Post Office Savings Schemes | अनेक लोक हे त्यांच्या भविष्यासाठी काही ना काही रक्कम गुंतवणूक करत असतात. अगदी लहान बचत योजनापासून ते पोस्ट ऑफिस बचत योजनापर्यंत सगळेजण चांगल्या प्रकारे गुंतवणूक करत असतात. बँकांच्या FD पेक्षा पोस्ट ऑफिसमध्ये चांगला परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसच्या काही बचत योजनांना सरकार देखील चांगलाच पाठिंबा दर्शवत आहे. त्यामुळे खूप कमी धोका असतो. यातून तुम्हाला चांगले व्याजदर देखील मिळते. आज आम्ही तुम्हाला अशाच बचत योजनाबद्दल माहिती सांगणार आहोत. जिथे तुम्हाला बँकेच्या एफडीपेक्षा जास्त परतावा मिळेल.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना | Post Office Savings Schemes
ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार केलेली आहे. 60 वर्षावरील नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजनेत 1000 रुपयाच्या किमतीमध्ये गुंतवणूक करावी लागते. जास्तीत जास्त तुम्ही 30 लाख रुपयांपर्यंत यामध्ये गुंतवणूक करू शकतात. त्याचप्रमाणे आयकर कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत या गुंतवणुकीवर कर सूट देखील उपलब्ध आहे.
किसान विकास पत्र
ही योजना भारत सरकारने जारी केलेली आहे. त्यामध्ये चांगला परतावा देखील उपलब्ध आहे. तिथे कर सवलतीचा कोणताही लाभ मिळत नाही. या योजनेत किसान विकास पत्राचा चक्रवाढ व्याज दर हा वार्षिक 7.5% एवढा आहे. या योजनेत गुंतवणूकदाराचे पैसे हे 115 महिन्यात म्हणजेच 9 वर्ष आणि 7 महिन्यात दुप्पट होतात.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना
या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना स्थिर उत्पन्न मिळण्याचे सुविधा आहे. या योजनेमध्ये किमान दीड हजार रुपयांनी जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवतात या योजनेमध्ये कमाल मर्यादा 15 लाख रुपये आहे. त्याचप्रमाणे कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील मिळतो. या योजनेमध्ये वर्षाला 7.4% दराने व्याज मिळते.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे | Post Office Savings Schemes
ही खात्रीशीर गुंतवणूक आणि बचत योजना आहे. येथे चक्रवाढ व्याज दर 7.7 टक्के प्रतिवर्ष आहे. ते मुदतपूर्तीवर दिले जाते. या योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. कमाल मर्यादा नाही. या योजनेअंतर्गत कितीही खाती उघडता येतात. गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ मिळवा.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र
ही योजना भारत सरकारने भारतीय महिलांमध्ये बचत संस्कृतीला चालना देण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेत कोणताही कर लाभ नाही. व्याज उत्पन्न करपात्र आहे. गुंतवणूकदाराच्या आयकर स्लॅबनुसार कर कापला जातो. ही योजना ७.५ टक्के वार्षिक व्याज देत आहे. हा व्याज दर तिमाही चक्रवाढ आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Oven Bag) आपल्या देशात फुडी लोकांची काही कमी नाही. अशा लोकांना वेगवेगळे पदार्थ, मसाले, त्यांचे सुगंध आणि चवीचा अक्षरशः नाद असतो. खाण्यापिण्याबाबत प्रत्येकाची वेगळी चॉईस असते. पण थंड जेवण कुणालाच आवडत नाही. एखादा पदार्थ गरमागरम खायला मिळाला तर पोटाची आणि मनाची शांतता होते. पण, प्रत्येकवेळी तुम्ही खात असलेला पदार्थ हा गरम मिळेलच याची काही खात्री नाही. मग अनेकदा हिरमोड होतो. तुमच्याही बाबतीत असे होते का? तर आता चिंता सोडा. तुमचं फूड गरम ठेवून मूड मस्त करण्यासाठी बाजारात एक स्मार्ट बॅग आली आहे. जिच्याविषयी जाणून तुम्हाला आनंद झाला नाही तर विचारा.
फुडी लोकांच्या फायद्याची स्मार्ट बॅग (Oven Bag)
जर तुम्ही फुडी असाल आणि तुम्हाला गरमागरम खाण्याची आवड असेल तर ही स्मार्ट बॅग तुमच्या फायद्याची आहे. कारण ही बॅग एक चालता फिरता ओव्हन आणि फ्रिज दोन्ही आहे. WillTex कंपनीने WillCook नावाची एक शोल्डर बॅग समोर आणली आहे. या बॅगेची खासियत अशी की, ही बॅग फक्त तुमचं जेवण गरम ठेवत नाही, तर १८० डिग्री सेल्सियस पर्यंत अन्न शिजवण्याची देखील क्षमता ठेवते. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, केवळ गरम नाही तर एखादा पदार्थ थंड ठेवण्याचे कामसुद्धा ही बॅग आरामात करते. म्हणजेच बॅग एक असली तरीही फायदे दोन आहेत.
कसं शक्य आहे?
WillCook Oven Bag ही एक हलकी पोर्टेबल आणि बॅटरी पावर्ड बॅग आहे. जी मायक्रोवेव्ह सेफ असून यातील पेटंटेड कापड हिट (उष्णता) निर्माण करते. (Oven Bag) या बॅगेत बिल्ट-इन रिचार्जेबल बॅटरी आहे. (Oven Bag) जी तुमचं जेवण फक्त २० मिनिटांत गरम करू शकते. तसेच एकदा गरम झालेलं जेवण ८२ डिग्री सेल्सियस पर्यंत गरम ठेऊ शकते. अर्थात ही बॅग तुमचे जेवण तब्बल २ तासांसाठी गरम ठेवू शकते. त्यामुळे या बॅगेचा वापर नुसता ऑफिससाठी नाही तर पिकीनिकसाठी जाताना सुद्धा करता येईल.
याशिवाय WillCook बॅग तुमचे अन्न केवळ गरम ठेवत नाही तर थंडसुद्धा ठेऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात ही बॅग तुम्हाला फायदेशीर वाटू शकते. (Oven Bag) या बॅगेत इन्सुलेटिंग कॉटन आणि अल्युमिनियम फिल्म आहेत. ज्यामुळे या बॅगेतील अन्न पदार्थ थंड राहू शकतात. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही बॅग ४ डिग्री सेल्सियस इतकं कमी तापमान ठेऊ शकते. अर्थात तुमचे जेवण २ ते ३ तासांसाठी थंड राहू शकते.
भारतात लॉंच होणार?
वृत्तानुसार, अद्याप ही स्मार्ट बॅग बाजारात विक्रीसाठी आलेली नाही. मात्र, या बॅगेची विक्री यंदा सप्टेंबर २०२४ मध्ये सुरु होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या बॅगेची मूळ किंमत २०० डॉलर्स अर्थात भारतीय चलनानुसार सुमारे १६,६०० रुपये इतकी असेल. ही बॅग भारतात लॉंच होईल, याबाबत शंका घेतली जात आहे. (Oven Bag) परंतु, ही बॅग भारतात आयात करण्याचा पर्याय उपलब्ध केला जाईल अशी आशा आहे.
Mansoon update | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. परंतु काही ठिकाणी मात्र तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. महाराष्ट्राकडे सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून उष्ण वारे येत आहेत. यामुळे राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
तापमानात दिवसेंदिवस वाढ झाल्यामुळे आता पाऊस आणि लवकरात लवकर आगमन करावे. अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. त्याचप्रमाणे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आता 31 मे रोजी मान्सून हा केरळमध्ये दाखल होणार आहे. तसेच बंगालच्या उपसागरात देखील चक्रीवादळाची निर्मिती झालेली आहे. या चक्रीवादळामुळे हवामानावर विपरीत परिणाम होऊ शकतो. असे देखील हवामान खात्याने (Mansoon update) सांगितलेले आहे.
ज्येष्ठ हवामान अभ्यासच पंजाबराव ढख (Mansoon update) यांनी मान्सून संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सूनसाठी सध्याचे वातावरण खूपच पोषक आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 22 मेला मान्सूनचे अंदमानमध्ये आगमन झालेले आहे. आणि देवापासून मान्सूनसाठी चांगली परिस्थिती निर्माण झालेली आहे. येत्या 31 मेपर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे. असा अंदाज पंजाबराव डोक्यांनी मांडलेला आहे.
केरळमध्ये मान्सून आला की, महाराष्ट्रात देखील मान्सूनला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात 1, 2 आणि 3 जून 2024 रोजी मोठा पाऊस होण्याचा अंदाज देखील त्यांनी लावलेला आहे. त्याचप्रमाणे जून महिन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या पावसामुळे मौसमी पाऊस राहणार नसून पूर्व मोसमी पाऊस राहणार आहे. त्याचप्रमाणे राज्यात 8 जूनला मान्सून सक्रिय होण्याची देखील शक्यता आहे.
म्हणजेच ८ जूनच्या आसपास महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे (Mansoon update) आगमन होणार आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी लवकर महाराष्ट्रमध्ये मान्सून येणार आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्याने मान्सून लवकर येणार आहे. सध्याचा उकाडा पाहता जर जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून आला, तर शेतकऱ्यांना आणि संपूर्ण नागरिकांना देखील दिलासा मिळणार आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपुरात नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले, गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात असा दावा शिवसेना खासदार संजय राऊतांनी सामनातील रोखठोक सदरातून केल्यानंतर मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी चोख प्रत्युत्तर देताना २०१९ मध्ये स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी संजय राऊतांनीही प्रयत्न केले होते असा गौप्यस्फोट बावनकुळे यांनी केलाय.
याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत म्हंटल, उबाठाचे अधिकृत आणि शरद पवार गटाचे स्वयंघोषित प्रवक्ते संजय राऊत यांनी पुन्हा अकलेचे तारे तोडत भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केले आहे. राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत पण ते शरद पवार यांची चाकरी करतात. ते भ्रमिष्ट अवस्थेत रोखठोक लिहीत असावेत. भाजप हा पक्ष नाही तर परिवार आहे. ज्यांनी आयुष्यभर गटातटाचे राजकारण केले त्या संजय राऊतांना परिवार काय कळणार? आदरणीय पंतप्रधान मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या एकाच परिवारातील सदस्य आहेत. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे मूल्य घेऊन भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता काम करतो. पण संजय राऊतांच्या बाबतीत प्रथम शरद पवार नंतर स्वतः आणि शेवटी उद्धव ठाकरे आणि उबाठा गट असा क्रम आहे. त्यामुळे राऊतांच्या डोक्यातून असेच काहीतरी बाहेर पडणार. २०१९ मध्ये स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी संजय राऊतांनीही प्रयत्न केले होते. पण त्यांचा डाव यशस्वी झाला नाही. हिंमत असेल तर एक ‘रोखठोक’ त्यावरही येऊ द्या!, असे आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
राऊतांचा दावा नेमका काय?
सामनातील रोखठोक सदरात राऊतांनी लिहिले कि, 4 जूननंतर भाजपात मोदी-शहांना पाठिंबा राहणार नाही. गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात. जे गडकरींचे तेच योगींचे अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Dancing Cop) सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ आपण रोजच पाहतो. यामध्ये कधी अतरंगी चाळे, कधी विचित्र फूड फ्युजन, तर कधी एकापेक्षा एक जबरदस्त डान्सचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. गेल्या काही महिन्यांपासून याच प्रसिद्धी माध्यमातून काही डान्सिंग कॉप्स प्रकाश झोतात आले आहेत. ज्यामध्ये मुंबईतील लोकप्रिय डान्सिंग कॉप अमोल कांबळे यांचा समावेश आहे. आताही त्यांचा एक कमाल व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये त्यांनी प्रसिद्ध इन्फ्लूएंसर नोएल रॉबिन्सनसोबत ट्रेंडिंग गाण्यावर डान्स केला आहे.
व्हायरल व्हिडीओ (Dancing Cop)
सोशल मीडियावर डान्सिंग कॉप अमोल कांबळे यांचा नवा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये त्यांनी जर्मन टिकटॉक सेन्सेशन नोएल रॉबिन्सनसोबत सध्या ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या ‘गुलाबी शरारा’ या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. इंदर आर्याचे ‘गुलाबी शरारा’ हे उत्तराखंडी गाणे गेल्या काही काळात जबरदस्त हिट झाले आहे.
या गाण्याला रसिक मंडळींचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याशिवाय सोशल मीडियावर हे गाणे चांगलेच ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यामुळे या गाण्यावरील बरेच रिल्स पहायला मिळत आहेत. यातच आता डान्सिंग कॉप अमोल कांबळे यांच्याही रील व्हिडिओचा समावेश झाला आहे.
जगातील सर्वात कूल पोलिस
जर्मन टिकटॉक सेन्सेशन नोएल रॉबिन्सन याने कांबळे यांच्यासोबतच्या अनुभवाने रोमांचित होऊन त्यांना ‘जगातील सर्वात कूल पोलिस’ म्हणून गौरवले आहे. (Dancing Cop) नोएल रॉबिन्सनचे सोशल मीडिया इंस्टाग्रामवर १०.३ दशलक्ष इतके फॉलोअर्स आहेत. नोएलने मुंबईच्या रस्त्यांचा शोध घेताना अमोल कांबळे यांची भेट घेतली आणि मग काय.. दोघांनी मिळून ‘गुलाबी शरारा’वर डान्स केला. प्रत्येक डान्स स्टेप करताना ते आनंद घेत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी आपली पसंती दर्शवली आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
नोएलने सोशल मीडियावर त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडल noelgoescrazy अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी विविध कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Dancing Cop) एकाने म्हटलंय, ‘एका पोलिसाला इतक्या डान्स स्टेप कशा काय लक्षात राहिल्या?’ तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय, ‘भारतीय पोलिसांसोबत नाचतोयस? हे नेक्स्ट लेव्हल आहे!! खूप उत्कृष्टपणे सादर करताय.. मस्त’. तर आणखी एकाने म्हटले, ‘पोलिस अधिकारी चुकीच्या क्षेत्रात गेला, किती भन्नाट डान्स करताय सर..’
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुतारी, मशाल किती जागा मिळणार? अजितदादांना आणि शिंदेंना फटका बसणार का? भाजपची दिल्लीत सत्ता येणार का? असा कन्टेन्टचा काथ्याकुट सर्वांचा करून झाला. पण यात एक गोष्ट आपल्या नजरेतून सुटली. ती म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेसच्या किती जागा येणार? मुंबईत ठाकरेंचा, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा आणि संपूर्ण विदर्भ पट्टयात लोकसभेला कस लागला तो काँग्रेसचा. मविआच्या जागा वाटपात 17 जागा पदरात पाडून घेणाऱ्या काँग्रेसच्या किती उमेदवारांना निवडणुकीत यश मिळतय? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या चिन्हावर किती उमेदवार दिल्लीत जातील? याबाबत अंदाज बांधूया
सुरुवात करूयात पश्चिम महाराष्ट्रपासून. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला तीन जागा लढवायला मिळाल्या त्यातला पहिला मतदारसंघ येतो तो सोलापूरचा… राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे अशी इथली प्रमुख लढत झाली. अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात गेली दोन टर्म भाजपचा दबदबा असला तरी यंदा वार फिरलं होतं. दलित, मुस्लिम मतं आणि मोहितेंमुळे मराठा मतं शिंदेंच्या बाजूने झुकल्याने सोलापुरात यंदा काँग्रेसला अप्पर हँड होता. त्यात सातपुतेंच्या प्रखर हिंदुत्वाचा मोठा इम्पॅक्ट सोलापुरात पाहायला मिळालं नाही. त्यामुळे सोलापुरात पंजा जिंकतोय, असं चित्र आहे. दुसरा मतदारसंघ आहे कोल्हापूरचा…. काँग्रेसनं शाहू छत्रपतींना उमेदवारी दिल्यापासूनच शिवसेनेचे संजय मंडलिक बॅकफुटला गेले होते. धनंजय महाडिक, हसन मुश्रीफ यांनी मंडलिकांच्या पाठीशी आपली सारी ताकद लावली असली तरी बंटी पाटलांच्या यंत्रणेपुढे तिचा निभाव लागताना दिसला नाही. मान आणि मत दोन्ही गादीलाच… या स्टॅन्डमुळे कोल्हापुरातही यंदा पंजा येतोय, हे क्लिअर आहे.
तिसरा मतदार संघ आहे पुण्याचा… कसब्याच्या पोटनिवडणुकीमुळे जायंट किलर ठरलेल्या रवींद्र धंगेकर यांनी इथे भाजपला कडवी टक्कर दिली.मात्र स्ट्रॉंग केडर, शहरी मतदान, आमदारांची पाठीशी असणारी संख्या हे सगळं मोहोळांना पुण्यातून प्लसमध्ये ठेवणारं होतं. त्यामुळे घासून लागणाऱ्या पुण्याच्या निकालात मुरलीधर मोहोळ निसटती बाजी मारतील, असं चित्र आहे .. चौथा मतदारसंघ आहे नंदुरबारचा…हिना गावित विरुद्ध काँग्रेसकडून गोवाल पाडवी अशी इथली लढत अटीतटीची झाली. एसटी प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात भाजप बरीच स्ट्रॉंग होती. त्यामुळे विद्यमान खासदार हिना गावितांनाच तिकीट रिपीट करण्यात आलं. गोवाल पाडवी यांनी इथून तगड आव्हान उभं केलं असलं तरी निकाल शेवटी कमळाच्या बाजूने झुकताना दिसतोय…
पाचवा मतदारसंघ आहे धुळ्याचा…धुळ्यात भाजपचे स्टॅंडिंग खासदार सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्यात मुख्य लढत झाली. मात्र सुभाष भामरे यांचा मतदारसंघावरचा होल्ड आणि महायुतीने दिलेली ताकद यामुळे भामरे यांना यंदाही धुळ्यामधून अप्पर हँड आहे…स्ट्रॉंग कैंडिडेट नसणं ही काँग्रेसची धुळ्यातील चूक ठरली, असं आता अनेक राजकीय विश्लेषकही सांगतायत…. सहावा मतदारसंघ आहे लातूरचा…सुधाकर शृंगारे विरुद्ध शिवाजी काळगे यांच्यात झालेल्या या लढतीत काँग्रेसने काळगेंसाठी मोठी ताकद लावली होती. पण स्टॅंडिंग खासदार सुधाकर शृंगारे हे मतदानानंतर पुन्हा एकदा निवडून येतील, असं लातूरमध्ये बोललं जातंय…
सातवा मतदार संघ येतो तो नांदेडचा… भाजपचे स्टॅंडिंग खासदार प्रतापराव चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण अशी ही लढत झाली. चिखलीकर यांच्या स्वतःच्या अशा एक इमेजसोबत भाजपचा बॅकअप चांगला लागल्याने नांदेडमध्येही पुन्हा एकदा कमळच फुलण्याचे चान्सेस जास्त आहेत….. आठवा मतदारसंघ आहे जालन्याचा. .. आपल्या सलग सहाव्या टर्मसाठी रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्या विरोधात लोकसभेला दंड थोपटले. मराठा आरक्षण हा जालन्याच्या संपूर्ण प्रचारातील ज्वलंत मुद्दा राहिला. दानवे यांच्या विरोधात मतदारसंघात यंदा बरीच नाराजी होती. पण या नाराजीचं आपल्या बाजूने कन्वर्जन करायला कल्याण काळे यांना म्हणावं असं यश येताना दिसलं नाही. मराठा मतांच्या विभाजनामुळे याचा फायदा दानवेंच्या पथ्यावर यंदाही पडतोय, असं चित्रं आहे.
नववा मतदारसंघ आहे अकोल्याचा…भाजपकडून अनुप धोत्रे, काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचितकडून स्वतः प्रकाश आंबेडकर इथून मैदानात होते. अकोल्यात वंचितची हक्काची वोट बँक असल्याने अभय पाटील आणि आंबेडकर यांच्यात मोठ्या प्रमाणावरील मत विभाजनाचा धोका होता. दोघांची भांडण तिसऱ्याचा लाभ असं जे काही चित्र 2019 ला पाहायला मिळालं अगदी तशीच सेम टू सेम परिस्थिती असल्यामुळे भाजपच्या अनुप धोत्रे यांच्या विजयाचा मार्ग इथे सोपा झालाय…दहावा मतदारसंघ आहे अमरावतीचा…काँग्रेसकडून बळवंत वानखेडे विरुद्ध भाजपकडून नवनीत राणा अशी ही इंटरेस्टिंग लढत पाहायला मिळाली. प्रहारच्या दिनेश बुब यांनी या लढतीला आणखीनच कडवं बनवलं. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच वातावरण काँग्रेसच्या बाजूने होतं. त्यात वंचित, आनंदराज आंबेडकर यांच्या एक्झिटमुळे मत विभाजनाचा भाजपला बसू शकणारा संभाव्य फटका टळला. एकूणच हाताचा पंजा इथून लीड घेईल असं मतदान सांगतंय.
अकरावा मतदारसंघ आहे रामटेकचा…रश्मी बर्वे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर श्यामकुमार बर्वे विरुद्ध शिंदेंकडून राजू पारवे अशी रामटेकची लढत झाली. शिंदेंनी राजू पारवे यांच्या उमेदवारीची काँग्रेस मधून आयातवारी केल्यानं ही गोष्ट मतदारांना फारशी रुचली नाही. महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी बर्वेंना दिलेली साथ आणि ठाकरे पवारांच्या सहानुभूतीच्या लाटेचा बर्वेंना फायदा होताना दिसला. काँग्रेसची दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक विकासाचं नरेटीव रामटेकमध्येही काँग्रेसला 4 तारखेला लीडमध्ये ठेवेल, असं इथलं चित्र आहे… बारावा मतदारसंघ आहे नागपूरचा…काँग्रेसचे विकास ठाकरे विरुद्ध भाजपचे नितीन गडकरी अशी इथली लढत झाली. आरएसएसचं मेन सेंटर, भाजपचं होम ग्राउंड आणि देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या राजकारणातील स्थानामुळे नागपूरमध्ये भाजपला नेहमीच एक हात जास्तीचा मिळतो. म्हणूनच काँग्रेसच्या विकास ठाकरेंच्या विरोधात यंदाही नितीन गडकरी मोठं लीड घेतील, असं बोलले जातंय…
तेरावा मतदारसंघ आहे भंडारा – गोंदियाचा…इथले भाजपचे स्टॅंडिंग खासदार सुनील मेंढे असले तरी काँग्रेसचा या मतदारसंघातील केडर बराच स्ट्रॉंग आहे. त्यामुळे भाजपच्या सुनील मेंढें आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यातील लढत इथे घासून झाली. सुनील मेंढे यांच्या विरोधात अँटी इन्कमबन्सी आणि काँग्रेसने लावलेली ताकद पाहता निसटत्या हाताने का होईना पण प्रशांत पडोळे जिंकतील, असं बोललं जातंय…चौदावा मतदारसंघ आहे गडचिरोली – चिमूरचा…भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे संजय किरसान यांच्यातील ही लढत. अनुसूचित जमातीसाठी राखीव असणारा हा मतदारसंघ भाजपासाठी वन साईड होता. मात्र आदिवासी, दलित आणि अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यांना हात घालत प्रचारात काँग्रेसने आघाडी घेतली होती. त्यामूळे गडचिरोलीची लढत तुल्यबळ झाली. मात्र पक्षीय बलाबल आणि कागदावरचं गणित भाजपच्या बाजूने असल्याने नेते सध्यातरी इथं लीडमध्ये दिसतायत…
पंधरावा मतदारसंघ आहे चंद्रपूरचा…विदर्भातल्या या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलय. कारण इथे काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार रिंगणात उतरले होते. मतदारसंघात रुजलेला काँग्रेसी विचार, मोदींचा गायब झालेला करिष्मा हे सगळं चंद्रपुरात काँग्रेसच्या पथ्यावर पडणार होतं. त्यात मुनगंटीवारांकडून करण्यात आलेल्या विखारी प्रचार त्यांच्यावरच बूमरँग झाल्याने चंद्रपुरात या बड्या नेत्याला धक्का बसत पंजा फिक्स असं सध्या वातावरण आहे. सोळावा मतदारसंघ आहे मुंबई उत्तरचा…मुंबई उत्तर हा भाजपचा सर्वात सेफ मतदारसंघ. म्हणूनच पक्षाने इथून पियुष गोयल यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात काँग्रेसने भूषण पाटील यांना तिकीट दिलं होतं. इथून पियुष गोयल आरामात निवडणूक जिंकतील. फक्त काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात ते कितीचं लीड घेतायत, हेच इथून पाहिलं जाणार आहे…
सतरावा मतदारसंघ आहे उत्तर मध्य मुंबईचा…. भाजपकडून उज्वल निकम विरुद्ध काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांच्यात झालेली ही लढत. अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेल्या या उमेदवारीमुळे दोघांनाही प्रचाराला अगदी थोडासा वेळ मिळाला. मात्र इथला मुस्लिम बहुल भाग आणि शिवसेनेची ताकद गायकवाड यांच्या बाजूने असल्याने उत्तर मध्य मधून पंजा निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत.तर असा होता काँग्रेसने लढलेल्या 17 जागांचा संभाव्य निकाल.. बाकी तुमचाही अंदाज असा आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Movie) विविध कथानक, विविध आशय आणि विषय असणाऱ्या अनेक मराठी कलाकृती आजवर प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. यातील प्रत्येक जॉनरचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग असल्याचे समजते. राजकीय, सामाजिक, रोमँटिक, हॉरर, बायोपिक अशा विविध जॉनरच्या कलाकृतींमुळे प्रेक्षकही सुखावतात. त्यामुळे कायम काहीतरी वेगळं पाहायला मिळेल अशी त्यांची इच्छा आहे. दरम्यान, लवकरच एका वेगळ्या विषयावर भाष्य करत संपूर्ण वातावरण भक्तिमय करायला ‘डंका.. हरी नामाचा’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
सिनेमागृहात वाजणार ‘डंका.. हरी नामाचा’ (New Movie)
‘डंका… हरी नामाचा’ या चित्रपटाची घोषणा करून बरेच दिवस होऊन गेले आहेत. मात्र अजूनही या चित्रपटाबाबत काहीही अपडेट नसल्यामुळे कुठेतरी प्रेक्षक नाराज होते. अशातच आता या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. येत्या १९ जुलै २०२४ रोजी हा चित्रपट सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. गणराज स्टुडिओज् आणि रुद्र एंटरटेनमेंट्स प्रस्तुत ‘डंका… हरी नामाचा’ हा चित्रपट श्रेयश जाधव, रवी फड निर्मित आहे. तर श्रेयश जाधव चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
५ भाषेत होणार प्रदर्शित
गणराज स्टुडिओज् आणि रुद्र एंटरटेनमेंट्स प्रस्तुत ‘डंका… हरी नामाचा’ हा चित्रपट एक दोन नव्हे तर तब्बल ५ विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये मराठी भाषेसह हिंदी, तेलगु, तामिळ आणि कन्नड भाषेचा देखील समावेश आहे. (New Movie)
माहितीनुसार, या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे. यामध्ये अभिनेता अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, किरण गायकवाड, सयाजी शिंदे, रसिका सुनील, अक्षया गुरव, कबीर दुहान सिंग, निखिल चव्हाण, अविनाश नारकर, महेश जाधव, मयूर पवार आणि किरण भालेराव या कलाकारांचा समावेश आहे.
मराठी चित्रपटांना वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न
या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणाले की, ”डंका… हरी नामाचा’ हा भव्य चित्रपट एक अॅक्शनपट असून त्याला विनोदाची जोड लाभली आहे. हळूहळू या चित्रपटाविषयीच्या अनेक गोष्टी प्रेक्षकांसमोर येतील. (New Movie) हल्ली प्रादेशिक चित्रपट पॅन इंडिया स्तरावर पोहोचत आहेत आणि मुळात मराठी चित्रपटांचा आशय हा अत्यंत दर्जेदार असतो. त्यामुळे मराठी चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या निमित्ताने मराठी चित्रपट पॅन इंडिया स्तरावर पोहोचतील’.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Webseries) मराठी कलाविश्वात कायम वेगवेगळे प्रयोग पहायला मिळतात. त्यामुळे गेल्या काही काळात मराठी कलाकृतींचा प्रेक्षक तुफान वाढताना दिसला आहे. न केवळ तर नाटकांचासुद्धा एक वेगळा प्रेक्षक आहे. जो विविध कलाकृतींचे भरभरून कौतुक करत असतो. अशाच रंगभूमीवर तुफान गाजलेले ‘पुरुष’ हे नाटक एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाले आहे. सिद्धहस्त लेखक जयवंत दळवी यांच्या लेखणीतून उतरलेल्या या नाटकावर आधारित वेब सिरीज लवकरच आपल्या भेटीस येत आहे.
‘पुरुष’वर आधारलेली वेब सिरीज (New Webseries)
जयवंत दळवी यांच्या लेखणीतून उतरलेले आणि मराठी रंगभूमीवर गाजलेले ‘पुरुष’ हे नाटक पुरुषी मनोवृत्तीचे दर्शन घडवते. मुख्य म्हणजे ज्यांचा उल्लेख गेंड्याची कातडी असलेला पुढारी असा केला जातो, अशा लोकांची मानसिकता दाखवणारी ही कलाकृती आहे. त्यामुळे रंगभूमीवर या नाटकाने प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळवले होते. या नाटकातील गुलाबराव जाधव हे पात्र चांगलंच गाजलं होतं. हे पात्र अभिनेते नाना पाटेकर यांनी साकारले होते. यानंतर वेबसीरिजमध्ये हे पात्र कोण साकारणार अशी उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. या नाटकातील अंबू हे पात्र त्यावेळी रिमा लागू यांनी साकारले होते. याही पात्राविषयी विशेष उत्सुकता पहायला मिळते आहे.
पुरुष नाटकाचे दर्जेदार कथानक
जयवंत दळवी यांचे ‘पुरुष’ हे नाटक १९८२ साली रंगभूमीवर आले. ज्यामध्ये नाना पाटेकर, रीमा लागू, चंद्रकांत गोखले, उषा नाडकर्णी, सतीश पुळेकर अशी स्टार कास्ट होती. या नाटकाची नायिका अंबिका आहे. (New Webseries) जिचे वडील शिक्षक असून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. अशा एका शिक्षकाच्या घरातली मुलगी पुरुष प्रधान संस्कृतीसोबत बरोबरी करण्याच्या प्रयत्नात आहे.
पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून तिला काम करायचं आहे. हे पाहून गुलाबराव जाधव या निर्ढावलेल्या पुढाऱ्याला पुरुषी अहंकार दुखावतो आणि तो तिच्यावर बलात्कार करतो. या आघाताने अंबिका खचून जाईल असे त्याला वाटते. पण या प्रसंगानंतर ती आणखीच पेटून उठते आणि गुलाबरावला धडा शिकते. असे या नाटकाचे कथानक आहे. जे आता प्लॅनेट मराठीच्या माध्यमातून वेब सीरिज स्वरूपात अवतरत आहे. (New Webseries)
कोण साकारणार गुलाबराव आणि अंबिका?
प्लॅनेट मराठीच्या या आगामी वेबसीरिजचा प्रोमो अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्याची सुरुवात फोनवरील संवादाने होते. या संवादातून ही वेबसीरिज पुरुषप्रधान असेल, याचा अंदाज येतो. या नाटकाची मुख्य पात्र गुलाबराव आणि अंबिका आहेत. ही दोन पात्र मराठी कलाविश्वात दिग्गज मंडळी साकारणार असल्याचे समजत आहे. (New Webseries) वेबसिरीजमध्ये गुलाबराव ही भूमिका अभिनेते सचिन खेडेकर तर अंबिका ही भूमिका अभिनेत्री मृण्मयी देशपांडे साकारणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रसन्न आजरेकर, श्रीरंग गोडबोले आणि अभिजित पानसे ही वेबसीरिज घेऊन येत आहेत. ज्याची निर्मिती अक्षय विलास बर्दापूरकर यांनी केली आहे.
UPSC Recruitment 2024 |नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नोकरीची अतिशय चांगले संधी घेऊन आलेलो आहोत. ही संधी खास करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. कारण आता संघ लोकसेवा आयोग अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत 405 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. यूपीएससी (UPSC Recruitment 2024) कडून होणारी ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे 13 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
महत्त्वाची माहिती | UPSC Recruitment 2024
पदाचे नाव – सहाय्यक आयुक्त (सहकार/क्रेडिट), चाचणी अभियंता, विपणन अधिकारी (गट-I), वैज्ञानिक अधिकारी (यांत्रिकी), कारखाना व्यवस्थापक, सहाय्यक खाण अभियंता, सहायक संशोधन अधिकारी, प्रशिक्षण अधिकारी, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
पदसंख्या – 405 जागा
वयोमर्यादा – 30 ते 40 वर्ष
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2024
अर्ज कसा करावा ? | UPSC Recruitment 2024
या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.
13 जून 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे या तारखे अगोदर अर्ज करा.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद मध्ये आयपीएलचा अंतिम सामना (KKR vs SRH Final) रंगणार आहे. चेन्नई येथील एम चिदंबरम स्टेडियममध्ये हा सामना आयोजित करण्यात आला असून देशातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष्य या मॅचकडे आहे. चेन्नईतील एकूण वातावरण पाहता अंतिम सामन्यावर पावसाचे सावट दिसत आहे. त्यामुळे जर आजच्या फायनलमध्ये पाऊस पडला तर? कोणत्या संघाला विजयी घोषित करणार? असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल… चला तर जाणून घेऊया BCCI चा प्लॅन बी ….
पाऊस पडला तर काय होईल ? KKR vs SRH Final
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यातील अंतिम सामन्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणे एक रिझर्व डे ठेवण्यात आला आहे.
जर पावसामुळे सामना 26 मे रोजी पूर्ण झाला नाही तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवार 27 मे रोजी सामना पूर्ण करण्यात येणार आहे.
जर पावसाने आयपीएलच्या अंतिम दिवशी व्यत्यय आणला तर सामन्याचा निकाल देखील डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीने ठरवला जाऊ शकतो.
KKR विरुद्ध SRH फायनल मॅचच्या रिझर्व डेला सुद्धा पाऊस पडला, तर अंपायर नियमित वेळेत कमीत कमी 5-5 ओव्हर्सचा सामना आयोजित करण्याचा विचार करतील.
पावसामुळे राखीव दिवशीही अंतिम सामना खेळला गेला नाही, तर पॉइंट टेबलच्या आधारे निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सला विजेता घोषित केले जाऊ शकते. पॉइंट टेबलमध्ये कोलकाता पहिल्या स्थानावर आहे.
दरम्यान, आजच्या सामन्यातील खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याचे मानले जात आहे. हैद्राबादकडे शहाबाज अहमद आणि अभिषेक शर्मा असे २ फिरकीपटू आहेत ज्यांनी क्वालिफायर सामन्यात राजस्थान फलंदाजांना रोखलं होते. तर कोलकात्याकडे वरून चक्रवर्ती आणि सुनील नारायण अशी २ मुख्य अस्त्रे आहेत त्यामुळे फिरकीपटूंच्या कामगिरीवर दोन्ही संघाचा विजय अवलंबून असेल. स्पर्धेचा अंतिम टप्पा (KKR vs SRH Final) असल्याने मैदान थोडं संथ झालं असेल. मात्र टिकून फलंदाजी केल्यास मोठी धावसंख्या उभारणे सोप्प होईल.