध

टॅनिंग दूर करण्यासाठी कच्चे दूध अत्यंत फायदेशीर ठरते. (Tan Removal) यामध्ये हळद आणि लिंबाचा रस घातल्यास आणखी फायदा होतो. हे तिन्ही पदार्थ एकत्र केल्यास नैसर्गिक टॅन रिमूव्हर तयार होतो. ज्यामुळे त्वचेचे तेज परत मिळवता येते.

4. हळद आणि बेसन

घरच्या घरी टॅनिंग काढायचे असेल तर हळद, गुलाबपाणी, कच्चे दूध दोन आणि बेसन एकत्र मिसळून ही पेस्ट टॅन झालेल्या भागावर लावा. हा पॅक संपल्यानंतर त्वचा पाण्याने धुवून स्वच्छ करा. त्वचा उजळ होईपर्यंत या पॅकचा वापर दार दुसऱ्या दिवशी करा. आठवड्याभरात फरक दिसून येईल.

5. हळद आणि दही

घरातल्या घरात टॅनिंग काढायचे असेल तर हळद आणि दह्याचे मिश्रण त्वचेवर लावा. (Tan Removal) या पॅकच्या वापराने त्वचेची चमक वाढेल आणि फ्री रॅडिकल्सपासूनदेखील संरक्षण मिळेल.

Gut Health : आतड्यांचे आरोग्य जपतील ‘हे’ 5 पदार्थ; पचनसंस्थाही राहील मजबूत

Gut Health

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gut Health) सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल तर तुम्हाला तुमची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण काय खातो याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे बिघडत्या जीवनशैलीचा प्रभाव तुमच्या खाण्यापिण्यावर पडणार नाही याची काळजी घ्या. भूक मारणे, उपाशी राहणे, अवेळी खाणे, चुकीचे अन्न पदार्थ खाणे यामुळे तुमच्या पोटाचे आरोग्य बिघडत असते. खास करून आतड्यांच्या कार्यात अडथळा आल्यास पचनक्रिया बिघडू शकते.

(Gut Health) आतड्यांचे आरोग्य सुव्यवस्थित असेल तर पोटाच्या समस्या होत नाहीत. पण जर आपण आपल्या खाण्याकडे व्यवस्थित लक्ष दिले नाही तर मात्र आतड्यांचे नुकसान होऊ शकते. ज्यामुळे गंभीर आजारपण येऊ शकते. असे होऊ नये यासाठी काही पदार्थ आपल्या आहारात असणे गरजेचे आहे. हे पदार्थ कोणते? याविषयी जाणून घेऊया.

1. ताक

ताक हे पेय प्रोबायोटिक असल्याने आतड्यांचे कार्य सुरळीत करण्यास मदत करते. आतड्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी चांगल्या बॅक्टेरियाला प्रोत्साहन द्यावे लागते, हे काम ताकातील प्रोबायोटिक्स करतात. (Gut Health) तसेच आतड्यांमध्ये असलेले बॅक्टेरिया संतुलित ठेवण्यास मदत करतात. यामुळे आतड्यांचे कार्य नीट चालते आणि पचनक्रिया सुरळीत चालते.

2. तूप

तुपामध्ये ब्युटीरिक ॲसिड असते जे एक शॉर्ट- चेन फॅटी ॲसिड आहे. यामुळे आतड्याच्या आतील पेशींना पोषण मिळते आणि पचन क्रियेतील जळजळ कमी होते. परिणामी आतड्यांसंबंधीच्या समस्या दूर होतात आणि एकंदरीत पचनक्रिया सुधारते.

3. आलं (Gut Health)

आल्यामध्ये पचनक्रिया सुरळीत करतील असे काही घटक असतात. त्यामुळे आल्याचे ओल्या किंवा कोरड्या स्वरूपात सेवन करता येते. आल्यामुळे मळमळ वाटणे, स्नायू दुखणे, खोकला- सर्दी, अतिरिक्त चरबी, अपचन, जळजळ या समस्या दूर होतात. आळ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स आतड्यांतील जळजळ कमी करतात. यामुळे आतड्यांचे नुकसान टळते.

4. खडी साखर

खडी साखरेत रासायनिक पदार्थ नसतात. ज्यामुळे खाडी साखर शुद्ध मानली जाते. (Gut Health) खडी साखरेचे सेवन केल्यास लठ्ठपणा, कमकुवत प्रतिकारशक्ती यासह आतड्यांच्या समस्या दूर होतात. परिणामी पचनक्रिया सुरळीत राहते आणि पोटाच्या समस्या होत नाहीत.

5. जिरे, धणे आणि बडीशेपचा चहा

जिरे, धणे आणि बडीशेप हे तिन्ही पदार्थ विविध औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत. हे तिन्ही पदार्थ एकत्र वापरून बनवलेला गुणकारी चहा हा पोटाशी संबंधित समस्यांवर प्रभावी काम करतो. (Gut Health) गॅस, अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर करून आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी हा चहा मदत करतो.