Friday, December 26, 2025
Home Blog Page 747

Bhiwandi Lok Sabha 2024 : भाजपचे कपिल पाटील की राष्ट्रवादीचे बाळ्यामामा ? जिंकणार कोण?

balyamama vs kapil patil

पश्चिम महाराष्ट्राचा भाग सोडल्यावर आज होणाऱ्या पाचव्या टप्प्यात पवारांची तुतारी मुंबईत देखील एका जागेवर वाजणार आहे… आणि ही तुतारी वाजवण्याचं काम करणारा अवलिया आहे बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे… मुंबईतील भिवंडी लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बाळ्यामामा विरुद्ध भाजपकडून दोन टर्मचे खासदार राहिलेले कपिल पाटील यांच्यात अटीतटीची लढत होतेय… प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत… मतदानही पार पडेल… पण भिवंडीची चर्चा होतेय ती तब्बल दोन टर्म खासदार राहिलेल्या आणि राज्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या कपिल पाटलांसारख्या बड्या नेत्याला शरद पवारांचा बाळ्या मामा काही केल्या तिसऱ्यांदा लोकसभेवर पाठवणार नाही याची… आधीच मुंबईमध्ये राष्ट्रवादीची ताकद कमकुवत असताना एकही खासदार पवारांना इथून निवडून आणता आला नव्हता. आता मात्र पक्ष फुटल्यानंतर मुंबईतल्या याच भिवंडीत पवारांची तुतारी वाजणार, याची बरीच चर्चा आहे… भाजप आणि शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी तुतारी वाजवण्याचा कार्यक्रम कसा टप्प्यात आणलाय? बाळ्या मामा भिवंडीचे राष्ट्रवादीचे पुढचे खासदार असतील, हे आम्ही इतक्या आत्मविश्वासाने का सांगतोय? तेच पाहुयात

तिकीट वाटपाचा कार्यक्रम सुरू असताना भिवंडीतून पंचायती राज्यमंत्री पदावर असणाऱ्या भाजपचे दोन टर्मचे खासदार कपिल पाटील यांना तोडीस तोड देईल असा एकही चेहरा महाविकास आघाडीकडे दिसत नव्हता… पाहायला गेलं तर भाजपच्या विरोधात काँग्रेसने उमेदवारी देण्याची भिवंडीची परंपरा… पण इथं शरद पवारांनी आपला राजकीय अनुभव पणाला लावत हुकूमाचा एक्का बाहेर काढला आणि तो म्हणजे बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे… बाळ्या मामांना तुतारीच्या चिन्हावर तिकीट जाहीर झालं… आणि कपिल पाटलांना तोडीस तोड उमेदवार मिळाला… तब्बल पाच वेळा पक्ष बदलणाऱ्या बाळ्या मामा यांची भिवंडीतील क्रेज मात्र काही केल्या कमी झाली नाही… मनी आणि मसल पॉवर दोन्हीही मजबूत असणारे बाळ्यामामा यंदा काहीही केलं तरी भिवंडीत भाजपच्या कमळाला बाजूला करत तुतारीचा आवाज वाढवणार हे आत्मविश्वासाने सांगता येतं त्याचं पहिलं कारण म्हणजे पाटलांच्या विरोधातील अँटी इन्कमबन्सी आणि बाळ्यामामा यांची क्रेझ…

तब्बल दोन टर्म खासदार असतानाही विकासकामांचा खोळंबा झाल्याने भिवंडीमध्ये कपिल पाटलांच्या विरोधात अँटी इनकमबन्सी आहे… भिवंडीतील रस्त्यांचा आणि सर्वात महत्त्वाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही कायम असल्यानं भिवंडीतील नागरिकांना बदल हवा आहे… तर दुसऱ्या बाजूला मसल पॉवर, गोडाऊन लॉबीवर असणार वर्चस्व यामुळे बाळ्यामामा यांची मतदारसंघात चांगली क्रेझ आहे. भाजपच्या उमेदवारांना मागील चार टप्प्यात राज्यात फटका बसत असल्याचं उघड उघड दिसत असताना भिवंडीही याला अपवाद राहणार नाही. त्यात बाळ्यामामा यांचा आगरी समाजावरचा होल्ड आणि राजकारणात नेहमीच निर्णायक ठरण्याची भूमिका या दोन्ही गोष्टी बाळ्यामामा यांना पाटलांपेक्षा भिवंडीच्या राजकारणात जास्त प्लस मध्ये ठेवतात…

दुसरं कारण येतं ते भाजपचं बिघडलेलं परसेप्शन

अबकी बार 400 पार… असं कॅम्पेन करणाऱ्या भाजपला संविधान बदलायचं आहे. असं म्हणत विरोधकांनी टार्गेट केल्याने अल्पसंख्यांक समाज हा ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपापासून लांब गेला… त्यात मुस्लिम समाजाविषयी पंतप्रधानांकडून केली गेलेली वक्तव्य यामुळे काठावर असणारा मुस्लिम समाजही इंडिया आघाडीकडे शिफ्ट झालाय. याचा मोठा फटका भिवंडीतही भाजपला बसणार आहे. करण भिवंडीत मुस्लिम समाजाचा मतदानाचा टक्का हा नेहमीच निर्णायक ठरत आलाय… जातीची मतं एकगठ्ठा कदाचित शिफ्ट होऊ शकत नाहीत. पण मुस्लिम मतं ही एकगठ्ठा होतात. त्याचा मोठा इंपॅक्ट हा मतदानावर दिसतो… बाळ्यामामा शरद पवारांच्या पक्षात असल्याने एक धर्मनिरपेक्ष पक्षाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातय… हेच पाहता बाळ्यामामा यांना मुस्लिम समाज हा भरभरून मतदान करेल, असा एकूणच अंदाज आहे… भाजपने प्रचार सभांमधून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला असला तरी तो सामान्य मतदारांना काही पटलेला नाहीये… त्यामुळे बाळ्यामामा यांचं पारडं भिवंडीमध्ये सध्या तरी जास्त दिसतय…

तिसरा मुद्दा येतो भावनिक लाट आणि मविआची एकजूट

मुंबईतील जवळपास सर्वच जागा महाविकास आघाडीकडून सर्व प्रकारचे मतभेद बाजूला ठेवून लढवल्या जातायत…भिवंडीतही बाळ्यामामा यांच्या पाठीशी मविआचे सर्व मित्रपक्ष ताकद लावून आहेत. कागदावर पाहिलं तर महायुती, कपिल पाटील जड जाणार असं वाटत असलं तरी देखील ग्राउंड मात्र बाळ्यामामांच्या बाजूने आहे… मुंबईत उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची लाट कायम आहे. शरद पवारांनाही तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात भावनिकतेवर मोठं व्होट झाल्याचं आपण पाहत आहोतच. दोन टर्म रेसमध्ये नसली तरी काँग्रेस भिवंडीमध्ये स्ट्रॉंग आहे… त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांची थोडी थोडी ताकद आणि त्यात बाळ्यामामा यांची वैयक्तिक ताकद लागत असल्याने मतदान घासून होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला कपिल पाटील यांच्या विरोधात पक्षांतर्गतच अनेक स्थानिक आमदारांची नाराजी आहे. शिवसेना शिंदे गट सोबत असला तरीदेखील कपिल पाटील यांनी भिवंडीत या शिवसेनेच्या आमदारांना आडकाठी घातली होती, त्यामुळे त्यांचीही पाटलांवर नाराज आहे…त्यात बाळ्यामामा यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे जवळचे संबंध पाहता तुतारी भिवंडीत जास्त फ्रंटला दिसतेय…

हे सगळं पाहता पश्चिम महाराष्ट्र पाठोपाठ मुंबईतल्या भिवंडीतही शरद पवारांच्या तुतारीचा आवाज यंदा घुमणार हे फिक्स वाटतंय. भाजपचा आणि विशेष करून राज्यमंत्री राहिलेल्या कपिल पाटलांचा जर इथून पराभव होत असेल तर ही भाजपासाठी नक्कीच मोठी नाचक्की ठरू शकते. जाता जाता एक महत्त्वाची अपडेट. भिवंडीची निवडणूक जरी बाळ्यामामा विरुद्ध कपिल पाटील अशी होत असली तरी जिजाऊ संघटनेचे निलेश सांबारे यांनी देखील भिवंडीतून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. वंचितची ताकद त्यांच्यासोबत असल्यानं आणि या भागात त्यांच्या संघटनेचा असणारा वरचष्मा पाहता मतविभाजनाचा मोठा फटका कपिल पाटील आणि बाळ्यामामा यांना बसणार आहे…तर अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये भिवंडीत 4 जूनला नेमकं काय होणार? कपिल पाटील विजयाची हॅट्रिक मारणार की पवारांचा बाळ्यामामा पहिल्याच झटक्यात दिल्ली गाठणार? तुम्हाला काय वाटतं? तुमचंही मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

देशातील 18 लाख मोबाईल सिमकार्ड पडणार बंद; सरकारने उचलले कठोर पाऊल

Cyber Crime Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारत सरकारच्या सुचनेवरुन दूरसंचार विभाग (Indian government) सायबर क्राईम (Cyber Crime) आणि ऑनलाइन फसवणूकीचे प्रकार रोखण्यासाठी एकाचवेळी 18 लाख सिम आणि यापेक्षा अधिक मोबाइल कनेक्शन खंडित करू शकते. अशी मोठी माहिती समोर आली आहे. गेल्या 9 मे रोजी दूरसंचार विभागाने Jio, Airtel आणि Vi सारख्या कंपन्यांना 28,220 मोबाइल बँड बंद करण्याचे निर्देश दिले होते. याशिवाय सुमारे 20 लाख मोबाईल कनेक्शनची फेरतपासणी करण्याच्या सूचना ही दिल्या होत्या.

केंद्र सरकारने देशातील सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणूक दूर करण्यासाठी एक मोहिम आखली आहे. या मोहिमेंतर्गत केंद्र सरकार सरकारी आणि खासगी एजन्सीच्या मदतीने ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार आहे. रिपोर्टनुसार, टेलिकॉम कंपन्या मोबाईल कनेक्शन आणि सिमकार्ड पुन्हा रीवेरिफिकेशन करतील. त्यानंतर ते त्यांना ब्लॉक ही करू शकतील. महत्वाचे म्हणजे, येत्या 15 दिवसांमध्ये बनावट मोबाईल आणि सिमकार्ड बंद करण्याचे आदेश दूरसंचार कंपन्यांना सरकारकडून देण्यात आले आहे.

सायबर क्राईममध्ये मोठी वाढ

ET च्या एका अहवालानुसार, देशात मोबाईलवरील सायबर क्राईममध्ये मोठी वाढ झाली आहे. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (NCRP) नुसार तर, 2023 मध्ये डिजिटल आर्थिक फसवणुकीमुळे सुमारे 10,319 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी 694,000 तक्रारी दाखल झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी सायबर फसवणुकीत अडकलेली 37 हजार सिमकार्ड बंद करण्यात आली आहेत. यासह 1,86,000 हँडसेट ब्लॉक करण्यात आली आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने सायबर क्राईम आणि डिजिटल फसवणूक करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठीच ही महत्त्वाची योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत वापरकर्त्यांचे मोबाईल बंद करण्यासोबतच सिमकार्डही ब्लॉक करण्यात येणार आहे. पुढे अशा लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. केंद्र सरकारने या घेतलेल्या निर्णयामुळे सायबर क्राईमच्या आणि ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mango Peel | आंब्याची साल फेकून न देता घरच्या घरी करा नैसर्गिक खत तयार; वाचा संपूर्ण पद्धत

Mango Peel

Mango Peel | सध्या उन्हाळा सुरू आहे. हा उन्हाळा सगळ्यांना नको असला, तरी देखील उन्हाळ्यामध्ये येणारी हंगामी फळे मात्र सगळ्यांनाच खायला आवडतात. यामध्ये आंबा हा सगळेजण खूप आवडीने आणि चवीने खातात. बाजारात अनेक प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत. आपण आंबे खातो आणि आंब्याच्या साली फेकून देतो. परंतु आता तुम्ही या आंब्याच्या साली (Mango Peel ) ठेवून नैसर्गिक प्रकारे हे खत तयार करू शकता. जे तुमच्या झाडांच्या वाढीसाठी खूप उपयोगाचे ठरेल.

आज काल रासायनिक खतांचा (Mango Peel ) वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे सगळ्या अन्नधान्यांवर त्याचा परिणाम होतो. आणि त्यामुळे आपल्याला अनेक आजारांचा धोका वाढतो. परंतु आता नैसर्गिक पद्धतीने खत तयार करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही आंब्याच्या सालीचा वापर करून नैसर्गिकरीत्या खत तयार करू शकता. आंब्याच्या सालीमध्ये कॉपर, फोलेट आणि जीवनसत्व बी 6 यांसारखे गुणधर्म असतात. याचा वापर खतासाठी होऊ शकतो

आंब्याच्या सालीचे (Mango Peel) खत तयार करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही आंब्याच्या या साली बारीक बारीक चिरून घ्या. नंतर एका कढईत पाणी घ्या आणि पाणी उकळल्यानंतर त्या साली पाण्यात टाकून चांगल्या प्रकारे शिजवून घ्या. पंधरा मिनिटानंतर गॅस बंद करा आणि पाणी थोडं थंड झाल्यावर खाली एका प्लेटमध्ये काढा. शिजलेल्या आंब्याच्या साली तुम्ही वा ळण्यासाठी उन्हात ठेवा आणि वाळल्यानंतर तुम्ही त्या सालींचे खत म्हणून वापरू शकता.

तुम्ही जर घरात कुंडीमध्ये काही झाड लावली असतील, तर त्या झाडाच्या आजूबाजूला हे खत वापरू शकता. त्यामुळे झाडांची वाढ चांगली होते. आणि त्याला कुठल्याही प्रकारच्या कीड देखील लागत नाही. अशा प्रकारे तुम्ही खाल्लेल्या आंब्याच्या सालींचा वापर नैसर्गिक खतामध्ये करू शकता.

Excessive Salt Intake : जेवणात वरून मीठ खाता? तुम्ही स्वतःच देताय तुमच्या मृत्यूला आमंत्रण; पहा काय म्हणाले तज्ञ?

Excessive Salt Intake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Excessive Salt Intake) कोणताही पदार्थ रुचकर आणि स्वादिष्ट बनवायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं असतं ते मीठ. जेवणात मिठाचं प्रमाण बरोबर असेल तर खाताना पदार्थ चविष्ट लागतो. मात्र, तेच मीठ जर चुकून कमी पडलं तर अळणी पदार्थ घशाखाली उतरत नाही. अशावेळी चवीचे पक्के असणारे लोक वरून मीठ घेऊन खातात. तुम्हालाही अशी सवय असेल तर सावधान!! ही एक सवय तुमच्या आरोग्याचं मोठं नुकसान करू शकते. वरून मीठ खाणे किंवा जास्तीचे मीठ खाणे आरोग्यासाठी केवळ हानिकारक नसून यामुळे मृत्यू देखील होऊ शकते असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितले आहे.

जागतिक आरोग्य संघटना कायम आपल्या आरोग्यासंदर्भात विविध महत्वाच्या सूचना देत असते. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने मीठ खाण्याबाबत अत्यंत महत्वाची माहिती प्रदान केली आहे. खासकरून अति प्रमाणात मिठाचं सेवन (Excessive Salt Intake) करणाऱ्यांसाठी ही माहिती उपयुक्त आहेत. जगभरात हृदय रोगाशी संबंधित आजार वाढल्याने जागतिक आरोग्य संघटनेने हा एक महत्त्वाचा इशारा दिला आहे, असे म्हणता येईल.

WHO ने काय सांगितलं?

WHO च्या तज्ञांनी केलेल्या अभ्यासात असे समोर आले आहे की, यूरोपमध्ये दररोज किमान १० हजार लोकांचा हृदयाशी संबंधित आजाराने मृत्यू होतोय. अर्थात वर्षभरात सुमारे ४० लाख लोकांचा हृदयविकाराने मृत्यू होतो. (Excessive Salt Intake) याचे कारण आहे प्रमाणापेक्षा जास्त मिठाचे सेवन. होय. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, मिठाचं प्रमाणापेक्षा अधिक सेवन केल्याने हे मृत्यू होत आहे. त्यामुळे मिठाच्या सेवनाचे प्रमाण किमान २५ टक्के कमी करायची गरज आहे. असे केल्यास २०३० पर्यंत ९ लाख मृत्यू रोखता येतील.

मृतांमध्ये पुरुषांचा सर्वाधिक समावेश

गेल्या काही वर्षातील रिपोर्ट पाहता, प्रमाणापेक्षा अधिक मीठ खाल्ल्याने (Excessive Salt Intake) रक्तदाब वाढून किंवा हृदयाशी संबंधित आजार होऊन झालेल्या मृतांमध्ये पुरुषांचा आकडा सर्वाधिक आहे. आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार, महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हृदयरोगाने मरण्याचं प्रमाण अधिक असून हे प्रमाण २.५ इतके आहे.

नियमित किती मिठाचे सेवन करावे? (Excessive Salt Intake)

WHO च्या तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे, अनेक देशात प्रतिदिन मिठाचं सेवन करण्याचं प्रमाण ५ ग्रॅमपेक्षा जास्त आहे. जे घातक आहे. आरोग्य संघटनेने सांगितले की, ५ ग्रॅम वा त्यापेक्षा कमी मीठ खाणे फायदेशीर ठरेल. अर्थात दिवसभरात केवळ १ चमचा किंवा त्यापेक्षा कमी मीठ खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचणार नाही. प्रोसेस्ड फूड आणि स्नॅक्समध्ये मीठाचं सर्वाधिक प्रमाण असतं. त्यामुळे हे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे, असंही सांगण्यात आलं आहे.

HSC Result 2024 : 12वी चा निकाल उद्या जाहीर होणार; या वेबसाईटवर करा चेक

HSC Result 2024

HSC Result 2024 : महाराष्ट्र राज्याचा बारावीच्या निकालाची वाट सगळे विद्यार्थी पाहत आहेत. अशातच आता हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत इयत्ता बारावीचा निकाल उद्या म्हणजेच मंगळवारी 21 मे रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून याबाबतचे अधिकृत सूचना देखील जाहीर झालेली आहे. आता अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक 9HSC Result 2024) आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागाची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेली आहे. उद्या 21 मे रोजी दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. आणि विद्यार्थ्यांना तो पाहता देखील येणार आहे.

यावर्षी बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी या दरम्यान झाली. राज्याची जवळपास 15.13 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक म्हणजे 7लाख 60 हजार 46 विद्यार्थी कला शाखेसाठी 3 लाख 81 हजार 982 विद्यार्थी वाणिज्य शाखेसाठी 3 लाख 29 हजार 905 आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 37 हजार 225 आयटीआय साठी 4750 विद्यार्थ्यांचा समावेश होता मागील वर्षी बारावीचा निकाल हा 91.25 टक्के लागलेला होता. त्यामुळे उद्या नक्की काय निकाल लागणार आहे. याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

या वेबसाईटवर निकाल पाहता येणार | HSC Result 2024

http://hscresult.mkcl.org

www.mahahsscboard.in

https://result.digilocker.gov.in

http://results.targetpublications.org

MS Dhoni Retirement : धोनीच्या निवृत्तीबाबत मोठी अपडेट; ‘माही’ने घेतला हा निर्णय

MS Dhoni Retirement UPDATE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल मधून गाशा गुंडाळावा लागला. चेन्नईचा संघ आयपीएल मधून बाहेर गेल्यानंतर महेंद्रसिंघ धोनीचे (MS Dhoni Retirement) स्वप्न तुटलं. यंदाची आयपीएल धोनीची शेवटची आयपीएल असू शकते अशा चर्चा सुरु आहेत. त्यामुळे आता धोनी पुन्हा आपल्याला पिवळ्या जर्सीत पाहायला मिळेल कि नाही याबाबत चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे. मात्र आता धोनीच्या निवृत्तीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. धोनीनं अंतिम निर्णयासाठी वेळ मागून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.

निवृत्तीच्या निर्णयापूर्वी धोनी विचार करणार – MS Dhoni Retirement

आरसीबी विरुद्धच्या पराभवानंतर धोनी दुसऱ्याच दिवशी रांचीला गेला. पण धोनीने CSK मधील कोणालाही सांगितले नाही की तो आयपीएल सोडणार आहे. त्याने व्यवस्थापनाला सांगितले आहे की अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तो काही महिने विचार करेल आणि मगच निवृत्तीबद्दल (MS Dhoni Retirement) त्याचा पुढचा निर्णय जाहीर करेल. धोनीने चेपॉकवर शेवटचा सामना खेळण्याचे वचन संघाला दिले होते ते तो पाळेल अशी आशा व्यवस्थापनाला आहे. महत्वाची बाब म्हणजे धोनीचा खेळ चांगलाच राहिला आहे. शनिवारी आरसीबी विरुद्धच्या सामन्यात सुद्धा त्याने जवळपास 200 च्या स्ट्राइक-रेटने 25 धावा केल्या होत्या तसेच त्याने ४ ओव्हर फलंदाजी केली होती.

क्रिझमधून धावत असताना सुद्धा त्याला कोणताही त्रास झाला नाही, अगदी आरामात तो सिंगल- डबल धावा पूर्ण करत होता. धोनी कुठेही दमलेला दिसला नाही तसेच त्याच्यात कोणतीही अस्वस्थता पाहायला मिळाली नाही. उलट स्टेडियमच्या बाहेर चेंडू घालवत आपण आजही मोठमोठे शकतो हे धोनीने दाखवून दिले हा त्याचा प्लस पॉईंट आहे. पुढील वर्षी आयपीएलचा मोठा लिलाव होणार आहे आणि प्रत्येक संघांला जास्तीत जास्त पाच खेळाडू ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. सीएसकेचे चार खेळाडू आहेत – रुतुराज गायकवाड, जडेजा, दुबे आणि मथीशा पाथिराना … ज्यांना निश्चितपणे संघात कायम ठेवले जाईल. अशा परिस्थितीत नवीन खेळाडूंना खरेदी करण्यासाठी धोनी जास्त पैसे न रोखता सर्वात कमी रिटेन्शन स्लॉटची निवड करू शकतो.

Brittle Bones : महिलांमध्ये वाढतेय हाडं ठिसूळ होण्याची समस्या; असू शकते ‘हे’ कारण

Brittle Bones

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Brittle Bones) घरातील प्रत्येकाची लहान मोठी काम करताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. अनेकदा अख्ख्या दिवसाचा ताण येऊनही महिला न थांबता काम करत असतात. सकाळी अंथरुणातून उठल्या की, थेट रात्रीच अंथरुणाला पाठ टेकतात. दरम्यान, बऱ्याच महिला अनेकदा पाठ आणि पाय दुखण्याची तक्रार करतात. त्यांच्या हाडांमध्ये प्रचंड वेदना होत असल्याचे म्हणतात. असे असूनही त्या हसत हसत अशा समस्यांकडे दुर्लक्ष करतात.

मात्र, हाडं दुखण्याची समस्या ही किरकोळ वाटत असली तरीही गंभीर आहे हे लक्षात घ्यायला हवे. हाडांमध्ये वेदना होत आहेत, याचा अर्थ आपली हाडे ठिसूळ वा कमकुवत आहेत. त्यामुळे या समस्येकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणूनच, आज आपण महिलांमध्ये वाढत असलेल्या या समस्येमागील कारण जाणून घेणार आहोत.

हाडे ठिसूळ होण्याचे कारण (Brittle Bones)

सतत बसून किंवा खूप वेळ उभं राहून काम करण्याच्या सवयींमुळेदेखील हाडांमध्ये वेदना जाणवतात. या वेदना आपली हाडे कमकुवत होत असल्याचे लक्षण आहे. प्रामुख्याने शरीरात व्हिटॅमिन डी आणि पोषक तत्वांची कमतरता झाल्यास हाडांची झीज व्हायला सुरुवात होते. वाढत्या वयाबरोबर शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता झाल्याचा सगळ्यात जास्त प्रभाव हाडांवर होतो आणि हाडे ठिसूळ होऊ लागतात.

शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास हाडे दुखणे, सांधेदुखी, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. (Brittle Bones) खास करून गर्भधारणेनंतर महिलांच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. यावेळी व्हिटॅमिन डीची कमतरता होण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे महिलांमध्ये हाडे लवकर ठिसूळ होण्याची समस्या दिसून येते. महिलांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास त्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागते? ते जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

सतत आजारपण

आपल्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर त्याचा परिणाम थेट आपल्या रोग प्रतिकार शक्तीवर होतो. त्यामुळे ज्या महिलांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असते त्या वारंवार आजारी पडतात. (Brittle Bones) रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे कोणताही संसर्गजन्य विषाणू आणि जीवाणू त्यांच्या शरीरावर सहज हल्ला करतात. ज्यामुळे सर्दी, खोकला, ताप असे आजारपण वारंवार येते.

हाडांमध्ये तीव्र वेदना

महिलांच्या शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडांची लवकर झीज होते. परिणामी हाडं ठिसूळ होत जातात आणि हाडे कमकुवत झाल्याने शारीरिक वेदना वाढतात. त्यामुळे महिलांना हाडे मजबूत ठेवण्यासाठी शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची मात्रा कमी होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. अन्यथा सतत होणाऱ्यावेदना असह्य होऊ लागतात. (Brittle Bones)

शारीरिक अशक्तपणा

जसजसं वय वाढत तसतशा महिला जास्त दमू लागतात. लहान सहन काम करताना देखील त्यांना थकवा जाणवू लागतो. अशक्तपणामूळे बऱ्याचदा त्यांना काही काम होत नाही. अशा वेळी त्यांना व्हिटॅमिन डीची गरज आहे हे लक्षात घ्या. कारण व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाणही कमी होते. परिणामी शारीरिक अशक्तपणा जाणवू लागतो.

जखम लवकर बरी होत नाही

जर एखाद्या महिलेच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर एखादी जखम लवकर बरी होत नाही. (Brittle Bones) अगदी किरकोळ जखमा देखील बराच काळ त्रास देतात. त्यात जर काही पुनर्प्राप्ती किंवा शस्त्रक्रिया झाली असेल तर अशा महिलांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते.

शरद पवारांच्या या 5 गौप्यस्फोटांमुळे राजकरणात खळबळ; निवडणुकीनंतर पालटणार फासे??

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकत्याच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच आता या गौप्यस्फोटांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर आगामी काळात काय परिणाम होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, “एकेकाळी नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे 2004 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते” असेही शरद पवार यांनी म्हणल्यामुळे राजकिय चर्चांचा जोर वाढला आहे.

शरद पवारांचे 5 मोठे गौप्यस्फोट

  • लोकसत्ताला मुलाखत देताना शरद पवारांनी गौप्यस्फोट केला की, “2004 साली काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे जास्त आमदार असल्याने मला मुख्यमंत्री पदाची संधी होती, मात्र मी अधिकची इतर मंत्रीपदे घेऊन मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडलं.”
  • “विधानसभा 2019 च्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती. पण त्यांचं नावच आमच्यापुढे आले नाही. एकनाथ शिंदे यांच्या नावाबद्दल शिवसेनेअंतर्गत चर्चा झाली असल्याचे नंतर आम्हाला समजले” असे शरद पवार यांनी सांगितले आहे.
  • “2014 सालीच महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न होता. भाजप आणि शिवसेनेत अंतर पाडण्याचा आमचा प्रयत्न होता. शिवसेना भाजपसोबत गेल्यामुळे 2014 मध्ये महाविकास आघाडीचा आमचा प्रयोग फसला गेला.” असेही शरद पवारांनी सांगितले.
  • “काँग्रेसबाहेर पडलेल्या नेत्यांनी स्थापन केलेले छोटे पक्ष विलीन होऊ शकतात. आपला पक्ष विलीन करण्याचा विचार नाही. पुढे हा पर्याय त्याज्य नाही” असे मुलाखतीत बोलताना शरद पवारांनी सांगितलं.
  • त्याचबरोबर, “प्रफुल्ल पटेल 2004 पासूनच भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते. काँग्रेसबरोबर जाण्यास प्रफुल्ल पटेल यांनी विरोध केला होता. तरी ही युपीए सरकारमध्ये आम्ही पटेल यांना केंद्रीय मंत्रीपद दिले. प्रफुल्ल पटेल सारखे सांगायचे की, या निवडणुकीत आपले पक्ष टिकणार नाहीत. वाजपेयींना पर्याय नाही. आपण सगळेच भाजपमध्ये जाऊयात. परंतु आम्ही याला नकार दिला. शेवटी त्यांना तुम्ही जा म्हणून सांगितलं” असे शरद पवार म्हणले.

Gold Price Today : बाजाराच्या पहिल्याच दिवशी सोने पुन्हा महागले; आजचे भाव इथे चेक करा

Gold Price Today 20 May

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज २० मे २०२४, सोमवार म्हणजे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोने 73608 रुपयांवर व्यवहार करत आहेत. आधीच्या किमतीच्या तुलनेत सोन्याच्या दरात 15 रुपयांची किरकोळ वाढ झाली असून या किमती अजून वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत सुद्धा ९० रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीचा भाव 90900 रुपये इतका आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

तर दुसरीकडे गुड रिटर्न नुसार सुद्धा सोने महागल्याने पाहायला मिळालं. गुड रिटर्न नुसार २४ कॅरेट १० ग्राम सोन्याची किंमत ७५३१० रुपये आहे तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ६९०५० रुपये आहे. तर चांदीच्या दराबाबत सांगायचं झाल्यास, चांदीच्या किमतीत ३ % ने वाढ झाली असुन १ किलो चांदीचा भाव ९६००० रुपये इतका आहे. मागील काही दिवसांपासून सोने- चांदीच्या किमतीत सुरु असलेल्या विक्रमी वाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र मोठी झळ बसत आहे.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 68,900 रुपये
मुंबई – 68,900 रुपये
नागपूर – 68,900 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 75,160 रूपये
मुंबई – 75,160 रूपये
नागपूर – 75,160 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

AC Jacket | उन्हात फिरताना वापरा AC जॅकेट, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

AC Jacket

AC Jacket | आजकाल प्रचंड ऊन वाढलेले आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस जरी, पडत असला तरी अनेक ठिकाणी कडाक्याचे ऊन पाहायला मिळत आहे. अगदी बाहेर पडताना देखील लोक विचार करतात. अशा वेळी तुम्ही 24 तास तुमच्यासोबत कुलर आणि एसी ठेवू शकत नाही. परंतु आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये अशा एका जॅकेटबद्दल माहिती देणार आहोत. जे घातल्यावर तुम्हाला एसीचा फील येईल. हे जॅकेट (AC Jacket) नक्की कसे आहे? ते नक्की काय काम करते? त्याची किंमत काय असणार आहे? याबद्दल सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

एअर कंडिशनर जॅकेट | AC Jacket

हे जॅकेट तुम्हाला ऑनलाईन ई-कॉमर्स वेबसाईटवर देखील हे उपलब्ध होईल. ॲमेझॉन तसेच फ्लिपकार्टवरून तुम्ही हे खरेदी करू शकता. या जॅकेटची मूळ किंमत 20 हजार 184 रुपये आहे. परंतु तुम्ही हे केवळ 13 हजार 920 रुपयांमध्ये घेऊ शकता. यावर तुम्हाला 31 टक्के सूट देत आहे. तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताना प्लॅटफॉर्म तुम्हाला अनेक बँक सवलती देत असतात. हे जॅकेट तुम्ही ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. ज्याचा मासिक हप्ता केवळ 626 रुपये एवढा असू शकतो.

जॅकेटचे वैशिष्ट्य आणि बॅटरी | AC Jacket

या जॅकेटमध्ये 1000 mAh USB एवढी बॅटरी आहे. ज्यामध्ये तुम्हाला दोन पंखे आणि एक केबल मिळेल हे जॅकेट तुम्हाला 13 तासापर्यंत सपोर्ट करू शकते. त्याचप्रमाणे हे जॅकेट वॉटरप्रूफ देखील आहे.

कलर ऑप्शन आणि स्टायलिश

हे जॅकेट एकदम स्टाईलिश आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये अनेक कलर ऑप्शन देखील उपलब्ध आहे. तुम्हाला चार रनिंग स्पीड मोड मिळतात. त्याचप्रमाणे हे जॅकेट तुम्हाला 14 तासांची बॅटरी बॅकअप देते. या जॅकेटची मूळ किंमत 5999 एवढी आहे. पण ॲमेझॉनवर तुम्हाला 20 टक्के सूट मिळत आहे. आणि हे जॅकेट तुम्हाला केवळ 4799 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.