Thursday, December 18, 2025
Home Blog Page 755

Alyad Palyad Marathi Movie : ‘काळी रात्र, तंत्र मंत्र अन करनटक्याचा काळ..’; ‘अल्याड पल्याड’चा भीतीदायक टिझर रिलीज

Alyad Palyad Marathi Movie

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन। (Alyad Palyad Marathi Movie) संपूर्ण महाराष्ट्रभरात विविध जाती जमातीचे लोक राहतात. त्यामुळे येथे सगळ्याच बाबतीत वैविध्य पहायला मिळते. जुन्या संस्कृती, प्राचीन रूढी- परंपरा, विचित्र प्रथा आणि ज्या त्या भागातील लोकांच्या विविध समजुतींविषयी आपण कायम काही ना काही ऐकत वाचत असतो. अशातच एका अत्यंत वेगळ्या आणि भयावह परंपरेची आराधना करण्याची प्रथा असलेल्या गुरगां भागातील एका गावाची आणि तिथे राहणाऱ्या माणसांची एक थरारक गोष्ट घेऊन ‘अल्याड पल्याड’ हा मराठी चित्रपट येत आहे. या चित्रपटाचा नुकताच एक टिझर समोर आला आहे. जो पाहून अंगावर काटा येईल.

‘अल्याड पल्याड’चा नवा टिझर प्रदर्शित (Alyad Palyad Marathi Movie)

गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ‘अल्याड पल्याड’ या मराठी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून एक आगळी वेगळी कथा पहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता पहायला मिळतेय. नुकताच या चित्रपटाचा नवा टिझर प्रदर्शित झाला आहे.

ज्यामध्ये अभिनेता संदीप पाठकच्या भूमिकेची एक झलक पहायला मिळते आहे. काळी जादू, बाहुल्या, कुंकू, रिंगण अशी भीतीदायक दृश्ये, किंकाळ्या आणि बॅकग्राऊंडला सुरु असलेले म्युझिक अंगावर एकच काटा उभा करत आहे.

‘हे’ कलाकार साकारणार मध्यवर्ती भूमिका

चित्रपटाच्या शीर्षकासह ‘परत आला करनटक्याचा काळ..’ लिहिलेले पहिले पोस्टर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट काहीसा वेगळा असणार याची खात्री पटली होती. (Alyad Palyad Marathi Movie) यानंतर आता जेव्हा टिझर समोर आला आहे तेव्हा मात्र उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, या चित्रपटातून एक चांगली स्टारकास्ट आपल्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठकसह दिग्गज अभिनेते मकरंद देशपांडे, MHJ फेम गौरव मोरे, माधुरी पवार, सुरेश विश्वकर्मा, सक्षम कुलकर्णी, भाग्यम जैन आणि अनुष्का पिंपुटकर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

एस. एम. पी. प्रोडक्शन अंतर्गत ‘अल्याड – पल्याड’ हा चित्रपट येत्या १४ जून २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील आहेत. चित्रपटाची कथा देखील एस के पाटील यांचीच आहे. तर पटकथा आणि संवाद संचय नवगिरे यांचे आहेत. (Alyad Palyad Marathi Movie) छायांकन योगेश कोळी यांचे आहे. तर संकलन सौमित्र धरसुलकर यांचे आहे. वेशभूषा अपेक्षा गांधी आणि ध्वनी स्वरूप जोशी यांचे आहे. हा चित्रपट एका वेगळ्या कथानकासह प्रेक्षकांना खिळवून ठेवेल अशी आशा चित्रपटाच्या टीमने व्यक्त केली आहे.

Colors Marathi : मतदानाच्या पार्श्वभूमीवर कलर्स मराठीने बदलला लोगो; प्रेक्षकांना केले ‘हे’ आवाहन

Colors Marathi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Colors Marathi) छोट्या पडद्यावर कलर्स मराठी ही अत्यंत लोकप्रिय वाहिनी आहे. कलर्स मराठीवरील जवळपास प्रत्येक मालिका प्रेक्षकांच्या घराघरात पाहिली जाते. प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्याच्या हेतूने कलर्स मराठी ही वाहिनी कायम प्रयत्नशील असते. विविध आशयाच्या, विविध ढंगाच्या आणि विविध कथानकाच्या बऱ्याच मालिका कलर्स मराठीवर सुरु आहेत. त्यामुळे गेल्या काही काळात कलर्स मराठीचा प्रेक्षकवर्ग वाढताना दिसला आहे. दरम्यान, सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहत असताना कलर्स मराठीने आपला लोगो बदलून आपल्या प्रेक्षक वर्गाला एक आवाहन केलं आहे.

कलर्स मराठीने बदलला लोगो (Colors Marathi)

कलर्स मराठी या लाडक्या लोकप्रिय वाहिनीने नुकताच आपल्या सोशल मीडिया हॅण्डल्स इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब लोगोमध्ये एक विशेष बदल केलेला दिसत आहे. या बदललेल्या नव्या लोगोमध्ये एका बोटावर शाई लागलेली दिसतेय. ज्यामुळे मत दिल्याचे सूचित होत आहे. मागील काही वर्षात मतदानाचा टक्का फार कमी झाला आहे. या नव्या लोगोच्या बदलामुळे लोकांमध्ये मतदानाचे महत्त्व आणि एक स्थिर देशासाठी त्याची आवश्यकता याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा कलर्स मराठीचा उद्देश आहे.

प्रेक्षकांना केले ‘हे’ आवाहन

कलर्स मराठीने नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक कार्यात आपले योगदान दिले आहे. नुकतेच कलर्स मराठीच्या कलाकारांनी इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवरून विविध व्हिडिओंद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. (Colors Marathi) मतदान करण्यासाठी बाहेर या, वोटिंग करणे हा तुमचा हक्क आणि जबाबदारी आहे. देशासाठी एक पाऊल उचलून मतदान करा. आपल्या एका मताने देशाचे कल्याण होईल. मतदार हे टीव्ही आणि सोशल मीडियाचा वापर अधिक प्रमाणात करतात, हीच गोष्ट लक्षात घेऊन कलर्स मराठीने हे स्तुत्य पाऊल उचलले आहे.

कलर्स मराठीने केलेला हा बदल प्रेक्षकांना मतदान करण्याची प्रेरणा देईल आणि त्यांना मतदान करण्यासाठी नक्कीच प्रवृत्त करेल. कारण मतदान हीच आपली ताकद, हीच आपली जबाबदारी! कलर्स मराठीने अत्यंत अनोख्या पद्धतीने आपल्या प्रेक्षक वर्गाला मतदार होऊन आपला हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. (Colors Marathi) या कृतीचे सर्व स्तरावरून विशेष कौतुक केले जात आहे.

Investment Tips : गुंतवणूक करताना चुकूनही करू नका ‘या’ 7 चुका; नाहीतर पैसे बुडालेच म्हणून समजा

Investment Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Investment Tips) भविष्यातील आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी आज गुंतवणुक करणे किती महत्वाचे आहे हे आता प्रत्येकाला समजू लागले आहे. त्यामुळे गेल्या काही काळात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसली आहे. दरम्यान, बरेच लोक आपल्या कष्टाचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवण्यासाठी सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनांचा शोध घेत असतात. कारण, अशा योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास आपण कमावलेल्या आणि त्यातून बचत केलेल्या पैशांमध्ये वाढ होते. सुरक्षित आणि निश्चित परताव्याची हमी मिळते.

आज गुंतवणूक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यांपैकी कोणता पर्याय गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे, त्याची निवड करतेवेळी बरेच लोक गडबडून जातात. अशावेळी जर चूक झाली तर मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. (Investment Tips) असे तुमच्या बाबतीत घडू नये म्हणून आज आम्ही तुम्हाला गुंतवणूक करताना कोणत्या चुका करू नये याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. तुम्ही गुंतवणुकीसाठी कोणत्याही चांगल्यातल्या चांगल्या पर्यायाची निवड केलात तरीही काही चुका तुमचे आर्थिक नुकसान होण्यास कारणीभूत ठरू शकतात. अशा काही चुकांविषयी आपण माहिती घेऊया.

1. गुंतवणूक करण्यासाठीचा हेतू अस्पष्ट असणे (Investment Tips)

माझ्या मित्राने गुंतवणूक केली म्हणून मी गुंतवणूक करणार, असे बरेच जण म्हणतात. पण गुंतवणूक ही आपल्या भविष्यासाठी करायची असते. त्यामुळे आपण गुंतवणूक करण्याआधी आपला हेतू स्पष्ट हवा. आपण गुंतवणूक का करतोय? कशासाठी करतोय? हे आपल्याला माहित हवे. अर्थात गुंतवणूक करण्याचे आपले ध्येय निश्चित असायला हवे. सेवानिवृत्ती, मुलांचे शिक्षण किंवा आजारपणाच्या काळासाठी पूर्वनियोजित तयारी असा कोणताही उद्देश असो. पण तो निश्चित करायला हवा.

2. मोठ्या फायद्याची हाव असणे

आपल्याला गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा मिळेल म्हणून तात्काळ वा तात्पुरत्या खरेदी विक्रीच्या पर्यायांची निवड करू नका. असे केल्यास तुमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. (Investment Tips) तुमचा हेतू अस्पष्ट झाल्याने नुकसानाचा फटका बसू शकतो.

3. विचार न करता घाईत निर्णय घेणे

झटपट श्रीमंतीची स्वप्न पाहणारे अनेकदा घाई करून गडबडीत चुकीचे निर्णय घेतात. ज्यामुळे गुंतवणुकीचे व्यवस्थित व्यवस्थापन होत नाही. इतकेच काय तर अशा घाई गडबडीत घेतलेल्या निर्णयांमुळे गुंतवणुकीतील शिस्त बिघडते. परिणामी मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते.

4. म्युच्युअल फंडमध्ये ट्रेडिंग करणे

अनेक लोक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे पसंत करतात. (Investment Tips) म्युच्युअल फंडात गुंतवणूक दीर्घ कालावधी करिता केलेली असते. त्यामुळे मुदत पूर्ण होण्याआधी यातून पैसे काढता येत नाहीत. त्यामुळे जर म्युच्युअल फंडात ट्रेडिंग अर्थात खरेदी विक्री केली तर नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मुदतपूर्तीआधी असे निर्णय घेऊ नका.

5. मार्केटवर डिपेंड राहणे

बरेच लोक चांगला परतावा या एकमेव गोष्टीसाठी गुंतवणूक करतात. जे चूक आहे. कारण यामुळे आस लागते आणि बरेच जण परताव्याच्या आशेने सतत मार्केटवर अवलंबून राहतात. झटपट फायदा मिळवण्याच्या हव्यासापोटी इथे गुंतवणूकदार चूक करतो आणि नुकसान करून घेतो.

6. पोर्टफोलिओमध्ये वैविध्य नसणे

गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय तसेच क्षेत्र उपलब्ध असतात. (Investment Tips) त्यामुळे गुंतवणूक करताना विविध क्षेत्रांचा अभ्यास करून विविध क्षेत्रात गुंतवणूक करावी. दरम्यान, एकाच क्षेत्रावर अवलंबून राहिल्याने अनेकदा नुकसानाची शक्यता असते. त्यामुळे नवनवीन क्षेत्रांचा अभ्यास करून आणि त्यातील धोक्यांचा अंदाज घेऊन आपल्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणा.

7. गुंतवणुकीचे अनॅलिसिस न करणे

बऱ्याच लोकांना कुणीतरी सांगितलं म्हणून त्या ठिकाणी गुंतवणूक करायची सवय असते. अशावेळी त्यांनी समोरच्याने सांगितलेल्या पर्यायाचा अभ्यास वा समीक्षा म्हणजेच अनॅलिसिस केलेले नसते. यामुळे अनेकदा नुकसानाची शक्यता वाढते. तुम्ही जे काही ध्येय निश्चित केले असेल त्यानुसार तुम्हाला गुंतवणूक करून परतावा मिळेल का याचे अनॅलिसिस केल्यास नुकसानाची शक्यता कमी होते. (Investment Tips)

मुस्लिम आणि आमचा DNA एकच; भाजप नेत्याचे मोठं विधान

BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या मुलाला म्हणजेच करण भूषण सिंहला कैसरगंज मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या मुलाच्या प्रचारासाठी ब्रिजभूषण मैदानात उतरलेले दिसत आहेत. त्यांच्या करण भूषण सिंह यांच्या प्रचारासाठी विविध भागात सभा पार पडत आहेत. यातीलच एका सभेमध्ये बोलताना त्यांनी मुस्लिम समुदायाला संबोधन एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे ब्रिजभूषण शरण सिंह चांगलेच चर्चेत आले आहेत.

एका सभेमध्ये बोलताना ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, “कोणी म्हणू अथवा नको पण तुमचे आणि माझे रक्त एक आहे. आपला डीएनए एकच आहे. जर आपला डीएनए तपासला तर तो सारखाच असेल.” हे वक्तव्य करत असताना ब्रिजभूषण चांगलेच भावुक झालेले दिसून आले. यावेळी बोलताना, गेल्या दीड वर्षांपासून माझ्याविरोधात षडयंत्र सुरू आहे. आम्हाला कोणतीही चूक न करता शिक्षा दिली जात आहे. 1996 मध्ये माझी पत्नी खासदार झाल्यानंतर माझ्याविरुद्ध कट रचला गेला. 2024 मध्ये माझ्यासोबत कट रचला गेला आता तर माझा मुलगा खासदार होईल. तेव्हाही कोणता ना कोणता कट रचला जाईल, असे ब्रिजभूषण यांनी म्हटले.

इतकेच नव्हे तर, कोणी म्हणो किंवा ना म्हणो तुमचे आमचे रक्त एकच आहे. डीएनए चाचणी केली तर तुमच्या 5 पिढ्या आधी आमचे रक्त असते. त्यामुळे आम्हाला इतर गोष्टींमध्ये जायचे नाही. आम्ही तुमच्यासाठी बदनाम आहोत आणि तुम्ही आमच्यासाठी बदनाम आहात, म्हणून तुम्ही लोक आमच्या पक्षात बी पेरतात. परंतु पक्षात बी पेरण्याऐवजी कमळावर पेरा. ही संकटाची आणि आणीबाणीची वेळ आहे, म्हणून कृपया समर्थन करा” असे ब्रिजभूषण शरण सिंह यांनी वक्तव्यं केले.

Viral Video : भावाने केली हवा!! इलेक्ट्रिक स्कुटरवरून नेली वाजत- गाजत वरात; व्हिडीओ पाहिला का?

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आपलं लग्न धुमधडाक्यात आणि सगळ्यांच्या लक्षात राहील असं व्हायला हवं म्हणून आजकालची तरुण मंडळी शक्य ते सगळं करतात. मग होतेकी डान्स असो किंवा अजून काही. लग्न समारंभात गेम्स खेळणे, सेलिब्रिटी आणणे हे सगळे फंडे आता जुने झाले. त्यामुळे आजच्या घडीला काय केलं म्हणजे चर्चा होईल? याचा विचार सगळेच करत असतात. लग्न आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस असतो. त्यामुळे हा दिवस जंगी साजरा करायचा म्हणून आजकाल हटके एंट्री केली जाते. मंडपात प्रवेश करण्यापासून ते वरातीपर्यंत सगळं कसं एकदम युनिक झालं पाहिजे. असाच एका वरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये नवरदेवाने घोड्यावरून नव्हे तर इलेक्ट्रिक स्कुटीवरून एंट्री घेतली आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, नवरदेव घोडा किंवा कारमधून नव्हे तर चक्क एथर इलेक्ट्रिक स्कूटरवरून आला आहे. त्याच्या या अनोख्या एंट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या नवऱ्या मुलाचे नाव दर्शन पटेल असे आहे आणि त्याने त्याची वरात हटके करायची म्हणून चक्क इलेक्ट्रिक स्कुटरवरून एंट्री घेतली आहे. यासाठी त्याने आपल्या एथर रिझता इलेक्ट्रिक स्कूटरला हार, फुलं, तोरणं लावून मस्त सजवले आहे. या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, वरातीत त्याच्या कुटुंबातील मंडळी देखील मस्त सजून धजून नाचत आहेत.

आजपर्यंत तुम्ही बऱ्याच वराती पाहिल्या असतील. ज्यामध्ये डोक्यावर दिवे, डीजे, बेंजोसह नवरदेवाची घोड्यावरून किंवा रथातून वगैरे एंट्री होते. पण या सगळ्या वरातींपेक्षा हा व्हिडीओ फारच वेगळा आहे. एथर इलेक्ट्रिक स्कूटरवरून एका नवरदेवाची वरात पाहून रस्त्यावरून जाणारे लोक सुद्धा पाहत राहिले आहेत. (Viral Video) तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून एथर एनर्जीचे सीईओ आणि सह-संस्थापक तरुण मेहता यांनीसुद्धा शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘हे गेल्या वीकेंडला घडलं! दर्शनला त्याची वरात एथर इलेक्ट्रिक स्कूटरवरून घेऊन जायची होती आणि आम्ही त्याची वरात आणखी खास केली’.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर peakbengaluru या एक्स (ट्विटर) अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ अनेकांनी पहिला असून या व्हिडीओतील ‘रिझता’ ही एथर कंपनीची नवीन लाँच केलेली इलेक्ट्रिक स्कूटर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. (Viral Video) यावर काही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील एकाने लिहिलंय, ‘आपल्या प्रोडक्टची पब्लिसिटी करण्याचा एक अनोखा मार्ग..’ आणखी एकाने म्हटलंय, ‘अरे वाह एकदम पर्यावरणपूरक वरात.. मला हे आवडलंय’. तर अन्य एकाने लिहिले, ‘एक नंबर.. मस्त शुभ्र रंगाची आधुनिक घोडी आहे’.

Cooking Tips : स्पॉंजी ढोकळा हवाय ? सोड्याऐवजी घाला ‘हा’ पदार्थ ; ट्राय करा वेगळी रेसिपी

cooking tips dhokla

Cooking Tips : उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु आहेत. घरी बच्चे कंपनींना काहीतरी हटके स्पेशल खायला आवडत असते गृहिणींना मात्र प्रश्न पडलेला असतो करायचं काय ? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक खास रेसिपी सांगणार आहोत. नाश्त्यासाठी ढोकळा हा प्रकार अनेकदा केला जातो आणि तो आवडीने खाल्लाही जातो. आजच्या लेखात आम्ही ढोकळ्याची एक वेगळी रेसिपी सांगणार (Cooking Tips) आहोत. चला तर मग जाणून घेऊया…

काय आहे कृती ? (Cooking Tips)

ही रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कप बेसन घाला. त्यामध्ये दोन ते तीन चमचे हळद घाला. त्यामध्ये एक छोटा चमचा साखर घाला आणि एक चमचा तेल घाला. तेल घातल्यामुळे ढोकळ्याला मॉइश्चुर येतं आणि चवही चांगली लागते. त्यानंतर त्यामध्ये आल्याचे तुकडे आणि चवीनुसार मीठ घाला. सोड्याऐवजी ऐवजी ढोकळ्याच्या मिश्रणात एक चमचा लिंबू पावडर घाला त्यात एक कप पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्या. मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट होणार नाही याची काळजी घ्या ढोकळ्याचं मिश्रण दोन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये (Cooking Tips) काढून घ्या.

तडाक्यासाठी रेसिपी (Cooking Tips)

तडका देण्यासाठी हिरव्या मिरच्या चिरून घ्या कढईमध्ये तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये राई कढीपत्ता घाला आणि चमच्याचा सहाय्याने चाळून घ्या; पाणी घालून व्यवस्थित उकळवून घ्या. त्यात एक मोठा चमचा साखर घाला आणि आंबटपणा (Cooking Tips) येण्यासाठी लिंबाचा रस घाला त्यात मीठ घालायला विसरू नका हे पाणी दोन मिनिटांसाठी उकळून ठेवा.

ढोकळा वाफवण्याची कृती (Cooking Tips)

आता ढोकळा बनवण्यासाठी कढई गॅसवर ठेवा. त्यामध्ये थोडं पाणी गरम करून झाकण ठेवून द्या. ढोकळ्याचे फुललेलं बॅटर चमच्याने ढवळून घ्या. त्यामध्ये इनोचे एक पाऊच घाला. एक छोट्या भांड्यात फॉईल पेपर ठेवून त्यावर ढोकळ्याचे मिश्रण (Cooking Tips) घाला. दुसरीकडे हा ढोकळ्याचे बॅटर भांड्यात घालण्याआधी त्यात लिंबू घाला पाणी उकळल्यानंतर त्यात प्लेट ठेवून ढोकळे वाफवून घ्या तयार आहेत गरमागरम ढोकळे. फोडणीसाठी गरम केलेले पाणी त्यावर घाला.

Chimpanzee Smoking : धुवाँ धुवाँ!! चिंपांझीला लागला सिगारेटचा नाद; स्टाईलमध्ये झुरका मारताना VIDEO झाला व्हायरल

Chimpanzee Smoking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Chimpanzee Smoking) आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये कधी काय पहायला मिळेल याबद्दल काही बोलू शकत नाही. कल्पनेच्या पलीकडे घडणाऱ्या घटनांचे एकापेक्षा एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यामातून पहायला मिळतात. यातील कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये येतात आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. कधी फूड फ्युजन, तर कधी अपघातांचे व्हिडीओ, इतकेच काय तर आजकाल माणसांसारखेच प्राण्यांचेसुद्धा अतरंगी व्हिडीओ पहायला मिळतात. आताही सोशल मीडियावर अशाच एका व्हिडीओने युजर्सचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर प्राण्यांचे बरेच व्हिडीओ व्हायरल होतात. यात कधी प्राणी गाणी म्हणत असतात तर कधी स्टंट करत असतात. इतकेच काय तर कधी मजेशीर खेळ खेळतात, भांडतात तर कधी नाचताना सुद्धा दिसतात. (Chimpanzee Smoking) सध्या सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये एक चिंपांझी असे कृत्य करत आहे जे पाहून तुम्ही चाट पडाल. चिंपांझीला प्राण्यांमध्ये सर्वात बुद्धीमान प्राणी म्हणून ओळखतात. पण तो या व्हिडिओत आपल्या बुद्धीचा वापर ज्या कामासाठी करतोय ते पाहून तुम्हालाही चिंता वाटेल.

व्हायरल व्हिडीओ (Chimpanzee Smoking)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक चिंपांझी एका ठिकाणी निवांत बसला आहे. यावेळी त्याच्या हातात चक्क सिगारेट आहे. रोज सिगारेट पिणाऱ्यांना तगडी टक्कर देत एकदम स्टाईलमध्ये हा चिंपांजी सिगारेट ओढतोय. चिंपांझीची सिगारेट ओढण्याची हटके स्टाईल पाहून कुणीही थक्क होईल. नाकातून धूर काढत हा चिंपांजी एन्जॉय करत सिगारेट ओढतोय. हे दृश्य खरोखरच थक्क करणारे आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.



हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर earth.reelनावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने ‘या व्हिडीओला कॅप्शन द्या’, असे लिहिले आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ अनेकांनी बघितला असून यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Chimpanzee Smoking)अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना या चिंपांजीच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. एकाने म्हटले आहे, ‘प्लीज याच्या हातातून सिगारेट काढून घ्या’. तर दुसर्याने म्हटलंय, ‘माणसासारखी यालाही वाईट सवय लागली’.

FLiRT Covid Variant | कोरोनाचा नवीन व्हेरिएंट समोर ! जाणून घ्या लक्षणे आणि संभवणारा धोका

FLiRT Covid Variant

FLiRT Covid Variant | काही वर्षांपूर्वी संपूर्ण जगात कोरोना आला आणि संपूर्ण जग धोक्यात आले. आता कुठे कोरोनाची (FLiRT Covid Variant) भीती बंद झाली होती. तर आता पुन्हा एकदा या कोरोनामुळे जगाची चिंता वाढली आहे. कारण आता कोरोना व्हायरस KP.2 चे नवीन प्रकार भारतात आलेला आहे. याला FLiRT असे नाव देण्यात आलेले आहे. ब्रिटन, अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये देखील कोविडची ही वाईट वाढती प्रकरण या प्रकाराची जोडली जात आहेत.

KP.2 हा प्रकार काय आहे ? | FLiRT Covid Variant

हाती आलेल्या माहितीनुसार KP.2 हे JN.1 प्रकारातील आहे. हे ओमीक्रॉनचे उपप्रकार आहे. यामध्ये नवीन जनुकीय बदल झालेले दिसून येत आहेत. त्यामुळे या दोन रोगप्रतिकारक जणूकीय बदलांच्या अक्षरांवर आधारित याला असे नाव देण्यात आलेले आहे.

भारतात परिस्थिती कशी आहे ?

INSACOG यांच्याद्वारे केलेल्या 250 KP.2 JN. 1 सिक्वेन्सिंगपैकी 128 सिक्वेन्स महाराष्ट्रात होते. त्याचप्रमाणे मार्चमध्ये सर्वात सिक्वेन्स आढळून आल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे जागतिक आकडेवारीनुसार असे समोर आलेले आहे की, भारत या जगातील सर्वात KP.2 सिक्वेन्सिंगची नोंद करत आहे. गेल्या सात दिवसात भारताने अपलोड केलेल्या एकूण डाटापैकी 29 टक्के डाटा आहात. KP.2 चा होता. 14 मे रोजी भारतात कोविडची 679 प्रकरणी सक्रिय होती.

KP.2 मुळे कोणते गंभीर आजार होऊ शकतात

या नवीन व्हेरियंटमध्ये (FLiRT Covid Variant) पूर्वीच्या संसर्ग आणि पूर्वीच्या लसीपासून मिळालेली प्रतिकारशक्ती टाळण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे सगळे तज्ञ याकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत. परंतु अशोका विद्यापीठातीलत्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्ससचे डीन डॉक्टर अनुराग अग्रवाल यांनी सांगितले की, याबाबत काळजी करण्याची कोणतेही कारण नाही. असे जनुकीय बदल यापूर्वी देखील झालेले आहेत.

लक्षणे काय आहेत ?

याचा संसर्ग झालेल्या लोकांना चव आणि वास कमी येतो. त्याचप्रमाणे सर्दी, खोकला, घसा दुखणे, नाक बंद होणे, नाक वाहने, डोकेदुखी, स्नायू दुखी, थकवा यांसारखी लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात.

जिओचा धमाकेदार रिचार्ज प्लॅन!! अनलिमिटेड 5G डेटासह मिळत आहे OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन

Jio's plan

Jio Recharge Plans| रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत असते. सध्या देशभरात आयपीएल आणि वर्ल्ड कपचे वारे वाहत असल्यामुळे जिओने अनेक नवीन प्लॅन लॉन्च केले आहेत. यातील एका प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड 5G डेटा मिळत आहे. तर चित्रपट आणि वेबसिरीज मोफत पाहता येत आहेत. या प्लॅनसाठी ग्राहकांना फक्त 398 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानंतर ग्राहकांना मनमुराद मनोरंजनाचा आनंद लुटता येईल.

Jio 398 Recharge Plan

जिओ प्लॅनच्या यादीत 398 चा रिचार्ज पॅक आहे. जिओ आपल्या 398 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 28 दिवसांची वैधता देत आहे. यासोबतच युजर्सना दररोज 2GB डेटाचा लाभही दिला जात आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 100 एसएमएसची सुविधा आहे. तसेच, या प्लॅनमध्ये 13 OTT प्लॅटफॉर्मची सदस्यता उपलब्ध आहे. याच प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud च्या मोफत सुविधा उपलब्ध आहेत. तसेच, अतिरिक्त शुल्काशिवाय 6 GB अधिक डेटा दिला जात आहे.

Jio 909 Recharge Plan

रिलायन्स जिओ आपल्या 909 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज 100 एसएमएस आणि एकूण 168GB डेटा देते. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. तसेच, वापरकर्ते या प्लॅनमार्फत 40Kbps वेगाने अमर्यादित डेटा वापरू शकतात. तसेच, या प्लॅनमध्ये Sony Liv आणि Zee5 ॲप्लिकेशन्सचे मोफत सबस्क्रिप्शन देण्यात आले आहे. नवीन जिओ रिचार्ज प्लॅन निवडणाऱ्या ग्राहकांना JioCinema, JioTV आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे.

Indian Railways Act : Indian Railways Act : ट्रेनमधून उडी मारल्यानंतर मिळू शकते का भरपाई ? काय सांगतो रेल्वे कायदा ?

Indian Railways Act : भारतामध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची काही कमी नाही. मात्र काही वेळा प्रवाशांना रेल्वे दुर्घटनांचा सामना करावा लागतो. अशावेळी रेल्वे कडून नुकसानभरपाई मिळते. मात्र नेमक्या कोणत्या घटनांमध्ये रेल्वेकडून भरपाई मिळते ? भरपाईची रक्कम किती असते ? याबाबत रेल्वेचे कायदा नेमका काय आहे ? चला जाणून घेऊया…

खरेतर नुकतेच कर्नाटक उच्च न्यायालयाने रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना आठ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. याआधी रेल्वे क्लेम ट्रिब्युनलने महिलेच्या मृत्यूची भरपाई देण्यास नकार दिला होता. ही महिला कर्नाटकातील चन्नापटना रेल्वे स्थानकावर चुकीच्या ट्रेनमध्ये चढली होती, तिची चूक लक्षात येताच तिने घाबरून चालत्या ट्रेनमधून उडी मारली, परिणामी तिचा मृत्यू झाला.

काय सांगतो नियम ? (Indian Railways Act)

रेल्वेतील अपघातात जखमी किंवा मृत्यूमुखी पडणाऱ्यांना विभाग नुकसान भरपाई देतो. मात्र, ही भरपाई रेल्वे विभागाची चूक असतानाच मिळते.रेल्वेचे नुकसान भरपाईचे दायित्व रेल्वे अधिनियम, 1989 च्या कलम 124 आणि 124A मध्ये विहित केलेले आहे. अशा परिस्थितीत, रेल्वे अपघातात जखमी किंवा मृत्यू झाल्यास नुकसान भरपाईचे काय नियम आहेत ते जाणून घेऊया.

किती मिळते नुकसान भरपाई ? (Indian Railways Act)

  • जर ट्रेन दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला असेल तर मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मिळतात. जर ट्रेन दुर्घटनेमध्ये गंभीर दुखापत झाली असेल तर अडीच लाख रुपये मिळतात आणि जर प्रवासी साधारण जखमी झाल्यास 50 हजार रुपये मिळतात.
  • एखादी अप्रिय दुर्घटना झाल्यास मृत्यू झाल्यास दीड लाख रुपये मिळतात. एखाद्या अप्रिय घटनेमध्ये जर प्रवाशाला गंभीर दुखापत झाल्यास पन्नास हजार रुपये मिळतात आणि याच घटनेमध्ये जर प्रवाशाला साधारण दुखापत झाली असेल तर पाच हजार रुपये (Indian Railways Act) मिळतात.
  • मानव युक्त लेवल क्रॉसिंग दुर्घटना जर घडली असेल तर आणि यात व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर पाच लाख रुपये मिळतात आणि या घटनेमध्ये जर व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असेल तर अडीच लाख रुपये आणि जर साधारण दुखापत झाली असेल तर 50 हजार रुपये मिळतात.

पर्यायी प्रवास विमा योजना

1 सप्टेंबर 2016 पासून IRCTC पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ई-तिकीट बुक करणाऱ्या कन्फर्म/आरएसी रेल्वे प्रवाशांसाठी 0.92 रुपये प्रति प्रवासी प्रीमियमने एक पर्यायी प्रवास विमा योजना सुरू करण्यात आली. योजनेंतर्गत, रेल्वे अपघात/ अप्रिय घटनांमुळे आरक्षित प्रवाशांचा मृत्यू/ दुखापत झाल्यास पीडित/कुटुंब किंवा पीडितेच्या कायदेशीर वारसाला विम्याची रक्कम दिली जाते.रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 124 आणि 124A अंतर्गत विमा संरक्षण मूळ स्थानकावरून ट्रेनच्या प्रत्यक्ष सुटल्यापासून ते ठरलेल्या स्थानकावर ट्रेनचे वास्तविक आगमन होईपर्यंत वैध असेल. विमा योजना सर्व गाड्यांवरील सर्व आरक्षित वर्गातील प्रवाशांसाठी उपलब्ध आहे (पॅसेंजर ट्रेन आणि उप-शहरी गाड्या वगळता) फक्त IRCTC वेबसाइटवर ऑनलाइन बुक केलेल्या तिकिटांसाठी ही सुविधा असेल.