Friday, December 19, 2025
Home Blog Page 764

Real Estate : तब्बल 13 वर्षांनी लागला निकाल, मिळणार फ्लॅटचा ताबा ; MahaRERA चा हस्तक्षेप

Maharera

Real Estate : फ्लॅट खरेदी करताना अनेकदा फसवणूक झाल्याचे किस्से आपण ऐकलेच असतील. याशिवाय पैसे घेऊनही फ्लॅटचा ताबा बिल्डरने न दिल्याच्या तक्रारींच्या संख्येतही अलीकडच्या काळात मोठी वाढ झाली आहे. याच संदर्भांतील आणखी एक केस समोर आली आहे. या केसमध्ये तब्ब्ल 13 वर्षानंतर गृहखरेदीदाराला दिलासा मिळला आहे. न्यायमूर्ती महेश पाठक (सदस्य – I) यांचा समावेश असलेल्याया केसमध्ये महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (प्राधिकरण) खंडपीठाने (Real Estate) अनेक वर्षांच्या विलंबानंतर बिल्डरला फ्लॅटचा ताबा गृहखरेदीदाराला देण्याचे निर्देश दिले आहेत. नक्की काय आहे प्रकरण चला जाणून घेऊया…

काय आहे प्रकरण ?

2010 मध्ये, गृहखरेदीदाराने (तक्रारदार) बिल्डरकडून (प्रतिसाददार) रु. 4,25,55,000 मध्ये एक फ्लॅट, दोन पार्किंगची जागा आणि विशेष सुविधा खरेदी केल्या. घर खरेदीदाराकडून रु.81,20,000 मोबदला मिळाल्यानंतर बिल्डरने 20 डिसेंबर 2010 रोजी एक वाटप पत्र जारी केले. तथापि, आश्वासने देऊनही, ताबा देण्यात आला नाही, ज्यामुळे पेमेंट शेड्यूल आणि बिल्डरकडून रद्द करण्याच्या नोटिसांवर वाद निर्माण झाला. 16 ऑगस्ट 2018 रोजी, गृहखरेदीदाराने RERA (Real Estate) अंतर्गत ताबा आणि विलंबित ताब्यासाठी व्याजासह सवलत मिळविण्यासाठी महारेराकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर, 8 मे 2019 रोजी, दोन्ही पक्षांनी 31 मार्च 2020 पर्यंत ताबा आणि विलंबित ताब्यासाठी व्याज निर्दिष्ट करणाऱ्या संमती अटींमध्ये प्रवेश केला. RERA तक्रार मागे घेण्यासही अटींनी परवानगी दिली आहे. म्हणून, गृहखरेदीदाराने महारेरासमोर पैसे काढण्याचा अर्ज दाखल केला आणि त्यानंतर, महारेराने 5 जुलै 2019 च्या आदेशाद्वारे तक्रार मागे घेतली.

पुढे, गृहखरेदीदाराने 8 मे 2019 रोजी संमती अटींची अंमलबजावणी करण्यासाठी महारेरासमोर एक एक्झिक्यूशन अर्ज दाखल केला. तथापि, 26 डिसेंबर 2022 रोजीच्या आदेशाद्वारे महारेराने ते राखीव ठेवण्यायोग्य नाही असे धरून ते रद्द केले. त्यानंतर गृहखरेदीदाराने 26 डिसेंबर 2022 च्या महारेरा आदेशाला आव्हान देणारी रिट (Real Estate) याचिका मुंबई उच्च न्यायालयासमोर दाखल केली, जी उच्च न्यायालयाने 29 जानेवारी 2024 च्या आदेशाद्वारे निकाली काढली. पुढे, जानेवारी 2023 मध्ये, बांधकाम व्यावसायिकांनी संमतीच्या अटींचे उल्लंघन केल्याबद्दल गृहखरेदीदाराकडून पैशांची मागणी केली. स्मरणपत्रे असूनही, बिल्डर्सनी त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या नाहीत आणि कर्ज चुकवले, ज्यामुळे त्यांच्या विरुद्ध अनेक NCLT कार्यवाही झाली. बिल्डरच्या विरोधात NCLT द्वारे दिवाळखोरीची कार्यवाही सुरू केली जाऊ शकते या भीतीने गृहखरेदीदाराने, महारेरासमोर फ्लॅटचा ताबा, विक्री कराराची अंमलबजावणी, बिल्डर्सकडून RERA उल्लंघन केल्याबद्दल दंड आणि तृतीय-पक्षाचे अधिकार रोखण्यासाठी अंतरिम सवलत मिळावी यासाठी खटला (Real Estate) दाखल केला.

प्राधिकरणाने नोंदवलेली निरीक्षणे (Real Estate)

प्राधिकरणाने निरीक्षण केले की वाटप पत्रानंतर दोन्ही पक्षांनी परस्पर स्वाक्षरी केलेल्या संमतीच्या अटी ज्यामध्ये बिल्डरने गृहखरेदीदाराला प्रकल्पाच्या विलंबाची भरपाई म्हणून रु. 68,88,000/- क्रेडिट ऑफर केले जे गृहखरेदीदाराच्या देय रकमेमध्ये समायोजित केले जाणार होते. शिवाय, प्राधिकरणाने निरीक्षण केले की, बिल्डरने संमतीच्या अटींवर स्वाक्षरी करून, केवळ घरखरेदीदाराला नुकसानभरपाई देण्यासच नव्हे तर रु.च्या दराने अतिरिक्त भरपाई देण्यासही सहमती दर्शवली. 2,91,707/- प्रति महिना. विनिर्दिष्ट वेळेवर ताबा देण्यात आला (Real Estate) नसल्यामुळे, कोविड-19 महामारीचा कालावधी वगळून, प्रकल्पासाठी ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळण्याच्या तारखेपर्यंत पुढील भरपाई देण्यासह या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी बिल्डर जबाबदार आहे. त्यामुळे, प्राधिकरणाने बिल्डरला फ्लॅटसाठी अधिक मोबदल्याची मागणी न करता, विक्रीसाठी नोंदणीकृत कराराची अंमलबजावणी केल्यानंतर सदनिकेचा ताबा गृहखरेदीदारास देण्याचे निर्देश दिले.

केस टायटल – उपासना बजाज विरुद्ध लोखंडवाला कटारिया कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर

उद्धरण- तक्रार क्रमांक CC006000000429328

तक्रारदाराचे वकील – ॲड. मिनिल शहा i/b Ld. ॲड. निलेश गाला

प्रतिवादींचे वकील – ॲड. विभव कृष्ण (Real Estate)

Lowest Price Scooty: 1 लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळतात या 5 स्कूटर; जाणून घ्या दमदार फीचर्स

lowest Price Scooty

Lowest Price Scooty| भारतातील विविध भागांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळेच लोक जास्त प्रमाणात फोरविलर घेण्याऐवजी स्कुटी खरेदी करण्यावर भर देताना दिसत आहेत. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला भारतीय बाजारपेठेतील 1 लाख रुपये किमती पेक्षाही कमी मिळणाऱ्या स्कुटींची माहिती देणार आहोत. जर तुम्हाला स्वस्थ दरात स्कुटी खरेदी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. (Lowest Price Scooty)

1) Honda Activa 6G – Honda Activa 6G मध्ये 109.51 cc एअर-कूल्ड इंजिन आहे. जे 7.79 PS 8000 rpm ची कमाल पॉवर देते. Honda Activa 6G किंमत 76,234 ते 82,734 रुपये दरम्यान आहे. त्यामुळे ही स्कूटी सर्वसामान्य व्यक्तींना खरेदी करताना सहज परवडू शकते.

2) TVS Scooty Pep Plus – TVS ची ही स्कुटी फक्त 68,000 रुपये किमतीपासून सुरू होते. कंपनीने या स्कुटी मध्ये 88 सीसी एअर कूल्ड सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 5.4 बीएचपी पॉवर जनरेट करते. या स्कूटरमध्ये यूएसबी चार्जर सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.(Lowest Price Scooty)

3) Hero Pleasure Plus – या स्कुटीची एक्स-शोरूम किंमत 79,738 रुपये आहे. Pleasure Plus मध्ये 110.9cc, एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक सिंगल सिलेंडर OHC इंजिन देण्यात आले आहे. जे 8bhp आणि 8.7Nm आउटपुट तयार करते. या स्कूटरची लांबी 1769 मिमी, रुंदी 704 मिमी, उंची 1161 मिमी आणि व्हीलबेस 1238 मिमी आहे.

4) Honda Dio – भारतीय बाजारात सर्वात लोकप्रिय असलेल्या Honda Dio ची किंमत 89,227 पासून सुरू होते. या स्कुटीमध्ये 109.51 सीसी फॅन कूल्ड, 4 स्ट्रोक एसआय इंजिन दिले आहे. जे 7.76 पीएस पॉवर आणि 9 एनएम टॉर्क देते. याशिवाय स्कुटीमध्ये स्पोर्टी एक्झॉस्ट, टेल लॅम्प, नवीन स्प्लिट ग्रॅब रेल, वेव्ह डिस्क ब्रेक, अलॉय व्हील, नवीन ग्राफिक्स यांसारखे उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत.

5) Hero Zoom 110 – भारतीय बाजारात या स्कुटीची किंमत 71,484 रुपयांपासून सुरू होते आणि 79,967 रुपयांपर्यंत जाते. (Lowest Price Scooty) सध्या Hero Zoom 110 तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ज्यात Hero Zoom 110 LX, Hero Zoom 110 VX, Hero Zoom 110 ZX यांचा समावेश आहे. या स्कुटीमध्ये 110cc इंजिन दिले आहे. जे 8 bhp आणि 8.7 Nm पीक टॉर्क देते.

Government Schemes | सरकारच्या ‘या’ योजनांनी शेतकऱ्यांना होईल लाखोंचा फायदा, असा घ्या लाभ

Government Schemes

Government schemes | आपला भारत देश हा एक कृषीप्रधान देश आहे. आपल्या भारतामध्ये जवळपास 70 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. म्हणजेच आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही शेती या व्यवसायावर जास्त अवलंबून आहे. त्यामुळे आपले सरकार देखील शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. शेतकऱ्यांना शेती करताना फायदा होत असतो. त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्ती यांसारख्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. सरकार देखील त्यांच्या मदतीला धावून येत असते. परंतु अशा काही योजना आहेत. त्याची माहिती शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे त्यांचा फायदा होत नाही. आज आपण त्याच योजनांची (Government schemes) माहिती जाणून घेणार आहोत.

प्रधानमंत्री किसान सिंचन योजना | Government schemes

शेतकऱ्यांना पाण्याशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने ही प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेताला पाणीपुरवठा केला जातो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी आकर्षक पद्धतीने प्रति थेंब जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.

पारंपारिक कृषी विकास योजना

केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50 हजार रुपये आर्थिक सहाय्य देत असून सेंद्रिय उत्पादनांमध्ये लेबलिंग सेंद्रिय प्रक्रिया, पॅकेजिंग, वाहतूक यासाठी तीन वर्षांनी मदत देखील देण्यात येते.

पंतप्रधान पिक विमा योजना

शेतकऱ्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले. तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सरकारने ही पीक विमा योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आहे.

किसान क्रेडिट कार्ड

ही योजना केंद्र सरकारने 1998 मध्ये शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत भारत सरकार शेतकऱ्यांना कृषी कर्जासाठी वार्षिक 4 टक्के सवलतीच्या दराने अनुदानाच्या स्वरूपात मदत करते. आतापर्यंत जवळपास 2.5 कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजना

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होतात. देशातील कोणत्याही शेतकऱ्याला या योजनेसाठी अर्ज करता येतो. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. 4 महिन्यांच्या अंतराने 2 हजाराचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो.

ही आहे LIC ची जबरदस्त योजना!! दरमहा मिळते हवी तेवढी पेन्शन, एकदाच करावी लागते गुंतवणूक

Jeevan Akshay Policy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| LIC आपल्या गुंतवणूकदारांसाठी सतत विविध योजना ऑफर करत असते. यातील सर्वात लोकप्रिय योजना आहे ती म्हणजे LIC ची जीवन अक्षय पॉलिसी योजना. (Jeevan Akshay Policy) या योजनेअंतर्गत दरमहा 20 हजार रुपये पेन्शन मिळते. त्यामुळे उतरत्या वयात व्यक्तीला बाहेर जाऊन काम करण्याची गरज पडत नाही. आजवर या योजनेचा अनेक लोकांनी लाभ घेतला आहे. त्यामुळेच ही योजना नेमकी काय आहे? तिचे फायदे काय? याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

जीवन अक्षय पॉलिसी (Jeevan Akshay Policy)

सध्याच्या घडीला तुम्ही जर एलआयसीची अशी योजना शोधत असाल जात कमी गुंतवणूक करून अधिक परतावा मिळेल, तर ही बातमी सविस्तर वाचा. कारण की, आज आपण एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसी योजनेविषयी माहित करून घेणार आहोत. एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित बनवू शकता. तसेच या पॉलिसीमुळे तुम्हाला आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळेल. ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीवर निर्भर राहावे लागणार नाही.

लक्षात घ्या की एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये 30 ते 85 वर्षे वयोगटातील लोक गुंतवणूक करू शकतात. LIC च्या या पॉलिसीमध्ये तुम्ही जर 40,72,000 रुपयांची एकर कमी गुंतवणूक केली तर तुम्हाला दरमहा सुमारे 20 हजार रुपये मासिक पेन्शनचा लाभ मिळू शकतो. खास म्हणजे, ही योजना एकल आणि संयुक्त विमा पॉलिसींसाठी 10 वर्षांसाठी उपलब्ध आहे. या योजनेत एकदा गुंतवणूक केल्यानंतर पेन्शन मिळताना मासिक प्रीमियम भरण्याची गरज पडणार नाही.

या पॉलिसीमध्ये दरमहा पेन्शन मिळविण्यासाठी 10 पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला LIC ची ही पॉलिसी सिंगल किंवा जॉइंट फॉर्ममध्ये खरेदी करण्याची सुविधा ही दिली जाते. पॉलिसी जारी केल्याच्या तीन महिन्यांनंतर तुम्हाला कर्जाची सुविधा दिली जाते. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीद्वारे मासिक, तिमाही आधारावर, सहामाही आधारावर किंवा वार्षिक आधारावर पेन्शन मिळवू शकता. महत्वाचे म्हणजे, जर एका 45 वर्षीय व्यक्तीने ही पॉलिसी विकत घेतली आणि यात 70,00,000 रुपयांचा विमा पर्याय निवडला तर त्याला 71,26,000 रुपये एकरकमी प्रीमियम भरावा लागेल. ज्यामुळे त्या व्यक्तीला दरमहा 36,429 रुपये पेन्शन मिळेल.

CBSE 12 TH Result | ब्रेकिंग!! बारावीचा निकाल जाहीर, इथे करा चेक

CBSE 12 TH Result

CBSE 12 TH Result | CBSE 12 TH Result बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता CBSE 12 TH Result बोर्डाच्या बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे. CBSE 12 TH Result बोर्डमध्ये बारावीचे देशातील जवळपास 87.98% विद्यार्थी पास झालेले आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षीच्या पासिंग पर्सेंटेशन 0.65 टक्क्याने वाढलेले दिसत आहे. यावर्षीच्या निकालामध्ये 91 टक्केहून अधिक मुली पास झालेल्या आहेत. तर मुलांच्या तुलनेत 6.4 टक्के अधिक मुली पास झालेल्या आहेत.

निकाल कुठे पाहता येईल | CBSE 12 TH Result

CBSE 12 TH Result बोर्डाचा बारावीचा निकाल तुम्ही सध्या ऑनलाईन काही वेबसाईटवर पाहू शकता. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल हा काही वेळानंतर डीजी लॉकरमध्ये उपलब्ध होईल. असे देखील सांगितलेले आहे. आता निकाल बघण्याच्या काही वेबसाईट आम्ही तुम्हाला खाली देत आहोत.

https://cbse.nic.in

https://cbse.gov.in

https://cbseresult.nic.in

Gold Price Today : सोन्याचे दर कोसळले; आज एका तोळ्याची किंमत किती?

Gold Price Today 13 may

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव (Gold Price Today) कमी झाला आहे. मॅलिटी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर १० ग्राम २४ कॅरेट 72202सोने रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या दराच्या तुलनेत आज सोन्याच्या किमतीत 0.54% म्हणजेच 393 रुपयांची घट पाहायला मिळाली. त्यामुळे सोने खरेदीदार ग्राहकांमध्ये समाधानाची बाब आहे. तर दुसरीकडे चांदीचे भाव सुद्धा दाणकन आपटले असून एक किलो चांदी सध्या 84549 रुपयांवर व्यवहार करत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

आज सकाळी MCX वर २४ कॅरेट १० ग्राम सोने (Gold Price Today) सकाळी ९ वाजता ७२२८० रुपयांवर व्यवहार करत होते, मात्र सुरुवातीपासून सोन्याचा भाव खाली खाली जाऊ लागला … सध्या ११ वाजून ४७ मिनिटांनी सोने ७२१२१ रुपयांवर व्यवहार करत आहेत. तर गुड रिटर्न वेबसाईट नुसार, १० ग्राम २४ कॅरेट सोन्याची किंमत ७३२५० रूपये आहे तर १० ग्राम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६७१५० रुपये आहे.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)- Gold Price Today

पुणे- 67000 रुपये
मुंबई – 67000 रुपये
नागपूर – 67000 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 73,090 रूपये
मुंबई – 73,090 रूपये
नागपूर – 73,090 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Airtel Recharge | दिवसाचा डेटा संपला तरी घ्या इंटरनेटचा आनंद, ‘हे’ आहेत एअरटेलचे 5 स्वस्त रिचार्ज प्लॅन

Airtel Recharge

Airtel Recharge | भारतामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्या आहे. त्यातील एअरटेल या कंपनीने त्यांच्याशी एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. त्यांचे नेटवर्क असो किंवा रिचार्ज प्लॅन असो ग्राहक नेहमीच त्यांच्याशी जोडले गेलेले असतात. अशातच आता अनेक वेळा लोकांचा रिचार्ज दिवसाचा संपल्यावर एक्सट्राचा डाटा रिचार्ज करतात. आता ग्राहकांची ही गरज लक्षात घेऊन कमी बजेटमध्ये स्वस्त डेटा प्लॅन रिचार्ज आणलेला आहे. आज आम्ही तुम्हाला 5 स्वस्त रिचार्ज यांची माहिती देत आहोत. एअरटेल आपल्या ग्राहकांना 100 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये हा डेटा प्लॅन ऑफर (Airtel Recharge) करते. तुम्ही 19 ते 99 रुपयांपर्यंतचा डेटा प्लॅन रिचार्ज करू शकता.

19 रुपयांचा रिचार्ज प्लॅन | Airtel Recharge

एअरटेलचा 19 रुपयांचा रिचार्ज प्लॅन हा ग्राहकांसाठी आणलेला आहे. हा एक डेटा प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला एक जीबी डेटाचा लाभ मिळतो. तुम्हाला जर तुमचा डेटा संपल्यानंतर इंटरनेट वापरायचे असेल तर तुम्ही हा पॅक करू शकता.

49 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलचा 49 रुपयांचा रिचार्ज प्लॅन एअरटेलचा 49 रुपयांचा रिचार्ज प्लॅन अधिक GB फायद्यांसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्ही 6GB डेटा घेऊ शकता. या डेटा पॅकची वैधता देखील केवळ 1 दिवसासाठी आहे. एअरटेलचा 58 रुपयांचा रिचार्ज प्लान एअरटेलने एक नवीन डेटा प्लान सादर केला आहे.

58 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

अशाप्रकारे तुम्हाला ५८ रुपयांच्या रिचार्जमध्ये एकूण ५ जीबी डेटाचा लाभ मिळेल. एअरटेलच्या 100 रुपयांखालील डेटा प्लान एअरटेलने दोन डेटा प्लॅन सादर केले आहेत. यापैकी एका प्लॅनची ​​किंमत 98 रुपये आणि दुसऱ्याची किंमत 99 रुपये आहे. दोन्ही योजनांमध्ये वेगवेगळे फायदे समाविष्ट आहेत.

98 रुपयांचा रिचार्ज प्लॅन | Airtel Recharge

98 रुपयांच्या डेटा पॅकसह, तुम्हाला तुमच्या आधीच्या प्लॅनपर्यंत 5GB डेटाचा लाभ मिळतो. जर डेटा संपला तर प्लॅनवर 50 पैसे प्रति एमबी दराने शुल्क आकारले जाते. याशिवाय, तुम्हाला ३० दिवसांसाठी Wynk Music Premium चा लाभ देखील मिळतो. 99 रुपयांच्या डेटा पॅकमध्ये तुम्हाला दररोज 20GB डेटाची सुविधा मिळते. हा डेटा पॅक 2 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्ही एकूण 40GB डेटा घेऊ शकता.

T20 World Cup 2024 : सर्वात मोठी भविष्यवाणी!! हा संघ जिंकणार यंदाचा T20 World Cup

T20 World Cup 2024 winner

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या १ जून पासून यंदाची T20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2024) सुरु होणार आहे. जवळपास सर्वच देशाने आपला संघ जाहीर केला असून यावर्षी कोण वर्ल्डकप जिंकणार याबाबत अनेक तर्क -वितर्क लढवले जात आहेत. सर्वच संघ तुल्यबळ वाटतं असून कोण विजेता होईल हे सांगणं तस कठीणच काम आहे. मात्र वेस्ट इंडिजचे माजी महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्सने मोठी भविष्यवाणी करत यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेतील चॅम्पियन संघाचे नाव सांगून टाकलं आहे. व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या मते वेस्ट इंडिजचा संघ टी-२० वर्ल्डकप जिंकू शकतो.

सर व्हिव्ह रिचर्ड्स म्हणाले, “माझं पाकिस्तानवर प्रेम असलं तरी, मला वाटतं की वेस्ट इंडिजकडे इतका चांगला संघ आहे की तो यावेळी विजेतेपद (T20 World Cup 2024) मिळवू शकतो. यंदाच्या वर्ल्डकप मध्ये वेस्ट इंडिज चांगली कामगिरी करण्यात यशस्वी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली . वेस्ट इंडिज संघ प्रतिभावान असून जगातील कोणत्याही संघाला पराभूत करण्याची ताकद त्यांच्यात आहे. या T20 फॉरमॅटमध्ये वेस्ट इंडिजचे सर्वच खेळाडू उत्तम फॉर्म मध्ये आहेत, फक्त त्यांनी आपला सर्वश्रेष्ठ खेळ करून दाखवला पाहिजे असे व्हिव्ह रिचर्ड्स यांनी म्हंटल.

आत्तापर्यंत वेस्ट इंडिजने २ वेळा T20 विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. आक्रमक खेळाडूंचा भरणा असलेला वेस्ट इंडिजचा संघ T20 क्रिकेट मध्ये सर्वानाच जड जातो हा इतिहास आहे. यंदाच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये रोवमन पॉवेल वेस्ट इंडिजचे कर्णधारपद भूषवणार आहे. आंद्रे रसेल, शिमरॉन हेटमायरसारख्या अनुभवी खेळाडूलाही संघात संधी मिळाली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ चांगलाच मजबूत वाटतं आहे.

T20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडिज संघ- रोव्हमन पॉवेल (कर्णधार), अल्झारी जोसेफ, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकेल होसेन, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड

T20 विश्वचषक 2024 गट: T20 World Cup 2024

अ गट- भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका

ब गट- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान

क गट- न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी

D गट- दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ

Foods for Hyaluronic Acid | त्वचा तरुण आणि मुलायम ठेवण्यासाठी, आहारात करा ‘या’ 10 पदार्थांचा समावेश

Foods for Hyaluronic Acid

Foods for Hyaluronic Acid | मानवी शरीरात वाढत्या वयानुसार अनेक हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे, वाढत्या वयाबरोबर शरीरातील हायलुरोनिक ऍसिडची पातळी कमी होऊ लागते, ज्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. Hyaluronic Acid शरीरात आढळणारा एक नैसर्गिक घटक आहे, जो त्वचेला हायड्रेट ठेवतो आणि सुरकुत्या कमी करतो.

चेहऱ्याची रचना सुधारून त्वचा निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जरी बाजारात अनेक hyaluronic ऍसिड पूरक आणि इंजेक्शन्स उपलब्ध आहेत, सर्वोत्तम मार्ग शरीरात नैसर्गिकरित्या निर्मिती आहे. म्हणून, असे काही पदार्थ आहेत जे सेवन केल्यावर, आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या हायलुरोनिक ऍसिड तयार होते आणि आपली त्वचा नैसर्गिकरित्या चमकू लागते.

हिरव्या पालेभाज्या | Foods for Hyaluronic Acid

स्विस चार्ड, पालक आणि काळे मधील पोषक घटक हायलुरोनिक ऍसिड वाढवतात. त्यामुळे त्यांचा आहारात समावेश करा.

स्टॉक

स्टॉक किंवा प्राण्यांच्या हाडांच्या मटनाचा रस्सा कोलेजनमध्ये समृद्ध आहे, जो त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी हायलूरोनिक ऍसिडच्या उत्पादनास प्रोत्साहन देतो.

रूट भाज्या

बीट, गाजर आणि बीटा कॅरोटीन समृद्ध रताळे हे हायलुरोनिक ऍसिडचे उत्पादन वाढवणारे पदार्थ आहेत. याला तुमच्या आहार योजनेचा भाग बनवा.

टोमॅटो

टोमॅटोमध्ये लाइकोपीन मुबलक प्रमाणात असते, जे कोलेजन उत्पादनात मदत करते. याचे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीरातील हायलुरोनिक ऍसिडची पातळी कायम राहते.

सीड्स आणि सुकी फळे

ओमेगा -3 फॅटी ऍसिडस्ने समृद्ध, या बिया आणि कोरडे फळे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. यासाठी सूर्यफुलाच्या बिया आणि अक्रोडाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.

बेल पेपर

बेल मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते, जे कोलेजनचे उत्पादन आणि हायलुरोनिक ऍसिडचे संश्लेषण करण्यास मदत करते.

मासे

मॅकेरल आणि सॅल्मन सारख्या ओमेगा -3 फॅटी ऍसिडमध्ये समृद्ध असलेले मासे त्वचेच्या आरोग्यासाठी आणि हायलुरोनिक ऍसिडच्या निर्मितीसाठी उपयुक्त आहेत.

बेरी

स्ट्रॉबेरी, ब्लू बेरी, रास्पबेरी यांसारख्या बेरी अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असतात आणि त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत करतात.

सोया उत्पादने

जेनिस्टीन हे सोया दूध आणि टोफूमध्ये आढळते, जे हायलुरोनिक ऍसिड तयार करण्यास मदत करते.

व्हिटॅमिन सी सह लिंबूवर्गीय फळे

व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या लिंबूवर्गीय फळांचे सेवन त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत करते. यासह, हायलुरोनिक ऍसिडच्या संश्लेषणासाठी देखील आवश्यक आहे.

संभाजीनगरमध्ये लढत दोन्ही शिवसेनेत, पण फायदा तिसऱ्यालाच?

Chhatrapati Sambhajinagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना विरुद्ध शिवसेना विरुद्ध MIM … महाराष्ट्र लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात होणारी ही छत्रपती संभाजीनगरची सर्वात मोठी वादळी निवडणूक… 1989 पासून बाळासाहेब ठाकरेंनी ‘खान हवा की बाण हवा’ असा प्रचार करत काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यावर भगवा फडकवला तो कायमचा.. सध्याचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे 1999 पासून ते 2019 पर्यंत छत्रपती संभाजीनगरमधून सलग चार टर्म खासदार राहिले… पण 2019 च्या निवडणुकीत वंचित आणि एमआयएम हे समीकरण एकत्र आल्यानं खैरेंना अवघ्या अडीच हजार मतांनी पराभव होत इम्तियाज जलील यांच्या रूपानं एमआयएमचा पहिला खासदार लोकसभेत गेला…पण उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून मशाल विरुद्ध धनुष्यबाण आणि सोबत वंचित, एमआयएम यांच्यातही कडव आव्हान असणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये वारं नेमकं कुणाच्या बाजूने आहे? शिवसेनेचा नेमका कुठला गट लोकसभेच्या मैदानात चार पावलं पुढे आहे? की पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम यांच्याच बाजूने कौल जातोय? हेच पाहुयात

शिवसेनेचा मुंबई बाहेरचा कुठला अभेद्य बालेकिल्ला असेल तर तो छत्रपती संभाजीनगरचा… 1989 साली बाळासाहेबांच्या प्रयत्नांनी इथे भगवा फडकला तो कायमचाच… चंद्रकांत खैरे हे तर 1999 पासून ते 2019 पर्यंत शिवसेनेचे चार टर्मचे खासदार राहिले… इथली पारंपारिक लढत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच राहिली… मात्र 2019 ला इथे एमआयएमने वंचितच्या मदतीने उडी घेतली आणि मतदारसंघाचे डायनॅमिक्स बदलून टाकले… या निवडणुकीत इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे यांच्यासोबत मराठा चेहरा असलेल्या हर्षवर्धन जाधवांनीही लोकसभेच्या मैदानात उडी घेतली… मराठा आरक्षणाचा मुद्दा जाधवांनी प्रतिष्ठेचा बनवून जवळपास सव्वातीन लाख मत मिळवली… या मत विभाजनाचा फटका खैरेंना बसला. आणि अवघ्या अडीच हजार मतांच्या लीडने इम्तियाज जलील खासदार झाले…

पण 2019 नंतर महाराष्ट्राचं राजकारण अनेक पातळ्यांवर बदलत गेलं. शिवसेना फुटली… दोन गट पडले.. मतदारसंघातही जवळपास सर्वच लोकप्रतिनिधींनी शिंदेंच्या बंडाला साथ दिली… त्यामुळे 2024 ला होत असलेल्या या निवडणुकीत ठाकरेंकडून चंद्रकांत खैरे… शिंदे गटाकडून संदिपान भुमरे… एमआयएमकडून इम्तियाज जलील… वंचितकडून अफसर खान… तर अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधव… लोकसभेच्या रिंगणात आहेत. पण निकाल काय लागेल या अंदाजाच्या दृष्टीने अत्यंत गुंतागुंतीच्या बनलेल्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात वारं कोणत्या बाजूने आहे? त्याचा थोडा अंदाज घेऊ…

एमआयएमकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार इम्तियाज जलील निवडणुकीच्या मैदानात आहेत. मात्र यावेळेस वंचितची साथ त्यांना नसणारय. एमआयएम भाजपची बी टीम असल्याचा जो प्रचार केला जातोय त्याचा फटकाही या निवडणुकीत जलील यांना बसण्याची शक्यता दाट आहे. दुसरीकडे खासदारकीच्या काळात केलेल्या अनेक आंदोलनांमुळे, लोकसभेतील भाषणांमुळे आणि विकासाच्या मुद्द्यांमुळे त्यांच्या नावाची क्रेझ मतदारसंघात आहेच. सोबतच हिंदू मुस्लिम सलोखा ही लाईन ते पुढे घेऊन जात असल्याने त्याचा फायदाही त्यांना उद्या मतदानाच्या दिवशी होऊ शकतो… जलील यांच्या प्रचारासाठी असदुद्दीन ओवेसी यांनी आतापर्यंत मतदारसंघात तीन जाहीर सभा घेतल्या आहेत… पण ‘बाबरी मशीद जिंदाबाद’ आणि सोबतच अँटी हिंदू नरेटीव्ह पुढे आणल्यामुळे याचा लॉसही त्यांना होऊ शकतो…

दुसरीकडे चंद्रकांत खैरे हे पहिल्यांदाच मशाल या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरून धनुष्यबाणाच्या विरोधात प्रचार करतायत… ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीच्या लाटेचा… अंबादास दानवे यांच्या नेटवर्कचा… आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा… मोठा सपोर्ट खैरेंच्या पाठीशी आहे. गद्दार की खुद्दार असं नरेटीव ठाकरे गटाकडून सेट केलं जात असल्यानं याचा मोठा फायदा खैरेंना होऊ शकतो. सोबतच मतदारसंघातील तीन शिवसेनेचे आमदार शिंदें सोबत गेले असले तरी कार्यकर्त्यांची फळी ही आजही ठाकरेंशी एकनिष्ठ आहे. थोडक्यात छत्रपती संभाजीनगरच्या मैदानात मशालीला निवडून येण्याचे जास्त चान्सेस वाटतात…

तिसरीकडे भाजप की शिवसेना यांच्यात बरीच खलबत होऊन उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी शेवटाला शिंदे गटाला ही जागा सुटून संदिपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. कागदावरचं गणित पाहिलं तर महायुतीची ताकद ही जिल्ह्यात जास्त दिसते. तब्बल पाच आमदार हे महायुतीच्या बाजूने आहेत. पण भागवत कराडांची निवडणूक लढण्याची इच्छा असतानाही त्यांना तिकीट नाकारल्यानं भाजपचे आमदार भुमरेंचं काम म्हणाव्या इतक्या फोर्सने करत नसल्याचं बोललं जातंय… महायुतीला मत म्हणजे मोदींना मत या टॅगलाईनचा भुमरे यांना जितका फायदा होऊ शकतो. तितकीच मोदी विरोधी मतं यामुळे खैरे किंवा जलील यांच्याकडे शिफ्ट होऊ शकतात.. त्यात प्रचारालाही भुमरेंना अगदी थोडा वेळ मिळाल्याने ते किती मतं पदरात पाडून घेतात, हे बघणं इंटरेस्टिंग राहणार आहे….

राहता राहिला प्रश्न वंचित आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचा… तर यंदाच्या निवडणुकीत वंचितचा म्हणावा असा प्रभाव नाहिये…तर हर्षवर्धन जाधवांचीही हवा नाहीये… एकूणच सगळं गणित नीट पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या मतदारसंघात ठाकरेंच्या लाटेमुळे चंद्रकांत खैरे यांचेच निवडून येण्याचे चान्सेस जास्त दिसतायेत…बाकी छत्रपती संभाजीनगरचा पुढचा खासदार कोण असेल? तुमचं मत कोणाला राहील? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.