Friday, December 19, 2025
Home Blog Page 765

Home Remedies for Stomach Pain | सतत पोट दुखत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, क्षणार्धात मिळेल आराम

Home Remedies for Stomach Pain

Home Remedies for Stomach Pain | अनेकवेळा लोकांना पोट दुखी आणि अपचनाचा त्रास होत असतो. अशावेळी ते डॉक्टरकडे जातात आणि त्यातही खूप वेळ वाया जातो. पण त्यांची पोटदुखी कायम असते. परंतु आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी एक अशी रेसिपी सांगणार आहोत. त्याच्या मदतीने तुम्हाला आराम मिळेल. आज आम्ही चिंचेची एक रेसिपी सांगणार आहोत. चिंच खायला सगळ्यांनाच आवडते. फार कमी लोकांना माहित आहे की, चिंचेच्या मदतीने पोटदुखी, अपचन, गॅस, ऍसिडिटी यांसारख्या समस्या दूर होतात. आता आपण कोणती रेसिपी बनवायची हे पाहणार आहोत.

साहित्य | Home Remedies for Stomach Pain

  • चिंचेची साल पावडर एक टीस्पून
  • मध एक टीस्पून
  • रॉक मीठ चिमूटभर

पोटदुखीच्या समस्या पासून सुटका मिळवण्यासाठी चिंचेची साल पावडर, मध आणि खडे मीठ एकत्र घेऊन एका भांड्यात मिसळा. याच्या सेवनाने तुमची पचनक्रिया देखील सुधारते आणि पोटदुखीपासून आराम मिळतो. याचे सेवन तुम्ही कोमट पाण्यासोबत देखील करू शकता. त्यामुळे छातीत जळजळ कमी होते. त्यात तुम्ही रॉक मिठाऐवजी स्ट्रिंग सुगर कँडी देखील घालू शकता.

अतिसार रोखण्यासाठी चिंचेचा उपयोग

चिंचेचा उपयोग हा केवळ पोटदुखीसाठी नाही, तर डायरीयाची समस्या दूर करण्यासाठी देखील होतो. आता आपण याबद्दलची कृती पाहणार आहोत.

पहिली रेसिपी

सगळ्यात आधी चिंचेची 10 ग्रॅम पाने 2 ग्लास पाण्यात उकळवा.
आता उकळल्यानंतर एक चतुर्थांश शिल्लक असताना गाळून घ्या आणि थोडे थंड झाल्यावर प्या.

दुसरी रेसिपी | Home Remedies for Stomach Pain

2 चमचे चिंचेच्या झाडाची साल पावडर घ्या आणि त्यात चिमूटभर काळी मिरी घाला.
आता या दोन्ही गोष्टी २ चमचे ताकात टाका आणि त्यापासून गोळ्या बनवा. अतिसार झाल्यास, तुम्ही कोमट पाण्यासोबत एक गोळी घेऊ शकता.

Tata Ace EV 1000 : Tata Motors ने लाँच केला Electric Truck; 161 KM रेंज, किंमत किती?

Tata Ace EV 1000 launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षात देशात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढली आहे. पेट्रोल- डिझेलच्या खर्चातून सुटका करून घेण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदीला प्राधान्य देत आहेत. आत्तापर्यंत तुम्ही इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक स्कुटर, इलेक्ट्रिक रिक्षा, इलेक्ट्रिक कार बघितली असेल, मात्र आता प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी Tata Motors ने इलेक्ट्रिक ट्रक लाँच केला आहे. Tata Ace EV 1000 असं या इलेक्ट्रिक ट्रकचे नाव असून सिंगल चार्जवर हा ट्र्क 161 किलोमीटर अंतर कापण्यास सक्षम आहे. तसेच तो 1 टन माल सुद्धा उचलू शकतो.

या नवीन इलेक्ट्रिक ट्रकच्या (Tata Ace EV 1000) लौंचिंग वेळी टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकलचे SCV आणि PU चे उपाध्यक्ष आणि बिझनेस हेड विनय पाठक यांनी म्हंटल कि, गेल्या दोन वर्षांपासून आमचे Ace EV ग्राहक या ट्रकचा पुरेपूर फायदा घेत आहेत, ज्यामुळे त्यांना नफाही मिळत आहे आणि हा ट्रक टिकाऊही आहे. विनय पाठक पुढे म्हणाले की, हा ट्रक क्रांतिकारी जीरो एमीशन लास्ट-मील मोबिलिटी सॉल्यूशनचा ब्रँड ॲम्बेसेडर बनला आहे.

काय फीचर्स मिळतात? Tata Ace EV 1000

Tata Ace EV 1000 इव्होजेन पॉवरट्रेनसह सुसज्ज आहे, ज्याची बॅटरी सात वर्षांची वॉरंटी देते तसेच पाच वर्षांचे मेन्टेनन्स पॅकेजही दिले जात आहे. टाटाच्या या इलेक्ट्रिक ट्रकमध्ये बसवलेली इलेक्ट्रिक मोटर 27 kW किंवा 36.2 bhp ची पॉवर आणि 130 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ट्रकमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा देण्यात आली असून त्यानुसार अवघ्या 105 मिनिटांत तो फुल्ल चार्ज होतो. एकदा का पूर्णपणे चार्जिंग केल्यास हा इलेक्ट्रिक ट्र्क तब्बल 161 किलोमीटर अंतर आरामात पार करू शकतो . पूर्णपणे लोड केल्यानंतर सुद्धा त्याच्या क्षमेतत कोणताही फरक पडत नाही. सध्या तरी या इलेक्ट्रिक ट्रकचा सामना करेल असा दुसरा ट्रक देशात नाही. कंपनीने Tata Ace EV 1000 ची किंमत 9.21 लाख रुपये ठेवली आहे.

मोदींना पवार- ठाकरे का हवेत? सामनातून मोठा उलगडा

narendra modi pawar thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपले पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यापेक्षा त्यांनी NDA मध्ये यावं असं आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलं होते. मोदींच्या या आवाहनानंतर अनेकजण संभ्रमात पडले. एकीकडे पवार ठाकरेंवर मोदी सडकून टीका करत असताना दुसरीकडे आमच्याकडे या अशी साद ते का घालत असावेत असा प्रहन राजकीय विश्लेषकांना सुद्धा पडला. मात्र आता सामना अग्रलेखातून मोदींच्या या आवाहनावर थेट भाष्य करण्यात आलं आहे. मोदी हे लोकसभा निवडणुकीत पराभूत होत आहेत. त्यांना बहुमत मिळणार नाही. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची मदत लागणार आहे असं सामना अग्रलेखातून म्हंटल आहे .

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल-

नरेंद्र मोदी हे नितीश कुमार यांच्याप्रमाणेच आजारी असून भारतीय जनता पक्षाने त्यांना फार दगदग करू देऊ नये. देशासाठी नसले तरी भाजपसाठी मोदी महत्त्वाचे आहेत. दुसरे असे की, काँग्रेस पक्षात मणिशंकर अय्यर, सॅम पित्रोदा वगैरे लोक जे बोलतात त्याचा फायदा भाजपास होतो. आजारपणामुळे मोदी त्याच रांगेत जाऊन बसले. मोदी यांची भाषणे व वक्तव्ये यामुळे भाजपचीच कोंडी होताना दिसत आहे. मोदी यांची प्रकृती बरी नसल्याचे हे लक्षण आहे. मोदी हे नंदुरबार येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आले. तेथे त्यांनी सांगितले की उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी आमच्या बरोबर यावे हे त्यांचे विधान हास्यास्पद आहे. गेल्या काही दिवसांपासून मोदी महाराष्ट्रात ठाण मांडून बसले आहेत. त्यांना महाराष्ट्राची भीती वाटते. महाराष्ट्रात आपल्याविरुद्ध वातावरण आहे हे त्यांनी जाणले आहे. मोदी यांनी प्रत्येक भाषणात ‘ठाकरे पवार’ यांच्यावर जहरी टीका केली. हे दोन्ही नेते व त्यांचे पक्ष नकली आहेत, उद्धव ठाकरे हे तर नकली संतान असल्याची गरळ त्यांनी ओकली. मग हे नकली लोक मोदींना त्यांच्या सोबत 4 जूननंतर का हवे आहेत? हा भाजपच्याच मंडळींना पडलेला प्रश्न आहे.

“एक अकेला सब पर भारी” असे मोदी स्वतःच स्वतःविषयी सांगतात. एकट्याच्या बळावर आपण लोकसभेच्या चारशेपार जागा जिंकू अशा वल्गना मोदी यांनी आधीच केल्या आहेत. एकनाथ शिदि, अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासारखे पोकळ बांबू त्यांनी ‘टेकू’ म्हणून भाजपला लावले. शिंदे, अजित पवार वगैरे लोक हे महाबली असल्याचे त्यांनी जाहीर केले. मग तरीदेखील उद्धव ठाकरे, शरद पवार त्यांना का हवे आहेत? याचे उत्तर एका वाक्यात सांगायचे तर मोदी हे लोकसभा निवडणुकीत पराभूत होत आहेत. त्यांना बहुमत मिळणार नाही. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार यांची मदत त्यांना लागणार. त्यामुळे आतापासून मोदी यांनी लाडीगोडीचे डाव टाकायला सुरुवात केली आहे.

माणूस आधी मनाने हरतो व मग रणांगणात हरतो. मोदी हे मनाने पराभूत झाल्याचे स्पष्ट दिसते. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांपैकी शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस व काँग्रेस यांची आघाडी किमान 35 जागा जिंकत आहे व महाराष्ट्राचा मतदार मोदींना धडा शिकवण्याच्या भूमिकेत आहे. ‘मोदी मॅजिक’, ‘मोदींची जादू’, ‘मोदी है तो मुमकीन है’ वगैरे प्रयोग यावेळी कोसळले आहेत. मोदी यांनी महाराष्ट्रात जे उटपटांग डाव टाकले ते त्यांच्यावरच उलटले आहेत. मोदी-शहा जोडीस भयाने ग्रासले आहे व त्यातूनच त्यांना काही नवे विकार जडले असावेत. मोदी हे ताळतंत्र सोडून बोलत आहेत. मोदी यांचे राजकीय आकलन व अनुभव वेगळाच आहे. त्यामुळे शरद पवार यांनी कांग्रेस व इतर पक्षांच्या विलीनीकरणासंदर्भात नक्की काय सांगितले ते मोदी यांच्या डोक्यात धड गेले नाही. असेही सामनातून म्हंटल आहे.

Weather Update | मतदानाच्या दिवशीच राज्यात वादळीवाऱ्यासह कोसळणार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट

Weather Update

Weather Update | सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता पार पडणार आहे. या चौथा टप्प्यामध्ये राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये आज म्हणजेच 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. यासाठी जोरदार तयारी देखील झालेली आहे. परंतु मतदानाच्या दिवशीच महाराष्ट्रावर पावसाचे सावट निर्माण झालेले आहे. सोमवारी दुपारनंतर अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

या जिल्ह्यात पडणार पाऊस | Weather Update

आता काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तर काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज पुणे, नगर, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच नंदुरबार, जळगाव आणि बीड जिल्ह्यातही पाऊस येणार आहे. काही जिल्ह्यात गारपीटीचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आलेला आहे. हवामान खात्याने पुणे, मावळ, शिरूर, अहमदनगर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट झाली करण्यात आलेला आहे.

मतदान सकाळच्या सत्रात करावे

त्याचप्रमाणे नंदुरबार जळगाव करण्यात आलेला आहे. त्यामुळे आज मतदारांनी सकाळच्या सत्रात मतदान करावे. आणि दुपारपर्यंत मतदान पूर्ण करावे असे आवाहन करण्यात आलेला आहे. कारण आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच काही भागात गारपीट देखील होणार आहे. त्याचप्रमाणे पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाची परिस्थिती अशीच असणार असल्याची माहिती देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे.

Indian Postal Department Bharti 2024 | 10 वी पास उमेदवारांसाठी भारतीय पोस्ट विभागात नोकरीची संधी; येथे करा अर्ज

Indian Postal Department Bharti 2024

 Indian Postal Department Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता एक नवीन भरती चालू झालेली आहे. पोस्ट ऑफिस अंतर्गत मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत स्टाफ कार ड्रायव्हर या पदाच्या जागा भरल्या जाणार आहे. या पदाच्या एकूण 27 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही अर्ज पद्धती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे 14 मे 2019 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अर्ज करा.

महत्त्वाची माहिती |  Indian Postal Department Bharti 2024

  • पदाचे नाव – स्टाफ कार ड्रायव्हर
  • पदसंख्या – 27 जागा
  • वयोमर्यादा –18 ते 27 वर्षे
  • शैक्षणिक पात्रता – दहावी पास
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता -व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, बेंगळुरू-560001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2024

अर्ज कसा करायचा ?

  • या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे.
  • 14 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

FD Rates | ‘या’ बँका FD वर देतायत भरघोस व्याजदर, आजच करा गुंतवणूक

FD Rates

FD Rates | अनेक लोक भविष्यासाठी गुंतवणूक करून ठेवत असतात. परंतु ही गुंतवणूक करताना त्यातून चांगला परतावा मिळावा आणि आपले पैसे सुरक्षित असावे असे सगळ्यांनाच वाटते. यासाठी बाजारात अनेक पर्याय देखील उपलब्ध आहे. अनेक लोक हे एफडीमध्ये गुंतवणूक करतात. कारण मुदत ठेव हा एक चांगला पर्याय आहे. यातून चांगला परतावा देखील मिळतो. अशातच आता या मे महिन्यामध्ये अनेक बँकांनी त्यांच्या एफडीवरील व्याजदर वाढवलेला आहे. त्यामुळे तुम्ही बँकेत एफडी केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. आता आपण या बँक काही बँकांची माहिती पाहणार आहोत. ज्यांच्याकडे एफडीवर (FD Rates) चांगला व्याजदर मिळेल

उत्कर्ष स्मॉल बँक | FD Rates

या बँकेने दोन कोटी रुपयांपर्यंतच्या एफडी करणाऱ्यांसाठी व्याजदरात बदल केलेला आहे. या बँकेकडून एफडीवर आता 4 टक्केपासून ते 8.5% पर्यंत व्याज मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला या बँकेतून चांगला परतावा मिळेल.

आरबीएल बँक

या आरबीएल बँकेने देखील त्यांच्या एफडीवरील व्याज दरात मोठ्या बदल केलेला आहे. हा केलेला बदल दोन कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर लागू आहेत. नवीन बदलानुसार आता 18 ते 24 महिन्यांसाठीच्या एफडीवर आरबीएल बँकेकडून 8 टक्क्यांनी व्याज मिळणार आहे.

कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक

कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेने देखील त्यांच्या एफडीवरील व्याजदरात बदल केलेला आहे. हा व्याजदर देखील दोन कोटी रुपयांपर्यंतच लागू होतो. एफडीवर 3.5% पासून ते 7.55% पर्यंत दिला जाईल. या बँकेकडून 400 दिवसांसाठीचा एफडीवर सर्वाधिक व्याज दिले जाते.

सिटी युनियन बँक

सिटी युनियन बँकेने देखील त्यांच्या व्याजदरात बदल केलेला आहे. या बदललेल्या व्याजदरानुसार दोन कोटी रुपयांपर्यंत एफडी लागू असेल. या बँकेकडून ग्राहकांना 5 ते 7.25 टक्के दराने व्याज दिले जाते. 400 दिवसांच्या एफडीसाठी ही बँक 7.25 टक्के व्याज देते.

Modi Guarantee : राम मंदिर, CAA कायदा.. देशातील जनतेला मोदींच्या 5 मोठ्या गॅरेंटी

narendra modi guarantees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सभांचा धडाका लावला आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोदी नवनवीन आश्वासने आणि ग्वाही देत आहेत. आज पश्चिम बंगाल येथील एका जाहीर प्रचारसभेत मोदींनी जनतेला ५ मोठी आश्वासने दिली आहेत. तसेच यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांचे टीएमसी सरकार आणि इंडिया आघाडीवर निशाणा साधला.

मोदी आपल्या भाषणात म्हणाले, मी भ्रष्टाचाराच्या पीडितांना आणि बंगालच्या जनतेला सांगेन, एकही भ्रष्ट माणूस वाचणार नाही, मी भ्रष्टाचाराने त्रस्त असलेल्या प्रत्येक बंगालीला सांगेन, एकही भ्रष्ट माणूस वाचणार नाही. त्यांच्याकडून वसूल केलेले हे कोट्यवधी रुपये पीडितांना मिळवून देण्याचा मार्ग मी शोधतोय. विकसित भारतासाठी विकसित बंगाल आवश्यक आहे. तुम्हाला टीएमसीच्या गुंडांना घाबरण्याची गरज नाही, मोठ्या संख्येने मतदान करा. जास्तीत जास्त कुटुंबात जा आणि लोकांना भेटा आणि म्हणा की मोदीजी आले होते आणि त्यांनी तुम्हाला जय श्री राम सांगितले आहे.

पीएम मोदींच्या 5 गॅरंटी

जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाणार नाही.”
जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत कोणीही CAA रद्द करू शकणार नाही.”
जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत तुम्हाला रामनवमी साजरी करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.”
जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कोणीही रद्द करू शकत नाही.”
जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि OBC यांचे आरक्षण संपणार नाही.”

Milk ATM Machine | पुण्यात तरुणांनी तयार केली चक्क दुधाची एटीएम मशीन, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल

Milk ATM Machine

Milk ATM Machine | ATM हा शब्द ऐकला की, आपल्या डोळ्यासमोर पैशाची एक मशीन येते. त्यावर तुम्ही तुमचा पिन टाकून पैसे काढू शकता. पण आता असे एक नवीन एटीएम मशीन आले आहे, ज्यातून तुम्हाला दूध मिळणार आहे. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दुधाची एटीएम मशीन दाखवलेली आहे. व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ पुण्यातील कात्रज आंबेगावातील प्रोस्टीन पॅसिफिक सोसायटीमधील आहे. दुधाच्या या एटीएम मशीनची सगळीकडे सध्या चर्चा आहे. या एटीएम (Milk ATM Machine) मशीनमधून दूध खरेदी करण्यासाठी लोक त्या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत.

व्हिडिओ व्हायरल | Milk ATM Machine

एटीएम मशीनची ही कल्पना पुण्यामध्ये साकारलेली आहे. त्यांनी दुधाचे एटीएम मशीन उभारले आहे. अनेक नागरिक या मशीनचा लाभ घेऊन दूध खरेदी करतात. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रॉयल तीन असे या दिवसाचे एटीएम मशीनचे नाव आहे. तीन मित्रांनी एक नवीन संकल्पना काढून हा नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे. ज्या व्यवसायाला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे.

https://www.instagram.com/reel/C6p2kZxtJbq/?utm_source=ig_embed&ig_rid=a18d63f1-4995-4475-a215-ba9f0c333d6e

सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान वायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिली आहे की, “पुण्यात चक्क दुधाची एटीएम पहिल्यांदाच पुणे कात्रज” या व्हिडिओवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने कमेंट करत दिली आहे की, “कल्पना चांगली असली तरी त्यामागे दुष्परिणाम देखील असतात. शिवाय मशीनची पाईप स्वच्छ आहे का आतून हे बघायला पाहिजे.”अनेकांना हा उपक्रम खूप आवडला आहे. तर अनेक लोक मात्र दुधाच्या एटीएम मशीनमधील हायजिनबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत.

पुण्यात गुलाल फिक्सय… धंगेकरांच्या विजयाचं गणित फिट्ट बसतंय??

dhangekar vs muralidhar mohol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । धंगेकर इज बॅक. पुण्यात पुन्हा एकदा धंगेकर पॅटर्नच चालणार. भाजपनं मोठ्या कष्टानं बांधलेल्या पुण्याच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडणार… अशी चर्चा सध्या होतेय राज्याची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात. चौथ्या टप्प्यात होत असणाऱ्या पुणे लोकसभेची निवडणूक (Pune Lok sabha Election 2024) ही पहिल्यांदाच तिरंगी होतेय. भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर वंचितकडून वसंत मोरे. पण मुख्य लढत असणारय ती धंगेकर विरुद्ध मोहोळ अशी. पुण्याच्या निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना भाजपचं केडर पुणे पिंजून काढत असलं तरीदेखील वारं हे धंगेकरांच्या बाजूने दिसतंय. मोहोळांची ताकद मोडीत काढत धंगेकर आमदारा पाठोपाठ आता थेट दिल्लीत जातील, असं आम्ही का म्हणतोय? मोहोळांचा कनेक्ट, फेस व्हॅल्यू आणि भाजपनं लावलेली ताकद हे सगळं प्लस मध्ये असताना पुण्याचा गुलाल धंगेकरांनाच लागण्याचे चान्सेस का वाढलेत? हेच सविस्तर पाहूया …..

पुणे तसं भाजपचा बालेकिल्ला. सुरेश कलमाडीनंतर भाजपने विधानसभा, लोकसभा आणि मग जिल्हा परिषद असं करत पुण्यात भाजपचा दबदबा निर्माण केला. पण रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) कसबा पोट निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचा अभेद्य बालेकिल्ला फोडलाच. यानंतर आता लोकसभेला गिरीश बापटांनंतर नवा चेहरा देण्यासाठी भाजपनं मुरलीधर मोहोळ यांना रिंगणात उतरवलय. पुण्यातील आपला स्ट्रॉंग केडर, आमदारांची फळी, महायुतीची ताकद या सगळ्यांमुळे यंदा ‘मोहोळ फिक्स’ असं वातावरण असताना धंगेकरांच्या एन्ट्रीने मात्र या स्वप्नांचा चुराडा झालाय. कारण विधानसभेला धंगेकरांनी जे काही करून दाखवलं अगदी सेम टू सेम लोकसभेलाही तोच शो धंगेकर रिपीट करतील अशी चिन्ह आहेत. कारण मागच्या काही दिवसात पुण्यावरील होल्ड धंगेकरांनी चांगला स्ट्रॉंग केलाय.

पुण्यातील वारं खरं फिरलं ते राहुल गांधी यांच्या सभेनंतर… खास धंगेकरांसाठी घेतलेल्या या सभेत गांधींनी भाजप सरकारच्या अनेक फसव्या दाव्यांची पोलखोल केली एवढंच नाही तर वंचित, दलित आणि अल्पसंख्यांकांच्या राजकारणाची लाईन मोठी केली. याचा मोठा इम्पॅक्ट पुण्यावरती पडू शकतो. पुणे लोकसभा मतदारसंघ शहरी असला तरी इथे अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय समाजाची संख्या मोठी आहे. यासोबतच दलित आणि मुस्लिम समाज या सगळ्यांची मतं एकगठ्ठा धंगेकरांच्याच पाठीशी राहतील. असं चित्र सध्या पुण्यात दिसतंय. वसंत मोरे मैदानात असले तरी वंचितचा इफेक्ट यंदा अंधुकसा असल्याचं दिसतंय. याचा अडवांटेज अर्थातच काँग्रेसला होऊ शकतो… मुस्लिम मतं, दलित मतं, भाजप विरोधी मत, काँग्रेस समर्थक मत, पवार आणि ठाकरे यांच्या सहानुभूतीचे मतं हे सगळं जोडून पाहिलं तर धंगेकर पुण्याचं मैदान आरामशीर मारताना दिसतायत…

दुसरी गोष्ट काँग्रेसच्या मागच्या दोन निवडणुका पाहिल्या तर निवडणुकीत उतरलेला उमेदवाराला म्हणावी इतकी फेस व्हॅल्यू नव्हती. 2014 च्या निवडणुकीत बाहेरून आलेल्या विश्वजीत कदमांनी तर 2019 ला मोहन जोशी गिरीश बापटांच्या विरोधात होते. काँग्रेसकडे या दोन्ही वेळेस खासदारकीसाठी स्ट्रॉंग कॅंडिडेट नसल्याने लोकसभेला नेहमीच पाणीपत होत होतं. पण 2024 ला परिस्थिती वेगळी आहे. कसब्यात धंगेकरांनी भाजपचा बालेकिल्ला फोडल्यापासून त्यांचं नाव पुण्यातच नाही तर राज्याच्या राजकारणात चांगलंच गाजतय. या आधीच्या निवडणुकीत काँग्रेसला पक्षाचा उमेदवार आणि चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक घराचे उंबरे झिजवावे लागायचे. पण धंगेकरांच्या उमेदवारीने हा प्रश्नच मिटलाय. मुरलीधर मोहोळ लोकप्रतिनिधी म्हणून उत्तम असले… महापौर पदाच्या काळात त्यांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी… शांत, संयमी आणि मिळून मिसळून जाणारा खासदार या सगळ्या त्यांच्या जमेच्या बाजू असल्या तरी एक बाजू त्यांची पडती आहे. ती म्हणजे भाजपच्या कमळ चिन्हावर लढवावी लागणारी निवडणूक. वाढलेली महागाई, गगनाला भिडलेले इंधनचे दर, बेरोजगारी या आणि अशा अनेक गोष्टींनी लोकांच्या मनात भाजपच्या विरोधात राग आहे. विशेषतः शहरी मतदार हा कुणाच्या प्रभावाखाली न येता आपल्याला पटेल त्यालाच मत देत असतो. याचा फटका मोहोळांना बसू शकतो. “पुण्याला जनतेचा मोहोळ हवा, मोदींचा नको” अशी मोहोळांच्या उमेदवारीवर धंगेकरांनी कमेंट करून कमळ चिन्ह काही प्रमाणात का होईना मोहोळ यांना लॉस मध्ये घेऊन जाणार, याचे चान्सेस आहेत…

विधानसभा निहाय पक्षीय बलबलाचा विचार करता महायुतीचं पारड जड वाटत असलं तरी पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार अवघ्या काही मतांच्या फरकाने पडले आहेत. वंचितच्या उमेदवारीने क्रॉस वोटिंग झाल्याने भाजपाला फायदा झाला होता. पण या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा बेस मजबूत आहे. त्यात धंगेकरांच्या उमेदवारीने त्याला आणखीन बळ मिळालंय… त्यामूळे कसब्याचा त्यांचा हक्काचा गड सोडला तर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, पर्वती आणि इतर विधानसभांमधूनही धंगेकरांना चांगलं लीड मिळू शकतं…

पुण्याची निवडणूक तशी फ्रेंडली सुरू आहे. उमेदवार एकत्र येतायत, गप्पा मारतायत, चर्चा करतायत. त्यात मुख्य तीन उमेदवारांमध्ये मैत्रीचे घट्ट धागे आहेत. त्यामुळे पुण्यातील लढत तशी समान सुटीत निघणारी आहे. पण मोदींच्या विरोधात वातावरण असल्यानं याचा फायदा धंगेकर सध्या उचलताना दिसतायत…महाविकास आघाडीने लावलेली ताकद, शरद पवारांनी जातीने लक्ष घालणं, राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीच्या सहानुभूतीची लाट, भाजपच्या विरोधातील वातावरण हे सगळं गणित 13 तारखेच्या मतदानाच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरणार आहे …ही सगळी लढत काट्याला काटा अशी घासून होणार असली तरी निकालाचं पारड हे थोडंफार काँग्रेसच्या बाजूने झुकलंय, असं बोललं तर नक्कीच अतिशयोक्ती राहणार नाही…सध्याचं पुण्यातील वातावरण पाहता धंगेकर आमदारकी पाठोपाठ आता खासदारही होतील का? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Flying Taxi : बाब्बो!! हवेत उडणारी टॅक्सी; आनंद महिंद्रानी शेअर केला फोटो

Flying Taxi anand mahindra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या या तंत्रज्ञानाच्या जगात आपल्याला अनेक नवनवीन आणि अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरताना दिसत आहेत. खासकरून ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये नवी क्रांती मागील काही वर्षात झाली आहे. बाजारात सध्या इलेक्ट्रिक गाड्या, cng गाड्या तसेच इथोनॉल वर चालणारी कार दाखल झाली आहे. आता तर तुम्ही भारतात हवेत उडणारी टॅक्सी (Flying Taxi) सुद्धा पाहू शकता… होय ऐकायला विचित्र वाटत असलं तर सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या जगात हे शक्य आहे. देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सोशल मीडियावर या हवेत उडणाऱ्या टॅक्सीची झलक शेअर केली आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत या एअर टॅक्सीचा फोटो शेअर केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटल की IIT मद्रास भारतातील पहिली इलेक्ट्रिक टॅक्सी बनवण्यासाठी एक ePlane कंपनी तयार करत आहे. ही इलेक्ट्रिक फ्लाइंग कार (Flying Taxi) पुढील वर्षापर्यंत उड्डाण करू शकते. यासह, त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये IIT मद्रासचे वर्णन जगातील एक रोमांचक आणि सक्रिय इनक्यूबेटर म्हणून केले आहे. आनंद महिंद्रा यांनी इन्क्युबेटर्सच्या वाढत्या संख्येबद्दल देशाचे आभार मानले आणि आता देश नवीन शोध लावण्यात मागे नसल्याचे सांगितले. आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये IIT मद्रासने बनवलेल्या इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सीची वैशिष्ट्ये देखील शेअर केली आहेत.

200 किलोमीटर रेंज – Flying Taxi

हि हवेत उडणारी टॅक्सी येत्या वर्षभरात देशातील प्रवाशांच्या सेवेत येईल असा विश्वास आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केला. आयआयटी मद्रासच्या सहकार्याने इप्लेन कंपनी ही एअर टॅक्सी विकसित करत आहे. इप्लेन ही चेन्नई मधील एक स्टार्टअप कंपनी आहे. या कंपनीला गेल्या वर्षी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून इलेक्ट्रिक विमाने तयार करण्यासाठी मंजुरी मिळाली होती. विमानाने आपल्या एअर टॅक्सीला E200 असे नाव दिले आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ते 200 किलोमीटरचे अंतर कापू शकते असा कंपनीचा दावा आहे. हि एअर टॅक्सी बाजारात लाँच झाल्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न काही काळ मिटू शकतो. तो टॅक्सी पूर्णपणे इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये तयार करण्यात आली आहे. या फ्लाइंग टॅक्सीच्या किमतीबाबत कंपनीने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.