Friday, December 26, 2025
Home Blog Page 742

भाजपला 272 चा आकडा गाठता आला नाही, तर पाठिंबा देणार का? पवारांचे थेट उत्तर

modi sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) आत्तापर्यंत ५ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यंदा पुन्हा एकदा देशात मोदी सरकार येणार असा दावा भाजपकडून केला जातोय तर दुसरीकडे देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल असा दावा विरोधी पक्षातील नेतेमंडळी करत आहेत. अनेक राजकीय विश्लेषक भाजपला २८० ते ३०० जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करत आहेत. अशातच जर मोदींना २७२ ची मॅजिक फिगर गाठता आली नाही तर महाराष्ट्रातून शरद पवार (Sharad Pawar) किंवा उद्धव ठाकरे मोदींना (Narendra Modi) पाठिंबा देतील का? अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र आता खुद्द शरद पवारांनीच हि गोष्ट फेटाळून लावली आहे.

ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कदम यांनी शरद पवार यांची विशेष मुलाखत घेतली. यामध्ये त्यांनी शरद पवारांना थेट प्रश्न केला कि समजा यंदाच्या निवडणुकीत 272 पेक्षा कमी भाजपच्या जागा आल्या आणि तुम्हाला त्यांनी साद घातली तरी तुमचा पक्ष त्यांच्यासोबत जाणार का? यावर उत्तर देताना पवारांनी स्पष्टपणे नाही असं उत्तर दिले. भाजपचे धोरण आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही भाजपसोबत जाणार नाही.. आमचे व्यक्तिगत संबंध चांगले राहतील, मी अजून राज्यसभेत आहे, त्याठिकाणी मोदींची भेट झाली तर आम्ही बोलणार नाही असं नाही .. मात्र उद्या संसदेत मी त्यांच्या बाजूने हात वर करणार नाही असं पवारांनी स्पष्ट केलं. तसेच कोणत्याही परिस्थितीत आपला पक्ष भाजपला साथ देणार नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं.

ठाकरे भाजपला पाठिंबा देणार नाहीत –

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही भाजपला पाठिंबा देणार नाहीत असं शरद पवारांनी सांगितले. निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील अशी अजिबात शक्यता नाही.. अजिबात म्हणजे अजिबात शक्यता नाही. उद्धव ठाकरे हे भाजप आणि मोदींसोबत जाणार नाहीत.. नाहीत.. नाहीत.. असे म्हणत शरद पवारांनी या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला. राज्यात महाविकास आघाडीच्या जागा वाढतील, मध्य प्रदेश, राजस्थानमध्येही काँग्रेसच्या जागा वाढणार आहेत. केजरीवालांच्या पक्षाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. असे शरद पवार यांनी म्हंटल.

Dinesh Karthik Retirement : दिनेश कार्तिक IPL मधून निवृत्त; RCB ने दिला भावनिक ‘गार्ड ऑफ ऑनर’

Dinesh Karthik Retirement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्स कडून पराभव झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा दिग्गज विकेटकिपर बॅट्समन दिनेश कार्तिक आयपीएल मधून निवृत्त (Dinesh Karthik Retirement) झाला. सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रूम मध्ये परतत असताना दिनेश कार्तिकने हातात ग्लोव्हज घेऊन प्रेक्षकांना अभिवादन केलं. यावरून त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळल्याचे स्प्ष्ट झालं. कार्तिकने आपल्या १६ वर्षाच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण ६ संघांकडून क्रिकेट खेळलं … त्यांची आयपीएल कारकीर्द नक्कीच अभिमानस्पद अशीच राहिली आहे.

कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या रोवमन पॉवेलने विजयी धाव घेताच दिनेश कार्तिकने विराट कोहलीला मिठी मारली.. यानंतर इतर सहकाऱ्यांनीही दिनेश कार्तिकला भावनिक निरोप दिला. खरं तर आपल्या निवृत्तीबाबत (Dinesh Karthik Retirement) कार्तिकने स्पष्ट अशी कोणतीही घोषणा केलेली नाही .. परंतु मैदानावरील एकूण ते भावनिक क्षण पाहता कार्तिक पुनः आपल्या मैदानावर पाहायला मिळणार नाही.

६ संघांकडून आयपीएल खेळला- Dinesh Karthik Retirement

दिनेश कार्तिक आत्तापर्यंत एकूण ६ संघांकडून आयपीएल खेळला. त्याने 2008 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्समधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 2011 मध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये गेले. त्यानंतर त्याने मुंबई इंडियन्स कडून दोन हंगाम खेळले. 2014 मध्ये पुनः एकदा तो दिल्लीच्या संघात गेला. त्यानंतर 2015 मध्ये आरसीबीने त्याला विकत घेतलं. 2016 आणि 2017 मध्ये कार्तिक गुजरात लायन्ससाठी खेळला आणि नंतर केकेआर बरोबर चार हंगाम खेळला, कार्तिकने कोलकात्याचे कर्णधारपदही भूषवले होते. यानंतर 2022 मध्ये पुन्हा एकदा तो आरसीबीमध्ये परतला आणि त्याने फिनिशरची उत्तम भूमिका बजावली.

दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये एकूण 257 सामने खेळले ज्यात त्याने 4842 धावा केल्या. यामध्ये 22 अर्धशतकांचा समावेश आहे. कार्तिकचा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या १० खेळाडूंच्या यादीत समावेश आहे. विशेषत: आरसीबीमध्ये सामील झाल्यानंतर कार्तिकचा खेळ आणखी सुधारला आणि फिनिशर म्हणून तो नावारूपाला आला. या मोसमात त्याने 15 सामन्यात 326 धावा केल्या. अखेरच्या षटकात फलंदाजीला येऊन आक्रमक शॉट मारण्यात कार्तिक माहीर आहे. त्याने अनेकदा आरसीबीला संकटातून बाहेर काढत मोठी धावसंख्या रचून दिली आहे.

MLA P. N. Patil Death : काँग्रेस नेते, करवीरचे आमदार पी एन पाटील यांचे निधन

MLA P. N. Patil Death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे कोल्हापुरातील आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी.एन. पाटील यांचे आज गुरुवारी (23 मे 2024) निधन (MLA P. N. Patil Death) झाले आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पी एन पाटील हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ होते तसेच माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक अशीही त्यांची ओळख होती. पी एन पाटील यांच्या निधनाने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली असून कोल्हापूर काँग्रेसने निष्ठावान नेता गमवला आहे .

डोक्याला झाली होती दुखापत – MLA P. N. Patil Death

रविवारी सकाळी चक्कर येऊन पडल्याने पी एन पाटील यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. यानंतर त्यांना तातडीने जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली, आज पहाटेच्या सुमारास त्यांनी आपला प्राण (MLA P. N. Patil Death) गमावला. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पी. एन. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी सडोेथेच च्यांली खालसा येथे नेण्यात येणार आहे. तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असे समजते.

पी एन पाटील यांच्या निधनानंतर कोल्हापूर काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केलं. काँग्रेसचे निष्ठावंत, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्याच्या निधनामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो व कुटुंबियांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो असं सतेज पाटील यांनी म्हंटल.

पी. एन. पाटील यांनी राजकारणाची सुरुवात केल्यापासून ते आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसचा झेंडा कधीच खाली ठेवला नाही. राजकीय जीवनात कितीही चढ उतार आले तरी त्यांनी कधीच पक्षाशी तडजोड केली नाही. ते नेहमीच काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले … कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद सलग १८ वर्ष आमदार पाटील यांच्याकडे होतं. काँग्रेसच्या पडत्या काळात त्यांनी पक्षाला उर्जित अवस्था दिली. स्वर्गीय विलासराव देशमुखांचे खंदे समर्थक म्हणूनही त्यांची ओळख होती. विलासरावांच्या कार्यकाळात जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होत होती तेव्हा तेव्हा पी. एन. पाटील यांच्या मंत्रिपदाची चर्चा रंगली. मात्र, मंत्रिपदाने त्यांना नेहमीच हुलकावणी दिली. हे सुद्धा तितकंच खरं आहे.

ईश्वर मला ऊर्जा देतो, परमात्म्यानेच मला पाठवलं आहे; पंतप्रधान मोदींच वक्तव्य

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, तुम्ही गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत अधिक ऊर्जावान दिसत आहात. तुम्ही थकत का नाहीत?? यावर उत्तर देताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “मी कन्व्हिन्स झालोय की मला नक्कीच परमात्म्यानं इथं पाठवलयं. हे ऐकून लोक माझ्यावर टीका करतील. पण ही ऊर्जा बायोलॉजिकल शरीराकडून मिळत नाही. ही ऊर्जा ईश्वराने मला दिली आहे. कदाचित त्याला माझ्याकडून काही काम करवून घ्यायचं असेल.”

त्याचबरोबर, “मी काहीच नाही. मी फक्त एक माध्यम आहे. जे ईश्वराने माझ्या रुपात घेण्याचं ठरवलं आहे. म्हणूनच मी ज्यावेळी काही करतो त्यावेळी माझ्या मनात विचार असतो की ईश्वरच माझ्याकडून हे काम करवून घेत आहे. त्यामुळे मी नावलौकिक किंवा बदनामीची कधीच चिंता करत नाही. मी पूर्णपणे ईश्वराला समर्पित आहे.” असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सध्या नरेंद्र मोदी यांच्या याच वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

दरम्यान, देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आता या लोकसभा निवडणुकीतील फक्त दोन टप्पे उरले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो, सभा पार पडत आहेत. या काळात त्यांनी विविध प्रसार माध्यमांना मुलाखतीही दिल्या आहेत. आताही एका मुलाखतीत बोलत असताना त्यांनी मला ईश्वराने पाठवले आहे असे म्हणले आहे. त्यामुळे त्यांचेहे वक्तव्य चांगलेच चर्चेचा भाग बनले आहे.

Nashik Lok Sabha Election 2024 : शिंदेंच्या हेमंत गोडसेंना ठाकरेंचे राजाभाऊ जड जाणार??

rajabhau waje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तिकीट वाटपापासून ते प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघाचा ड्रामा हा जबरी राहिला.. ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे, शिंदे गटाकडून हेमंत गोडसे तर अपक्ष शांतिगिरी महाराज यांच्यातल्या या तिरंगी लढतीकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.. मतदानाच्या दिवशीही नाशिकमध्ये बराच राडा झाला… बोगस मतदान, आमदारांच्यातील बाचाबाची आणि शांतिगिरी महाराजांवर दाखल झालेला गुन्हा यामुळे नाशिकचं मतदान वादळी राहिलं. नाशिकचं मतदान तर झालंय… निकाल एव्हीएममध्ये बंद ही झालाय… पण आता सगळीकडे चर्चा आहे ती निवडून कोण येणार याची? लढत घासून होणार असली तरी नाशकात मशालच पेटणार असं बोललं जातंय… संपूर्ण प्रचारात आणि मतदानाच्या दिवशीही नाशिकात राजाभाऊ वाजे यांच्याच नावाची चर्चा का राहिली? शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष उभं राहून नेमका कुणाचा गेम केला? कालच्या मतदानात निकाल कुणाच्या बाजूने झुकलेला दिसतोय? धनुष्यबाण की मशाल? याचंच डिकोडींग करुयात

मतदानासाठी नाशिकमध्ये नागरिकांनी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाच्या रांगा लावल्या होत्या. यामुळे नाशिकमध्ये निवडणूक लोकांनी हातात घेतलीय असं बोललं गेलं. शांतिगिरी महाराजांनी मतदान झाल्यानंतर मतदान कक्षाला गळ्यातील हार घातल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला… राजाभाऊ वाजे यांच्यासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या… तर आजी-माजी आमदारांच्यातील बाचाबाची मुळे नाशिकचं वातावरण मतदानाच्या दिवशी बरंच तणावाचं होतं. काही ठिकाणी बोगस मतदान आणि पैसे वाटल्याचे प्रकारही आढळून आले. शेवटी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नाशकात 51. 16 टक्के मतदानाचा आकडा नोंदवण्यात आला. त्यातही शहरी पट्टयात कमी तर ग्रामीण भागात जास्त असा मतदानाच्या टक्केवारीचा पॅटर्न आढळून आला… आणि इथंच ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे निवडून येतील याचा अंदाज फिट्ट बसला… कारण नाशिक शहरात भाजपची ताकद जास्त होती. हिंदुत्ववादी मतांचा टक्काही नाशकात जास्त आहे. या मतांच्या कन्वर्जनवर गोडसेंची मोठी मदार होती. पण तिथूनच सर्वात कमी मतदान झाल्यामुळे हा गोडसेंसाठी मोठा पॉलिटिकल लॉस आहे…

मतदानासाठी उदासीन असणारा हा मतदार अर्थात भाजपचा होता, तो मतांमध्ये कन्व्हर्ट न झाल्यामुळे राजाभाऊ वाजे यांचं वजन मतदानानंतर वाढताना दिसतंय. दुसरा मुद्दा असा की राजाभाऊ वाजे ज्या मतदारसंघातून येतात त्या सिन्नरमध्ये सर्वाधिक म्हणजे 58.70 टक्के मतदानाची नोंद झाली. शेजारच्या इगतपुरी मध्येही मतदानाची आकडेवारी 57 टक्केंच्या आसपास राहिली. ग्रामीण पट्टयातील मतदानाचा हा वाढता आकडा वाजे यांना दिल्लीपर्यंत घेऊन जाण्यासाठी पुरेसा ठरणार आहे… ग्रामीण भागात पहिल्यांदाच आपला माणूस खासदार होणार, ही भावना तीव्र होती. त्यामुळे वाजेंना मतदान करण्यासाठी मतदारांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या.

शांतिगिरी महाराजांना भाजपाचा बॅक सपोर्ट असल्याच्या अनेक वावड्या नाशिक शहरात उठल्या… संपूर्ण प्रचार प्रक्रियेत हेमंत गोडसे आणि त्यांची शिवसेना एकटे दिसले… भाजपची इथे हक्काची व्हॉट बँक असतानाही त्यांचे कार्यकर्ते उदासीन दिसले. सेम गोष्ट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही ठरली. भुजबळ यांची नाशिकमध्ये मोठी ताकद असतानाही त्यांचा मतदारसंघातील सायलेन्स बरंच काही सांगून जाणारा ठरला… याउलट काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाजेंना निवडून आणण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करताना दिसले… ग्रामीण पट्टा, मुस्लिम – दलित व्होटर, वंजारी, माळी या सायजेबल जातींचा सपोर्टही वाजेंच्याच बाजूने मतदानाच्या दिवशी दिसला. हे सगळं पाहता गोडसे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का म्हणावा लागेल…

साधा सदरा, गळ्यात मफलर असा लुक असल्याने विरोधकांनी वाजेंना उमेदवारीनंतर हलक्यात घेतलं होतं. खासदाराला इंग्रजीतून बोलावं लागतं असं म्हणत त्यांच्या अबिलिटी वरच शंका घेण्यात आली होती. त्यावर राजाभाऊंनी खटक्यावर बोट जाग्यावर पलटी या न्यायाने विरोधकांना उत्तर देत चांगलीच अद्दल घडवली होती. माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने येऊन इंग्रजीतून चर्चा करावी. मी त्यांच्या सर्व प्रश्नांचे उत्तरे देईन. अगदी ग्रॅमॅटिकली व शुद्ध इंग्रजी भाषेत मी चर्चा करायला तयार आहे. त्यात थोडी जरी चूक झाली किंवा कोणी शोधली, तर मी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही… राजाभाऊंनी दिलेल्या या आव्हानामुळे विरोधक गपगार पडले आणि राजाभाऊंना नाशिकमध्ये यामुळे मोक्कार पब्लिसिटी मिळून गेली. थोडक्यात वाजे हे प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यात गोडसेंपेक्षा उजवे राहिले… दूसरीकडे अगदीच रडत खडत उमेदवारी मिळाल्याने महायुतीच्या प्रचारात म्हणावी इतकी रग नव्हती. त्याचंच रिफ्लेक्षण मतदानाच्या दिवशीही जर पडताना दिसलं तर गोडसे यांचा करेक्ट कार्यक्रम होऊन 4 जूनला निकाल वाजेंच्या बाजूने झुकलेला दिसेल. थोडक्यात नाशिकात गुलाल हा साध्यासुध्या राजाभाऊ वाजे यांच्या कपाळाला लागतोय, असा एकंदरीत कल आहे. बाकी नाशिकचा उमेदवार म्हणुन तुमची पसंद कुणाला? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

Amazon वर बंपर सेल सुरू!! एसी, फ्रिज आणि वॉशिंग मशीन मिळत आहे स्वस्त दरात; पहा ऑफर्स

Summer Appliances sale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गर्मीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही स्वस्त एसी, फ्रीज आणि इतर गृहोपयोगी वस्तू शोधत आहात का? असे असेल तर आम्ही सांगू इच्छितो की, सध्या ॲमेझॉनवर खास सेल सुरू झाला आहे. Summer Appliances sale असे या सेलचे नाव आहे. ज्यामध्ये तुम्हाला खरेदी केलेल्या वस्तूंवर 60 % पर्यंत सूट मिळत आहे. Summer Appliances sale 22 ते 27 मे पर्यंत चालू आहे. या सेलमध्ये तुम्हाला बँक डिस्काउंटचाही लाभ मिळत आहे. तर विविध बँका वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत. खास म्हणजे, IDFC बँक 5 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे.

सध्या Amazon India वर AC चे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामधून तुम्ही 1 टन ते 2 टनपर्यंत पर्याय निवडू शकता. याठिकाणी सर्वच ब्रँडचे एसी येथे उपलब्ध आहेत. जे वेगवेगळ्या सवलती आणि किमतींमध्ये दिले जात आहेत. Amazon India वर पर्याय आहे की, ज्यावरून तुम्ही तुमच्या रूमच्या आकारानुसार AC खरेदी करू शकता. यामुळे तुम्हाला हवा तो AC निवडता येईल.

फ्रीज आणि वॉशिंग मशिनवरही ऑफर

Summer Appliances sale मध्ये वॉशिंग मशीन आणि फ्रीजवर ही ऑफर सुरू आहे. त्यामुळे या सलेवरून तुम्ही या वस्तूही स्वस्तात खरेदी करू शकता. या सेलमध्ये तुम्ही सिंगल डोअर, डबल डोअर आणि उच्च क्षमतेचे रेफ्रिजरेटर खरेदी करू शकता. तसेच, साइड बाय डोर फ्रीज देखील खरेदी करू शकता. खरेदी करताना तुम्ही एचडीएफसी बँक कार्डवर ईएमआय पर्याय निवडला तर तुम्हाला 14 हजार रुपयांची त्वरित सूट मिळेल.

5 स्टार रेटिंग लक्षात ठेवा

कधीही एसी, फ्रीज खरेदी करण्यापूर्वी वीज बचत दर्शविणारी 5 स्टार रेटिंग नेहमी लक्षात पहात चला. 5 स्टार रेटिंगसह एसी खरेदी केल्यास तुमचे वीज बिल खूप कमी येईल. यामुळे तुम्ही वर्षभरात सुमारे 10 ते 25 हजार रुपयांची बचत कराल.

IGI Aviation Bharti 2024 | IGI विमानचालन सेवा अंतर्गत 1074 रिक्त पदांची भरती, अशाप्रकारे करा अर्ज

IGI Aviation Bharti 2024

IGI Aviation Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय नोकरीची चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता IGI एवीएशन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत एक भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत ग्राहक सेवा एजंट या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांच्या एकूण 1074 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत 22 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी केवळ आजचा दिवस आहे म्हणून तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा. आता या भरतीचे सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

महत्त्वाची माहिती | IGI Aviation Bharti 2024

  • पदाचे नाव- ग्राहक सेवा एजंट
  • पदसंख्या – 1074 जागा
  • शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बारावी पास
  • वेतनश्रेणी – 15000 ते 25 हजार रुपये
  • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मे 2024

निवड प्रक्रिया

  • उमेदवाराला सगळ्यात आधी लेखी परीक्षा द्यावी लागेल .
  • जे उमेदवार लेखी परीक्षेत पास होतील ते कंपनीच्या दिल्ली येथील नोंदणीकृत कार्यालयात वैयक्तिक मुलाखतीसाठी हजर राहतील.
  • लेखी चाचणी आणि मुलाखत यांच्या एकत्रित मार्क्सवर निवड केली जाईल.
  • परीक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये घेतले जाईल.
  • यामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करू शकता.
  • चुकीचे अर्ज पूर्णपणे नाकारण्यात येईल.
  • 22 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

विराट कोहलीच्या जीवाला धोका; RCB ने रद्द केली पत्रकार परिषद

virat kohli threat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेटविश्वातून एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. रॉयल चॅलेंन्जर बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहलीला (Virat Kohli) भर आयपीएलच्या माहौलात धमकी देण्यात आली आहे. कोहलीच्या जीवाला धोका असून त्यामुळे आरसीबीच्या संघाने सराव सत्रात सहभागही घेतला नाही आणि सामन्यापूर्वीची पत्रकार परिषद सुद्धा रद्द करण्यात आली आहे. दहशतवादी कारवायांच्या संशयावरून गुजरात पोलिसांनी सोमवारी रात्री अहमदाबाद विमानतळावरून चार जणांना अटक केली. पोलिसांनी चार आरोपींच्या झाडाझडती घेतल्यानंतर शस्त्रे, संशयास्पद व्हिडिओ आणि मजकूर संदेश जप्त केल्याची माहिती आहे. यानंतरच कोहलीच्या जीवाला धोका असल्याचे समोर आलं.

याबाबत आनंदबाजार पत्रिकेच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे. रिपोर्टनुसार, विराट कोहलीला धमक्या (Virat Kohli Threat) मिळाल्या होत्या त्यामुळे आरसीबीने (Royal Challenger Bangalore) सराव सामना आणि पत्रकार परिषद रद्द केली. या धमकीनंतर आरसीबीच्या टीम हॉटेलबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. सर्व RCB संघातील खेळाडूंसाठी वेगळी एंट्री देण्यात आली. जी हॉटेलमधील इतर कोणत्याही व्यक्तीला नसेल. एवढच नव्हे तर मान्यताप्राप्त मीडिया कर्मचाऱ्यांनाही हॉटेलच्या आवारात प्रवेश दिला जात नव्हता. विराट कोहली हा एक राष्ट्रीय खजिना असून त्याची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे अशी माहिती पोलीस अधिकारी विजय सिंघा ज्वाला यांनी दिली.

दरम्यान, आज रात्री ७या वाजून ३० मिनिटांची रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स (RR Vs RCB Eliminator Match) यांच्या एलिमिनेटर सामना पार पडणार आहे. विराट कोहलीच्या तुफान फॉर्मच्या जोरावर आरसीबीने चमत्कार करत प्ले ऑफ मध्ये धडक मारली. आज त्यांचा सामना संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स विरोधात असून आज जो संघ सामना हरेल तो आयपीएल मधून बाहेर जाईल आणि जो जिंकेल त्याला क्वालिफायर २ मध्ये सनरायजर्स हैद्राबादशी दोन हात करावे लागतील.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 | रयत शिक्षण संस्था अंतर्गत मोठी भरती सुरु, थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या नवनवीन संधी घेऊन येतोय. आज देखील आम्ही अशीच एक नवीन संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे शिक्षण संस्था सातारा अंतर्गत आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल द्वारे एक भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सहाय्यक शिक्षक, शारीरिक शिक्षक, संगणक शिक्षक, रेखाचित्र, ग्रंथपाल, लिपीक शिपाई, सहाय्यक शिक्षक या पदासाठी जागा निघालेल्या आहेत. या पदांच्या एकूण 35 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहावे. मुलाखतीची तारीख ही 1 जून 2024 ही ठेवलेली आहे. आता या भरतीबद्दलचे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

  • पदाचे नाव- मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सहाय्यक शिक्षक, शारीरिक शिक्षक, संगणक शिक्षक, रेखाचित्र, ग्रंथपाल लिपीक, शिपाई, सहाय्यक शिक्षक
  • पदसंख्या – 35 जागा
  • नोकरीचे ठिकाण – सातारा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा तालुका जिल्हा सातारा पिन कोड 415001
  • मुलाखतीची तारीख – 1 जून 2024

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी मुलाखती द्वारे निवड होणार आहे.
  • दिलेल्या तारखेवर मुलाखतीसाठी उमेदवारांना हजर राहावे लागेल.
  • 1 जून 2024 ही मुलाखतीची तारीख आहे.
  • मुलाखतीला येण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Thane Lok Sabha 2024 : राजन विचारेंनी ठाण्यात करून दाखवलं? एकनाथ शिंदेंचा मोठा गेम

rajan vichare naresh mhaske

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्याचा (Thane Lok Sabha 2024) खासदार कोण? याचा निकाल आता इव्हीएममध्ये बंद झालाय. ठाकरेंचे एकनिष्ठ राजन विचारे (Rajan Vichare) विरुद्ध शिंदेंच्या राईट हॅण्ड समजल्या जाणाऱ्या नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्यातली ही काटे की टक्कर… एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबाण की मशाल याचं उत्तर 4 जूनला स्पष्ट होणारच आहे… पण मतदानाच्या दिवशीचं एकूण वातावरण पाहता आणि मतदानाच्या टक्केवारीचं डिकोडिंग केलं तर मतदान घासून झालं पण निकालात थोड्या फरकाने मशाल मैदान मारेल, असं चित्र सध्या दिसतंय. मतदानाच्या दिवशीचा संपूर्ण थरार आणि निकाल कुणाच्या बाजूने लागतोय. तेच तुम्हाला थेट सांगतोय.

ठाण्यात मतदानाच्या दिवशीही बराच ड्रामा पाहायला मिळाला. बोगस मतदानाच्या तक्रारी, ठराविक जातीच्या मतदारांची नावं मतदार यादीतून गायब होणं तर बऱ्याच ठिकाणी संथ झालेलं मतदान यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ दिवसभर चर्चेचा मुद्दा राहिला… मतदान पार पडल्यावर समोर आलेल्या आकडेवारी नुसार ठाण्यात पाच वाजेपर्यंत 45.38 टक्के इतक्या कमी मतदानाची नोंद झाली. त्यातही एरोलीमध्ये 42.66 टक्के अशी सर्वात कमी तर मुख्यमंत्री शिंदे प्रतिनिधित्व करत असलेल्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालं. आता हा मतदानाचा आकडा नक्की कुणाच्या बाजूने शिफ्ट होऊ शकतो? याचं थोडं डिकोडींग करुयात…

पहिलं म्हणजे ठाण्याचा सेंटर पॉईंट असणाऱ्या ठाणे विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान होईल अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्ष मतदान खूपच कमी झालं. इथं धनुष्यबाणाचा जोर होता. पण मशालीलाही दिवसभर मिळालेला प्रतिसाद पाहता धनुष्यबाणाला इथं काठावरचं लीड मिळेल… ओवळा माजिवाडा मतदारसंघात प्रताप सरनाईक यांनी धनुष्यबाणाचे हात बळकट केले होते…पण नरेंद्र मेहता यांनी मशालीला दिलेला हात मजबूत असल्याने इथला निकालही बरोबरीत सुटेल, असं बोललं जातंय.. तिसरा आणि सर्वात इंटरेस्टिंग राहिला तो कोपडी पाचपाखाडी मतदारसंघ… शिंदे आमदार असलेल्या या विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदान झालं. शिंदेंनी इथं पूर्ण ताकद लावून मतदान आपल्या बाजूने खेचून आणलं असलं तरी इथला मशालीचा सायलंट व्होटर सर्वांनाच धक्का देऊ शकतो… बेलापूर मध्ये मंदा म्हात्रे यांनी धनुष्यबाणाचं काम केलं असलं तरी सुरुवातीपासून या भागात बघायला भेटणारी मशालीची सुप्त लाट लढत बरोबरीत सोडवेल, असं चित्र आहे… एरोलीत नाईक पिता पुत्रांच्या नाराजीचा फटका महायुतीला बसल्याचं मतदानाच्या दिवशीही पाहायला मिळालं. त्यामुळेच इथला मतदानाचा टर्नओव्हर सर्वात कमी होता. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या मीरा-भाईंदर मध्ये धनुष्यबाण लीड मध्ये राहील. पण इथल्या मुस्लिम समाजाची मतं ही विचारेंच्या पाठीशी असल्यामुळे हा म्हस्केंसाठी मोठा सेटबॅक असणारय… ठाण्याच्या मतदानाप्रमाणे त्याचा निकालही घासून लागेल, असं एकूणच मतदानानंतरचं चित्रं आहे…

राजन विचारे यांनी शिवसेनेतील बंडाच्या वेळेस ठाकरेंशी निष्ठा दाखवून शिंदेंना मोठं आव्हान दिलं… महाविकास आघाडीने राजन विचारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन प्रचाराच्या दोन तीन फेऱ्या पार पडल्या तरी शिंदेंकडून कोण? या नावाचं कन्फर्मेशन होत नव्हतं…पण शेवटी शिंदेंचे ठाण्यातील एकनिष्ठ नरेश म्हस्के यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिली… पण प्रचारात उतरायला लागलेला टाईम, विचारेंनी आक्रमकपणे गद्दार विरुद्ध खुद्दार असा आक्रमक प्रचार करत खेचून आणलेली काठावरची मतं आणि संपूर्ण मतदान प्रक्रियेत भाजपचा राहिलेला इनऍक्टिव्हनेसचा मोठा फटका नरेश म्हस्के यांना बसल्याची ग्राउंड मध्ये चर्चा आहे…

दुसरीकडे मशालीला जिंकवून देण्यासाठी लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदार केंद्रात लांबच्या लांब रांगा लावल्याची चर्चाही झाली…एकूणच काय बारामतीतील अजित पवारांसारखं ठाण्यातील एकनाथ शिंदेंच्यांविरोधातही जनतेच्या नाराजीचा सूर दिसला… या सहानुभूतीच्या कन्वर्जनचा फायदा मशालीला मोठ्या प्रमाणात झाल्याने ठाण्यात 4 जूनला निसटती का होईना, पण मशाल पेटणार… असं चित्र पाहायला मिळतंय. ठाण्यातून मशाल पेटणं म्हणजे बालेकिल्ल्यातूनच शिंदेंची नाचक्की असा एकंदरीत हा प्रकार असणार आहे… त्यामुळे ठाण्यात 4 जूनला कुणाच्या बाजूने निकाल लागणार? यासाठी दोन्ही गटांनी देव पाण्यात सोडलेत, असं म्हणायला हरकत नाही…मतदानानंतर ठाण्यात मशालच पटेल, असं तुम्हालाही वाटतं का? तुमचं मत, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा..