Thursday, December 25, 2025
Home Blog Page 728

ससूनमधील डॉक्टरच नव्हे, तर अनेकांनी आपलं ईमान विकलंय; धंगेकरांच्या आरोपाने खळबळ

Ravindra Dhangekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुण्यामध्ये अल्पवयीन मुलांकडून झालेल्या अपघात प्रकरणात (Pune Car Accident) ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ही गैरकृत्य केल्याची बाब उघडकिस आली आहे. अशातच आता काँग्रेसचे कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत धक्कादायक आरोप केले आहेत. या आरोपांमध्ये त्यांनी, “कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघाता वेळी ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले” असे म्हणले आहे. त्यामुळे धंगेकर यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे.

रविंद्र धंगेकर यांनी काय आरोप केले आहेत??

रविंद्र धंगेकर यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हणले आहे की, “पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या 2 डाॕक्टरांना अटक करण्यात आली आहे. ब्लड रिपोर्ट मधे फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.तुम्हाला आम्हाला काही तासात मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये जेव्हा ७ दिवस होऊनही मिळत नव्हते तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत होता. याच ससून मध्ये मयत अश्विनी कोस्टा यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अजून अर्धा तास शवगृहात ठेवा आमची अँब्युलन्स येत आहे,अशी विनंती केली होती. मात्र रुग्णालय प्रशासनाने अर्धा तास वाढवून द्यायला देखील नकार दिला होता. असो,हे वाटतं तेव्हढ सोप्पं नाहीये.त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले आहेत.जे आता हळू हळू जगासमोर येतील.”

दरम्यान, कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणात आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील 2 डॉक्टरांनी रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल केली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळेच डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना पुणे पोलीसांनी अटक केली आहे. या दोन्ही डॉक्टरांना अग्रवाल कुटुंबांने पैशाचे उमेश दाखवले होते. त्यांच्या सांगण्यावरूनच या डॉक्टरांना रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल केली होती. महत्वाचे म्हणजे, विशाल अग्रवाल यांनी अजय तावरेंना फोन केल्याची माहिती कॉल डिटेल्समधून समोर आली आहे. या माहितीच्या आधारावरच पोलिसांनी या दोन्ही डॉक्टरांची चौकशी सुरू केली आहे.

IRCTC Tour Package : फॉरेनचे समुद्रकिनारे विसराल ! IRCTC सोबत भेटी ‘द्या’ भारतातील अप्रतिम बिचेसना

IRCTC Tour Package : फेसाळणारा निळाशार समुद्र …! पांढरी शुभ्र रेती …! नारळाची उंच झाडं असं जरी म्हंटल तरी परदेशातील सुंदर सुंदर समुद्रकिनारे डोळयासमोर येतात. पण तुम्हाला अशाप्रकारचे समुद्र किनारे अनुभवायचे असतील तर परदेशात जाण्याची गरज नाही. तुम्ही भारतातच सुंदर समुद्रकिनाऱ्यांचा अनुभव घेउ शकता. अंदमान हे भारतातील असे ठिकाण आहे, जिथे पोहोचल्यावर तुम्हाला परदेशात असल्यासारखे वाटेल यात शंका नाही. इथले क्रिस्टल क्लीअर पाणी स्वच्छ समुद्रकिनारा, आजूबाजूची हिरवाई आणि पांढरी वाळू तुमची ट्रिप अविस्मरणीय ( IRCTC Tour Package ) करतील यात शंका नाही.

तुम्हाला अंदमान टूर करायची असेल तर तुम्ही IRCTC सोबत ही तर प्लॅन करू शकता. सप्टेंबरमध्ये ( IRCTC Tour Package ) तुम्ही इथे प्रवासाचा आनंद घेऊ शकता, तेही बजेटमध्ये. टूर पॅकेजची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

कसे असेल पॅकेज ?

  • पॅकेज कालावधी- 6 रात्री आणि 7 दिवस
  • प्रवास मोड- फ्लाइट
  • डेस्टिनेशन कव्हर्ड- हॅवलॉक, पोर्ट ब्लेअर
  • तुम्ही कुठे भेट देऊ शकता – भुवनेश्वर
  • तुम्ही कधी प्रवास करू शकाल – 22 सप्टेंबर 2024

काय असतील सुविधा ? ( IRCTC Tour Package )

  1. तुम्हाला राउंड ट्रिपसाठी इकॉनॉमी क्लासचे फ्लाइट तिकीट मिळेल.
  2. राहण्यासाठी हॉटेल सुविधा उपलब्ध असतील.
  3. या टूर पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा उपलब्ध असेल.
  4. तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही मिळेल.

किती येईल खर्च ? ( IRCTC Tour Package )

  1. या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास केल्यास तुम्हाला 71,250 रुपये मोजावे लागतील.
  2. दोन लोकांना प्रवास करायचा असेल तर प्रति व्यक्ती 49,000 रुपये द्यावे लागतील.
  3. तीन लोकांना प्रवास करायचा सेल तर प्रति व्यक्ती 48,585 रुपये शुल्क भरावे लागेल.
  4. तुम्हाला मुलांसोबत प्रवास करायचा असेल तर मुलांसाठी वेगळी फी भरावी लागेल. बेडसाठी (5-11 वर्षे) तुम्हाला 44,795 रुपये द्यावे लागतील आणि बेडशिवाय तुम्हाला 42,015 रुपये द्यावे ( IRCTC Tour Package ) लागतील.

कसे कराल बुकिंग ?

तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला ( IRCTC Tour Package ) भेट देऊ शकता.

Hidden Beach In Mumbai : मुंबईच्या गजबजाटात लपलाय शांत, निवांत समुद्र किनारा; इथे जाताच विसरून जाल टेन्शन

Hidden Beach In Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hidden Beach In Mumbai) मुंबई म्हणजे धावतं शहर. कोणासाठीही आणि कशासाठीही न थांबणाऱ्या मुंबईचे रहिवाशी कायम घड्याळाच्या काट्यावर धावत असतात. रस्त्यावर वाहनांचा गोंगाट आणि मनात अस्वस्थतेचे वादळ घेऊन मुंबईकर सतत गडबडीत दिसतो. अशा धावपळीतून एखादा निवांत क्षण मिळावा असे एखाद्या मुंबईकराला वाटले तर त्यात काही चूक ठरणार नाही. पण हा निवांतपणा मुंबईत मिळणार कुठे? तर आज आम्ही तुम्हाला मुंबईजवळील एका छुप्या समुद्रकिनाऱ्याबद्दल सांगणार होते. जो मुंबईजवळ असूनही अत्यंत शांत आणि निवांत आहे. चला तर या समुद्रकिनाऱ्याविषयी जाणून घेऊया.

कुठे आहे? (Hidden Beach In Mumbai)

मुंबईकरांना निवांतपणा अनुभवायचा असेल मुंबईच्या अगदी जवळ असलेलय कळंब बीचला एकदा जरूर भेट द्या. हा समुद्र किनारा नालासापोरा स्टेशनपासून काही अंतरावर आहे. हे ठिकाण फारसे कुणाला माहित नसल्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या बरीच कमी आहे. मुंबईजवळील अत्यंत सुंदर आणि आकर्षक असा हा समुद्र किनारा नालासोपारा पश्चिम येथील कळंब गावात आहे. कळंब गावाची हद्द संपताच हा समुद्र किनारा सुरु होतो. या किनाऱ्यावर कांदळवन आणि छोटसं सुरुचं बनसुद्धा आहे. जे पहायला फारच सुंदर आहे.

कळंब समुद्र किनाऱ्यावरची वाळू चंदेरी रंगाची आणि समुद्राचे पाणी स्वच्छ निळेशार आहे. (Hidden Beach In Mumbai) हा समुद्र किनारा फिरताना मनावरील ताण आपोआपच हलका होऊ लागतो. एका बाजूला वसईचे दृष्य तर दुसऱ्या बाजूला डहाणू, पालघरचे समुद्र किनारे दिसतात. तसेच या समुद्रकिनाऱ्यावरून सनसेट पाहणे अत्यंत लोभसवाणे आहे.

कसे जाल?

जर तुम्ही शॉर्ट पिकनिकचा विचार करत असाल तर हा बीच फिरायला नक्की जा. नालासोपारा पश्चिम येथील कळंब गावात हा सुंदर समुद्र किनारा आहे. त्यामुळे इथे जाण्यासाठी तुम्हाला पश्चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा रेल्वे स्थानाकात उतरावे लागेल. रेल्वे स्थानकातून पश्चिमेला बाहेर पडल्यानंतर कळंब हे गाव आहे. (Hidden Beach In Mumbai) रेल्वे स्टेशनबाहेरुन कळंब गावात जाण्यासाठी वसई विरार परिहवन सेवा उपलब्ध आहे. शिवाय रिक्षानेदेखील इथे जाता येईल. शिवाय तुमची गाडी असेल तर तुम्ही थेट गाडीने सुद्धा इथे जाऊ शकता.

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातून ‘या’ महिला उमेदवार लोकसभा निवडणूक जिंकतायत; विश्लेषण पाहा

Women MP in maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार…. महिला विरुद्ध महिला… अशी लढत बघायला मिळणारा बारामतीचा एकमेव मतदारसंघ… यंदा राज्यात अनेक दिग्गज महिला नेत्यांनी लोकसभेसाठी नशीब आजमावलं. तर अगदी नवख्या महिला उमेदवारही अगदी तगड्या प्रतिस्पर्ध्याला भिडताना दिसल्या…पण पाचव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर आता निकालाचा अंदाज येऊ लागलाय…म्हणूनच महाराष्ट्रातील किती महिला यंदा लोकसभेत पाहायला मिळतील? कुठल्या महिला घासून तर कुठल्या ठासून खासदार होतायत? त्यामागची नेमकी कारणं काय? याचं सविस्तर विश्लेषण पाहुयात,

महाराष्ट्राचंच नाही तर पुऱ्या देशाच्या नजरा ज्या लढतीकडे लागून राहिल्या आहेत त्या बारामतीतून महिला उमेदवार लोकसभेत जाणार, हे तर फिक्स आहे. फक्त कुठल्या राष्ट्रवादीच्या हा खरा प्रश्न आहे? कारण बारामतीचं मतदान अपेक्षेपेक्षा घासून झालं. असं सरळ साधं समीकरण मांडून कोण जिंकून येईल, हे सांगता येणार नाही. पण शरद पवारांच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट वर्कआउट झाल्याचं अनेक बारामतीकर सांगतायत. त्यामुळे राज्यातील सुप्रिया सुळे सलग चौथ्यांदा बारामतीचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतील याचे जास्त चान्सेस आहेत. महिला प्रश्नांपासून ते अनेक पॉलिसी लेवलच्या डिबेटमध्ये त्या संसदेत सहभागी होत असल्याने महाराष्ट्रातील एक प्रॉमिनंट महिला खासदार म्हणून त्यांची या आधीच ओळख आहे…

आता वळूयात मुंबईकडे. ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी या भाजपच्या हेमंत सावरा यांच्या विरोधात लढत देतायेत. यंदाच्या निवडणुकीत ठाकरे गटात पालघरच्या जागेबाबत कमालीचा आत्मविश्वास होता. विकासाचं राजकारण हा निवडणूक प्रचारातला सेंटर पॉइंट ठेवून भारती कामडी यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं होतं. भूमिपुत्रांचं संरक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी त्यांनी मतदारसंघात बजावलेली भूमिका हे सगळं त्यांना प्लसमध्ये घेऊन गेलं. त्यामुळे ठाकरे गटाचं युवा नेतृत्व भारती कामडी या संसदेत या प्रश्नांवर आपली भूमिका मांडताना दिसल्या. तर आश्चर्य वाटायला नको.

दक्षिण मुंबईमधून शिंदे गटाच्या यामिनी जाधव ठाकरेंच्या अरविंद सावंत यांच्या विरोधात उभ्या असल्या तरी इथे मशालीचं पारड जड दिसतंय. पण उत्तर मध्य मध्ये एक इंटरेस्टिंग फाईट पाहायला मिळतेय. उज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड अशी. अगदी झिरो अव्हरला दोघांचीही उमेदवारी जाहीर झाल्याने प्रचाराला तसा कमी टाईम मिळाला. सरकारी खटल्यांचा निकमांचा चांगला अभ्यास असला तरी आघाडी सरकारच्या काळात मंत्रीपदावर असल्यानं वर्षा गायकवाड यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. त्यात दक्षिण मध्य मध्ये मविआची ताकद आणि ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची लाट असल्याने इथून वर्षा गायकवाड यांची खासदारकी फिक्स समजली जातेय. मुख्यमंत्री शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे आपल्या कल्याणच्या बालेकिल्ल्यातून पुन्हा एकदा हॅट्रिकसाठी मैदानात उतरले होते. त्यांच्याविरोधात ठाकरेंनी अनपेक्षितपणे माजी नगरसेवक वैशाली दरेकर यांना तिकिट देऊ केलं. विकासकामांच्या जोरावर श्रीकांत शिंदे प्लसमध्ये असले तरी मतदानानंतर इथे दोघांनाही फिफ्टी-फिफ्टी चान्स दिसतायेत. म्हणून 4 जूनला कल्याणच्या पुढच्या खासदार वैशाली दरेकर झाल्या, तर आश्चर्य वाटायला नको…

पश्चिम महाराष्ट्रात बारामती सोडता सोलापुरातही महिला उमेदवार आहेत. भाजपच्या राम सातपुते यांच्या विरोधात काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे मैदानात आहेत. ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने इथला दलित आणि मुस्लिम व्होट बँक यंदा काँग्रेसच्या पाठीशी पाहायला मिळाली. सलग दोन टर्म भाजप इथून सरशी मारत असली तरी यंदा प्रणिती शिंदे खासदार होण्याचे चान्सेस वाढलेत. उत्तर महाराष्ट्राकडे पाहिलं तर इथे तब्बल चार महिला उमेदवार होत्या. त्यात जळगावच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांचा मशालीकडून पराभव होईल, असं चित्र आहे. तर दिंडोरीतून अनुभवी खासदार राहिलेल्या भाजपच्या भारती पवार यांच्यापेक्षा तुतारीचा आवाज हा जास्त दिसला…पण नंदुरबारमधून हिना गावित तर रावेरमधून रक्षा खडसे आपली खासदारकी कायम टिकवताना दिसत असल्याने उत्तर महाराष्ट्रातून भाजपच्या दोन महिला खासदार दिसतील, असं सध्या चित्रं आहे…

मराठवाड्यात केवळ दोनच जागांवर महिला उमेदवार उभ्या आहेत. त्यात धाराशिवमध्ये घडलेल्या नाट्यमय घटनाानंतर भाजपचे राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हातात घेऊन मशालीच्या ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात लढत दिली. पण इथे ओमराजे म्हणजेच मशालीचंच पारड जड दिसतय. तर राजकीय पुनर्वसनासाठी बीडमधून पहिल्यांदाच लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या पंकजा मुंडे यांच्यासाठी सुरुवातीला घोडे मैदान सोपं वाटत असताना जातीय समीकरण आणि शरद पवार फॅक्टर यामुळे बजरंग बाप्पा सोनवणे तुतारी वाजवणार, हे जवळपास कन्फर्म समजलं जातंय…

विदर्भातही केवळ तीनच महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यात यवतमाळमधून ठाकरेंच्या संजय देशमुख यांच्या विरोधात शिंदेंनी राजश्री पाटील यांना तिकीट दिलं होतं. पण मशाल इथेही जोरात असल्याने राजश्री पाटील यांच्या जिंकण्याचे चान्सेस कमी आहेत. तर नवनीत राणा यांनी खासदारकीची पहिली टर्म गाजवली असली तरी अमरावतीत वातावरण फिरलय, असं पहिल्या दिवसापासून बोललं जात होतं. त्यामुळे इथे काँग्रेसचे बळवंत वानखडे लीड घेतील, असा एक अंदाज आहे. आता येऊयात शेवटच्या लढतीकडे तर सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर अशी चंद्रपूरची निवडणूक झाली. मुनगंटीवारांसारख्या भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्याला लोकसभेच्या मैदानात उतरवूनही इथं हाताच्या पंजाची प्रेस पाहायला मिळाली. मतदार संघातील काँग्रेसचा मजबूत केडर, महाविकास आघाडीनं एकदिलाने लावलेली ताकद हे सगळं बघितलं तर विदर्भातून दिल्लीत जाणाऱ्या प्रतिभा धानोरकर या एकमेव खासदार असतील, असं इथलं चित्र आहे…

साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर शरद पवार गटाच्या एक, काँग्रेसच्या दोन, भाजपच्या दोन तर ठाकरे गटाच्या दोन खासदार 2024 ला दिल्लीत दिसतील, असं सध्याच्या घडीला सांगता येऊ शकतं. म्हणजेच एकट्या महाराष्ट्रातून सात ते आठ महिला खासदार असतील, असं म्हणायला हरकत नाही… बाकी महाराष्ट्रातल्या कुठल्या महिला उमेदवारांना तुम्हाला संसदेत खासदार होताना पाहायला आवडेल? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

BSF Bharti 2024 | BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत मोठी भरती सुरु, असा करा अर्ज

BSF Bharti 2024

BSF Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता सीमा सुरक्षा दल अंतर्गत (BSF Bharti 2024) एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत 141 जागा भरण्यासाठी पदांनुसार अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 17 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी आता अजिबात उशीर न करता लवकरात लवकर अर्ज भरा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

महत्त्वाची माहिती | BSF Bharti 2024

  • पदाचे नाव – पॅरा मेडिकल स्टाफ, श्रीमती. (कार्यशाळा), पशुवैद्यकीय कर्मचारी, निरीक्षक (ग्रंथपाल)
  • पदसंख्या – 141 जागा
  • वयोमर्यादा – 18 – 30 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –17 जून 2024

पद संख्या

  • पॅरा मेडिकल स्टाफ – 99
  • श्रीमती. (कार्यशाळा) – 37
  • पशुवैद्यकीय कर्मचारी – 03
  • निरीक्षक (ग्रंथपाल) – 02

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • 17 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ; इथे चेक करा आजचे भाव

Gold Price Today 27 may

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सोमवार २७ मे २०२४, बाजाराच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या किमतींनी (Gold Price Today) उच्चांक गाठला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 71711 रुपयांवर व्यवहार करत आहेत. मागील किमतीच्या तुलनेत या दरात 0.46% म्हणजेच 331 रुपयांनी वाढ झाली आहे तर दुसरीकडे चांदी 91895 रुपयांवर व्यवहार करत असून या किमतीत सुद्धा 1.52% म्हणजेच 1374 रुपयांची घसघशीत वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Gold Price Today

आज MCX वर सोन्याचा भाव ७१६५० रुपयांपासून सुरु झाला.. मात्र थोड्याच वेळात हि किंमत (Gold Price Today) ७१७०१ रुपयांवर गेली. त्यानंतर या किंमतही अजूनही वर खाली होत आहेत. सध्या २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 71711 रुपयांवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाईट नुसार, २४ कॅरेट १० ग्राम सोन्याची किंमत ७२२१० रुपये आहे. तर २२ कॅरेट १० ग्राम सोन्याचा ६६६५० रुपये आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या किमतीत प्रचंड चढउतार पाहायला मिळाला त्यामुळे सोने खरेदीदार ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 66,650 रुपये
मुंबई – 66,650 रुपये
नागपूर – 66,650 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 72,710 रूपये
मुंबई – 72,710 रूपये
नागपूर – 72,710 रूपये

Gold Price Today 3 april

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Padmanabhaswamy Temple : पद्मनाभ मंदिराच्या तळघराचे ​सर्पराज करतात रक्षण; अनंतकाळापासून दडलंय एक रहस्य

Padmanabhaswamy Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Padmanabhaswamy Temple) ज्या लोकांना अद्भुत, चमत्कारिक आणि रहस्यमयी गोष्टींमध्ये रस आहे ही बातमी त्यांच्यासाठी नक्कीच खास ठरेल. आपल्या देशात प्राचीन संस्कृती आणि परंपरांचे आजही विविध भागांमध्ये जतन केले जाते. संपूर्ण देशभरात अनेक मंदिरे आहेत. ज्यांपैकी काही मंदिरांमध्ये रहस्य आणि आश्चर्यकारक गूढ दडलेले आहे. त्यापैकी एक म्हणजे तिरुवनंतपूरम येथील पद्मनाभ मंदिर. या मंदिराविषयी तुम्ही आजपर्यंत अनेक गोष्टी ऐकल्या वाचल्या असतील. ज्यामध्ये मंदिराच्या तळघरात दडलेल्या रहस्याचा सुद्धा उल्लेख केलेला असेल. आज आपण याच रहस्याविषयी अधिक माहिती घेणार आहोत.

कोणी बांधले पद्मनाभ मंदिर? (Padmanabhaswamy Temple)

माहितीनुसार, श्रीविष्णूंना समर्पित असलेले श्री पद्मनाभ स्वामी मंदिर हे त्रावणकोरच्या राजांनी ६ व्या शतकात बांधले होते. या घराण्याने आपले जीवन, संपत्ती आणि सर्वस्व या मंदिराला अर्पण केले होते. सन १७५० मध्ये महाराज मार्तंड वर्मा यांनी पद्मनाभ मंदिरावर आपला हक्क सांगितला आणि तेव्हापासून हे घराणे मंदिराचे व्यवस्थापन पाहत आहे. मुख्य म्हणजे, या मंदिराच्या एका कणाचाही वापर ते स्वतःसाठी करत नाहीत. तसेच मंदिरातून बाहेर पडताना आजही ते पाय धुऊन बाहेर पडतात. जेणेकरून मंदिराच्या मातीचा एखादा कण त्याच्यासोबत बाहेर पडू नये.

पद्मनाभ मंदिराच्या तळघराचा रहस्यमयी सातवा दरवाजा

पद्मनाभ मंदिराच्या तळघरात एकूण ७ दरवाजे आहेत.काही वर्षांपूर्वी त्यापैकी ६ दरवाजे खुले करण्यात आले होते. (Padmanabhaswamy Temple) मात्र, सातवा दरवाजा अद्याप बंद आहे. असे म्हटले जाते की, या दरवाजामागे अनेक गूढ, रहस्ये आणि जोखीम आहे. या दरवाजामागे नेमकं असं काय आहे? याविषयी प्रत्येकालाच प्रश्न पडला आहे. त्याविषयी अधिक जाणून घेऊया.

​सर्पराज करतात संरक्षण

पद्मनाभ मंदिराच्या तळघरातील सातवा दरवाजा हा स्टीलचा असून त्याला कुठलीही कडी किंवा कुलूप नाही. या दरवाजावर दोन सापांच्या आकृती रेखाटण्यात आलेल्या आहेत. असे म्हटले जाते की, त्रावणकोरच्या राजांनी अत्युच्च दर्जाची अपार संपत्ती या तळघरात ठेवली आहे. या सातव्या दरवाजाचे संरक्षण २ सर्पराज करतात, असे बोलले जाते. (Padmanabhaswamy Temple) जेव्हा हा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न झाला तेव्हा २ जणांचा सर्पदशांने मृत्यू झाला होता. तेव्हापासून हा दरवाजा खुलल्यास अशुभ घटना घडतील आणि इथला काही भाग शापित आहे, अशी मान्यता आहे.

​नाग पाशम मंत्र

या मंदिराच्या तळघरातील सातवा दरवाजा नाग पाशम मंत्राचा प्रयोग करून बंद करण्यात आला होता, असे म्हटले जाते. तर काहींच्या मते, या दरवाजापाशी कान लावल्यास समुद्राच्या लाटांचा आवाज येतो. (Padmanabhaswamy Temple) हा दरवाजा खुला केल्यास महाप्रलय येऊन मोठे जलमय संकट येऊ शकते, असा दावा केला जातो.

कसा खुलणार हा रहस्यमयी दरवाजा?

पद्मनाभ स्वामी मंदिराच्या तळघरातील सातवा दरवाजा अत्यंत रहस्यमयी असून तो कसा खुलणार याविषयी बोलायचे झाले तर, काही मान्यतांनुसार हा दरवाजा उघडण्यासाठी गरुड मंत्राचे अचूक आणि स्पष्ट उच्चारण होणे आवश्यक आहे. मात्र, आजपर्यंत असा एकही सिद्ध व्यक्ती सापडलेला नाही, जो गरुड मंत्राचे अचूक आणि स्पष्ट उच्चारण करेल. (Padmanabhaswamy Temple) समजा, एखाद्याने गरुड मंत्र अचूक म्हणण्याचा प्रयत्न केला पण तरीही चुकला तर त्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे. अशी अनेक रहस्य या मंदिरात दडलेली असून देशातील सर्वात गुढमय मंदिर म्हणून या मंदिराचा उल्लेख केला जातो.

Trijata In Ramayana : ‘इथे’ पुजली जाते दैत्यकन्या त्रिजटा; तिच्या दैवी शक्तींना घाबरायचा दशानन

Trijata In Ramayana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Trijata In Ramayana) आपल्या भारतात प्राचीन अन पुरातन वास्तू, ग्रंथ तसेच पुराणांचे अनन्य साधारण महत्व आहे. यांपैकी एक म्हणजे रामायण. जे वाल्मीकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य आहे. रामायणाला हिंदू धर्मात एक पवित्र ग्रंथ मानले जाते. यातील रावणाविषयी आपण सारेच जाणतो. दशानन रावण.. म्हणजे क्रूर अन अहंकारी वृत्तीचे उत्तम उदाहरण मानले जाते. भक्तीचा दुरुपयोग करून मिळवलेले अमरत्व त्याने अहंकारात चुका करून घालवले. कुणालाच न घाबरणारा रावण एक व्यक्तीला घाबरत होता. जिचा उल्लेख रामायणात असूनही आपल्यापैकी बरेच जण तिच्याविषयी अनभिज्ञ आहेत. ती व्यक्ती म्हणजे दैत्यकन्या त्रिजटा. ती कोण होती आणि तिला दशानन का घाबरायचा? याविषयी जाणून घेऊया.

कोण होती त्रिजटा? (Trijata In Ramayana)

त्रिजटा ही रावणाचा बंधू विभिषणची मुलगी होती. तरीही तिच्याबद्दल कुणाला फारशी माहिती नाही. विविध भाषांमध्ये लिहिलेल्या रामायणात तिचा उल्लेख आहे. ज्यात सांगितल्याप्रमाणे, विभीषणाची कन्या अतिशय सुंदर होती. राक्षस कुळात जन्म घेऊनही तिच्या मनाचे सौंदर्य विशेष होते. ती फार हुशार होती असेही यात लिहिले आहे. धार्मिक ग्रंथानुसार, जेव्हा माता सीतेने रावणाच्या महालात राहण्यास नकार दिला तेव्हा त्यांची कैद अशोक वाटिकेत केली गेली. यावेळी रावणाने राक्षसांना आपले रक्षक म्हणून नियुक्त केले आणि त्यांना कडक सूचना दिल्या.

त्रिजटा सर्वांमध्ये ज्येष्ठ होती. शिवाय तिचे पिता विभीषण हे श्रीरामाचे भक्त होते. (Trijata In Ramayana) जेव्हा राक्षसांनी माता सीतेला रावणाशी लग्न करण्याची गळ घातली तेव्हा त्रिजटाने मध्यस्थी केली. माता सीतेसोबतच्या वागणुकीबद्दल त्यांनी सहकारी राक्षसांना फटकारले आणि क्षमा मागायला लावली. ग्रंथानुसार, रावण खूप शूर आणि कुणालाही न घाबरणारा होता. मात्र, असे असूनही तो विभीषणाच्या कन्येला म्हणजेच त्रिजटाला घाबरत होता असे म्हटले जाते.

त्रिजटाला का घाबरायचा रावण?

त्रिजटाला शस्त्रे आणि जादुई क्षमतांचे ज्ञान होते. शिवाय तिच्याकडे दैवी शक्तीदेखील होत्या. वरवर सामान्य दिसणारी त्रिजटा दैवी शक्तींमुळे विशेष होती. (Trijata In Ramayana) तिच्या या दैवी शक्तींबाबत रावण जाणून होता आणि म्हणूनच तो तिला घाबरत होता. त्रिजटाच्या तोंडून निघालेलं विधान कायम सत्य होत असे. तसेच ती भगवान विष्णूंवर निस्सीम प्रेम करायची आणि त्यांची पूजा करायची. याबाबत देखील रावणाला माहिती होती. म्हणूनच रावण त्रिजटाला घाबरत असल्याचे सांगितले जाते.

‘इथे’ आहे त्रिजटाचे मंदिर

माता सीता कैदेत असताना त्रिजटाना त्यांची खूप सेवा केली होती. त्यामुळे माता सीतेने त्रिजटाला वरदान दिले होते की, कार्तिक पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तिचीही देवीच्या रूपात पूजा केली जाईल. रावणाचा वध झाल्यानंतर माता सीता परत येताना त्यांनी त्रिजटाला सांगितले की, ती काशीत वसेल आणि तिला एक दिवस देवी म्हणून पुजले जाईल. (Trijata In Ramayana) बनारसमध्ये त्रिजटाचे मंदिर असून इथे कार्तिक पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तिची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, जो कोणी त्रिजटा राक्षसीची पूजा करतो, ती त्यांचे नेहमी रक्षण करते. यामुळे त्रिजटाच्या दर्शनासाठी या दिवशी भाविक मोठी गर्दी करतात आणि विशेष म्हणजे नैवेद्य म्हणून मुळा आणि वांगी अर्पण केली जातात.

SSC Result 2024 : 10 वीचा निकाल 95.81 % लागला, कोकण विभाग अव्वल; यंदाही मुलींची बाजी

SSC Result 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षेचा म्हणजेच दहावीचा निकाल (SSC Result 2024) आज जाहीर झाला आहे. दहावीचा निकाल 95.81 % लागला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.21 टक्के तर मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा 2.65 टक्के ने जास्त लागला आहे. महत्वाची बाब म्हणजे यावर्षी निकालामध्ये कोकण विभागानं बाजी मारली असून नागपूर विभाग मात्र शेवटला फेकला गेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज पत्रकार परिषद घेत दहावीच्या निकालाबाबत माहिती दिली.

विभागनिहाय निकाल– SSC Result 2024

पुणे – 96.44%
नागपुर – 94.73%
संभाजीनगर – 95.19%
मुंबई – 95.83%
कोल्हापूर – 97.45%
अमरावती – 95.58%
नाशिक – 95.28%
लातूर – 95.27%
कोकण – 99.01 %

कसा चेक कराल निकाल –

दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईट दहावीचा निकाल (SSC Result 2024) पाहता येईल. यासाठी खालील संकेतस्थळांचा वापर करा

https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org/

निकाल कसा पाहायचा

दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
त्यानंतर होम पेजवरील दहावीच्या निकालावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुमचे लॉगिन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचे नाव या सगळ्यांची नोंदणी करायची आहे.
हे सगळे केल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.
निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड देखील करता येईल, आणि प्रिंट देखील काढता येईल.

अजित पवार पुण्याला लागलेल्या वाळवीचे किडे; सामनातून हल्लाबोल

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यामधील कल्याणी नगर येथे झालेल्या पोर्शे कारच्या भीषण अपघातामध्ये (Pune Porsche Accident) दोघांना प्राण गमवावा लागल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली. दररोज या अपघातासंदर्भात नवीन अपडेट्स समोर येत आहेत. आता या प्रकरणावरून राजकारण सुद्धा तापलं आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अपघातप्रकरणी तब्बल ६ दिवसांनी प्रतिक्रिया दिल्याने शिवसेना ठाकरे गटाचे अजितदादांवर निशाणा साधला आहे. अजित पवार पुण्याला लागलेल्या वाळवीचे किडे असं म्हणत सामनातून घणाघात करण्यात आलाय.

सामना अग्रलेखात काय म्हंटल?

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे इतक्या मोठय़ा दुर्घटनेनंतरही नेहमीप्रमाणे गायब म्हणजे ‘नॉट रिचेबल’ होते. हा त्यांचा आवडीचा छंद आहे. “मी पुण्याचा पालकमंत्री आहे व मी सांगेन तेच होईल,” असा सुका दम देणाऱया अजित पवारांनी या अपघातानंतर संवेदना व्यक्त करणे सोडाच, पण दोन ओळींचे निषेधपत्रही काढले नव्हते. आता दुर्घटनेनंतर तब्बल सहा दिवसांनी अजित पवारांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ‘कितीही श्रीमंत बापाचा पोरगा असला तरी कारवाई होणारच,’ असे ते म्हणाले. मात्र ‘च’वर जोर देऊन हे सांगायला त्यांनी सहा दिवस का घेतले? या प्रकरणात अगदी सुरुवातीपासून राजकीय हस्तक्षेप दिसून आला असताना असा कुठलाही प्रकार नाही, असा निर्वाळा पुण्याचे पालकमंत्री सहा दिवसांनी का देत आहेत? असा सवाल सामनातून करण्यात आलाय.

पहिल्या दिवसापासून या घटनेकडे आपले लक्ष आहे असा खुलासा करायला त्यांना एक आठवडा लागला यातच सगळे आले. पुण्यात एकंदरीत घाशीराम कोतवालाचेच राज्य पुन्हा अवतरले असून सरकारने त्या घाशीरामी कारभाराची सूत्रे तेथील पोलीस आयुक्तांना दिलेली स्पष्ट दिसतात. ज्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत दारू पिऊन दोन तरुण जिवांचा खून केला तो अल्पवयीन वगैरे अजिबात नाही. त्याचे वय साडेसतरा इतके आहे. म्हणजे तो चांगला सज्ञान आहे. त्याच्यावर प्रौढ म्हणूनच खटला चालायला हवा व ‘निर्भया’ प्रकरणात तेच घडले आहे. पण जोपर्यंत फडणवीस यांचा हस्तक पोलीस आयुक्तपदी बसला आहे तोपर्यंत मृतांना न्याय मिळणार नाही.

धंगेकर यांनी आयुक्तांवर केलेले आरोप गंभीर आहेत. बिल्डरांच्या पाकिटावर आयुक्त काम करतात हा त्यांचा आरोप दुर्लक्षित करता येणार नाही. धंगेकर हे आमदार आहेत व इतर आमदारांप्रमाणे विकत घेतले जातील अशा वर्गात मोडणारे नाहीत. भाजप व अजित पवारांचे सर्व घाशीराम या प्रश्नी तोंड शिवून बसले असताना धंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरले व एका बेवडय़ा श्रीमंताने केलेले दोन खून सहज पचवले जाऊ नयेत म्हणून ते उभे ठाकले आहेत. पुण्याला वाळवी लागली आहे व अजित पवारांसारखे लोक त्या वाळवीचे किडे आहेत. पुण्यात बिल्डरांचे राज्य त्यांनीच निर्माण केले अशी जळजळीत टीका ठाकरे गटाने अजित पवारांवर केली आहे.