Thursday, December 25, 2025
Home Blog Page 732

गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांची रसद; नव्या दाव्याने खळबळ

fadnavis gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ जागांवर मतदार पार पडलं आहे. आता ४ जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे जनतेचं लक्ष्य आहे. त्याच दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून एक मोठा दावा केला आहे. नागपुरात नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले, गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात असा दावा संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

4 जूननंतर भाजपात मोदी-शहांना पाठिंबा राहणार नाही. गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात. जे गडकरींचे तेच योगींचे अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. उत्तर प्रदेशात भाजपला 30 जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी-शहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचाही परिणाम 4 जूनला दिसेल.

महाराष्ट्राने मोदी-शहांच्या झुंडशाहीशी झुंज दिली. त्यामुळे उद्याच्या दिल्लीतील परिवर्तनात महाराष्ट्राचे नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल. दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले. ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील. एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25-30 कोटी रुपये वाटले. पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळे बजेट. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले. महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीने अनेकांचे डोळे दिपले. विचारांवर चालणारा महाराष्ट्र या निवडणुकीत पैशांच्या धुरळय़ावर चालला.

मोदी-शहांच्या राजकारणाने महाराष्ट्राचे केलेले हे अध: पतन. तरीही महाराष्ट्र विकला जाणार नाही व किमान 32 जागांवर मोदी-शहा मित्रमंडळाचा पराभव होईल. महाविकास आघाडीने झंझावात उभा केला. त्यामुळे मोदी-फडणवीस – शिंदे उडून गेले. अमित शहांची दखलही महाराष्ट्राने घेतली नाही. महाराष्ट्रात पैशांचे राज्य या लोकांनी निर्माण केले. तोच महाराष्ट्र दिल्लीतील पैशांचे राज्य उखडून फेकेल. बदल नक्की होतोय. मोदींच्या बोलण्यातला व अंगातला जोर ओसरलाय हे दिसत आहे असं संजय राऊतांनी म्हंटल.

Blue Tea Benefits | ब्लॅक किंवा ग्रीन टीऐवजी, आता सकाळी प्या ब्लू टी; दिवसभर टिकेल एनर्जी

Blue Tea Benefits

Blue Tea Benefits | आपल्यापैकी बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात सकाळच्या चहाने करतात. त्यामुळे चहाप्रेमींमध्ये आपला देश पाचव्या क्रमांकावर आहे. पण आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या आरोग्याची काळजी घेत, सकाळी काळी चहा, ग्रीन टी किंवा लेमन टी यांसारखा हर्बल चहा, जो कॅफिनमुक्त असतो, पिण्यास प्राधान्य देतो.

ब्लू टी एक हर्बल टी देखील आहे. जो तुम्ही तुमच्या सकाळच्या चहाच्या जागी देऊ शकता. ब्लू टी, ज्याला क्लिटोरिया टर्नेटिया देखील म्हणतात, ही एक आग्नेय आशियामध्ये आढळणारी वनस्पती आहे. ब्लू टी त्याच्या फुलांपासून बनवला जातो. हे रिकाम्या पोटी प्यायल्याने तुम्ही स्वतःला दिवसभर ऊर्जावान ठेवू शकता. हे अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. ब्लू टी (Blue Tea Benefits) देखील सध्या ट्रेंडमध्ये आहे. आता हा चहा पिल्याने काय फायदा होतो? हे आपण जाणून घेणार आहोत.

ब्लू टी कसा बनवायचा? | Blue Tea Benefits

एका भांड्यात चार ते पाच वाळलेल्या फुलपाखरू मटारची फुले ठेवा आणि काही वेळ चांगली उकळा. यानंतर ते गाळून त्यात थोडे मध आणि लिंबाचा रस तुमच्या चवीनुसार टाकून प्या.

ब्लू टीचे फायदे

  • बटर फ्लाय पी फ्लॉवर टी (ब्लू टी) अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे, जे आपल्या शरीरातील पेशींचा ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करते आणि त्यामुळे होणारे नुकसान टाळते.
  • ब्लू पी टीमध्ये भरपूर प्रमाणात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते आणि संधिवात सारख्या आजारांपासून मुक्त होण्यास मदत होते.
  • ब्लू पी टीमध्ये असलेले पोषक घटक आपल्या मेंदूमध्ये एसिटाइलकोलीन नावाचे रसायन वाढवतात, जे आपला मानसिक ताण आणि संबंधित समस्या दूर करण्यास मदत करतात.
  • ब्लू पी टीमध्ये अँथेलमिंटिक (आतड्यांतील कृमी मारते) गुणधर्म असतात जे आपल्या आतड्यांमधील कृमींची वाढ थांबवतात. यासोबतच ते यकृत आणि किडनींना चांगले डिटॉक्स करण्यास सक्षम आहे, ज्यामुळे अपचन आणि सूज येणे यासारख्या समस्या उद्भवत नाहीत.
  • अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेला ब्लू पी टी केसांसोबतच त्वचेची पूर्ण काळजी घेतो. हे मुक्त रॅडिकल्स आणि बाह्य प्रभावांमुळे त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. यामुळे ते प्यायल्याने तुम्ही दीर्घकाळ तरूण राहू शकता.

Red Potato Eating Benefits | पांढरे नाहीतर लाल रंगाच्या बटाट्यांमध्ये आहेत पोषकतत्व, आरोग्याला मिळतील ‘हे’ फायदे

Red Potato Eating Benefits

Red Potato Eating Benefits | बटाट्याला भाज्यांचा राजा असे म्हटले जाते. कारण बटाट्याचा वापर जवळपास प्रत्येक भाजीमध्ये करू शकतो. त्याचप्रमाणे बटाट्यापासून अनेक पदार्थ होतात. बटाट्याची भाजी, चिप्स, पकोडे, बटाटा पराठा, बटाटाची कोथिंबीर असे विविध पदार्थ पदार्थपासून केले जातात. प्रत्येक घरात बटाटा हा असतोच. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच बटाट्याची भाजी आवडते. बटाटा चवीला देखील खूप चांगला असतो. आणि त्यामध्ये अनेक पोषकतत्व देखील येतात.

बटाट्याचे नाव येताच पांढऱ्या बटाट्याचा विचार मनात येतो. परंतु बटाटे देखील लाल रंगाचे (Red Potato Eating Benefits) असतात, जे अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात. लाल बटाट्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, विशेषत: अँथोसायनिन, त्यामुळे त्याचा रंग लाल होतो. हे बटाटे म्हणजे पोषक तत्वांचा खजिना, ज्यातून आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

पोषक तत्वांनी समृद्ध | Red Potato Eating Benefits

लाल बटाट्यामध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. हे आपले सामान्य आरोग्य नेहमी निरोगी ठेवण्यास मदत करते.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

लाल बटाट्यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब राखण्यास मदत करते, ज्यामुळे उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग यांसारख्या समस्यांचा धोका कमी होण्यास मदत होते.

पचन सुधारते

लाल बटाट्यामध्ये आहारातील फायबर आढळते, जे पाचन तंत्र मजबूत करते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होते.

प्रतिकारशक्ती मजबूत करते

लाल बटाट्यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात. याशिवाय यामध्ये असलेले झिंक आणि कॉपर आपल्या शरीराला कोणत्याही संसर्गापासून वाचवते.

ऊर्जा मिळवा

कार्बोहायड्रेट्सने समृद्ध असलेला लाल बटाटा आपल्या शरीराला ऊर्जा देतो, ज्यामुळे तुम्ही दिवसभर एनर्जीने परिपूर्ण राहू शकता.

त्वचेचे आरोग्य सुधारते

लाल बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या त्वचेच्या आरोग्यास प्रोत्साहन देतात.

मानसिक आरोग्य सुधारते

लाल बटाट्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी मानसिक आरोग्य राखण्यास मदत करते. यामुळे स्मरणशक्ती आणि लक्ष देण्याची शक्ती वाढते.

Shower Tips : उन्हातून घरी येताच अंघोळ करण्याची सवय पडू शकते महागात; होऊ शकते गंभीर समस्या

Shower Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shower Tips) गेल्या काही दिवसात बाहेरील तापमान इतके वाढले आहे की, घरातून बाहेर पडायची ईच्छा सुद्धा होत नाही. असे असताना काही काम अशी असतात जी करण्यासाठी घरातून बाहेर पडावेच लागते. मग उन्हातान्हात फिरल्यानंतर शरीराचं तापमान प्रचंड वाढतं. ज्यामुळे साहजिक आहे गरमीने जीव हैराण होतो. घामाघूम झालेलं अंग आणि त्यात उन्हाचा पारा सहन होत नाही. त्यामुळे बरेच लोक उन्हातून घरी आल्या आल्या थेट बाथरूम गाठतात आणि मस्त शॉवर घेतात. पण ही सवय आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे का? याबाबत कधी विचार केलाय? चला तर जाणून घेऊया याविषयी तज्ञ काय सांगतात.

उन्हातून घरी येताच अंघोळ केल्याने काय होत? (Shower Tips)

बऱ्याच लोकांना गरमी, उष्णता सहन होत नाही. त्यामुळे हे लोक जर कामानिमित्त उन्हात घरातून बाहेर पडले तर घरात आल्या आल्या अंघोळ करणे पसंत करतात. तुम्हालाही अशी सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण यामुळे तुमच्या शरीराचे नुकसान होऊ शकते. ते कसे? (Shower Tips) याबाबत बोलताना तज्ञ सांगतात कि, बाहेरील उन्हामुळे शरीराचे तापमान वाढलेले असते. अशात जर तुम्ही घरात आल्या आल्या अंघोळ केलीत तर साहजिकपणे तुम्हाला आरोग्यविषयक काही समस्यांना तोंड द्यावे लागेल.

खास करून सर्दी होणे, घसा खवखवणे, ताप येणे अशा काही समस्या होण्याची शक्यता असते. उन्हातून घरी आल्यानंतर अंघोळ करणे ही सवय नक्कीच चांगली आहे. पण यासाठी तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल. उन्हातून घरी आल्यानंतर लगेच अंघोळ करू नका. घरी येऊन अर्धा तास बस आणि त्यानंतर अंघोळ करा. (Shower Tips) तसेच जास्त वेळ शॉवर घेऊ नका. यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते. त्यातही जर तुम्ही गरम पाण्याने अंघोळ करत असाल तर तुमच्या त्वचेचे नैसर्गिक तेज निघून जाते. ज्यामुळे त्वचेत कोरडेपणा येतो आणि उष्मा पुरळ होण्याची शक्यता वाढते.

याशिवाय तज्ञ सांगतात की, तुमच्या शरीरावरील छिद्र उघडले जाऊ शकतात. तसेच जितका जास्त वेळ शॉवर घ्याल तितकेच तुमच्या शरीराचे तापमान वाढेल. शिवाय डिहायड्रेशनमुळे रक्त घट्ट होणे किंवा रक्तात गुठळ्या होणे अशा समस्या होऊ शकतात. (Shower Tips) यामुळे पल्मोनरी एम्बोलिझम होण्याची शक्यता असते. जे हृदयविकाराच्या झटक्यापेक्षासुद्धा वाईट मानले जाते.

Skin Care Tips : पिंपल्स, रिंकल्सने केले हैराण? ‘या’ टिप्स वापरा, चुटकीत गायब होतील समस्या

Skin Care Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care Tips) गेल्या काही दिवसात तापमान इतकं जास्त वाढलंय की, गरमीने सगळेच हैराण झाले आहेत. अशा दिवसात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजचे असते. खास करून त्वचेची काळजी घ्यायला हवी, असे प्रामुख्याने सांगितले जाते. कडक उन्हामुळे टॅनिंगची समस्या होतेच शिवाय पिंपल्स आणि रिंकल्सच्या समस्या देखील वाढू शकतात. अशावेळी काय केल्यास आपल्या चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होणार नाही? याबाबत कायम विचारणा केली जाते. त्याचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

उन्हाळ्यातसुद्धा डागरहित आणि चमकदार त्वचा हवी असेल तर आज आम्ही तुम्हाला ज्या ४ महत्वाच्या टिप्स देणार आहोत त्या वापरून पहा. ऋतू बदलत राहिले तरीही तुमची त्वचा मात्र, तेजस्वी आणि चमकदार राहील.

टिप 1 : चेहरा धुणे (Skin Care Tips)

उन्हाळ्याच्या दिवसात प्रतिदिन किमान २ वेळा तरी चेहरा धुणे गरजेचे आहे, हे लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार समजून घ्यावा लागेल. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार फेस वॉश निवडा आणि दिवसभरातून किमान दोनवेळा चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील धूळ आणि माती स्वच्छ होण्यास मदत होईल. यामुळे पिंपल्स आणि रिंकल्सची समस्या होणार नाही.

टिप 2 : सनस्क्रिनचा वापर

उन्हाळ्याच्या दिवसात टॅनिंगपासून बचाव करायचा असेल तर चांगले सनस्क्रिन वापरा. (Skin Care Tips) ऋतू कोणताही असला तरी सनस्क्रीन जरूर वापरा. यामुळे सूर्याच्या अतिनिल किरणांपासून तुमच्या त्वचेचे रक्षण होईल आणि प्रदूषणामुळे चेहरा खराब होणार नाही.

टिप 3 : एक्सफोलिएट करणे

उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेताना एक्सफोलिएट करणे अत्यंत महत्वाचे असते. यासाठी तुमच्या त्वचेचा प्रकार काय आहे ते समजून घ्या आणि त्यानुसार स्क्रबची निवड करा. (Skin Care Tips) हा स्क्रबर खरेदी करताना तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या होणार नाहीत याची काळजी घ्या. तसेच आपल्या त्वचेला काय समस्या आहेत? हे लक्षात घेऊन स्क्रब करा. यामुळे चेहऱ्यावर सतत पिंपल्स येणे बंद होईल आणि चेहरा खराब होणार नाही.

टिप 4 : भरपूर पाणी प्या

उन्हाळ्यात शरीर लगेच डिहायड्रेट होऊ शकते. डिहायड्रेट होणे म्हणजे काय? तर शरीरातील पाणी कमी होणे. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेला डिहायड्रेट होण्यापासून थांबवणे गरजेचे आहे. (Skin Care Tips) यासाठी दिवसातून किमान ४ ते ५ लिटर पाणी प्या. यामुळे तुमची त्वचा सुधारेल आणि पिंपल्सच्या समस्येपासून तुमची सहज सुटका होईल.

कंबरदुखी, गुडघेदुखीमुळे त्रस्त झाला आहात?? तर दररोज हा 1 लाडू खा; हाडे होतील भक्कम

Health Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतामध्ये नारळाचा वापर स्वयंपाक घरामध्ये केला जातो. तसेच नारळाचे तेलही अधिक प्रमाणात वापरले जाते. नारळ हा चवीसाठी जितका चांगला लागतो तितकाच तो शरीरासाठी ही फायदेशीर ठरतो. तुमची कंबरदुखत असेल किंवा गुडघेदुखीचा त्रास जाणवत असेल तर त्यावर नारळ रामबाण उपाय आहे. एका हेल्थ रिपोर्टमधून समोर आले आहे की, नारळाचे तेल हाडांची रचना सुधारते. तसेच कोकोनट ऑईलमुळे हाडे फॅक्चर होण्याचा धोका ही टळतो.

त्यामुळे दररोज नारळाचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरते. तुम्ही नारळाचे लाडू बनवून ही ते खाऊ शकता. नारळाच्या लाडूमध्ये आयर्न, फायबर, प्रोटीन अधिक असते. त्यामुळे नारळाचे लाडू कंबरदुखीवर किंवा सांधेदुखीवर गुणकारी ठरतात. हे नारळाचे लाडू तुम्ही साखरेऐवजी गूळ वापरूनही बनवू शकता. आज तुम्हाला गुळ आणि नारळ वापरून लाडू कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

साहित्य

नारळ – अर्धा किलो
डिंक- 300 ग्राम
काजू, बदाम – 100 ग्राम
आक्रोड- 100 ग्राम
मनुके – 100 ग्राम
तूप – अर्धा किलो

नारळाचे लाडू बनवण्याची कृती

  • सर्वात प्रथम नारळाचे लाडू बनवण्यासाठी नारळ घ्या. त्यानंतर वरचा तपकिरी भाग सोलून काढा. आता गॅसवर तवा ठेवा आणि त्यात अर्धी वाटी तूप घाला.
  • या तुपामध्ये काजू, बदाम, अक्रोड, मनुके सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या. पुढे बारीक केलेले खोबऱ्याचे तुकडे हलक्या सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या.
  • आता एका पॅनमध्ये डिंक आणि अर्धा किलो गूळ घालून ते वितळवा. गुळ आणि डिंका वितळत असताना त्यात भाजलेले ड्रायफ्रूट बारीक करून घाला.
  • यानंतर त्यामध्ये भाजलेले खोबरे आणि कोरडे मेवे ही आवश्यकतेनुसार घाला. हे सर्व साहित्य एकजीव करून घेतल्यानंतर गॅस बंद करा.
  • हे सर्व मिश्रण थोडे थंड झाल्यानंतर लाडू बांधायला सुरुवात करा. लाडू बांधून झाल्यानंतर त्यावर खोबऱ्याचा कीस वरून घाला. आणि हे लाडू रोज सकाळी एक एक खावा.

Mumbai Ac Local : एसी लोकलमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना बसणार चाप ; जारी केला विशेष हेल्पलाईन नंबर

AC local

Mumbai Ac Local : मुंबईमध्ये रेल्वेला किती गर्दी असते हे काही वेगळं सांगायला नको. विशेषतः लोकल ह्या खचाखच गर्दीने भरलेल्या असतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे एसी लोकलला प्रवास करणाऱ्यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र अनेकदा एसी लोकलमधून फुकट्यांचा प्रवास होत असल्याची माहिती समोर आली आहे. एसी लोकल मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मुळे (Mumbai Ac Local) तिकीट काढून बसणाऱ्या प्रवाशांची मात्र गोची झाली आहे.

म्हणूनच रेल्वेच्या टास्क फोर्सकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एसी लोकल आणि साध्या लोकलच्या फर्स्ट क्लास ने प्रवास करताना विना तिकीट किंवा साधे तिकीट असतानाही घुसकोरी करून गर्दी करणाऱ्या प्रवाशांना (Mumbai Ac Local) धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तपासणी करण्याबरोबरच मध्य रेल्वेच्या टास्क फोर्स न एक नवीन व्हाट्सअप क्रमांक जारी केला आहे. या हेल्पलाइनवर जर प्रवाशांना प्रवासामध्ये काही अनधिकृत व्यक्ती प्रवास करत असल्याचा आढळल्यास त्यावर तुम्ही तक्रार करू शकता.

रोज 33 लाख प्रवासी करतात प्रवास (Mumbai Ac Local)

खरंतर मध्य रेल्वे मध्ये तर रोज 33 लाख प्रवासी प्रवास करतात तसं दररोज 810 लोकल फेऱ्या चालवल्या जातात. मध्य रेल्वेवर दररोज एसी लोकलच्या 66 फेऱ्या चालवल्या जातायेत. एसी लोकलच्या मागणीतही वाढ होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसी लोकलचे एकेरी प्रवासाचे तिकीट मागच्या वर्षी निम्म्या किमतीने कमी केले होते. त्यामुळे मध्या रेल्वेच्या 66 एसी लोकल फेऱ्यांमधून दररोज साधारण 78 हजार 332 प्रवासी प्रवास करतात. ऐसी लोकलला प्रवासी प्राधान्य देत आहेत.

सर्वाधिक एसी लोकलच्या फेऱ्या ह्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गावर (Mumbai Ac Local) चालवण्यात येत आहेत अशावेळी एसी लोकल मधून सुरक्षित प्रवास करता येत आहे मात्र एसी लोकल मधून काही विना तिकीट प्रवासी घुसखोरी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या त्यामुळे मध्य रेल्वेच्या एसी टास्क फोर्स नियमित तिकीट तपासणी सोबतच एक हेल्पलाइन जारी केला आहे.

काय आहे हेल्पलाईन नंबर ? (Mumbai Ac Local)

तुम्ही सुद्धा एसी लोकलने प्रवास करत असाल आणि तुम्हाला जरी कोणतेही प्रवासी विना तिकेट किंवा साध्या लोकांचे तिकीट घेऊन एसी लोकलमध्ये प्रवास करताना आढळले तर अशावेळी तुम्ही एका व्हाट्सअप नंबरला मेसेज करू शकता आणि तुमची तक्रार नोंदवू शकता. 7208819987 असा हा हेल्पलाइन नंबर आहे. या हेल्पलाइन नंबर वर केवळ मेसेज करण्याची सोय आहे.

प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मध्य रेल्वेची एक स्पेशल मॉनिटरिंग टीम स्थापन करण्यात आली असून या क्रमांकावर तक्रार येताच ही टीम कारवाई करणार आहे. शिवाय तक्रारीचे निवारण केलं नाही तर ही टीम दुसऱ्या दिवशी (Mumbai Ac Local) त्या डब्यामध्ये साध्या पेक्षा जाणार आहे आणि कारवाई करणार आहे असं मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी एका माध्यमाला माहिती देताना स्पष्ट केले आहे.

Samrudhi Expressway : वर्षभरात समृद्धीवरून धावली 1 कोटी वाहने ; मिळाला 725 कोटी रुपयांचा महसूल

Samrudhi Expressway : राज्य सरकारने काही महत्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेतले आहेत, त्यापैकीच एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग… 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचे काम आता पूर्ण होण्यासाठी केवळ शेवटचा टप्पा बाकी आहे, त्यापूर्वी वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेल्या मार्गाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

725 कोटी रुपयांचा महसूल (Samrudhi Expressway)

मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पातील शिर्डी ते भरवीर दरम्यानच्या 80 किलोमीटर वाहतुकीचा टप्पा सेवेत दाखल झाला त्याला आज एक वर्ष पूर्ण झाला आहे. याच मार्गाबाबत आता एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली असून आतापर्यंत या महामार्गावरून तब्बल एक कोटी वाहन धावली आहे. तर या मार्गावरून 725 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला (Samrudhi Expressway) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सध्या 701 किलोमीटर समृद्धी महामार्गाच्या बांधकामापैकीच 625 किमीचा मार्ग खुला करण्यात आला आहे. यामध्ये नागपूर ते शिर्डी हा टप्पा 2022 मध्ये तर शिर्डी ते धारवीर हा टप्पा 25 मे 2023 रोजी वाहतुकीसाठी खुला झाला होता. याबरोबरच भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा 25 किलोमीटरचा टप्पा हा मार्च 2024 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. या तिन्ही महामार्गांवर चांगली वाहतूक पाहायला मिळत आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद यावरून पाहायला मिळतो आहे. डिसेंबर 2022 पासून 23 मे 2024 पर्यंत या महामार्गावरून 99 लाख 80 हजार वाहनांनी प्रवास केल्याची माहिती एम एस आर डी सी पी एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून (Samrudhi Expressway) मिळाली आहे.

‘या’ वर्षाअखेरपर्यंत मार्ग होणार पूर्ण (Samrudhi Expressway)

आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमने गाव हा अदयाप पूर्णत्वास आलेला नाही. हे काम सुरू आहे. मात्र महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कार्पोरेशन म्हणजेच एम एस आर डी सी कडून उर्वरित काम येत्या वर्षाअखेर (Samrudhi Expressway) पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती मिळाली आहे.

MSRDC च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत 90% काम पूर्ण झालेले आहे. उरलेले काम १. ८ किलोमीटर लांबीचे कासरा येथील खर्डी ब्रिज चे आहे जे प्रामुख्याने आव्हान असेल. याशिवाय आठ किलोमीटरच्या लांब बोगद्याचे (Samrudhi Expressway) काम सुद्धा पूर्णत्वास आलेले आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. खरंतर 701 किलोमीटरचा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा सहा पदरी मार्ग आहे मात्र खर्डी पुलावर हा मार्ग केवळ चार पदरी राहणार असून थोडासा अरुंद होणार असल्याची माहिती देखील या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Bank Holiday: महत्त्वाची कामे पुढच्या आठवड्यातच उरका!! जून महिन्यात बँकाना आहेत भरपूर सुट्ट्या

Bank Holiday

Bank Holiday| तुम्हाला जर बँकेशी संबंधित एखादे काम करायचे असेल तर ते पुढच्याच आठवड्यात करून घ्या. कारण, पुढच्या आठवड्यात मे महिना संपला की जून महिना सुरू होईल आणि जून महिन्यामध्ये बँकांना जास्त आहेत. जून महिन्यात दर आठवड्याच्या रविवारी सुट्ट्या आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्ट्या तसेच इतर सणावारांच्या सुट्ट्या मिळून बँक 10 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळेच सर्वांनी आपली बँकेची कामे आटपून द्यावीत.

जून महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holiday)

2 जून 2024 – बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

8 जून 2024 – दुसरा शनिवार असल्यामुळे बँका बंद राहतील.

9 जून 2024 – रविवारमुळे बँक बंद असेल.

15 जून 2024 – YMA दिवस आणि राजा संक्रांती निमित्ताने बँकेला सुट्टी असेल. मिझोराम आणि ओडिशात 15 जून रोजी संक्रांतीमुळे बँक बंद असतील.

16 जून 2024 – रविवारची साप्ताहिक सुट्टी असेल.

17 जून 2024 – ईद-उल-अजहानिमित्त मिझोराम, सिक्कीम आणि इटानगर वगळून देशभरातील बँका बंद राहतील.

21 जून 2024 – वटसावित्री वृत्त असल्यामुळे राज्यांतील अनेक बँका बंद राहतील.

22 जून 2024 – संत गुरु कबीर जयंती असल्यामुळे छत्तीसगढ़, हिमाचल प्रदेश, हरियाणा पंजाब येथील बँका बंद राहतील.

30 जून 2024 – रविवार असल्यामुळे बँकेला सुट्टी असेल.

Mysterious Stepwell : महाराष्ट्रातील ‘ही’ रहस्यमयी विहीर पाहून येईल चक्कर; अद्याप गूढ कायम

Mysterious Stepwell

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mysterious Stepwell) महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे आहेत जी पाहण्यासाठी कायम पर्यटक येत असतात. अगदी लांबून लोक मोठ्या उत्सुकतेने ही ठिकाणे पहायला येतात. ज्यामध्ये काही ऐतिहासिक वास्तू तर काही पुरातन भव्य इतिहास असलेल्या ठिकांणांचा समावेश आहे. आज आपण महाराष्ट्रातील अशाच एका ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण तसेच रहस्यमयी ठिकाणाविषयी माहिती घेणार आहोत. जगात जर्मनी आणि भारतात परभणी… हे उगाच म्हटलं जात नाही. परभणीत एक अशी रहस्यमयी विहीर आहे जिचे गूढ आजपर्यंत कुणीच उलगडू शकलेलं नाही. याच विहिरीविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.

परभणीची रहस्यमयी विहीर (Mysterious Stepwell)

महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात वालूर नावाचे एक गाव आहे. या गावात वेलूर बारव अर्थात वेलूरची एक अत्यंत प्राचीन पायविहीर आहे. या विहीरीची रचना अतिशय गूढ आणि तितकीच आकर्षक आहे. या विहिरीत आठ बाजूने चक्राकार पद्धतीने फिरत तळाशी जाणाऱ्या पायऱ्या आहेत. ज्या नुसत्या पाहूनच चक्कर येते. मग उतरायचं लांबच राहील. या विहिरीची रचना ३२.२ फूट लांब, ३०.८ फूट रुंद आणि ३२ फूट खोल अशी आहे. ही विवाहित कुणी बांधली? का बांधली? याबाबत कुणालाही माहित नाही. त्यामुळे या विहिरीच्या बांधकामाचे रहस्य आजही उलघडलेले नाही.

विहिरीत डोकावताच येते चक्कर

परभणीतील ही पायविहीर अत्यंत प्राचीन असून तिचे बांधकाम फारच गूढ स्वरूपाचे आहे. (Mysterious Stepwell) विशेष म्हणजे, या विहिरीच्या पायऱ्यांचा आकार हा नदीतील पाण्याच्या भोवर्‍याप्रमाणे वाटतो. अगदी पाण्यात वावटळ यावं आणि पाणी गोलगोल फिरावं असंच काहीसं वाटत. यामुळे विरीहीत डोकावून पाहताचा चक्कर येते किंवा डोळे गरगरू लागतात.

८ आकड्याची कमाल

परभणीच्या वालूर गावातील ही बारव म्हणजेच पायविहीर तिच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधकामामुळे कायम चर्चेत असते. ही वास्तू प्रचंड आकर्षक आणि तितकीच रहस्यमयी आहे. कारण, या विहीरीची रचना अतिशय गूढ आहे. माहितीनुसार, वालूर गावाला तंत्रविद्येची पार्श्वभूमी आहे. ज्याचा खास प्रभाव या बारव अर्थात पायविहिरीवर दिसून येतो.

(Mysterious Stepwell) या विहिरीच्या बांधकामाची खासियत सांगायची म्हणजे, विहीरीच्या बांधकामात ८ आकाड्याची कमाल अनुभवता येईल. या विहिरीत आठ बाजूने उतरणार्‍या पायर्‍या, आठ देवकोष्ट अशी काहीशी खास रचना आहे. या विहिरीचे बांधकाम त्याची शैली आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहता सुमारे १ ते दीड हजार वर्षांपूर्वी केले असेल असा अंदाज इतिहास तज्ञांनी लावला आहे.