Bank Loan | अनेकवेळा आपल्याला तातडीने पैशांची गरज लागते. आणि अशा वेळेस नेमके काय करावे समजत नाही. बँकेत जरी पर्सनल लोन घ्यायला गेलो, तरी त्यासाठी खूप मोठी प्रक्रिया असते. त्यामुळे अशावेळी नक्की पैसे कुठून घ्यायचे हा प्रश्न पडत असतो. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका बँकेबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्हाला दहा मिनिटात दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल. एचडीएफसी बँकेने ही एक खास सुविधा केलेली आहे. आता या सुविधाचा लाभ कसा घ्यायचा? हे आपण जाणून घेणार आहोत.
एचडीएफसी बँकेच्या (Bank Loan) या कर्जासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी केली जाते. आणि सगळी कागदपत्र बरोबर आहेत का? याची पडताळणी केली जाते. आणि त्यानंतर तुमचे कर्जाचे पैसे तुमच्या बँक खातात पाठवले जातात.
एचडीएफसी बँक ही पर्सनल लोन देते. परंतु हे पर्सनल लोन घेण्यापूर्वी तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे की, त्यांच्या वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरात सतत चढ-उतार करत असते. ही बँक सध्या 10 टक्के ते 14 टक्के पर्यंत व्याजदर आकारते. एचडीएफसी बँकेद्वारे तुम्हाला 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. ही एक सर्वात जलद लोन देणारी बँक आहे.
अर्ज कसा करायचा ? | Bank Loan
एचडीएफसी बँकेकडून पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमध्ये एचडीएफसी बँकेचे ॲप डाऊनलोड करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला Apply Now या बटणावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर कर्जाच्या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल.
त्यानंतर या अर्जातील सर्व माहिती अचूक भरलेली असणे गरजेचे आहे.
माहिती भरल्यानंतर केवायसी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुमच्या अर्जाची छाननी केली जाईल.
या कर्जाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जर पात्र असाल, तर कर्जाची रक्कम काही वेळातच तुमच्या बँक खात्यावर पाठवली जाते.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Injury Scars Removal Remedies) लहानपणी खेळताना, बागडताना ढोपर फुटणे, खरचटणे अशा छोट्या मोठ्या जखमा होतात. यातील बहुतेक लहान जखमा कालांतराने नैसर्गिकरित्या बऱ्या होतात. मात्र, जखमा झाल्याने उठणारे व्रण आणि त्यामुळे त्वचेवर पडणारे डाग काही केल्या जातात. वय वाढत जात मात्र हे डाग काही जाण्याचं नाव घेत नाहीत. कधी काळी झालेल्या किरकोळ जखमांच्या खुणा आयुष्यभर तशाच राहू नये म्हणून आपण किती काय काय उपाय करतो. मात्र, मनासारखे परिणाम मिळत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला किरकोळ जखमांवर प्रभावी ठरणाऱ्या काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत.
या घरगुती उपायांच्या मदतीने न केवळ जखमा लवकर बऱ्या होतील. तर जखमांमुळे येणारे व्रण, खुणा आणि डागाचे अंश अजिबात उरणार नाहीत. शिवाय हे उपाय अत्यंत सोपे आणि कुणीही करू शकेल असे असल्याने यासाठी फार खिटपिट सुद्धा करायची गरज नाही. चला तर या प्रभावी नैसर्गिक आणि घरगुती उपायांविषयी जाणून घेऊया.
1. हळद (Injury Scars Removal Remedies)
हळदीतील अँटी बॅक्टेरियल गुणधर्म जखमांवर प्रभावीपणे काम करते. शिवाय हळदीतील कर्क्युमिन बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करते. तसेच हळदीतील अँटी फंगल आणि दाहक विरोधी गुणधर्म जखमा लवकर बऱ्या करतात आणि डागदेखील पडू देत नाहीत.
2. कोरफड
कोरफड ही औषधी वनस्पती विविध प्रकारे आरोग्यदायी ठरते. यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे आपल्या शरीरासाठी चांगली असतात. शिवाय कोरफडमध्ये असणारा ग्लुकोमानन हा घटक सेल्युलर उत्पादनास मदत करतो आणि शरीरात कोलेजेनची मात्रा वाढवतो. यामुळे जखम लवकर बरी होते. (Injury Scars Removal Remedies) शिवाय जखमेमुळे उठणारे व्रण देखील नाहीसे होतात. खूप जुन्या जखमेचे व्रण सुद्धा कोरफडीच्या मदतीने कमी करता येतात. यासाठी एकतर ताजा गर वापरावा किंवा मग कोरफड जेलचा पातळ वा जेलमध्ये भिजवलेली पट्टी वापरता येईल.
3. मध
मध अत्यंत गुणकारी असून यातील अँटी ऑक्सिडेंट गुणधर्म जखमेच्या उपचारांसाठी बरेच फायदेशीर आहेत. मध हे कोणत्याही जखमांच्या उपचारांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्याची क्षमता ठेवते. (Injury Scars Removal Remedies) यातील बरेच घटक जखमेतील जिवाणूंची वाढ रोखते आणि संसर्गापासून बचाव करते. शिवाय जखमेमूळे व्रण देखील येऊ देत नाही. एखाद्या जुन्या जखमेचा डाग असेल तर तो लवकर कमी होण्यास मदत होते.
4. लसूण
लसणीतील अॅलिसिन गुणधर्म आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म जखमांच्या उपचारासाठी प्रभावीपणे काम करते. खास करून जळलेल्या वा पोळलेल्या जखमांवर उपचार म्हणून लसूण क्रीम चांगला मार्ग आहे. यामुळे जखमांचे डाग देखील राहत नाहीत. (Injury Scars Removal Remedies)
BHC Bharti Recruitment 2024 | जे लोक नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी एक चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता एका भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे ज्यांना नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. त्यांनी अजिबात वेळ वाया न घालवता लवकरात लवकर अर्ज प्रक्रियेला सुरुवात करा. मुंबईतील उच्च न्यायालयाच्या अंतर्गत (BHC Bharti Recruitment 2024) नागपूर शहरातील भरती प्रक्रिया सुरू होत आहे. ही भरती प्रक्रिया लिपिक या पदासाठी राबवली जात आहे. आता या भरती प्रक्रियेबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
एकूण रिक्त पदे | BHC Bharti Recruitment 2024
या भरतीसाठी एकूण 56 रिक्त पदे आहेत. ती रिक्त पदे भरण्यासाठी आता भरती निघालेली आहे. नागपूर शहरातील उच्च न्यायालयात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कायद्यामध्ये पदवी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. त्याचप्रमाणे तुमच्याकडे बेसिक टायपिंगचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. टायपिंगच्या वेगाची देखील अट असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
27 मे 2024 अर्ज करण्याचे शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच तुम्ही अर्ज करा.
अर्ज पद्धती
ही भरती प्रक्रिया केवळ ऑनलाइन माध्यमातून होणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन त्या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहेत. आणि सगळी कागदपत्र देखील जोडावी लागणार आहेत. आता या भरतीचा अर्ज करण्यासाठी आम्ही एक लिंक देत आहोत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य…अशी 13 तारखेला पार पडलेली नगरची निवडणूक. भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध शरद पवार गटाकडून निलेश लंके यांच्यात घासून झालेल्या या लढतीचा निकाल आता ईव्हीएममध्ये बंद झालाय. बीडमध्ये मतदान संपल्यानंतर 53.27% इतक्या मतदानाच्या टक्केवारीची नोंद झाली… पैसे वाटपापासून ते चक्क मतदान केंद्रात झालेले अनेक गैरप्रकार यामुळे नगरचं मतदानाच्या दिवशीचं राजकारण गरमागरमीचं राहिलं… पण मतदान कुणाला झालं? निकाल कुणाच्या बाजूने लागेल? याचा जेव्हा मतदारांकडूनच कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अहमदनगरमध्ये तुतारी जोरात वाजणार, असं सगळेच खासगीत बोलू लागलेत. एकूणच प्रचाराच्या काळात काय काय घडलं? नगरमध्ये लंके विरुद्ध विखे यांच्यात शाब्दिक चकमकी कशा झाल्या? आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी घडलेल्या अनेक घटनांनी वारं कुणाच्या बाजूने फिरलं?
अहमदनगरमध्ये मतदाना दिवशीच्या मध्यरात्रीच राडा झाला. विखे पाटील समर्थकांकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. याची चर्चा मतदानाच्या दिवशीही दिवसभर राहिली. पाथर्डी तालुक्यातील घुमटवाड येथे भाजपा उमेदवारांनी आपल्या तालुक्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मतदान केंद्रावर आपल्यालाच उमेदवाराला मतदान कसं होईल, यासाठी निवडणूक आयोगाच्या नियमांना हरताळ फासलं… दिवसाच्या शेवटी 53.27 टक्के इतक्या मतदानाने नगरची निवडणूक पार पडली… लंके आणि विखे यांचं राजकीय भविष्य ईव्हीएममध्ये बंद झालं असून चार तारखेला तो निकाल लागेल. पण प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य अशी लढत झाल्याने नगरमध्ये मतदानासाठी बरीच चुरस पाहायला मिळाली. पण लोकांचा कल, स्थानिक पत्रकार आणि मतदानाच्या दिवशी असणारा वातावरण हे सगळं पाहता निलेश लंकेंची तुतारी नगरमध्ये वाजताना दिसतेय…
निलेश लंके विरुद्ध सुजय विखे अशी लढत फिक्स झाल्यानंतर दोघांच्यात बऱ्याच शाब्दिक चकमकी झाल्या. लंकेंनी इंग्रजी बोलून दाखवावी… असं जाहीर सभेत केलेलं स्टेटमेंट विखेंवरच बूमरँग होताना दिसलं… तर मतदानाच्या दोन-तीन दिवसांआधीच अजितदादांनी नगरच्या जाहीर सभेतून निलेश लंकेंवर केलेली पर्सनल टीका ही सुजय विखे पाटलांना मतदानाच्या दिवशी बॅकफुटला घेऊन गेली… त्यामुळे तिकीट वाटपाच्या वेळेस एकतर्फी वाटणारी निवडणूक मतदानाच्या दिवसापर्यंत तुतारीकडे शिफ्ट झाली, असा एकूण अंदाज आहे…
खरंतर नगर मधील विखे पाटील हे फार मोठे प्रस्थ. विठ्ठलराव विखे पाटलांपासून ते राधाकृष्ण विखे पाटील आणि पुढे हाच सहकाराचा आणि राजकारणाचा वारसा सुजय विखे पाटील पुढे चालवतायत. मूळ काँग्रेसी विचारांच्या असणाऱ्या विखेंनी 2019 च्या आधी कमळ हातात घेतलं आणि भाजपच्या मदतीने मुलाला खासदार केलं. राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांना त्यांनी मोठ्या लीडने आसमान दाखवलं होतं. पण आता नगरच्या राजकारणाचे आणि राष्ट्रवादी पक्षाचेही डायनॅमिक्स बदलले आहेत. विखे पाटील यंदाही आरामात खासदार होतील, असं चित्र असताना निलेश लंकेंमुळे या सगळ्या शक्यतांना खीळ बसली. मागच्या दहा दिवसांतील राजकरणात लंके यांनी इथं मोठी लीड घेतली…
पण सुजय विखेंच्या विरोधात राजकारण जाण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यातलीच एक म्हणजे पक्षांतर्गत विरोधक…
विखे पाटील पिता पुत्रांनी भाजपात प्रवेश केल्यापासूनच जिल्हा भाजपमधील अस्वस्थता वाढली होती. विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे तिकीट कापून नव्या नवख्या सुजय विखे पाटलांना उमेदवारी दिल्याने भाजपचे पदाधिकारी नाराज झाले होते. मात्र पक्षादेश पाळून त्यांनी विखेंना निवडून आणलं. यानंतर मात्र विखे पाटलांचा एकक कलमी कार्यक्रम सुरू झाला, असा आरोप भाजपच्या नेत्यांकडूनच होऊ लागला. 2019 च्या विधानसभेला भाजपकडून उभे असणारे राम शिंदे, स्नेहलता कोल्हे, शिवाजी कर्डिले, मधुकरराव पिचड आणि बाळासाहेब मुरकुटे या दिग्गज आणि प्रस्थापितांना पराभवाचा धक्का बसला. पण या सगळ्याला विखे पाटीलच कारणीभूत असल्याचा आरोप या माजी आमदारांनी केला. राम शिंदे आणि विवेक कोल्हे यांनी तर विखे पाटील जिल्ह्यात भाजप संपवण्याचं काम करतंय अशा अनेक तक्रारी दिल्लीकडे केल्या होत्या. थोडक्यात जिल्ह्यातील सर्वच भाजप नेते सध्या विखे पाटलांच्या विरोधात आहेत. दाखवण्यासाठी जरी ते विखे पाटलांच्या सोबत असले तरी आतल्या गोटातून मदतीचा हात ते निलेश लंकेना दिल्याची शक्यता जास्त आहे. आपली स्वतःची यंत्रणा मजबूत असली तरी वाड्यावस्त्यावर पोहोचलेली या स्थानिक नेत्यांच्या यंत्रणानी कमळासाठी कमी आणि तुतारीसाठी जास्त काम केलं असावं.
विखेंच्या विरोधात जाणारी दुसरी गोष्ट प्रस्थापित विरुद्ध सामान्य हे नरेटिव्ह
नगरची निवडणूक प्रस्थापित विरुद्ध सामान्य अशी आहे, असं नरेटीव सेट करण्यात निलेश लंकेना यश आलंय. पारनेरमध्ये आमदारकीची पहिलीच टर्म असताना कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या कामांमुळे लंके हे नाव राज्यात सर्वदूर पसरलं. नगरच्या ग्रामीण भागात तर निलेश लंके या नावाची वेगळी क्रेझ आहे. लोकांच्यात मिसळून साधेपणाने काम करण्याची त्यांची स्टाईल ही मतदारांना कनेक्ट करत असते. नगरचं राजकारण हे नेहमीच प्रस्थापित घराण्यांचं राहिलं. याच घराण्यातून नगरला खासदार मिळाले. पण पहिल्यांदाच नगरच्या निवडणुकीला सामान्य घरातून आलेले नेतृत्व मिळालं आहे, असा सुरू असणारा शरद पवार गटाचा प्रचार लंकेंना प्लस मध्ये घेऊन जाणारा ठरला…
तिसरी गोष्ट येते ते म्हणजे पवार प्लस थोरात समीकरण
विखे पाटलांचे पारंपारिक विरोधक म्हणून थोरात आणि पवार यांच्याकडे पाहिलं जातं. शरद पवारांनी विखेंना केलेला विरोध तर सगळ्यांना माहिती आहेच. त्यामुळे आता शरद पवारांच्या बाजूने सहानुभूतीची लाट असताना आणि विरोधात विखे असताना शरद पवार या निवडणुकीत आपली सारी ताकद लावतील. प्राजक्त तनपुरे, रोहित पवार यांनी नगरच्या काही भागांवर मिळालेल्या कमांडचाही लंकेंना फायदाच होताना दिसतोय. त्यात महाविकास आघाडीचे नेते नगरमध्ये एकदिलाने प्रचार करत असल्यानं तुतारी या घडीला तरी प्रत्येक घरात पोचलेली आहे. या सगळ्यचं प्रतिबिंब 13 तारखेला तुतारीच्या बाजूने दिसेल, असा अंदाजही आता व्यक्त केला जातोय…
नगरच्या प्रचारात मात्र विकासाच्या मुद्द्यांपेक्षा गुंडाराज जास्त चालण्याची सध्या चर्चा आहे. या सगळ्या प्रकाराला लंके आणि विखे जबाबदार असल्याचं एकमेकांकडे बोट दाखवत असले. तरी स्टॅंडिंग खासदार असल्याने याचा मेजर लॉस विखेंना बसू शकतो… थोडक्यात नगरमध्ये कागदावरची आणि ग्राउंडवरची दोन्ही समीकरण हे तुतारीसाठी पूरक आहेत. बॉटम लाईन काय तर लंकेंनी सामान्य विरुद्ध प्रस्थापित असं सेट केलेलं नरेटीव, भाजपच्या स्थानिक नेत्यांनीच विखे पाटलांच्या विरोधात पुकारलेला एल्गार, पवार-थोरात जोडगोळी आणि तुतारीच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट हे सगळं निलेश लंकेंना दिल्लीपर्यंत घेऊन जाण्यासाठी पुरेसं दिसतंय. त्यामुळे लंके म्हणतात तसं ‘माझा गुलाल फिक्सय’ हा प्रत्येक शब्द न शब्द नगरच्या राजकारणात खरा ठरतो का? याचं उत्तर चार जूनलाच समजणार आहे…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Health Tips) आपल्या आहारात भाज्या, दुग्धजन्य पदार्थ यांसह फळांचादेखील समावेश असायला हवा. त्यात मोसमी फळे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. त्यामुळे कधीही आपल्या आहारात फळांचा समावेश करताना मोसमी फळे जरूर खावीत. बऱ्याच लोकांना नियमित फळे खाण्याची सवय असते. त्यामुळे बरेच लोक एकाच वेळी बरीच फळे आणून फ्रिजमध्ये साठवतात. फ्रिजमध्ये फळे ठेवल्याने ती लवकर खराब होत नाहीत, हे कितीही खरं असलं तरी काही फळे मात्र फ्रिजमध्ये ठेवल्याने खराब होतात.
काही फळे अशी असतात जी फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे आरोग्यदायी नव्हे तर आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. फळांमधली पोषकता कमी होते आणि ही फळे खाण्यालायक राहत नाहीत. (Health Tips) तुम्हालाही फळे फ्रिजमध्ये साठवण्याची सवय असेल तर ही माहिती पूर्ण वाचा. कारण, आम्ही तुम्हाला कोणती फळे फ्रिजमध्ये साठवू नये याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत.
1. आंबा
उन्हाळ्याच्या हंगामात सर्वाधिक खाल्ले जाणारे फळ म्हणजे आंबा. हे फळ सगळ्यांचेच आवडते असल्याने एकदाच मोठ्या प्रमाणात आणले जाते. पण लक्षात घ्या, आंबा कधीही फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक करू नका. (Health Tips) असे केल्याने आंबा पिकण्याची प्रक्रिया मंदावते. शिवाय वरून साल ताजी आणि आंबा आतून किडत जातो. तसेच त्याची चव आणि पोतदेखील बिघडतो. असा आंबा खाल्ल्याने पोटाच्या समस्या होऊ शकतात.
2. पपई
बऱ्याच लोकांना पपई खायला खूप आवडतो. त्यामुळे पपईचे तुकडे करून ते फ्रिजमध्ये साठवले जातात. (Health Tips) तर काही लोक एकाच वेळी जादा पपई आणून फ्रिजमध्ये ठेवतात. पण यामुळे पपईची चव आणि पोत बदलतो. तसेच फ्रिजचे तापमान कमी असल्याने पपईची पिकण्याची प्रक्रिया मंदावते. यामुळे पपई लवकर शिजत नाही आणि पिकलेला पपई खाण्यायोग्य राहत नाही.
3. केळी
बऱ्याच आरोग्यदायी फायद्यांसाठी केळी खाल्ली जातात. पण केळी कधीही फ्रिजमध्ये ठेवू नका. यामुळे एकतर त्याचे साल काळे पडते आणि केळ्याच्या गरावर वाईट परिणाम होतो. विशेषत: लहान मुलांना अशी केळी खायला देऊ नये. आणखी एक सांगायचं म्हणजे, केळी फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे ती लवकर शिजत नाहीत. त्यामुळे केळी कायम खोलीच्या तापमानावर संग्रहित करावी.
4. टरबूज (Health Tips)
उन्हाळ्यात टरबूज हे फळ हमखास खाल्ले जाणारे फळ आहे. अनेक लोकांना टरबूज कापून किंवा असंच फ्रिजमध्ये साठवण्याची सवय असते. पण यामुळे टरबूजातील अँटिऑक्सिडंट्स कमी होतात आणि त्यातील पोषक घटक निघून जातात. ज्यामुळे हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर उरत नाही.
5. संत्री
संत्री हे फळंसुद्धा कधीच फ्रिजमध्ये साठवू नका. यामुळे हे लिंबूवर्गीय फळ आतून कोरडे पडत जाते. ज्यामुळे त्याची चव कमी होते आणि ते खायला खूप कोरडे लागते. शिवाय यातील पोषक घटक देखील कमी होतात. (Health Tips)
6. अननस
जर तुम्ही अननस फ्रिजमध्ये साठवत असाल तर तुम्ही मोठी चूक करताय. कारण, यामुळे अननसाचा पोत खराब होतो आणि चवही बिघडते. त्यामुळे अननस खोलीच्या तापमानावर ठेवा. अननस पूर्ण पिकला असेल तर एखाद्या दिवसासाठी फ्रिजमध्ये ठेवता येईल. पण अधिक काळ फ्रिजमध्ये राहिल्यास तो खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
7. एवोकॅडो
एवोकॅडो हे फळ कधी फ्रीजमध्ये साठवू नका. यामुळे ते कडक होते आणि व्यवस्थित पिकात नाही. असे योग्यरित्या न पिकलेले एवोकॅडो खाल्ल्याने आरोग्यास फायदे नाही पण तोटे नक्कीच होऊ शकतात.
8. लिची
उन्हाळ्यात खाल्ली जाणारी लिची मोठ्या प्रमाणात आणून फ्रिजमध्ये साठवली जाते. (Health Tips) ज्यामुळे ती फ्रेश राहील असा सर्वसामान्य समज आहे. पण लिची जितकी जास्त काळ फ्रिजमध्ये राहील तितकी लवकर खराब होते. वरवर चांगली दिसत असली तरी आतून पूर्ण खराब झालेली असू शकते. त्यामुळे लिची फ्रिजऐवजी पाण्यात साठवा. यामुळे ती बराच काळ खाण्यायोग्य राहील.
Technology : आपल्याकडे उन्हाळयात खूप जास्त प्रमाणात गर्मी असते अगदी सकाळी ९ वाजता सुद्धा उन्हाचे चटके बसायला लागतात. त्यामुळे घर आणि ऑफिस अशा ठिकाणी AC , फॅन , कुलर असल्याशिवाय काही चालताच नाही. मात्र बाहेर फिरताना असह्य झालेली गर्मी सहनच करावी लागते. तुम्हाला आता बाहेर फिरताना गरमी सहन करावी लागणार नाही. कारण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा (Technology) वापर करून Neck Mini AC बनवण्यात आला आहे. जो एखाद्या नेकबॅन्ड प्रमाणेच दिसतो. त्याला कुठेही तुम्ही घेऊन जाऊ शकता. शिवाय त्याची किंमत देखील किफायतशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया…
SFZ Portable Rechargeable Neck AC (Technology)
हे डिवाइस तुम्ही flipkart वरून खरेदी करू शकता आणि विशेष म्हणजे हे डिवाइस तुमच्या गळ्यामध्ये तुम्ही सहज घालू शकता. यामध्ये स्पीड कंट्रोल करता येते वेगवेगळ्या स्पीडचे ऑप्शन्स यामध्ये दिलेले आहेत. हा डिव्हाईस वजनाने खूप हलकं असल्यामुळे तुम्ही जास्त काळ तो परिधान करू शकता. याची किंमत 1424 रुपये इतकी आहे.
PAVITYAKSH Air Conditioner Neck Fan Cooler
हा डिवाइस चालू बंद करण्यासाठी एक वेगळा पॉवर बटन दिलेला आहे. त्याची किंमत 499 रुपये आहे. म्हणजे तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात सोबत बाहेर एसी किंवा फॅन घेऊन चालण्याची काहीही गरज नाही केवळ एक बटन दाबून तुम्ही स्वतःचा पर्सनल एसी म्हणजेच हा नेक AC बँड कुठेही (Technology) घालून फिरू शकता.
INDRAMANSHA Neck AC (Technology)
हा डिवाइस फ्लिपकार्ट वरून जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 599 रुपये मोजावे लागतील. या डिव्हाइसचे डिझाईन बऱ्यापैकी खास आहे. याशिवाय तुम्हाला अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत ज्याद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता यामध्ये कार्ड पर्याय आहे आणि यूपीआय पर्याय देखील आहे कंपनीकडून एक वर्षाची वॉरंटी (Technology) उपकरणासाठी दिली जाते आणि वैशिष्ट्य म्हणजे हा डिव्हाईस विजेच्या शिवाय काम करतो. आणि वेगवेगळे कलर ऑप्शन सुद्धा तुम्हाला यामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
Property Tips| एखादे घर, फ्लॅट किंवा दुकान खरेदी करण्याचे स्वप्न अनेकजण पाहत असतात. खरे तर अशी कोणतीही मालमत्ता खरेदी करणे अत्यंत जोखमीचे काम असते. कारण की, मालमत्ता खरेदी करत असताना कागदपत्रांसह इतर सर्वच बाबींची तपासणी करावी लागते. खरेदी करायला तहसीलदार ऑफिसमध्ये नोंदणी करून मोकळे होऊन चालत नाही. पुढे त्या खरेदीदाराला इतर प्रक्रिया ही पूर्ण करावी लागते. महत्त्वाचे म्हणजे, रजिस्ट्रेशन केल्यानंतर म्यूटेशन करणे आवश्यक असते. हे म्यूटेशन काय असते? ते कसे केले जाते? याबाबत वाचा. (Property Tips)
म्यूटेशन करून घ्या (Mutation of Property)
एखाद्या व्यक्तीने मालमत्ता खरेदी केली आणि मालमत्तेची नोंदणी केली तरी त्या व्यक्तीला मालमत्तेचे मालकी हक्क मिळत नाहीत. त्याकरिता म्यूटेशन करावे लागते. म्यूटेशन न केल्यामुळे मालमत्तेसंदर्भात वाद निर्माण होई शकतो. भारतीय नोंदणी कायद्यानुसार, कोणत्याही मालमत्तेचे खरेदी केल्यानंतर त्यांचे लिखित नोंदणीही करावी लागते. ही नोंदणी उपनिबंधक कार्यालयात केली जाते. परंतु फक्त ही नोंदणी केल्यामुळे मालमत्तेचा मालकी हक्क प्राप्त होत नाही. त्यासाठी म्यूटेशन करावे लागते.
कोणत्याही मालमत्तेची ही नोंदणी झाल्यानंतर या नोंदणीच्या आधारे म्यूटेशन केल्यानंतरच मालमत्तेवर हक्क दाखवता येतो.(Property Tips) हे म्यूटेशन केल्यामुळे मालमत्तेचे पूर्ण हक्क तुमच्याकडे येतात. महत्वाचे म्हणजे नोंदणी नंतर जेव्हा दाखल खारीज होते तेव्हाच मालमत्तेचे हक्क खरेदीदाराकडे येतात. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकारी रेकॉर्डमध्ये तुमचे नाव समाविष्ट करण्यात येते. तसेच जुन्या मालकाचे नाव त्या मालमत्तेवरून काढले जाते. ही प्रक्रिया करणे प्रत्येक खरेदी दारासाठी आवश्यक आहे. अन्यथा पुढे जाऊन जुना मालक पुन्हा मालमत्तेवर हक्क दाखवू शकतो.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शिवसेनेत बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपशी हात मिळवणे केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिंदे आणि भाजप सरकारमध्ये सहभाग नोंदवला. परंतु अजित पवार यांचे महायुतीत सहभागी होणे भाजपच्या पारंपारिक मतदारसंघाला आवडले नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले आहे. “अजित पवार यांच्या महायुती देण्यामुळे भाजपचा मतदार नाराज झाला होता” असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी मराठी आणि मुस्लीम मतांचा मुंबईच्या जागांवर किती प्रभाव होऊ शकतो, याबाबत माहिती दिली. तसेच, यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, “अजित पवार महायुतीत आले तेव्हा आमचा मतदार नाराज झाला होता. परंतु अजित पवारांच्या वर्तनाने महायुतीचा अवमान होणार नाही याची त्यांना खात्री पटली. याचा तुम्हाला बारामतीच्या निकालात प्रत्यय येईल आणि खडकवासला येथील भाजप मतदार कोणाला मतदान करतात यावरुन समजेल”
शरद पवारांवर टीका
त्याचबरोबर, “शरद पवारांनी पक्ष आणि घरं फोडली आहेत. आपला वारसा आपल्या मुलांकडे देण्याची इच्छा असल्यामुळे त्यांचे पक्ष फुटले. शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंकडे वारसा सोपवायचा असल्यामुळे अजित पवारांना व्हिलन करण्यात आले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी पक्षवाढीसाठी काम केलेलं असतानाही त्यांचे पंख छाटून आदित्य ठाकरेंना पुढे आणलं जात होते. आता मराठी मतदार हा शिवसेनेबरोबर आहे ही फक्त अफवा आहे” असे वक्तव्यं देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
दरम्यान, या मुलाखती देवेंद्र फडणवीस यांनी जागा वाटपाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “आम्हाला 30 जागांची अपेक्षा होती, परंतु 28 मिळाल्या. आम्ही ठाणे मिळण्यासाठी आग्रही होतो. पण मुख्यमंत्री म्हणाले की, ही जागा तुमची असली तरी आम्ही ती सातवेळा जिंकली आहे. जर मी आनंद दिघेंचा मतदारसंघ जाऊ दिला तर माझ्या समर्थकांचं खच्चीकरण होईल. आम्ही ठाण्यासाठी आग्रह करु नये अशी त्यांनी विनंती केली”
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sita Devi Temples) हिंदू देवतांमध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे विशेष दैवत आहे. तर प्रभू श्रीराम यांच्यासोबत त्यांची अर्धांगिनी म्हणून माता सीतेचे देखील पूजन केले जाते. देशभरात अनेक श्री राम मंदिरे आहेत. ज्या ठिकाणी श्री राम यांच्या मूर्तीसोबत माता सीता, लक्ष्मण, हनुमंताचे देखील पूजन केले जाते. मात्र याच देशात माता सीतेची अशी काही अद्भुत आणि दुर्मिळ मंदिरे आहेत. जिथे प्रभू श्रीरामांशिवाय केवळ माता सीतेचे पूजन केले जाते. ही मंदिरे अत्यंत पुरातन आणि ऐतिहासिक आहेत. ज्यांच्याविषयी फार कमी लोकांना माहित आहे. उद्या १६ मे रोजी सीता नवमी आहे. यानिमित्त आपण सीता मातेच्या या दुर्मिळ मंदिराविषयी माहिती घेणार आहोत.
वायनाड स्थित देवी सीता मंदिर (Sita Devi Temples)
वायनाड हा भारताच्या केरळ राज्याच्या ईशान्येकडील जिल्हा आहे. जिथे देवी सीतेचे अत्यंत खास असे दुर्मिळ मंदिर आहे. जे हिरवीगार झाडीमुळे झाकलेले दिसते. या मंदिरात न केवळ सीता देवी तर तिची दोन्ही मुले अर्थात लव आणि कुश यांच्याही मूर्ती पहायला मिळतील. या मंदिराच्या सभोवतालचा परिसर अत्यंत शांत आणि निवांत आहे. त्यामुळे भाविक इथे येऊन प्रसन्न होतात. हे मंदिर सीतादेवी लवकुश मंदिर नावाचे प्रसिद्ध आहे. सकाळी ५ ते दुपारी १२:३० आणि संध्याकाळी ५:३० ते सायंकाळी ७:३० असं हे मंदिर भाविकांसाठी खुलं असतं.
नाशिक सीता गुंफा
महाराष्ट्रात नाशिक पंचवटी परिसरातील सीता गुंफा हे अत्यंत प्रसिद्ध मंदिर आहे. (Sita Devi Temples) या ठिकाणी माता सीता भगवान राम यांच्यासह वनवासात राहिली होती. या ठिकाणी तुम्हाला ५ पवित्र वटवृक्ष दिसतात. या ५ वटवृक्षांमुळे या ठिकाणाला पंचवटी असे नाव मिळाले. इथे सीता गुंफेत जाण्यासाठी पायऱ्या पार कराव्या लागतात. या मंदिराची वेळ सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत अशी आहे. नाशिक रेल्वे स्टेशनपासून ही गुहा केवळ ५ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी कायम भाविकांचे येणे जाणे असते.
प्रभू श्री रामांशिवाय केले जाते देवी सीतेचे पूजन
मध्य प्रदेशातील अशोकनगरमध्ये कारिला स्थित मंदिर हे देवी सीता मातेचे विशेष आणि दुर्मिळ मंदिर आहे. कारण, इथे प्रभू श्री रामचंद्राशिवाय जानकी मातेचे पूजन केले जाते. या मंदिरात सीता माता आपल्या दोन्ही मुलांसह पुजली जाते. त्यामुळे या मंदिराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. (Sita Devi Temples) असे मानले जाते की, जेव्हा भगवान रामाने माता सीतेचा त्याग केला त्या काळात माता सीता येथे वास्तव्यास होती. मात्र कालांतराने माता सीता जंगलात वसलेल्या महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात वास्तव्यास गेली आणि या ठिकाणी तिने आपल्या दोन्ही मुलांचे लालन पालन केले.
UPSC Bharti 2024 | नोकरी शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या नवनवीन संधी घेऊन येत असतो. अगदी सरकारी नोकरी त्याचप्रमाणे खाजगी नोकरी या सगळ्या संधी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. जे विद्यार्थी यूपीएससी परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी ही एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे आता संघ लोकसेवा आयोग अंतर्गत (UPSC Bharti 2024) एक भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 83 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 30 मे 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेला अर्ज भरा. आता या भरतीचे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्वाची माहिती |UPSC Bharti 2024
पदाचे नाव – सहाय्यक आयुक्त, चाचणी अभियंता, विपणन अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, यांत्रिकी कारखाना व्यवस्थापक, सहाय्यक अभियंता, सहाय्यक संशोधन, अधिकारी प्रशिक्षण, अधिकारी प्राध्यापक सहयोगी , प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक
रिक्त जागा – 83 जागा
वयोमर्यादा – 50 वर्ष
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2024
अर्ज कसा करावा ? | UPSC Bharti 2024
यूपीएससीच्या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
आम्ही खाली लिंक देत आहोत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.
अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
30 मे 2024 की अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.