हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gut Health) सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल तर तुम्हाला तुमची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण काय खातो याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे बिघडत्या जीवनशैलीचा प्रभाव तुमच्या खाण्यापिण्यावर पडणार नाही याची काळजी घ्या. भूक मारणे, उपाशी राहणे, अवेळी खाणे, चुकीचे अन्न पदार्थ खाणे यामुळे तुमच्या पोटाचे आरोग्य बिघडत असते. खास करून आतड्यांच्या कार्यात अडथळा आल्यास पचनक्रिया बिघडू शकते.
(Gut Health) आतड्यांचे आरोग्य सुव्यवस्थित असेल तर पोटाच्या समस्या होत नाहीत. पण जर आपण आपल्या खाण्याकडे व्यवस्थित लक्ष दिले नाही तर मात्र आतड्यांचे नुकसान होऊ शकते. ज्यामुळे गंभीर आजारपण येऊ शकते. असे होऊ नये यासाठी काही पदार्थ आपल्या आहारात असणे गरजेचे आहे. हे पदार्थ कोणते? याविषयी जाणून घेऊया.
1. ताक
ताक हे पेय प्रोबायोटिक असल्याने आतड्यांचे कार्य सुरळीत करण्यास मदत करते. आतड्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी चांगल्या बॅक्टेरियाला प्रोत्साहन द्यावे लागते, हे काम ताकातील प्रोबायोटिक्स करतात. (Gut Health) तसेच आतड्यांमध्ये असलेले बॅक्टेरिया संतुलित ठेवण्यास मदत करतात. यामुळे आतड्यांचे कार्य नीट चालते आणि पचनक्रिया सुरळीत चालते.
2. तूप
तुपामध्ये ब्युटीरिक ॲसिड असते जे एक शॉर्ट- चेन फॅटी ॲसिड आहे. यामुळे आतड्याच्या आतील पेशींना पोषण मिळते आणि पचन क्रियेतील जळजळ कमी होते. परिणामी आतड्यांसंबंधीच्या समस्या दूर होतात आणि एकंदरीत पचनक्रिया सुधारते.
3. आलं (Gut Health)
आल्यामध्ये पचनक्रिया सुरळीत करतील असे काही घटक असतात. त्यामुळे आल्याचे ओल्या किंवा कोरड्या स्वरूपात सेवन करता येते. आल्यामुळे मळमळ वाटणे, स्नायू दुखणे, खोकला- सर्दी, अतिरिक्त चरबी, अपचन, जळजळ या समस्या दूर होतात. आळ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स आतड्यांतील जळजळ कमी करतात. यामुळे आतड्यांचे नुकसान टळते.
4. खडी साखर
खडी साखरेत रासायनिक पदार्थ नसतात. ज्यामुळे खाडी साखर शुद्ध मानली जाते. (Gut Health) खडी साखरेचे सेवन केल्यास लठ्ठपणा, कमकुवत प्रतिकारशक्ती यासह आतड्यांच्या समस्या दूर होतात. परिणामी पचनक्रिया सुरळीत राहते आणि पोटाच्या समस्या होत नाहीत.
5. जिरे, धणे आणि बडीशेपचा चहा
जिरे, धणे आणि बडीशेप हे तिन्ही पदार्थ विविध औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत. हे तिन्ही पदार्थ एकत्र वापरून बनवलेला गुणकारी चहा हा पोटाशी संबंधित समस्यांवर प्रभावी काम करतो. (Gut Health) गॅस, अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर करून आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी हा चहा मदत करतो.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल चार्जिंग आणि इलेक्ट्रिक गाड्यांच्या चार्जिंगबाबत (Electric Vehicle Charging) नवीन अपडेट आली आहे. आता येत्या काही दिवसात १ मिनिटात मोबाईल चार्ज तर इलेक्ट्रिक गाड्यांच्या चार्जिंग साठी फक्त १० मिनिटे लागतील. तुम्हाला हे वाचून धक्का बसेल किंवा विश्वास बसणार नाही, मात्र भारतीय वंशाचे संशोधक अंकुर गुप्ता आणि त्यांच्या टीमने एक नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे, ज्यामुळे स्विच ऑफ झालेला मोबाईल किंवा इलेक्ट्रिक गाडी फक्त 10 मिनिटांत चार्ज करू शकता.
हे नवीन तंत्रज्ञान ‘प्रोसीडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या अभ्यासात, संशोधकांनी सूक्ष्म छिद्रांच्या जटिल नेटवर्कमध्ये आयन-लहान चार्ज केलेले कणांची हालचाल शोधली. गुप्ता यांच्या मते, ते, या यशामुळे ‘सुपरकॅपेसिटर’सारखी अधिक कार्यक्षम स्टोरेज उपकरणे बनवता येतील. हा शोध केवळ वाहने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये ऊर्जा साठवण्यासाठीच नाही तर पॉवर ग्रिडसाठीही महत्त्वाचा आहे, जेथे ऊर्जेच्या मागणीतील चढ-उतारांमुळे कमी मागणी पूर्ण करण्यासाठी कार्यक्षम साठवण आवश्यक आहे आणि उर्जेची जलद वितरणाची वेळ वाया जाण्यापासून वाचवता येते
ते म्हणाले, सुपरकॅपेसिटर ही ऊर्जा साठवण उपकरणे आहेत जी त्यांच्या छिद्रांमध्ये आयन संग्रहावर अवलंबून असतात. त्यांचा चार्जिंग वेळ जलद आहे आणि त्यांचे आयुष्य देखील बॅटरीपेक्षा जास्त आहे. संशोधकांना असे आढळून आले आहे की सुपरकॅपॅसिटरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा वेग. या अभ्यासापूर्वी, लीटरमध्ये आयनची हालचाल केवळ सरळ छिद्रामध्ये होते असे वर्णन केले गेले होते. तथापि, संशोधकांच्या मते, शोध आता काही मिनिटांत हजारो परस्पर जोडलेल्या छिद्रांच्या जटिल नेटवर्कमध्ये आयन प्रवाहाचे अनुकरण आणि अंदाज सक्षम करते. दरम्यान, सध्या जगभरात अनेक नवनवीन इलेक्ट्रिक गाड्या लाँच होत आहेत, मात्र त्याच्या चार्जिंगसाठी लागणारा वेळ जास्त असल्याने ग्राहकांचा वेळ वाया जातो. अशा परिस्थितीत कमी वेळात अधिक चार्ज होणारे उपकरण आल्यास नागरिकांसाठी तो मोठा दिलासा ठरू शकतो.
Viral Video | आजचा माणूस अंतराळात पोहोचला आहे. तरी देखील समुद्रबाबतची अनेक गूढ त्याला समजू शकले नाही. अजूनही समुद्र तळाशी नक्की काय आहे? याचा शोध मानवाला लागलेला नाही. महासागराचे जग हे आपल्यापेक्षा खूप वेगळे आणि विचित्र असते. जिथे आपल्याला अनेक प्राणी देखील पाहायला मिळतात. काही काही प्राणी तर असे आहेत, जे पाहिल्यावर आपल्याला आश्चर्य वाटते. आज देखील असाच एक प्राणी चर्चेत आलेला आहे. जो ॲनिमेशन चित्रपटासारखा दिसतो. जो प्राणी पाहून लोकांना तो एलियन प्राणी असल्यासारखे वाटू लागलेला आहे. कारण या आधी त्यांनी हा प्रकार कधी समुद्रामध्ये पाहिला नाही. या प्राण्याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल होत असणाऱ्या या व्हिडिओमध्ये प्रशांत महासागराच्या किनारपट्टीचे दृश्य दिसत आहे. जिथे एक प्राणी आलेला आहे. हा एक विचित्र प्राणी म्हणजेच स्पेसिफिक फुटबॉल फिश आहे. हा प्राणी समुद्राच्या खोलवर तळावर आढळतो. या प्राण्याबाबत आता मोठ्या प्रमाणात संशोधन देखील सुरू झालेले आहे
स्थानिक सागरी संग्रहालय सीसाइड एक्वेरियमने फेसबुकवर या प्राण्याबद्दल पोस्ट केले आणि सांगितले की आतापर्यंत असे मोजकेच प्राणी येथे सापडले आहेत. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘2000-3300 फूट उंचीवर संपूर्ण अंधारात राहणारा हा मासा तुम्ही क्वचितच पाहिला असेल.’ ज्यामध्ये न्यूझीलंड, जपान, रशिया, हवाई, इक्वेडोर, चिली आणि कॅलिफोर्निया सारख्या देशांचा समावेश आहे.
स्थानिक सागरी संग्रहालय सीसाइड एक्वेरियमने फेसबुकवर या प्राण्याबद्दल पोस्ट केले आणि सांगितले की आतापर्यंत असे मोजकेच प्राणी येथे सापडले आहेत. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘2000-3300 फूट उंचीवर संपूर्ण अंधारात राहणारा हा मासा तुम्ही क्वचितच पाहिला असेल.’ जग आहेत. ज्यामध्ये न्यूझीलंड, जपान, रशिया, हवाई, इक्वेडोर, चिली आणि कॅलिफोर्निया सारख्या देशांचा समावेश आहे.
या प्राण्याबाबत शास्त्रज्ञांनी सांगितले की, जरी हे प्राणी परजीवीसारखे दिसत असले तरी त्यांच्या नर आणि मादीमध्ये काही फरक नाही. ते स्वत: त्यांच्याशी जोडण्यासाठी महिलांचा शोध घेत असतात. याशिवाय, ते त्यांच्या शिकारला आकर्षित करण्यासाठी त्यांच्या कपाळावर फॉस्फोरेसेंट बल्बमधून चमकणारा प्रकाश वापरतात.
Best Schemes of Modi Government | केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक उत्कृष्ट योजना सुरू केलेल्या आहेत. गोरगरीब कुटुंबांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. त्याचा फायदा देशातील करोडो कुटुंबांना होत आहे. या योजनांचा आधार घेऊन अनेक कुटुंबांनी त्यांची प्रगती देखील केलेली आहे. देशातील नागरिकांसाठी मोदी सरकारने या योजना सुरू केलेल्या आहेत. आता आपण अशा पाच योजनाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या योजना मोदी सरकारने सुरू केल्या आहेत आणि सर्वसामान्य लोकांना याचा खूप चांगला फायदा होत आहे.
प्रधानमंत्री फसल बीमा योजना | Best Schemes of Modi Government
केंद्र सरकारची योजना शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेअंतर्गत देशातील अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते. ज्या शेतकऱ्यांच्या आपण नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेले आहे. यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत सरकार दोन लाख रुपयांपर्यंत संरक्षण देत असते. शेतकऱ्यांना पन्नास टक्के रक्कम भरावी लागते आणि उर्वरित रक्कम सरकार देणार आहे.
उज्वला योजना
देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबांना एलपीजी गॅस कनेक्शन देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. महिलांना स्वयंपाक करताना धुराचा सामना करावा लागतो. त्यांचे हे कष्ट दूर करण्यासाठी सरकारनेही उज्वला गॅस कनेक्शनची योजना सुरू केलेली आहे.
मोफत शिलाई मशीन योजना
महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी मोदी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी शिवण यंत्र सरकारकडून दिली जातात.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना
केंद्र सरकारने 2023 मध्ये कारागीर आणि कारागीरांसाठी ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत देशातील सुतार, सुतार, शिल्पकार, कुंभार समाजातील तरुणांना एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. त्याच वेळी, या कर्जावर सुमारे 5% व्याज भरावे लागेल.
प्रधानमंत्री आवास योजना | Best Schemes of Modi Government
सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत देशातील दुर्बल घटकातील कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना सुमारे 1,30,000 रुपये आणि शहरी भागातील लोकांना सुमारे 1,20,000 रुपयांची मदत मिळते.
MPSC Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची एक सुवर्णसंधी आलेली आहे. आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Bharti 2024) अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघालेल्या आहेत. या पदांसाठी एकूण 48 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 मे 2019 सुरू होण्याची तारीख आहे. तर 10 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी आता लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.
महत्त्वाची माहिती | MPSC Bharti 2024
पदाचे नाव – संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट-अ
पदसंख्या – 48 जागा
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 27 मे 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2024
अर्ज कसा करावा ? | MPSC Bharti 2024
वरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करा 10 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरतील.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद मध्ये आयपीएलचा अंतिम सामना (KKR vs SRH Final) रंगणार आहे. चेन्नई येथील एम चिदंबरम स्टेडियममध्ये आयपीएल फायनलचा थरार रंगणार असून क्रिकेटप्रेमी मोठ्या आतुरतेने या अंतिम सामन्याची वाट बघत आहेत. संध्याकाळी 7:30 वाजता सामना सुरु होणार असून क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा रंगतदार आणि रोमांचक सामन्याची अपेक्षा आहे. आजच्या या अंतिम सामन्यात कोणत्या संघाचे पारडं जड असेल? खेळपट्टी कोणाला साथ देईल? आणि दोन्ही संघाची Playing XI कशी असेल? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात …..
कोणाची ताकद जास्त ? KKR vs SRH Final
दोन्ही संघाचा नीट अभ्यास केल्यास टॉप ऑर्डरची आक्रमक फलंदाजी हीच दोघांची मुख्य ताकद आहे. सनरायजर्स हैद्राबादकडे अभिषेक शर्मा आणि तट्रेव्हिस हेड असे २ आक्रमक सलामीवीर आहेत जे कोणत्याही मैदानावर गोलंदाजाच्या चिंधड्या उडवण्याची क्षमता राखतात. दोन्ही डावखुरे फलंदाज डावाच्या पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांवर तुटून पडलेलं आपण बघितलं आहे. यामुळेच मॅचच्या सुरुवातीपासून प्रतिस्पर्धी संघावर हैद्राबाद वरचढ ठरत आली आहे. मात्र जेव्हा जेव्हा हे दोन्ही सलामीवर लवकर बाद होतात तेव्हा तेव्हा हैद्राबादचा डाव कोसल्याचे सुद्धा आपण बघितलं आहे. या दोघांव्यतिरिक्त एडन माक्रम आणि हेन्री क्लासेन संघाच्या मदतीला आत्तापर्यंत धावून आलेत. तर गोलंदाजीमध्ये कर्णधार पॅट कमिन्स, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार आणि फिरकीपटू शहाबाज अहमद यांच्यावर हैदराबादची भिस्त असेल.
दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सबाबत सांगायचं झाल्यास, केकेआर कडे सुद्धा सुनील नारायण आणि रहमतुल्ला गुरबाज यांच्यारूपाने आक्रमक सलामीवीर आहेत. सुनील नारायण तर कोलकात्याच्या आत्तापर्यंतच्या यशाचा हिरो आहे. पहिल्या चेंडूपासून चौकार- षटकारांची आतषबाजी करत नारायण समोरच्या गोलंदाजांना अक्षरशा घायाळ करत आहे. याशिवाय मधल्या फळीत कर्णधार श्रेयश अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल सारखे फलंदाज संघासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. गोलंदाजीमध्ये मिचेल स्टार्क, वरून चक्रवर्ती, हर्षित राणा आणि सुनील नारायण केकेआरला आणखी मजबूत करतात.
हेड टू हेड निकाल कसाय –
कोलकाता आणि हैदराबाद यांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध 27 आयपीएल सामने खेळले आहेत. त्यापैकी KKR ने 18 जिंकले आहेत तर SRH ने 9 सामन्यात विजय मिळवला आहे. या मोसमात हे दोन्ही संघ दोनदा भिडले.या दोन्ही सामन्यात कोलकात्याच्या हैद्राबादचा पराभव केला आहे.
पीच रिपोर्ट काय सांगतो?
चेपॉक हे नेहमीच त्याच्या संथ खेळपट्टीसाठी ओळखले जाते, जे फिरकीपटू आणि स्लो गोलंदाजांना मदत करते. हैद्राबादकडे शहाबाज अहमद आणि अभिषेक शर्मा असे २ फिरकीपटू आहेत ज्यांनी क्वालिफायर सामन्यात राजस्थान फलंदाजांना रोखलं होते. तर कोलकात्याकडे वरून चक्रवर्ती आणि सुनील नारायण अशी २ मुख्य अस्त्रे आहेत त्यामुळे फिरकीपटूंच्या कामगिरीवर दोन्ही संघाचा विजय अवलंबून असेल. स्पर्धेचा अंतिम टप्पा (KKR vs SRH Final) असल्याने मैदान थोडं संथ झालं असेल. मात्र टिकून फलंदाजी केल्यास मोठी धावसंख्या उभारणे सोप्प होईल.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hyundai IPO) Hyundai Motor India ही भारतातील दुसरी सर्वात मोठी कार उत्पादन कंपनी आहे. जिने आजपर्यंतचा सर्वात मोठा IPO लॉन्च करण्याचे ठरवले आहे. दक्षिण कोरियाची ऑटो कंपनी ह्युंदाई मोटर कंपनीने भारतीय युनिट ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडला बाजारात सूचीबद्ध करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे Hyundai Motor India चा IPO हा आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा IPO नक्कीच ठरू शकतो. माहितीनुसार, या इश्यूच्या माध्यमातून साधारण २५ हजार कोटी ते ३० हजार कोटी रुपये जमवण्याचा कंपनीचा मानस आहे.
सल्लागार म्हणून कोटकी महिंद्रा कॅपिटलची निवड
वृत्तानुसार, भारतीय युनिट ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने IPO लॉन्च करण्यासाठी सल्लागार नेमले आहेत. (Hyundai IPO) ज्यामध्ये कोटक महिंद्रा कॅपिटल आणि मॉर्गन स्टॅनली यांची निवड केल्याचे समजत आहे. या दोन्ही बँका ह्युंदाई इंडियाला IPO लॉन्च करण्यासाठी मदत करणार आहेत. तसेच दक्षिण कोरियाची ह्युंदाई मोटार कंपनी तिच्या भारतीय उपकंपनीच्या IPO साठी मसुदा रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRPH) येत्या जून – जुलैच्या अखेरीस SEBI कडे पाठवणार आहे.
LIC पेक्षा मोठा IPO असणार (Hyundai IPO)
असे सांगितले जात आहे की, ह्युंदाई मोटार इंडियाचा IPO हा एलआयसीपेक्षा मोठा असू शकतो. कारण, एलआयसीच्या IPO ची किंमत २.७ अब्ज डॉलर्स इतकी होती. त्यासमोर आता ह्युंदाई मोटार इंडियाच्या IPO ची किंमत २.५ ते ३ अब्ज डॉलर्स अर्थात भारतीय चलनानुसार २५ हजार ते ३० हजार कोटी रुपये इतकी असू शकते.
मूल्य किती असणार?
या प्रकरणासंबंधित अधिक माहिती देताना काही तज्ञांनी सांगितले आहे की, भारतीय सबसिडरीनुसार उपकंपनीचे मूल्यांकन २० अब्ज डॉलर इतके असू शकते. मात्र, अद्याप याबाबत ठोस सांगू शकत नाही. (Hyundai IPO) त्यामुळे तर्क काढणे घाईचे ठरेल. वृत्तानुसार, IPO चे मूल्य आणि आकार अद्याप निश्चित असा ठरलेला नाही. त्यामुळे ठोस काहीही सांगता येणार नाही.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे हे प्रवासाचे सर्वात उत्तम साधन मानलं जाते. रेल्वेचा प्रवास कमी पैशात होत असल्याने आणि देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचं जाळं पसरलं असल्याने लांबच्या प्रवासासाठी रेल्वे चांगला पर्याय मानला जातो. त्यामुळे दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. तुम्हालाही रेल्वे प्रवास आवडत असेल. मात्र रेल्वे आपल्या प्रवाशांना देत असलेल्या सोयी सुविधेबद्दल सर्वानाच माहिती असेल असं नाही. आज आम्ही तुम्हाला रेल्वेच्या डेस्टिनेशन अलर्ट (Railway Destination Alert) सुविधेबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही बिन्दास्त पणे ट्रेनमध्ये झोपू शकता आणि रेल्वे स्वतःच तुम्हाला तुमचं स्टेशन आलं कि उठवेल.
जेव्हा आपण रायेंट्रीच्या वेळी प्रवास करतो त्यावेळी आपलं स्टेशन चुकण्याची भीती नेहमीच असते. पण, जर तुम्ही रेल्वेच्या डेस्टिनेशन अलर्ट सुविधेचा लाभ घेतला तर तुम्ही शांतपणे झोपू शकता. या सुविधेत, तुमची रेल्वे हि सदर स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच तुमच्या मोबाईलवर अलर्ट मेसेज (Railway Destination Alert) पाठवून तुम्हाला जागे करते जेणेकरून तुम्ही तुमचे स्टेशन चुकवू नये. रेल्वेच्या या सेवेची निवड करणाऱ्या प्रवाशांना स्टेशनवर पोहोचण्याच्या 20 मिनिटे आगोदरचे मोबाईल नंबर वर वेक-अप कॉल किंवा एसएमएस मिळेल. खास बाब म्हणजे यासाठी तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता सुद्धा नाही. मात्र याठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत लांबच्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीच ही सुविधा देण्यात आली आहे.
रेल्वेच्या डेस्टिनेशन अलर्ट सेवेचा लाभ कसा घ्याल- Railway Destination Alert
यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला IRCTC हेल्पलाइन क्रमांक 139 वर कॉल करावा लागेल. याठिकाणी तुम्हाला तुमच्या आवडीची भाषा निवडावी लागेल. ज्याठिकाणी तुम्हाला उतरायचे आहे त्या ठिकाणाची माहिती द्यावी लागेल. यासाठी तुम्हाला 7 नंबर आणि नंतर 2 नंबर दाबावा लागेल. यानंतर तुम्हाला 10 अंकी PNR क्रमांक विचारला जाईल. तो तुम्हाला १ नंबर दाबून कन्फर्म करावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही वेक अप अलार्म सेट करू शकाल. या सेवेसाठी तुम्हाला फक्त 3 रुपये द्यावे लागतील.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Credit Card Application) आजकाल बरेच लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात. क्रेडिट कार्ड म्हणजे काय? तर एक प्रकारचे कर्ज. जे रोख स्वरूपात न मिळता कार्डच्या स्वरूपात मिळते. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर हा अगदी पैशासारखा केला जातो. त्यानंतर महिना अखेरीस खर्च केलेली रक्कम व्याजासहित पार्ट केली जाते. असे हे क्रेडिट कार्ड वापरण्याचे बरेच फायदे आहेत. पण जिथे फायदा तिथे तोटासुद्धा असण्याची शक्यता असते. ज्याविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. आता क्रेडिट कार्ड वापरणे काही कठीण गोष्ट नाही. पण हे विसरून चालत नाही की, क्रेडिट कार्ड हे एकप्रकारे जबाबदारी आहे. जी पार पाडणे आवश्यक असते.
आजच्या घडीला वेगवेगळ्या ऑफर्ससह अनेक क्रेडिट कार्ड बाजारात उपलब्ध आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना नक्कीच चांगल्या आणि अनेक प्रकारच्या सुविधा प्रदान केल्या जात आहेत. (Credit Card Application) त्यामुळे जर तुम्हीही क्रेडिट कार्ड खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यात काही चूक नाही. मात्र, क्रेडिट कार्ड घेताना तुम्हाला कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड घ्यावे याबाबत संभ्रम होऊ शकतो. शिवाय क्रेडिट कार्डची खरेदी करतेवेळी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजचे असते. त्या कोणत्या याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
मासिक खर्चानुसार निवड
क्रेडिट कार्ड खरेदी करताना प्रत्येकाने त्यांच्या मासिक खर्चानुसार कार्ड निवडणे गरजचे असते. (Credit Card Application) तसेच तुम्ही कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड घ्यायला हवे? याचे तुमच्याकडे ठोस कारणसुद्धा असायला हवे. जे तुमच्या गरजेला साजेसे असेल. कारण क्रेडिट कार्ड एक प्रकारचे लोन आहे. जे घेतल्यानंतर फेडणे तुमची जबाबदारी आहे.
आवश्यकता आहे का? (Credit Card Application)
माझ्या मित्राने क्रेडिट कार्ड घेतलं म्हणून मी घेतो हे कोणत्याही प्रकारे सुयोग्य कारण असू शकत नाही. त्यामूळे सर्वप्रथम तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की, तुम्हाला क्रेडिट कार्डची खरोखर आवश्यकता आहे का? तुमची गरज काय आहे? यावर क्रेडिट कार्ड घ्यायचे का नाही हे ठरते. यात मोठी खरेदी करण्यासाठी चांगली क्रेडिट मर्यादा मिळणे, ऑफरचा फायदा घेणे किंवा सुरवातीपासून क्रेडिट वाढवणे अशा कारणांचा समावेश असेल तर क्रेडिट कार्ड नक्की घ्या.
क्रेडिट प्रोफाइल तपासा
जर तुम्ही क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी तुम्ही तुमची क्रेडिट प्रोफाइल तपासा. यावरून तुम्हाला क्रेडिट कार्ड खरेदीसाठी तुमची पात्रता लक्षात येईल. (Credit Card Application) तुमची पात्रता आणि गरज यानुसार क्रेडिट कार्डची तुलना केल्यास तुमचा गोंधळ कमी होईल आणि तुम्ही निश्चित निर्णय घेऊ शकाल.
सुविधांबाबत माहिती घ्या
आजकाल क्रेडिट कार्डसोबत अनेक प्रकारच्या सुविधांचा लाभ मिळतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड घेताना तुमच्या गरजेनुसार सर्वात जवळचे कार्ड निवडा. ज्यामध्ये ऑफर्स आणि इतर चांगल्या सुविधा उपलब्ध असतील. (Credit Card Application) असे केल्यास तुम्ही घेत असलेले क्रेडिट कार्ड तुम्हाला किती फायदा देऊ शकते? याचा अंदाज येईल.
आधी निवड करा मगच अर्ज करा
क्रेडिट कार्ड खरेदीसाठी अर्ज करताना गडबड गोंधळ करू नका. क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायचा आहे हे निश्चित झाल्यास आधी बँकेला भेट द्या. त्याविषयी सर्व माहिती घ्या आणि नंतर बँकेच्या वेबसाइटद्वारे किंवा कोणत्याही तृतीय- पक्षाच्या वेबसाइटद्वारे अर्ज करा. (Credit Card Application) एकंदरच काय की, चांगले क्रेडिट कार्ड निवडा आणि त्यानंतरच अर्ज करा.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटलेल्या पक्षांसोबत महायुती करत त्याला मागून मनसेचं इंजिन जोडून स्वतःच्या पदरात 23 जागा पाडून घ्यायला भाजपाला यश आलं. यामध्ये अनेक विद्यमान खासदारांसोबत नवीन चेहरेही मैदानात होते. दहा वर्षात सत्तेत असणारी भाजपची कारकीर्द महाराष्ट्राच्या पचनी पडली आहे का? याचा निकालच जनता 4 तारखेला देणार आहे. फोडाफोडीच्या राजकारणाचा शिंदे गट आणि अजित पवार गट यांना लोकसभेला फटका बसल्याच्या चर्चा असताना सत्ताधारी भाजप महाराष्ट्रात किती जागांवर निवडून येतोय? भाजपच्या कोणत्या दिग्गजांना लोकसभेत पराभवाचा धक्का बसतोय? तेच सविस्तर पाहूयात,
पहिला मतदारसंघ येतो तो नागपूरचा…आरएसएसचं मेन सेंटर, भाजपचं होम ग्राउंड आणि देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या राजकारणातील स्थानामुळे नागपूरमध्ये भाजपला नेहमीच एक हात जास्तीचा मिळतो. म्हणूनच काँग्रेसच्या विकास ठाकरेंच्या विरोधात यंदाही नितीन गडकरी मोठं लीड घेतील, असं बोलले जातंय…दुसरा मतदारसंघ आहे भंडारा-गोंदियाचा…इथले भाजपचे स्टॅंडिंग खासदार सुनील मेंढे असले तरी काँग्रेसचा या मतदारसंघातील केडर बराच स्ट्रॉंग आहे. त्यामुळे भाजपच्या सुनील मेंढें आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यातील लढत घासून झाली. सुनील मेंढे यांच्या विरोधात अँटी इन्कमबन्सी असली तरी देखील भाजपने लावलेली ताकद पाहता निसटत्या हाताने का होईना पण मेंढे जिंकतील, असं बोललं जातंय…
तिसरा मतदारसंघ आहे चंद्रपूरचा…विदर्भातल्या या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलय. कारण इथे काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार रिंगणात उतरले होते. बाळू धानोरकर यांच्या विषयीची सहानुभूतीची लाट, मतदारसंघात रुजलेला काँग्रेसी विचार, मोदींचा गायब झालेला करिष्मा हे सगळं चंद्रपुरात काँग्रेसच्या पथ्यावर पडणार होतं. त्यात मुनगंटीवारांकडून करण्यात आलेल्या विखारी प्रचार त्यांच्यावरच बूमरँग झाल्याने चंद्रपुरात या बड्या नेत्याला धक्का बसत पंजा फिक्स असं सध्या वातावरण आहे. चौथा मतदारसंघ आहे गडचिरोली – चिमूर भाजपचे स्टॅंडिंग खासदार अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे संजय किरसान यांच्यातील ही लढत. अनुसूचित जमातीसाठी राखीव असणारा हा मतदारसंघ भाजपासाठी वन साईड होता. मात्र आदिवासी, दलित आणि अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यांना हात घालत प्रचारात काँग्रेसने आघाडी घेतली होती. त्यामूळे गडचिरोलीची लढत तुल्यबळ झाली. मात्र पक्षीय बलाबल आणि कागदावरचं गणित भाजपच्या बाजूने असल्याने अशोक नेते यांच्या बाजूने निकाल जाऊ शकतो.
पाचवा मतदारसंघ आहे अमरावतीचा…काँग्रेसकडून बळवंत वानखेडे विरुद्ध भाजपकडून नवनीत राणा अशी ही इंटरेस्टिंग लढत पाहायला मिळाली. प्रहारच्या दिनेश बुब यांनी या लढतीला आणखीनच कडवं बनवलं. राणा या मतदारसंघातील प्रॉमिनंट चेहरा असल्या तरी प्रचाराच्या सुरुवातीपासूनच वातावरण काँग्रेसच्या बाजूने होतं. त्यात वंचित, आनंदराज आंबेडकर यांच्या एक्झिटमुळे मत विभाजनाचा भाजपला बसू शकणारा संभाव्य फटका टळला. याउलट प्रहारने राणांच्या पारड्यातील मतं आपल्या बाजूला घेतल्याने अमरावतीत यंदा बळवंत वानखेडे निवडून येतील, अशी चर्चा आहे. सहावा मतदारसंघ आहे अकोल्याचा…भाजपकडून अनुप धोत्रे, काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचितकडून स्वतः प्रकाश आंबेडकर इथून मैदानात होते. अकोल्यात वंचितची हक्काची वोट बँक असल्याने अभय पाटील आणि आंबेडकर यांच्यात मोठ्या प्रमाणावरील मत विभाजन यंदाही पाहायला मिळेल. दोघांची भांडण तिसऱ्याचा लाभ असं जे काही चित्र 2019 ला पाहायला मिळालं अगदी तशीच सेम टू सेम परिस्थिती असल्यामुळे भाजपच्या अनुप धोत्रे यांच्या विजयाचा मार्ग इथे सोपं झालंय…
सातवा मतदारसंघ आहे वर्धा… वर्ध्यात कमळ विरुद्ध तुतारी अशी लढत झाली. भाजपचे स्टॅंडिंग खासदार रामदास तडस विरुद्ध शरद पवार गटाचे अमर काळे यांच्यात प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसापर्यंत बरंच घमासान झालं. शरद पवारांनीही अमर काळेंसाठी बरीच फिल्डिंग लावली. पण जातीय समीकरण, महायुतीची मतदार संघातील ताकद आणि बूथ मॅनेजमेंट यामुळे वर्ध्यात पुन्हा एकदा कमळ दिसणार, असं चित्र आहे…आठवा मतदारसंघ आहे तो नांदेडचा…भाजपचे स्टॅंडिंग खासदार प्रतापराव चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण अशी ही लढत झाली. चिखलीकर यांच्या स्वतःच्या अशा एक इमेजसोबत भाजपचा बॅकअप चांगला लागल्याने नांदेडमध्येही पुन्हा एकदा कमळच फुलण्याचे चान्सेस जास्त आहेत.
नववा मतदारसंघ आहे. तो साताऱ्याचा… छत्रपती उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात जास्त अटीतटीची लढत झाली. साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत शरद पवार विरुद्ध उदयनराजेच एकमेकांच्या विरोधात होते. तेव्हा श्रीनिवास पाटलांना पुढे करत अजितदादांनी उदयनराजेंना धक्का दिला. यंदाही तिकीट मिळवण्यासाठी लागलेला वेळ आणि शशिकांत शिंदेंनी शरद पवारांना सोबत घेत केलेला वादळी प्रचार यामुळे साताऱ्यात तुतारी वाजणार, हे जवळपास प्रत्येकाच्या तोंडी आहे…दहावा मतदारसंघ आहे माढाचा…माढा हा तसा भाजपसाठी यंदा सोपा गड समजला जात होता. पण धैर्यशील मोहितेंनी तुतारी हाती घेतल्यानंतर मतदारसंघातील समीकरण बदललं. रणजितसिंह नाईक निंबाळकरांना बळ देण्यासाठी मोदींपासून ते फडणवीसांपर्यंत सर्वांनी सभा घेतल्या. पण मतदारसंघातील मोहित्यांचे प्रस्थ त्याला मिळालेली शरद पवारांच्या सहानुभूतीची लाट यामुळे माढ्यात तुतारी फिक्स वाजतेय, असा अंदाज आहे.
अकरावा मतदारसंघ आहे सोलापूरचा.. भाजपकडून राम सातपुते तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे हे दोन्ही नवखे चेहरे लोकसभेसाठी देण्यात आले होते. अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात गेली दोन टर्म भाजपचा दबदबा असला तरी यंदा वार फिरलं होतं. दलित, मुस्लिम मतं आणि मोहितेंमुळे मराठा मतं शिंदेंच्या बाजूने झुकल्याने सोलापुरात यंदा काँग्रेसला अप्पर हँड होता. त्यात सातपुतेंच्या प्रखर हिंदुत्वाचा मोठा इम्पॅक्ट सोलापुरात पाहायला मिळालं नाही. त्यामुळे सोलापुरात पंजा जिंकतोय, अशी परिस्थिती निर्माण झालीय…बारावा मतदारसंघ आहे सांगलीचा…सांगलीत संजय काका पाटील यांच्या विरोधात अँटी इनकंबनसी होती. त्यामुळे काँग्रेसला इथून निवडून येण्याची फुल शॉरिटी होती. पण चंद्रहार पाटलांच्या हाती मशाल देत ठाकरेंनी सांगली प्रतिष्ठेची केली. त्यामुळे विशाल पाटलांनी केलेले बंड, वंचितनं दिलेली त्यांना साथ आणि नो मशाल ओन्ली विशाल हा संपूर्ण प्रचारात दिली जाणारी घोषणा पाहता विशाल मशाल विझवत इथं खासदार होतील, असं प्रत्येकाचंच म्हणणं आहे.
तेरावा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्गचा…नारायण राणेंच्या विरोधात ठाकरेंचे विनायक राऊत मैदानात असल्याने इथला निकाल काय लागेल याची पुऱ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली आहे. राज ठाकरेंपासून ते शिंदेंच्या नेत्यांनी राणेंसाठी जीवतोड मेहनत घेतली असली तरी ठाकरेंचा बाजूने असणारा सायलंट व्होटर आणि महाविकास आघाडीने लावलेली ताकद पाहता विनायक राऊतांची मशाल आघाडी मिळवेल, असा अंदाज आहे…चौदावा मतदारसंघ आहे रावेरचा…रक्षा खडसे विरुद्ध शरद पवार गटाचे श्रीराम पवार यांच्यात इथून लढत झाली. एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपवासी झाल्याने तुतारी इथून बॅकफुटला गेली. श्रीराम पाटील यांच्यासाठी राजकारण नवं कोरं असल्यानं त्यांनी त्यांच्या परीने प्रचारात जीव ओतला होता. पण जातीय समीकरण, नाथाभाऊ यांचे सर्व पक्षीय नेत्यांशी असणारे संबंध आणि भाजपचं केडर पाहता रक्षा खडसे सलग तिसऱ्यांदा खासदार होतील, असं बोललं जातंय…
पंधरावा मतदारसंघ आहे जळगावचा…उन्मेष पाटील यांच्या खेळीने ठाकरेंना करण पवार हा आयात उमेदवार मिळाला तर भाजपने स्मिता वाघ यांना मैदानात उतरवलं. भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असल्याने जळगाव भाजपासाठी सेफ समजला जात होता. पण केळी आणि शेती प्रश्नावरून तयार केलेलं वातावरण, उन्मेष पाटील यांनी केलेल्या कामांचा सातबारा आणि महाविकास आघाडीने दाखवलेली एकजूट यामुळे जळगावात मशालीचे निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत. सोळावा मतदारसंघ आहे जालन्याचा…आपल्या सलग सहाव्या टर्मसाठी रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्या विरोधात लोकसभेला दंड थोपटले. मराठा आरक्षण हा जालन्याच्या संपूर्ण प्रचारातील ज्वलंत मुद्दा राहिला. दानवे यांच्या विरोधात मतदारसंघात यंदा बरीच नाराजी होती. पण या नाराजीचं आपल्या बाजूने कन्वर्जन करायला कल्याण काळे यांना म्हणावं असं यश येताना दिसलं नाही. मराठा मतांच्या विभाजनामुळे याचा फायदा दानवेंच्या पथ्यावर यंदाही पडतोय, असं चित्रं आहे.
सतरावा मतदारसंघ आहे पुण्याचा…भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर वंचितकडून वसंत मोरे अशी झालेली ही लढत…भाजपचा बालेकिल्ला, स्ट्रॉंग केडर, शहरी मतदान, आमदारांची पाठीशी असणारी संख्या हे सगळं मोहोळांना पुण्यातून प्लसमध्ये ठेवणारं होतं. पण धंगेकरांची ताकदही इथ जोरात होती. कसब्याच्या पोटनिवडणुकीमुळे जायंट किलर ठरलेल्या रवींद्र धंगेकर यांनी इथे भाजपला कडवी टक्कर दिली. पण अगदी निसटत्या मतांनी मोहोळ इथून विजयी होतील, अशी परिस्थिती आहे. अठरावा मतदारसंघ आहे अहमदनगरचा…भाजपने 2024 लाही सुजय विखे यांनाच तिकीट रिपीट केल्यानं इथली स्थानिक समीकरण फिरली. शरद पवारांनी पवार गटात नाराज असलेल्या निलेश लंकेंना गळाला लावत त्यांच्या हातात तुतारी देत नगरची लढत रेसमध्ये आणली. पक्षांतर्गत नाराजीचा फटका यंदा विखेंना बसण्याची दाट शक्यता होती. तसेच लंके यांचं ग्राउंड पॉलिटिक्स स्ट्रॉंग असल्याने संपूर्ण प्रचारात ते वरचढ ठरले. त्यामुळे निकालाच्या दिवशीही निलेश लंकेंना नगरमधून अप्पर हॅन्ड मिळेल, अशी मतदारसंघात चर्चा आहे.
एकोणिसावा मतदारसंघ आहे बीडचा…भाजपकडून पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाकडून बजरंग बाप्पा सोनवणे अशी इथली मुख्य लढत झाली. बीड हा मुंडेंचा बालेकिल्ला असला आणि धनंजय मुंडे सोबत असतानाही ही लोकसभा निवडणूक भाजपाला जड गेली. मराठा विरुद्ध वंजारी या कास्ट फॅक्टरवर ही निवडणूक शिफ्ट झाल्याने आणि तुतारीच्या बाजूने असणारी सहानुभूती हे सगळं बजरंग बाप्पांच्या पथ्यावर पडलं. त्यामुळे 4 तारखेला मुंडेंच्या प्रस्थापित राजकारणाला इथून तुतारी मोठा धक्का देऊ शकते…विसावा मतदारसंघ आहे नंदुरबारचा…भाजपकडून हिना गावित विरुद्ध काँग्रेसकडून गोवाल पाडवी अशी इथली लढत झाली. एसटी प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात भाजप बरीच स्ट्रॉंग होती. त्यामुळे विद्यमान खासदार हिना गावित त्यांनाच तिकीट रिपीट करण्यात आलं. गोवाल पाडवी यांनी इथून तगड आव्हान उभं केलं असलं तरी निकाल शेवटी भाजपच्याच बाजूने झुकताना दिसतोय…
एकविसावा मतदारसंघ आहे दिंडोरीचा…इथेही कमळ विरुद्ध तुतारी अशी लढत पाहायला मिळाली. विद्यमान खासदार भारती पवार यांनाच भाजपने तिकीट रिपीट केलं. तर मविआमध्ये ही जागा शरद पवारांच्या वाट्याला आली. पुन्हा एकदा खासदार होण्यासाठी भारती पवार यांनी जोराचा प्रचार केला असला तरी मतदारसंघात तुतारीच्या भास्कर भगरे यांची बरीच चर्चा होती. मतदानानंतर भगरे मोठ्या लीडने दिंडोरीचं मैदान मारतील, असंही आता बोललं जाऊ लागलय.बाविसावा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पूर्वचा…इथून भाजपने मिहीर कोटेचा तर ठाकरे गटाने संजय दिना पाटील यांना मैदानात उतरवलं होतं. मतदानही काट्याला काटा असच झालं. पण सहानुभूतीचा फॅक्टर इथून वर्कआउट झाल्यामुळे मशालीचा उजेड इथं पाहायला मिळेल, असं राजकीय विश्लेषक सांगतायत…
तेविसावा मतदारसंघ आहे मुंबई उत्तरचा…मुंबई उत्तर हा भाजपचा सर्वात सेफ मतदारसंघ. म्हणूनच पक्षाने इथून पियुष गोयल यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात काँग्रेसने भूषण पाटील यांना तिकीट दिलं होतं. इथून पियुष गोयल आरामात निवडणूक जिंकतील. फक्त काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात ते कितीचं लीड घेतायत, हेच इथून पाहिलं जाणार आहे… चोविसावा मतदारसंघ आहे लातूरचा…सुधाकर शृंगारे विरुद्ध शिवाजी काळगे यांच्यात झालेल्या या लढतीत काँग्रेसने काळगेंसाठी मोठी ताकद लावली होती. पण स्टॅंडिंग खासदार सुधाकर शृंगारे हे मतदानानंतर पुन्हा एकदा निवडून येतील, असं लातूरमध्ये बोललं जातंय…
पंचविसावा मतदारसंघ आहे पालघरचा…भाजपने या मतदारसंघावर दावा ठोकत डॉ. हेमंत विष्णू सावरा यांना मैदानात उतरवले. आघाडीतर्फे ठाकरे गटाच्या वतीने भारती कामडी यांना अगोदरच उमेदवारी जाहीर केली. मात्र येथे ‘बविआ’ने अगदी शेवटच्या दिवशी राजेश पाटील यांना उमेदवारी दिली. आणि खरी लढत या तीन प्रमुख उमेदवारांमध्येच रंगली. मतदानानंतर या जागेवर भाजपच्या हेमंत सावरा यांचं पारड थोडं जड दिसतंय…सहविसावा मतदारसंघ आहे भिवंडीचा…तुतारीकडून बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे विरुद्ध भाजपकडून स्टॅंडिंग खासदार कपिल पाटील यांनाच तिकीट रिपीट केलं होतं… पाटलांच्या विरोधात असणारी अँटीइन्कमबन्सी, दोन टर्म निवडून देऊनही तसाच जिवंत असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे जनतेला बदल हवा होता… मनी आणि मसल पॉवर, सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध आणि पवारांच्या बाजूने असणारी लाट यामुळे इथं तुतारी कन्फर्म, असं बोललं जातय…
सत्ताविसावा मतदार संघ आहे उत्तर मध्य मुंबईचा…भाजपकडून उज्वल निकम विरुद्ध काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांच्यात झालेली ही लढत. अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेल्या या उमेदवारीमुळे दोघांनाही प्रचाराला अगदी थोडासा वेळ मिळाला. मात्र इथला मुस्लिम बहुल भाग आणि शिवसेनेची ताकद गायकवाड यांच्या बाजूने असल्याने पंजा निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत.अठ्ठाविसावा मतदारसंघ आहे धुळ्याचा…धुळ्यात भाजपचे स्टॅंडिंग खासदार सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्यात मुख्य लढत झाली. मात्र सुभाष भामरे यांचा मतदारसंघावरचा होल्ड आणि महायुतीने दिलेली ताकद यामुळे भामरे यांना यंदाही धुळ्यामधून अप्पर हँड आहे…तर असा होता भाजपने लढलेल्या 28 जागांचा संभाव्य निकाल. तुमचाही अंदाज असा आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.