Friday, December 19, 2025
Home Blog Page 767

मोदींनी आता महाराष्ट्राचा शाप अनुभवावा; सामनाच्या मुलाखतीत ठाकरेंचा घणाघात

uddhav thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज राज्यात फिरत आहेत. उद्या ते गल्लीतही फिरतील. त्यांनी गल्लीबोळात फिरावं, त्यांनी महाराष्ट्र बघावा. महाराष्ट्राचं प्रेम काय असतं हे त्यांना कळालं. पण महाराष्ट्राचा शाप काय असतो हे त्यांनी अनुभवावं, असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार घणाघात केला आहे. उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राला एक रोखठोक मुलाखत दिली, त्यावेळी त्यांनी देशभरातील विविध राजकीय विषयांवरून मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये प्रचार सभांचा धडाका लावतायत, गल्लीबोळांत फिरतायत. एक-दोन दिवसांत ते घाटकोपर भागातही रोड शो करणार आहेत. त्याच घाटकोपरमध्ये काल अनेक गुजराती सोसायटय़ांमधून शिवसैनिकांना म्हणजे मराठी माणसाला प्रचार करण्यापासून रोखण्यात आलं. हे तुम्ही किती गांभीर्याने घेताय? असा सवाल त्यांनी मोदींना केला. तसेच लोकांच्या मनात आग आहे. मोदींना महाराष्ट्रांनी निवडून दिलं. भरभरून खासदार दिले. तुम्ही फक्त शिवसेनेचा घात नाही केला. तर महाराष्ट्राचा घात केला. त्यामुळे महाराष्ट्राचं प्रेम काय असतं हे त्यांना कळालं. पण महाराष्ट्राचा शाप काय असतो हे त्यांनी अनुभवावं असा इशारा ठाकरेंनी मोदींना दिले. मराठी माणसं या पद्धतीने कधीही कुठल्याही राज्यात दादागिरी करत नाहीत; पण हे कोणाच्या आशीर्वादाने घडतंय? आणि त्यांना म्हणजेच मराठी द्वेष्टय़ांना बळ देण्यासाठी मोदी इकडे रोड शो करणार आहेत का? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी केला.

महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे मोदींनी गुजरातला नेले. महाराष्ट्रात येऊ घालणारे उद्योगही गुजरातला नेले. मी मुख्यमंत्री असेपर्यंत त्यांची उद्योग पळवण्याची बिशाद नव्हती. मात्र आमचं सरकार पाडल्यानंतर त्यांनी गद्दारांना सोबत घेऊन उद्योग फिरवले, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. गुजरातबद्दलदेखील माझ्या मनात काही आकस नाहीये. गुजरातही आमचाच आहे. १९९२-९३ साली शिवसेनेनेच त्यांना वाचवलं. मोदी त्यावेळी कुठे होते?” असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

Benefits of White Onion | हृदयाच्या आरोग्यासाठी पांढरा कांदा आहे गुणकारी, जाणून घ्या फायदे

Benefits of White Onion

Benefits of White Onion | आपण आपल्या घरामध्ये भाजीमध्ये बऱ्याचवेळा लाल कांद्याचा वापर करतो. परंतु पांढऱ्या कांद्याबद्दल खूप कमी लोकांना माहीत असेल. या पांढऱ्या कांद्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. आज आपण या पांढऱ्या कांद्यामुळे (Benefits of White Onion) शरीराला नेमके कोणते फायदे होतात. हे जाणून घेणार आहोत.

हृदय निरोगी राहते | Benefits of White Onion

पांढरे कांद्याच्या सेवनाने हृदयाशी संबंधित आजार दूर होतात. याचे सेवन केल्याने तुम्हाला मुबलक प्रमाणात एंटीऑक्सीडेंट मिळतात. त्यामुळे जळजळ कमी होते आणि उच्च रक्तदाब आणि रक्त गोठण्याची समस्या देखील उद्भवत नाही.

शरीर थंड राहते

पांढऱ्या कांद्यामध्ये अनेक प्रकारचे कुलिंग एजंट असतात. उन्हाळ्याच्या शरीराला थंड ठेवण्यासाठी पांढरा कांदा खूप उपयोगी होतो. त्याचप्रमाणे त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी देखील पांढऱ्या कांद्याचा उपयोग होतो.

पचन चांगले होते

तुमची पचनक्रिया सुधारण्यासाठी पांढरा कांदा तुमची मदत करतो. पांढऱ्या कांद्याचे सेवन केल्याने आतड्यांचे स्वास्थ सुधारते. त्याचप्रमाणे पचनसंस्था देखील मजबूत होते. पांढरा कांदा खाल्ल्याने पोटातील चांगल्या बक्टेरियाची संख्या वाढते. आणि भरपूर प्रमाणात फायबर देखील मिळते.

चांगली झोप लागते

अभ्यासात असा आढळून आले आहे की, पांढरा कांदा खाल्ल्यामुळे ताणतणावापासून आराम मिळतो आणि चांगली झोप लागते. त्यामुळे पांढऱ्या कांद्याचा तुमचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

रोग प्रतिकारशक्ती वाढवते | Benefits of White Onion

तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पांढरा कांदा खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटिबॅक्टरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म आहेत ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

जंक फूडमुळे कमी वयातच अकाली मृत्यूचा धोका! धडकी भरवणारा रिपोर्ट समोर

Junk Food

हॅलो महाराष्ट्र | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलत चाललेली आहे. कामाच्या गडबडीत त्यांना वेळ नसल्याने ते जंक फूड आणि फास्ट फूडला जास्त प्राधान्य देतात. परंतु नुकतेच हार्वर्ड युनिव्हर्सिटीने संशोधन केलेले आहे. या संशोधनात असे आढळून आलेली आहे की, जे लोक जंक फूड जास्त खातात. त्यांच्यासाठी एक धोक्याची घंटा आहे. संशोधनातून असे समोर आलेली आहे की, जे नियमितपणे बाहेरून तयार केलेले प्रक्रिया केलेले अन्न खातात. त्यांना अकाली मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. यात 30 वर्षाहून अधिक काळ 1 लाख 14 हजार लोकांच्या खाण्या पिण्याच्या सवयी यांनी जीवनशैलीवर लक्ष ठेवून हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे फास्ट फूड खाणाऱ्या लोकांसाठी एक धोक्याची घंटा आहे.

अल्ट्रा प्रोसेड फूड म्हणजे काय ?

अल्ट्रा प्रोसेड फुड हे एक असे फूड आहे. ज्यामध्ये साधारणपणे घरात स्वयंपाक घरात वापरलेले पदार्थ वापरला येणार नाही. हे घटक आरोग्याला खूप हानि पोहोचवतात. जसे की संरक्षण रंग आणि कृत्रिम पद्धतीने चरबी निर्माण करणारे जास्त फायबर नसलेले हे अन्न असते. या अल्ट्राप्रोसेड फूड किंवा कॉस्मेटिक फूड असे देखील म्हणतात. यामध्ये अन्नातील नैसर्गिक घटक काढून त्या जागेत कृत्रिम घटक टाकले जातात. त्यामुळे अन्नातील पोषक तत्वे नष्ट होतात. प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये केक, पेस्ट्री, नूडल्स यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो.

संशोधनात काय आढळले ?

हा अभ्यास बीएमजे या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित केलेला आहे. यात अल्ट्रा प्रोसेड तुमच्या सेवनाने संबंधित जोखीमीबद्दल सांगण्यात आलेले आहे. अधिक प्रक्रिया केलेले अन्न जास्त खाल्ल्याने मृत्यूचा धोका वाढतो. जे लोक नियमितपणे अल्ट्रा प्रोसेड मासांचे सेवन करतात. त्यांना अकाली मृत्यू येण्याची शक्यता13 टक्के असते. जे लोक जास्त प्रमाणात गोड आणि कृत्रिम साखर खातात. त्यांना लवकर मृत्यू होण्याचा धोका 9% असतो.

14 वर्षे चाललेल्या या संशोधनादरम्यान संशोधकांनी 48,193 मृत्यू ओळखले जाते. कर्करोगाने 13557 मृत्यू हृदय व रक्तवाहिन्यांची संबंधित रोगामुळे एक 11416 श्वसन रोगांमुळे 3926 मृत्यू आणि न्यूरोडीजेनेरेटिव्ह या रोगामुळे 6343 लोकांचा मृत्यू झालेला आहे.

Mother’s Day : आईला सफर करवा ‘या’ अप्रतिम ठिकणांची ; तिलाही कळू द्या, ‘ती’ किती आहे स्पेशल

mothers day 2024

Mother’s Day : खरंतर आईसाठी कुठला एक खास दिवस नसतो. आई ही अशी असते की जिच्यासाठी सम्पूर्ण वर्षभर सेलिब्रेशन केलं तरी कमीच पडेल. जभरात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी १२ मे रोजी हा दिवस साजरा केला जाणार आहे. हा दिवस कसा साजरा करायचा याचे अजून नियोजन केले नसेल तर हरकत नाही. आम्ही तुम्हाला मदत करू. आम्ही तुम्हाला पुण्यातील काही खास ठिकाणांबद्दल (Mother’s Day) सांगत आहोत जे मदर्स डेच्या दिवशी तुमच्या आईला घेऊन जाण्यासाठी परफेक्ट ठिकाणं ठरतील यात शंका नाही.

पाषाण तलाव (Mother’s Day)

पुण्याजवळील पाषाण तलाव हा एक कृत्रिम तलाव आहे. येथील ताजी हवा असते हवेत शांततेने श्वास घ्या आणि नैसर्गिक सौंदर्याचा मनापासून आनंद घ्या.तसेच तुमच्या आईच्या बालपणीच्या गोष्टी आणि खोड्या ऐकवायला विसरू नका. आपल्या आईचे मन देखील जाणून घ्या. जेणेकरून रात्रीच्या जेवणात तिला काय खायचे आहे ? हे समजेल. इथे हवं तर आईसोबत बोटीतही फिरू शकता, तिला आवडेल.

मुळशी तलाव आणि धरण

हे पुण्यातील सर्वात जुन्या आकर्षणांपैकी एक आहे. या धरणाचा वापर जलविद्युत निर्मितीसाठी होतो. गोंगाटापासून दूर शांत वातावरणात काही निवांत क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. टेकड्या आणि हिरवीगार जंगले यांच्या मधोमध या ठिकाणाचे सौंदर्य अनेक पटींनी वाढते. इथे तुम्ही तुमच्या आईशी खूप बोलू शकता (Mother’s Day) आणि हो, तुमच्या आईवर तुमचे किती प्रेम आहे हे सांगायला विसरू नका.

आगा खान पॅलेस (Mother’s Day)

पुण्यातील येरवडा येथे ही ऐतिहासिक वास्तू आहे. ही इमारत सुलतान मोहम्मद शाह आगा खान दुसरा यांनी बांधली होती. महात्मा गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना येथे कैद करून ठेवले होते. कस्तुरबा गांधी यांचाही याच राजवाड्यात मृत्यू झाला. त्यांची समाधीही येथेच आहे. या इमारतीत एक संग्रहालयही आहे. ही इमारत बाहेरून अतिशय सुंदर दिसते. तुमच्या आईला अशा ऐतिहासिक स्थळांना भेट (Mother’s Day) देण्याची आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्यात रस असेल तर तिला नक्कीच इथे घेऊन या.

Mumbai Local : ‘मुंबई लोकल’चे पहिले पोस्टर रिलीज; प्रथमेशसोबत झळकणार मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा

Mumbai Local

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mumbai Local) अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. मुंबई लोकल या चित्रपटात प्रथमेश आणि ज्ञानदाची जोडी दिसणार असून, या नव्या जोडीविषयी चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर चित्रपटाच्या टीमने सिद्धिविनायक चरणी दर्शन घेऊन या चित्रपटाची घोषणा केली.

मुंबई लोकल’मध्ये झळकणार प्रथमेश- ज्ञानदा (Mumbai Local)

टाइमपास, टकाटक, बालक पालक अशा अनेक चित्रपटांतून अभिनेता प्रथमेश परबनं आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. विनोदी भूमिकांसह त्याच्यातील गंभीर अभिनेत्याचं दर्शन प्रेक्षकांना घडवलं आहे. त्यामुळे प्रथमेश परब हा नव्या पिढीतला लोकप्रिय अभिनेता ठरला आहे. तर ज्ञानदा रामतीर्थकरनं प्रामुख्यानं टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला आहे. ज्ञानदाच्या सख्या रे, जिंदगी नॉट आऊट, शतदा प्रेम करावे, ठिपक्यांची रांगोळी अशा मालिका गाजल्या आहेत. त्याशिवाय धुरळासारखे काही चित्रपटही तिनं केले आहेत.



बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश राठी यांनी “मुंबई लोकल” (Mumbai Local)या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्राची राऊत, सचिन अगरवाल सहनिर्माते असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित करणार आहेत. या चित्रपटात प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे आदी कलाकारही आपल्याला या चित्रपटातून भेटीस येणार आहेत.

चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी करणार असून संकलन स्वप्निल जाधव यांचे आहे. क्रिएटिव्ह प्रोडूसर आणि सह दिग्दर्शक विनोद शिंदे असून कलादिग्दर्शक म्हणून सुमित पाटील पाहणार आहेत. कार्यकारी निर्माता नीलेश गुंडाळे तर रश्मी राठी कपडेपट पाहणार आहेत. संगीतकार म्हणून देव आशिष आणि हर्षवर्धन वावरे काम पाहत आहेत. (Mumbai Local) मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेमध्ये घडणारी एक मनोरंजक कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

New Marathi Movie : आगळ्या वेगळ्या कथानकाच्या ‘लाईफ लाईन’ सिनेमाची घोषणा; अशोक सराफ, हेमांगी कवी मुख्य भूमिकेत झळकणार

New Marathi Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Marathi Movie) मराठी कालविश्वात कायम नवनवीन प्रयोग होत असतात. त्यामुळे गेल्या काही काळात मराठी सिने इंडस्ट्रीने आपला प्रेक्षक वर्ग वाढवल्याचे दिसून आले आहे. अनेक निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार मंडळी देखील उत्तम कलाकृती सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत. आता अशीच एक दर्जेदार कलाकृती आपल्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. क्रिसेंडो एन्टरटेनमेंट निर्मित, ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘लाईफ लाईन’ ह्या आगामी मराठी चित्रपटाची नुकतीच सोशल मीडिया वरून घोषणा करण्यात आली आहे.

‘लाईफ लाईन’ची घोषणा (New Marathi Movie)

आगामी चित्रपट लाईफ लाईनची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. त्यासोबत पहिल्या पोस्टरची देखील झलक पाहता येत आहे. सोबत आकर्षक शीर्षक लक्ष वेधून घेत आहे. नेमका या चित्रपटाचा विषय काय आहे? अशी उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण होते आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या रीतिरिवाजांचा संघर्ष अशी संकल्पना असणाऱ्या ह्या चित्रपटाचे कथानक दर्जेदार पद्धतीने सादर करण्यात आले आहे. ज्याची आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

‘हे’ कलाकार साकारणार मध्यवर्ती भूमिका

लोकप्रिय अभिनेते माधव अभ्यंकर आणि महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त महानायक अशोक सराफ या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सोबतीला हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर अशी तगड्या कलाकारांची फौज आहे. साहिल शिरवैकर दिग्दर्शित ‘लाईफ लाईन’ ह्या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीत राजेश शिरवैकर यांचे आहेत. (New Marathi Movie) अशोक पत्की ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर ह्यांचा आवाज लाभला आहे. तर लालजी जोशी, कविता शिरवैकर, मिलिंद प्रभुदेसाई, संध्या कुलकर्णी, अमी भुता, संचीता शिरवैकर, उदय पंडीत, शिल्पा मुडबिद्री ‘लाईफ लाईन’ चे निर्माते आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘लाईफ लाईन’ चे तरुण दिग्दर्शक साहिल शिरवैकर म्हणतात, ‘सामाजिक भान आणि व्यावसायिक मूल्यं राखून हा चित्रपट आम्ही बनवलेला आहे. विधात्याने रेखाटलेली तळहातावरची ‘आयुष्य रेखा’ आपण वाढवू शकतो का? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही ह्या चित्रपटातून केलेला आहे. (New Marathi Movie) अनोखी कथा, अनोखा संघर्ष, अनोखी मांडणी, अनोखी पात्रनिवड आणि तगड्या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदीही ह्या चित्रपटाची वैशिष्ट्यं म्हणता येतील. बाकी अशोक सराफ सर चित्रपटांच्या निवडीबाबत किती चोखंदळ असतात हे सर्वांना माहीत आहेच. त्यांनी आमचा चित्रपट स्विकारला म्हणजे विषय संपला’.

Viral Video : एका तरुणानं केलं 165 वर्ष जुन्या गुहेत शिरण्याचं धाडस; VIDEO करताना काय मिळालं? ते पहा

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) बऱ्याच लोकांना गूढ, रहस्य, चमत्कार अशा गोष्टींमध्ये फार रस असतो. त्यामुळे असे लोक कुठे फिरायला गेले आणि त्यांच्या नजरेस काही नेहमीपेक्षा वेगळे पडले तर त्यांची कुतूहलता सक्रिय होते. ज्यातून शोध लागतो नव्या गोष्टींचा. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी असे बरेच पराक्रम केले जातात. जे इतरांपेक्षा वेगळे सिद्ध होतील आणि आपल्याला लाईक्स, व्ह्यूज मिळतील. आताही सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. पण हा व्हिडीओ थोडा वेगळा आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, एक तरुण एका गुहेत प्रवेश करतोय. तर दुसरी व्यक्ती व्हिडीओ शूटिंग करत आहे. दरम्यान इक्वल एका टॉर्चच्या सहाय्याने हा तरुण गुहेत जाताना दिसतोय. आता जाताना त्याला काँक्रीट आणि विटांची भिंत दिसताच पुढे तो सांगतो की, ‘ही एक खूप खूप जुनी कोळशाची खाण आहे’. यानंतर हा तरुण गुहेच्या आत जाण्यासाठी झोपतो आणि मग प्रवेश करताना दिसतो. पुढे जाताच त्याला काही वेळानंतर आतमध्ये अत्यंत भव्य गुहेचा शोध लागतो.



हा व्हिडीओ सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर undergroundbirmingham नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘१८६० च्या दशकात एका बोगद्यात जाताना’. व्हिडिओतील व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ही गुहा सुमारे १६५ वर्षे जुनी आहे. (Viral Video)या गुहेचा शोध घेणाऱ्या व्यक्तीचे इंस्टाग्राम नीट पाहिले तर समजेल की, आतापर्यंत या व्यक्तीने अशा बऱ्याच गुहांचा शोध घेतला आहे. शिवाय त्याच्या फॉलोवर्सचा आकडा देखील मोठा आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

आतापर्यंत हा व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स देखील केल्या आहेत. त्यांपैकी एकाने लिहिले आहे की, ‘आम्हाला ही गुहा दाखविल्याबद्दल धन्यवाद! पण तुम्ही यातून बाहेर कसे पडलात?’. (Viral Video) तर आणखी एका नेटकऱ्याने काळजी व्यक्त करत म्हटले आहे की, ‘हे तुम्ही काय करताय.. जर कधी असे अडकलात, तर काय कराल?’.

Kitchen Tips : शेफ कुणाल कपूर यांनी सांगितली भारी ट्रिक ; एका मिनिटात फुटेल नारळ, निघेल खोबरं

kitchen tips coconut

Kitchen Tips : महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मध्ये नारळ अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. चटण्या असो किंवा भाज्यांची ग्रेव्ही किंवा मग मस्त झणझणीत नॉनव्हेजचा बेत, नारळ हा वापरलाच जातो. मात्र नारळ फोडणे म्हणजे वेळखाऊ आणि कटकटीचे काम वाटते. पण प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामध्ये नारळ फोडण्याची एक सोपी ट्रिक दाखवली असून या ट्रिकच्या (Kitchen Tips) मदतीने एका मिनिटात नारळ फोडता येईल. शिवाय नारळाचं खोबरं कसं काढायचं याची सुद्धा ट्रिक कपूर यांनी सांगितली आहे. चला तर मग जाणून घेऊया…

काय आहे नारळ फोडण्याची ट्रिक (Kitchen Tips)

कुणाल कपूर यांनी आपल्या इंस्टाग्राम व्हिडीओ मध्ये सांगितलेल्या ट्रिक नुसार नारळ फोडताना सर्वप्रथ नारळाचे पाणी काढण्यासाठी चाळणी आणि एक बाउल घ्या त्यानंतर नारळाच्या ज्या मुख्य शिरा असतात. त्यावर बत्ता किंवा लाटण्याने हलके ३-४ फटके मारा. त्यानंतर एक जोरदार फटका (Kitchen Tips) मारल्यास लगेच नारळ फुटेल.

नारळाचं खोबरं काढण्यासाठी (Kitchen Tips)

नारळ फोडण्यासोबत नारळाचे खोबरे काढणे सुद्धा तितकेच कठीण (Kitchen Tips) काम आहे. म्हणूनच याबाबदलाची ट्रिक सुद्धा कपूर यांनी सांगितली आहे. नारळ फोडल्यानंतर गॅसवर एक जाळी ठेऊन ३०-३५ सेकंदासाठी नारळ शेकून घ्या. त्यानंतर त्यातील मॉइश्चर सुकू लागेल. त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सुरीच्या साहाय्याने नारळातील पूर्ण खोबरे लगेच निघेल. हे खोबरं सहज कापून तुम्ही चटणी किंवा इतर पदार्थ (Kitchen Tips) बनवू शकता.

Post Office Best Schemes | सुरक्षित पैशासह मिळेल भरघोस नफा, जाणून घ्या पोस्ट ऑफिसच्या ‘या’ खास योजना

Post Office Best Schemes

Post Office Best Schemes | सगळेच लोक आपल्या भविष्यासाठी काही ना काही बचत करत असतात. त्याचप्रमाणे बाजारात देखील पैशांची बचत करण्याच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. परंतु हे पैसे नक्की कुठे गुंतवावेत? आणि पैसे किती सुरक्षित आहेत? त्यातून किती परतावा मिळेल? या सगळ्या गोष्टींची शहानिशा करूनच पैसे गुंतवणे फायदेशीर होते. नाहीतर अनेक लोकांचे आजकाल पैसे बुडत आहेत. परंतु पोस्ट ऑफिस ही एक विश्वासाहार्य योजना आहे. यामध्ये अनेक लोक गुंतवणूक करतात. या योजनेमध्ये देखील जास्त व्याज मिळते. त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये पैसे सुरक्षित असतात. आता आपण पोस्ट ऑफिसच्या काही योजना (Post Office Best Schemes) पाहूया त्यातून चांगला परतावा मिळेल.

किसान विकास पत्र | Post Office Best Schemes

या योजनेमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली, तर तुम्हाला 7.5% दराने व्याज मिळेल. तुम्ही 9 वर्ष आणि 7 महिन्यांसाठी यामध्ये पैसे भरले, तर तुम्हाला यामध्ये गुंतवणुकीच्या काही अटी आहेत. या योजनेमध्ये 1 हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करता येणार नाही.

राष्ट्रीय बचत वेळ ठेव खाते

या योजनेअंतर्गत (Post Office Best Schemes) 1 वर्षासाठी 6.9% दराने दोन वर्षासाठी 7 टक्के दराने 3 वर्षे यासाठी 7.1% दराने आणि 5 वर्षासाठी 7.5% दराने पैसे गुंतवले जाऊ शकते. यामध्ये देखील किमान मर्यादा 1000 आहे, तर कमाल मर्यादा तुम्ही कितीही पैसे घेऊन ठेवू शकता. तुम्ही तरी या योजनेतून 1 वर्षांपूर्वी पैसे काढले, तर तुम्हाला बचत खात्यावर जेवढे व्याज मिळते तेवढेच व्याज मिळेल.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार केलेली आहे. या योजनेमध्ये वार्षिक 8.2% दराने व्याज मिळते. मात्र हे व्याज 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मिळणार आहे. हे खाते एक वर्षासाठी जर बंद केले, तर व्याज दिले जाणार नाही. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराची किमान 60 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

ही योजना 5 वर्षात मॅच्युर होते. यामध्ये तुम्हाला वार्षिक 7.60% दराने व्याज मिळते. या योजनेमध्ये तुम्ही 1000 रुपये पासून सुरुवात करू शकता, तर कमाल रकमेवर मर्यादा नाही.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची भारतीय व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करू शकतो. 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना हे खाते त्यांच्या पालकांकडे उघडावे लागेल. या मध्ये 7.1% दराने व्याज मिळते ही योजना 15 वर्षात म्हैसूर होते तुम्ही या योजनेमध्ये कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेतून तुम्हाला 1 वर्षाच्या कालावधीनंतर कर्ज देखील घेता येते.

Government Jobs after JEE Exam | JEE नंतर अधिकारी पदावर मिळणार सरकारी नोकरी!! जाणून घ्या प्रक्रिया

Government Jobs after JEE Exam

Government Jobs after JEE Exam | तुम्हाला जर आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला जेईई परीक्षा उत्तीर्ण करणे खूप गरजेचे आहे. ही परीक्षा तुमच्यासाठी सरकारी नोकरीचे दार उघडते. परंतु जर तुम्हाला या परीक्षेत चांगले गुण असतील, तर तुम्ही थेट अधिकारी होऊ शकता. आता आपण जेईई परीक्षेमुळे तुम्ही सरकारी नोकरी कशी मिळवू शकता हे पाहणार आहोत.

तुम्ही जर जेईई (Government Jobs after JEE Exam) ही परीक्षा उत्तीर्ण झाले आणि तुम्हाला चांगले मार्क्स असतील आणि तुम्हाला जर आयआयटीमध्ये प्रवेश घेताना असेल, तर तुम्ही भारतीय सैन्यात तांत्रिक प्रवेश योजनेसाठी अर्ज करू शकता. तुमची जेईईमध्ये निवड झाली, तर तुम्हाला अधिकारी पदावर नोकरी मिळू शकते. भारतीय नौदलाने या परीक्षेसाठी त्यांच्या वेबसाईटवर अधिसूचना देखील जारी केली आहे. या भरतीत जर तुमची निवड झाली, तर तुम्हाला चांगला पगार देखील मिळतो.

शैक्षणिक पात्रता | Government Jobs after JEE Exam

या परीक्षेत बसण्यासाठी तुम्हाला 70 टक्के गुणांसह बारावी पास असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जेईई मेन परीक्षेला बसणे आवश्यक आहे. दोन्ही गुणपत्रिकेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवाराची बारावी ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये असावी. या परीक्षेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही.

वयोमर्यादा

तुमचे वय जर 20 वर्षे असेल, तर तुम्ही या भरती मोहिमेत भाग येऊ शकता. कारण या परीक्षेसाठी कमाल वय 19.5 निश्चित करण्यात आलेले आहे. 16.5 ते 19.5 या वयोगटातील उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकता. उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्याची मुलाखत घेतली जाईल. आणि मुलाखतीवर निवड झाल्यानंतर उमेदवारांना भारतीय नौदलात कडून मेल पाठवला जाईल

नवोदयातून मिळणार मोफत शिक्षण

या निवडलेल्या उमेदवारांना अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग, मेकॅनिकल इंजीनियरिंग, किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड इंजीनियरिंगमधील चार वर्षाच्या B. Tech कोर्ससाठी कॅडेट म्हणून समाविष्ट केले जाईल. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ द्वारे दिली जाईल. त्याचप्रमाणे मुलाखत पूर्ण झाल्यानंतर पुस्तके, वाचन, साहित्य, प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च हा भारतीय नवोदयाकडून केला जातो. त्याचप्रमाणे कॅडेट्सला योग्य कपडे आणि जेवणही दिले जाते.