Friday, December 26, 2025
Home Blog Page 743

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता; राजकिय वर्तुळात मोठा गौप्यस्फोट

Rashmi Thackeray and Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यापासून राजकीय वर्तुळात दररोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून टीका-टिपणी होताना दिसत आहे. तर राजकीय नेते दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या नेत्यांविषयी दावा, गौप्यस्फोट करत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी मुख्यमंत्री पदाबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी, “आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचा आग्रह होता” असे सांगितले आहे.

उमेश पाटील म्हणाले की, “2019 साली एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचे ठरले होते. मात्र, रश्मी ठाकरे यांच्या हट्टामुळे आदित्य ठाकरे यांचे नाव सुरुवातीला मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणण्याचा प्रयत्न झाला होता. ते शक्य नसल्याचे लक्षात येताच संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचा आग्रह शरद पवार यांच्याकडे धरला होता. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याबाबत शरद पवार यांचाही नकार होता”

भाजपसोबत आमची जी डील झाली…

त्याचबरोबर, “2019 साली जाणीवपूर्वक शरद पवार यांनी अजित पवार व्हिलन होतील, अशी भूमीका घेतली होती. शिवसेनेचा मुख्यमंत्री करायच ठरलं होतं त्यावेळी एकनाथ शिंदेंच नावही चर्चेत होत. परंतु एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाला संजय राऊतांचाच विरोध होता. पुढे मुख्यमंत्री पद अडीच वर्ष शिवसेना आणि अडीच वर्ष सुप्रिया सुळे मुख्यमंत्री राहतील असे ठरल्यामुळे भाजपसोबत आमची जी डील झाली होती ती फिरवण्यात आली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आले.” असाही गौप्यस्फोट उमेश पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, “भविष्यात सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पद द्यायचे असेल तर त्यासाठी दुसरे नेतृत्व पक्षात नको म्हणून शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री केले नाही. 2004 साली शरद पवारांनी मुख्यमंत्री पद घेतले नाही.” असा दावाही उमेश पाटील यांनी केला आहे. आता उमेश पाटील यांनी केलेल्या या सर्व गौप्यस्फोटांमुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

वैशाली दरेकर या मशालीला रेसमध्ये आणत शिंदेंना धक्का देणार?

shirikant shinde vaishali darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कल्याण म्हणजे श्रीकांत शिंदे…आणि श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) म्हणजे कल्याण.. कितीबी ताकद लावा निवडून येणार तर श्रीकांत शिंदेच…अगदी मतदानाच्या दिवसापर्यंत शिंदे समर्थकांकडून दाखवण्यात येणारा हा कॉन्फिडन्स… शिंदेंची दोन टर्मची खासदारकी…या काळात त्यांनी मतदारसंघात पाडलेला निधीचा पाऊस आणि केलेली विकासकामं यांचा लेखाजोखा पाहिला तर कल्याणची निवडणूक वन साईड होईल असा सर्वांचाच अंदाज होता. त्यातही ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तर शिंदेंच्या खासदारकीची हॅट्रिक फिक्स समजली जात होती…पण मतदान पार पडल्यावर लढत घासून झाली असून दरेकर शिंदेंना अनपेक्षित धक्का देऊ शकतात…मतदानानंतर कल्याणचा निकाल काय सांगतोय? शिंदेंच्या दोन टर्मच्या कामांकडे पाहून कल्याणकरांनी मतदान केलं की एकनिष्ठा पाहून दरेकरांच्या बाजूनं पारड जड केलंय. तेच पाहुयात

शिवसेनेत उभी फूट पाडणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंच्या मुलाची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे कल्याणमध्ये (Kalyan LoK Sabha 2024) धनुष्यबाणाचे की मशालीचे हात बळकट होणार यावर सगळा खेळ अवलंबून होता. मतदान झालं पण मतदानाचा आकडा कमालीचा घसरल्याने याचा मोठा फटका धनुष्यबाणाला बसू शकतो, असं मत इथले स्थानिक पत्रकार व्यक्त करतायत…संध्याकाळी पाच वाजेपर्यंत इथे 41.70 टक्के इतक्याच मतदानाची नोंद झाली…त्यातंही अंबरनाथ मधून सर्वात कमी तर कल्याण ग्रामीण मधून सर्वात जास्त मतदान झालं… आता या आकडेवारीची नीट फोड केली तर आपल्याला थेट निकालापर्यंत पोहचता येऊ शकतं. तर शहरी भागात धनुष्यबाण चालणार याचे सर्वाधिक चान्सेस होते. शिंदेंनीही त्यासाठी बराच जोर लावला होता. पण मतदान झालंच नाही त्यामुळं शिंदेंना जिथून होप्स होते तिथंच त्यांना खीळ बसली…कल्याण ग्रामीण मधून सर्वाधिक मतदान झालं असलं तरी इथं लढत निम्म्याला निम्मी अशी सुटणार असल्याने इथेही कल्याणचं चित्रं फारसं स्पष्ट दिसत नाही…उल्हासनगरमध्ये धनुष्यबाणाला मोठं लीड मिळेल पण कल्याण आणि डोंबिवलीच्या शहरी भागातून मशालीला झालेल्या मतदानातून ते भरून निघेल…थोडक्यात कल्याणचं मतदान घासून झालंय. मशाल किंवा धनुष्यबाण यांपैकी कुणीही सरशी मारलीच तरी देखील विजयाचं मार्जिन फारच कमी असेल, असा अंदाजही व्यक्त केला जातोय…

भाजपने आधीपासूनच कल्याणच्या जागेवर दावा केल्यामुळे महायुतीत बराच वाद झाला होता…कल्याणमधील भाजपच्या स्थानीक पदाधिकाऱ्यांनी धनुष्यबाणाचे काम करणार नाही, असा पवित्र घेतला…महायुतीतल्या या भांडणाचा फायदा दरेकरांना उचलण्याची संधी होती… काठावरची आणि भाजपकडे झुकणारी मतं आपल्याकडे शिफ्ट करून घेण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्नही केले…तर तुलनेने इथून महाविकास आघाडीने मशालीच्या बाजूने पूर्ण ताकद लावली होती…या सगळ्या गोष्टी मतदानाच्या दिवशीही दरेकरांच्या पथ्यावर पडताना दिसल्या…थोडक्यात काय तर श्रीकांत शिंदेंना कल्याण आरामात सुटेल.. असं जे काही वाटलं होतं त्याच्या अगदी विरोधी चित्रं मतदानानंतर कल्याणमध्ये दिसतंय… प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही कल्याणमध्ये बराच गोंधळ पाहायला मिळाला… ईव्हीएम मशीन बंद पडल्या…मुद्दामहून काही विशिष्ट समुदायाचा मतदान केंद्रावर खोळंबा करण्यात आला… तर कुठे बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारीही झाल्या. याचा किती इम्पॅक्ट कलर वर होईल, हे चार जूनलाच स्पष्ट होईल…

श्रीकांत शिंदे यांच्या दोन्ही टर्म अत्यंत चांगल्या गेल्या… अनेक विकासकामं त्यांनी मतदारसंघात केल्याने आपलं एक स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करण्यात त्यांना यश आलं होतं…त्यातही स्वतः शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक प्रकारचा निधी श्रीकांत शिंदेंनी मतदारसंघासाठी आणला…त्यामुळे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंची इमेज तशी चांगली राहिली…पण खरं गणित बिघडलं ते एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर… शिंदे पितापुत्रांनी पुढाकर घेऊन ठाकरेंवर अनेक शाब्दिक वार चढवले… जशास तसं उत्तर दिलं…याचा परिणाम असा झाला की मुंबईत ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची मोठी लाट तयार होऊन शिंदे पितापुत्र याचे सॉफ्ट टारगेट बनले…त्यामुळे श्रीकांत शिंदे कामाचा माणूस असला तरी एकनिष्ठ नाहीये… या एकाच गोष्टीसाठी श्रीकांत शिंदेंची खासदारकी धोक्यात येऊ शकते… त्यात कल्याणमध्ये एवढं काम करूनही भाजपने तिकीट अडवून धरल्यामुळे याचाही चुकीचा मेसेज मतदारसंघात गेला असल्याची शक्यता ना करता येत नाही…उद्धव ठाकरेंनी त्यात मोठी खेळी करत प्रस्थापित चेहरा शिंदेंच्या विरोधात न देता एक सामान्य माजी नगरसेविका महिलेला उमेदवारी देऊन शिंदे विरुद्ध शिवसैनिक असं मतदानाचं नरेटीव सेट केलं त्याचाही मोठा फटका शिंदेंना मतदानाच्या दिवशी बसला असू शकतो…

कल्याण मध्ये महायुती स्ट्रोंग होती… श्रीकांत शिंदे यांनी आपल्या दहा वर्षांतील विकास कामाचं कॅसेट प्रचारात चांगलं वाजवलं होतं…भाजप आणि राज ठाकरे यांनीही शिंदेंसाठी सभा घेतल्याने मनसैनिकांचं लाखभर मतांचं इंजिन शिंदेंच्या पाठीशी लागलं… पण ठाकरेंच्या बाजूने असणाऱ्या सहानुभूतीच्या लाटेपुढे मतदानाच्या दिवशी काहीच टिकू शकलं नाही, असंही मत आता समीर येतंय… त्यामुळे कल्याणची लढत घासून झाली असली तरी धनुष्यबाण सुटण्याऐवजी मशालीच्या प्रकाशाने कल्याण उजळलेले दिसेल, अशीही चर्चा कल्याणमध्ये आहे… त्यामुळे चार तारखेचा निकालात कल्याणकर कुठल्या शिवसेनेला कौल देतील? शिंदेंच्या की ठाकरेंच्या? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

टीम इंडियाचा नवीन कोच कोण? हे नाव सर्वात आघाडीवर

team india coach gautam gambhir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक (Team India Coach) राहुल द्रविड यांचा कार्यकाळ येत्या T20 वर्ल्ड कप नंतर संपणार आहे. अशावेळी मग टीम इंडियाचा नवा कोच कोण असणारा यावर तर्क वितर्क लढवले जात आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले आहेत. 27 मे ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय संघाचा जो कोणी नवा प्रशिक्षक असेल त्याचा कार्यकाळ जुलै 2024 ते डिसेंबर 2027 पर्यंत असेल. तसेच क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट मध्ये त्याला आपलं योगदान द्यावं लागेल.

एका रिपोर्ट्स नुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीर, स्टीफन फ्लेमिंग, जस्टिन लँगर,व्हीव्हीएस लक्ष्मण, महेला जयवर्धने यांच्या नावांचा विचार करत आहे. हे संभाव्य उमेदवार भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्यास इच्छुक आहेत का ते जाणून घेण्याचा प्रयत्न बीसीसीआय करत आहे. प्रशिक्षक पदाच्या संभाव्य यादीत भारताचा माजी जलदगती गोलंदाज आशिष नेहराचे नाव सुद्धा होते मात्र सर्व फॉरमॅटमध्ये पूर्णवेळ प्रशिक्षण देण्याबाबत थोडी शंका आहे.

भारताच्या नव्या कोचला 2027 मध्ये होणाऱ्या पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपर्यंत आणि दरवर्षी कमीत कमी १० महिने टीम इंडियासोबत राहावं लागणार आहे. वरील जी काही संभाव्य नावे आहेत ते खेळाडू सध्या आयपीएल मधील कोणत्या ना कोणत्या संघाचे प्रशिक्षक आहेत त्यामुळे त्यांना अनुभव आहे.. व्हीव्हीएस लक्ष्मण हा एकमेव असा व्यक्ती आहे जो सध्या आयपीएलमध्ये कोचिंग करत नाही. लक्ष्मण सध्या एनसीए प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

सूत्रांच्या मते, टीम इंडियाच्या नवीन प्रशिक्षक पदाच्या यादीत गौतम गंभीरचे (Gautam Gambhir) नाव आघाडीवर आहे. आयपीएल मध्ये गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्सने फायनल मध्ये धडक मारल्याने गंभीरची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. तसेच गंभीर आणि भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंमध्ये चांगली मैत्री सुद्धा आहे. भारताचा मुख्य खेळाडू विराट कोहली गंभीरमध्ये काही मतभेद असल्याच्या चर्चा असतात मात्र मैदानाबाहेर दोघांमध्ये नेहमीच चांगली मैत्री राहिली आहे. या एकूण सर्व कारणामुळे गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्याचे चान्सेस जास्त आहेत.

Covid New Varient | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा भारतात वेगाने प्रसार; 300 हून अधिक लोकांना झाला संसर्ग

Covid New Varient

Covid New Varient | भारतामध्ये कोरोनाचा नवीन वेरीएंट पुन्हा एकदा आलेला आहे. कोविड-19 चा उपप्रकार kP. 2 याचा 290 लोकांना संसर्ग झाला आहे. तर KP.2 या व्हेरिएंट्स यांचा 34 लोकांना संसर्ग झाल्याचे समोर आलेले आहे. सिंगापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. आणि त्यासाठी हे दोन उपप्रकार चांगले जबाबदार झालेले आहेत. JN1 प्रकारचे उपवेरीयंट (Covid New Varient) आहेत. याचा गंभीर आजाराशी संबंध नाही. त्यामुळे काळजी करण्याचे त्याचप्रमाणे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. असे सांगण्यात आलेले आहे

हाती आलेल्या माहितीनुसार भारतीय सार्स कोव 2 जिनो मिक्स कंसोर्टियमने या प्रकरणाची संपूर्ण दखल घेतलेली आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचे नवीन रूप उदयास आल्यास त्याचा आपण प्रतिकार करू शकतो. असे देखील सांगितलेले आहे. यामध्ये सात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये KP.1ची प्रकरणे आढळून आलेली आहेत. यामध्ये 34 प्रकरणे आढळून आलेली आहेत. बंगालमध्ये 23 प्रकरणे यात नोंदवलेली गेली आहे. सध्या महाराष्ट्रात 4, गुजरातमध्ये 2, राजस्थानमध्ये गोव्यात 1 हरियाणामध्ये 1 उत्तरखंडामध्ये एक रुग्ण आढळून आलेला आहे.

KP. 2 उपप्रकाराची (Covid New Varient) 290 प्रकरणे समोर आलेली आहे. त्यापैकी सर्वाधिक 148 प्रकरणे महाराष्ट्रामध्ये आहे. सिंगापूरमध्ये काही दिवसात कोविड-19 ची लाट आलेली आहे. KP.1 आणि KP. 2प्रकार सिंगापूरमध्ये वेगाने पसरत आहे. 5 मे ते 11 मेपर्यंत सिंगापूरमध्ये 26000 केसेसची नोंद झालेली आहे. या प्रकरणांमध्ये दोन तृतीयांश प्रकरणे फक्त KP.1 प्रकारची संबंधित आहे.

Vivo Y200 Pro 5G भारतात लाँच; 64 MP कॅमेरा, 8GB रॅम अन बरंच काही …

Vivo Y200 Pro 5G launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने भारतीय बाजारात Vivo Y200 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. विवो चा हा सर्वात महागडा मोबाईल सून यापूर्वी तो चिनी मार्केट मध्ये लाँच करण्यात आला होता. 8GB रॅम, 64 मेगापिक्सेलचा कॅमेरा यांसारखी अनके फीचर्स यामध्ये देण्यात आली आहेत. भारतात या स्मार्टफोनची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली असून हा मोबाईल सिल्क ग्रीन आणि सिल्क ग्रास आय २ रंगाच्या पर्यायात उपलब्ध असेल. आज आपण विवोच्या या मोबाईलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेणार आहोत.

6.78 इंचाचा डिस्प्ले –

Vivo Y200 Pro 5G मध्ये 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट सह 6.78 इंच 3D कर्व्ह AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले फुल HD + रिझोल्यूशनसह येत असून यामध्ये 1300 nits पीक ब्राइटनेस मिळतेय. त्यामुळे कितीही जास्त ऊन असलं तरी तुम्हाला आरामात स्क्रिन योग्य प्रकारे दिसते. कंपनीने विवोच्या या स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 695 प्रोसेसर बसवला असून हा स्मार्टफोन Android 14 OS वर आधारित Funtouch OS 14 या ऑपरेटिंग सिस्टीम वर चालतो.

कॅमेरा – Vivo Y200 Pro 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झालयास, Vivo Y200 Pro 5G मध्ये 64 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 2 MP बोकेह सेन्सर देण्यात आलाय, तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 16 MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5000mAh बसवण्यात आली आहे. विवोच्या या मोबाईल मध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलंय. तुम्ही व्हर्च्युअल रॅमद्वारे ही रॅम आणखी 8GB पर्यंत वाढवू शकता.

किंमत किती?

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Vivo Y200 Pro 5G ची किंमत 24,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन सिल्क ग्रीन आणि सिल्क ग्रास या दोन कलर व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. तुम्हाला हा मोबाईल खरेदी करायचा असेल तर Vivo India च्या eStore वरून खरेदी करता येईल.

Diabetes And Obesity | मधुमेह आणि लठ्ठपणाचा परस्पर संबंध!! तज्ज्ञांनी सांगितला स्नायूंवर होणार परिणाम

Diabetes And Obesity

Diabetes And Obesity | मधुमेह हा एक गंभीर आणि जुनाट आजार आहे, जो जगभरातील अनेक लोकांना होत असतो. भारतात गेल्या अनेक काळापासून या आजाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळे आपला देश आता जगाची मधुमेहाची राजधानी बनला आहे. हा एक असाध्य रोग आहे, ज्यावर कोणताही इलाज नाही. अशावेळी औषधे आणि योग्य जीवनशैलीच्या मदतीने ते नियंत्रणात ठेवले जाते. याशिवाय मधुमेहाच्या रुग्णांनाही वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो.

कारण मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या लठ्ठपणामुळे (Diabetes And Obesity) रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त आणि अनियंत्रित होऊ शकते. तसेच, एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की लठ्ठपणा असलेल्या दहापैकी नऊ लोकांना टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता असते, परंतु असे का होते हे शोधण्यासाठी, आम्ही बंगळुरूमधील मणिपाल हॉस्पिटलमध्ये बॅरिएट्रिक आणि ॲडव्हान्स्ड लॅपरोस्कोपिक सर्जरीचा अभ्यास केला

मधुमेह आणि लठ्ठपणा यांच्यातील संबंध | Diabetes And Obesity

लठ्ठ व्यक्तींमध्ये, स्वादुपिंडाने तयार केलेले इन्सुलिन ऊतींद्वारे प्रभावीपणे शोषले जात नाही, त्यामुळे शरीरात इन्सुलिनची पातळी वाढते. यामुळे स्नायू दुखणे, मुंग्या येणे आणि अतिसंवेदनशीलता यासारख्या स्नायूंच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच, यामुळे, किरकोळ दाब देखील खूप वेदनादायक असू शकतो. याशिवाय, अशा रुग्णांना सांध्याची मर्यादित हालचाल, पायांना मुंग्या येणे आणि वेदना जाणवू शकतात. ही सर्व डायबेटिक न्यूरोपॅथी आणि मधुमेहामुळे होणारी हायपरइन्सुलिनमियाची लक्षणे आहेत.

मधुमेहावरील स्नायूंवर लठ्ठपणाचा प्रभाव

डॉ. मोईनुद्दीन पुढे स्पष्ट करतात की, याशिवाय मधुमेहामुळे लठ्ठपणामुळे (Diabetes And Obesity) पायांना संसर्ग आणि सूज येऊ शकते, ज्यामुळे सांध्याची गतिशीलता आणखी मर्यादित होऊ शकते. अशा लोकांमध्ये सर्दीबद्दल अतिसंवेदनशीलता असते. या लक्षणांचे व्यवस्थापन करण्यासाठी, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. निरोगी साखरेची पातळी राखल्याने स्नायू दुखणे कमी होण्यास मदत होते आणि बी-व्हिटॅमिन सप्लीमेंट्स घेतल्याने डायबेटिक न्यूरोपॅथीची लक्षणे कमी होऊ शकतात.

मधुमेह मेल्तिस म्हणजे काय?

त्याच वेळी, डॉ. आदित्य जी हेगडे, मणिपाल हॉस्पिटल (ओल्ड एअरपोर्ट रोड), बेंगळुरू येथील मधुमेह आणि एंडोक्राइनोलॉजीचे सल्लागार म्हणतात की, मधुमेह मेलिटस (डीएम) हा एक प्रणालीगत रोग आहे, जो सतत उच्च रक्त शर्करा (हायपरग्लायसेमिया) मुळे होतो. . मधुमेहाचे 2 प्रकार आहेत, टाइप 1 आणि टाइप-2 मधुमेह, ज्यामध्ये टाइप-2 हा रोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. DM चे Neuromusculoskeletal sequelae सामान्य आहेत आणि लोकांनी या परिस्थितींबद्दल सावध असले पाहिजे.

DM सह खालील मस्क्यूकोस्केलेटल स्थिती उद्भवतात:

स्नायू पेटके
स्नायूचा इन्फेक्शन
परिधीय न्यूरोपॅथी
रिफ्लेक्स सिम्पेथेटिक डिस्ट्रॉफी सिंड्रोम

डॉक्टर पुढे स्पष्ट करतात की स्नायू पेटके हे मधुमेहाचे एक सामान्य लक्षण आहे. हे इलेक्ट्रोलाइट असंतुलन, हायपोग्लाइसेमिया, धमनी अपुरेपणासह परिधीय संवहनी रोग आणि परिधीय न्यूरोपॅथीमुळे असू शकते. पेटके सामान्यतः खालच्या अंगांवर परिणाम करतात आणि रात्रीच्या वेळी अधिक सामान्य असतात. त्याच्या लक्षणांमध्ये स्नायू क्रॅम्पिंग वेदना आणि कधीकधी मोचांचा समावेश होतो.

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणी राष्ट्रवादी आमदाराच्या पत्नीचा मोठा खुलासा; म्हणाल्या, त्या मुलामुळे माझ्या मुलाला …

Pune Porsche Accident sonali tanpure

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे अपघात (Pune Porsche Accident ) प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाने २ मुलांना उडवले असून पोलीस याप्रकरणी ऍक्शन मोड मध्ये आलेत. आत्तापर्यंत सदर प्रकरणामध्ये या अल्पवयीन मुलाने ज्या ठिकाणी मद्यपान केलं त्या बार आणि पबच्या मालकांनाही ताब्यात घेतलं आहे तसेच विशाल अग्रवालला सुद्धा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आता याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार पत्नीने सदर अल्पवयीन मुलाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे (Sonali Tanpure) यांनी याबाबत ट्विट केलं आहे. सोनाली तनपुरे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटल, कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या… संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती . मात्र, योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे.

वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा, अशी मागणी सोनाली तनपुरे यांनी केली आहे. सोनाली तनपुरे यांनी आपल्या ट्विट मध्ये कोणाचे नाव घेतले नाही मात्र त्यांचा रोख हा विशाल अग्रवाल यांच्या कडे दिसत आहे.

विशाल अग्रवालला अटक – (Pune Porsche Accident )

ड्रमायन, पुण्यात अलिशान पोर्शे कारखाली दोन जणांना चिरडणाऱ्या (Pune Porsche Accident ) अल्पवयीन मुलाचे वडील बिल्डर विशाल अग्रवालला अखेर अटक करण्यात आली. कोणाला आपला थांगपत्ता लागू नये म्हणून म्हणून विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगर येथील एका पडक्या हॉटेलमध्ये लपला होता. मात्र पोलिसाना त्याचा सुगावा लागताच त्याला बेड्या ठोकण्यात आल्यात. कोणत्याही परिस्थितीत अग्रवाल सुटता कामा नये, असे आदेश पुणे पोलिस आयुक्तांकडून छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांना देण्यात आले होते.

Kokankada Reverse Waterfall : आश्चर्यकारक!! आकाशाच्या दिशेने वाहतो ‘हा’ नयनरम्य धबधबा; दृश्य पाहून व्हाल अचंबित

Kokankada Reverse Waterfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kokankada Reverse Waterfall) राज्यभरात फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. खास करून पावसाळ्यात फिरायला मजा येईल अशा ठिकाणांची काढू तेव्हढी यादी कमीच. त्यात पर्यटकांचा सर्वाधिक कल हा लहान मोठ्या धबधब्यांकडे असतो. अशाच धबधब्यांपैकी एका अद्भुत आणि नयनरम्य ठिकाणाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आजपर्यंत तुम्ही अनेक धबधबे पाहिले असतील. जे उंच कड्यावरून खाली कोसळताना दिसतात. अशी दृश्य पाहून मन अगदी ओलंचिंब होऊन जात. पण गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला आव्हान देईल असा आकाशाच्या दिशेने वाहणारा धबधबा पाहिलाय का? नाही? चला तर या वेगळ्या आणि आकर्षक धबधब्याविषयी जाणून घेऊया.

आश्चर्यकारक उलटा धबधबा (Kokankada Reverse Waterfall)

राज्यभरात अनेक आश्चर्यकारक धबधबे आहेत. पण डोळ्याचं पारण फेडणारा महाराष्ट्रातील रिव्हर्स धबधबा पाहण्याची मजा काही औरच आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गवाडी कोकणकडा परिसरात असलेला हा धबधबा रिव्हर्स वॉटरफॉल म्हणून प्रसिद्ध आहे. पृथ्वीवरील अनेक रहस्यमयी ठिकाणांमध्ये या ठिकाणाचा देखील समावेश आहे. इथे जमिनीच्या दिशेने नव्हे तर आकाशाच्या दिशेने धबधबा वाहतो. त्यामुळे हा धबधबा पहायला अनेक पर्यटक गर्दी करताना दिसतात.

गुरुत्वाकर्षणाला देतो आव्हान

कोकणकडा नाणेघाट धबधबा परिसर हा कायम शुभ्र धुक्यात हरवलेला असतो. त्यामुळे हा परिसर कायम पर्यटकांना आकर्षित करतो. इथे वाऱ्याच्या प्रवाहाने उंचावरून पडणारे पाणी हे थेट आकाशाच्या दिशेने वरती फेकले जाते. त्यामुळे नाणेघाट धबधबा एक वैशिष्ट्यपूर्ण आणि तितकाच रहस्यमयी वाटतो. (Kokankada Reverse Waterfall) हवेच्या दाबामुळे हा धबधबा खरतर उलटे पाणी फेकतो. मात्र यामुळेच डोंगर कपारीवर हे दृश्य पाहताना मनाला मिळणारा आनंद फार वेगळाच असतो. या धबधब्यातील उलटे वाहणारे पाणी एकप्रकारे गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला आव्हान देत आहे.

पावसाळ्यात होते पर्यटकांची गर्दी

कोकणकडा नाणेघाट धबधबा हा अत्यंत सुंदर आणि नयनरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. खास करून हा धबधबा पावसाळ्यात फारच मनमोहक वाटतो. त्यामुळे इतर कोणत्याही दिवसांपेक्षा जास्त पावसाळ्यात इथे येणाऱ्या पर्यटकांची गर्दी जास्त असते. इतर कोणत्याही धबधब्यांपेक्षा वेगळा आणि निसर्गाचा चमत्कार असलेला हा धबधबा पहायला लोक लांबून येतात. (Kokankada Reverse Waterfall) तुम्हीही या पावसाळ्यात कोकणकडा नाणेघाट धबधबा पहायला जरूर जा आणि अविस्मरणीय क्षणांचा मनमुराद आनंद घ्या.

Easy Home Remedies : व्हॅक्सिंग करताना भाजलं तर करा ‘हे’ घरगुती उपाय; चट्टे, डाग दिसणार नाहीत

Easy Home Remedies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Easy Home Remedies) शरीरावर नको असलेले केस काढण्यासाठी आधी रेझरचा वापर केला जायचा. पण आजकाल व्हॅक्सिंगचा वापर केला जातो. व्हॅक्सिंग करताना काही प्रमाणात वेदना होतात. मात्र व्हॅक्सिंगनंतर बराच काळ नको असलेले वाढत नाहीत. मुख्य म्हणजे रेझरच्या वापरानंतर अंगावर पुरळ येणे, खाज येणे किंवा कधी कधी त्वचेचे नसून होणे अशा समस्या होतात. मात्र, व्हॅक्सिंगचा वापर केल्यास अशा कोणत्याही समस्या जाणवत नाहीत.

व्हॅक्सिंगचे बरेच फायदेदेखील आहेत. जसे कि, डेड स्किन काढून टाकणे. याशिवाय टॅनिंग काढणे. यामुळे त्वचा आपोआप सुंदर दिसू लागते. असे असले तरीही व्हॅक्सिंग करताना वापरल्या जाणाऱ्या गरम व्हॅक्समूळे त्वचेला चटका लागतो. (Easy Home Remedies) यामुळे कधी कधी त्वचा पोळण्याची शक्यता असे. जर व्हॅक्सिंग करताना जराही निष्काळजीपणा झाला तर त्वचा भाजू शकते आणि यामूळे त्वचेवर चट्टे वा डाग येतात. तसे होऊ नये म्हणून आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्याच्या वापराने व्हॅक्स बर्न लवकर बरे होते.

1. थंड पाणी

व्हॅक्सिंग करताना भाजलं तर तो भाग लगेच थंड पाण्याखाली धरा. किमान १० मिनिटे थंड पाण्याखाली तसेच थांबा. यामुळे जळजळ कमी होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूज किंवा चट्टे येणार नाहीत.

2. कोरफड जेल (Easy Home Remedies)

भाजणे, पोळणे अशा समस्यांवर कोरफडीचा गर वा जेल खूपच प्रभावीपणे काम करते. व्हॅक्सिंग करताना भाजलेल्या ठिकाणी कोरफड जेल लावल्यास सूज येत नाही. तसेच वेदना देखील कमी होतात. व्हॅक्सिंग करताना भाजल्यास आधी थंड पाण्याने ती जागा धुवून त्यानंतर किमान २ ते ३ वेळा कोरफड जेल लावा. यामुळे भाजलेल्या जागी डाग येणार नाहीत.

3. मध

व्हॅक्सिंग करताना भाजल्यास त्या भागावर नैसर्गिंकरित्या अँटीसेप्टिक आणि मॉइस्चरायजर म्हणून ओळखले जाणारे मध लावा. (Easy Home Remedies) यामुळे जखम होणार नाही. शिवाय संक्रमणापासून बचाव होईल.

4. खोबरेल तेल

व्हॅक्सिंग करताना भाजले वा पोळले तर त्या भागावर त्वरित खोबरेल तेल लावा. हे नैसर्गिकरित्या मॉइस्चरायजर असल्याने जखम होत नाही. जखम झाल्यास लवकर भरते आणि जळजळ थांबते.

5. बटाटा

व्हॅक्स बर्न बरे करण्यासाठी बटाट्याचा वापर करता येईल. कारण बटाट्यात असणारा थंडपणा हा जखम लवकर बरी करतो. शिवाय सूज येऊ देत नाही आणि मुख्य म्हणजे जळजळ लगेच थांबते. (Easy Home Remedies)

Side Effects Of Eating Bread : ब्रेकफास्टमध्ये रोज ब्रेड खाता? दुष्परिणाम जाणून होईल पश्चाताप

Side Effects Of Eating Bread

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Side Effects Of Eating Bread) बऱ्याच लोकांचा सकाळचा नाश्ता एकदम भरपेट असतो. ज्यामध्ये भाकरी, भाजी सगळं काही असतं. तर काही लोकांचा नाश्ता म्हणजे नुसताच चहा. पण बरेच लोक असेही असतात ज्यांना रोजच्या नाश्त्यात ब्रेड लागतो. मग ब्रेड ऑम्लेट असो किंवा ब्रेड आणि चहा. नाश्त्यात ब्रेड हवाच. तुम्हीही रोजच्या नाश्त्यात ब्रेड खाता का? तर मग सावध व्हा. कारण तुम्ही जो ब्रेड पोट भरण्यासाठी रोज खाताय तोच ब्रेड तुमच्या आरोग्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतोय हे तुमच्या लक्षात येत नाहीये.

बऱ्याच लोकांना सकाळच्या नाश्त्यात चहा ब्रेड किंवा दुध ब्रेड खायला आवडतो. पण खायला आवडेल तो प्रत्येक पदार्थ आरोग्यदायी असेलच असे नाही. दररोज ब्रेड खाल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. (Side Effects Of Eating Bread) ज्याविषयी आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित नसल्यामुळे अज्ञानापायी रोजच्या नाश्त्यात आवर्जून ब्रेड खाल्ला जातो. ज्यामुळे आरोग्याचे नुकसान होते. चला तर जाणून घेऊया रोज ब्रेड खाल्ल्याने आरोग्याचं नेमकं काय नुकसान होतं? खालीलप्रमाणे:-

1. सतत आजारपण येते

रोज न चुकता ब्रेड खाणारे लोक वारंवार आजारी पडू शकतात, कारण ब्रेड खाल्ल्याने होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या सतत डोकं वर काढतात. ज्यामुळे सारखं आजारपण येऊ शकतं.

2. पोटाच्या समस्या (Side Effects Of Eating Bread)

रोजच्या ब्रेकफास्टमध्ये तुम्ही ब्रेड खात असाल तर पोटाशी संबंधित विविध समस्या होऊ शकतात. जसे की, अपचन, पोटात गॅस होणे, बद्धकोष्ठता, पॉट जड वाटणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. खास करून लहान मुलांना नियमित ब्रेड खायला देणे टाळा.

3. ब्लड शुगर वाढेल

जे लोक रोजच्या नाश्त्यात ब्रेड खातात त्यांच्या रक्तातील शुगर झपाट्याने वाढते. जे आरोग्यासाठी नक्कीच धोकादायक आहे. त्यामुळे लहान मुळेच नव्हे तर कोणत्याही वयोगटातील व्यक्तींनी नाश्त्यात किंवा आहारात रोज ब्रेड खाणे टाळायला हवे.

4. झपाट्याने वजन वाढते

दररोज ब्रेड खाल्ल्याने झपाट्याने वजन वाढू शकते. (Side Effects Of Eating Bread) अर्थात जे आधीपासून लठ्ठ आहेत त्यांनी ब्रेड खाणे म्हणजे मूर्खपणाच म्हणावे लागेल. ब्रेडमध्ये असणारी कर्बोदके, रिफाइन्ड साखर आणि मीठ यामुळे शरीरात वेगाने फॅट वाढते. त्यामुळे माणूस आणखी लठ्ठ होत जातो.

5. हृदय रोगाचा धोका वाढतो

ब्रेडमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रक्तदाब वाढण्याचा धोका असतो. उच्च रक्तदाबामूळे हृदयाला ज्या रक्तवाहिन्यांद्वारे रक्त पोहोचते त्याचे नुकसान होते. यामुळे हृदय विकाराचा धोका वाढतो. (Side Effects Of Eating Bread)