Saturday, December 20, 2025
Home Blog Page 774

Gold Price Today : अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्ती सोने स्वस्त झाले की महागले? इथे करा चेक

Gold Price Today Akshaya Tritiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अक्षय्य तृतीयेचा दिवस .. अक्षय्य तृतीय म्हणजे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त … अक्षय्य तृतीयेनिमित्त सोने खरेदी करणं शुभ मानलं जाते, त्यामुळे आजच्या दिवशी सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी लगबग पाहायला मिळते. तुम्ही सुद्धा आज सोने खरेदी करण्याचा विचार करणार असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आज १० मे २०२४ रोजी सोन्याच्या भावात (Gold Price Today) विक्रमी वाढ झाली आहे. आज MCX वर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा दर 72500 रुपये आहे. कालच्या तुलनेत यामध्ये 1.28% म्हणजेच 914 रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे.

आज सकाळी MCX वर २४ कॅरेट १० ग्राम सोने सकाळी ९ वाजता ७२०८५ रुपयांवर व्यवहार करत होते, मात्र हळूहळू हा आकडा वाढतच गेला. दुपारी १२:३० वाजता सोन्याचा दर ७२३५० रुपयांवर व्यवहार करत होता. सोन्याच्या किमतीत( Gold Price Today) आणखी वाढ होण्याची शक्यता असून यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसू शकते. तर दुसरीकडे चांदीच्या दरात सुद्धा 937 रुपयांची घसघशीत वाढ झाली असून १ किलो चांदीचा भाव 85436 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)- Gold Price Today

पुणे- 67000 रुपये
मुंबई – 67000 रुपये
नागपूर – 67000 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 73,090 रूपये
मुंबई – 73,090 रूपये
नागपूर – 73,090 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Dr. Dabholkar Case Verdict: नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी 2 आरोपींना जन्मठेप; तिघांची निर्दोष मुक्तता

Narendra Dabholkar

Dr. Dabholkar Case Verdict: आज विशेष न्यायालयाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर ( Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपयांची शिक्षा सुनावली आहे. तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना निर्दोष ठरवले आहे. जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांचा समावेश आहे. या दोघांना ही विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावत पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. (Dr. Dabholkar Case Verdict)

गेल्या 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेन्द्र दाभोलकर यांची शिंदे पुलावर हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी दाभोलकर कुटुंबाने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यानंतर या प्रकरणासंबंधित अनेक धागे-दोरे समोर येऊ लागले. पुढे या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली. (Dr. Dabholkar Case Verdict) हा तपास सुरू असताना सचिन अंदुरे, शरद कळस्कर, वीरेंद्र तावडे, अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांना अटक करण्यात आली होती.

शरद कळस्कर यानेच दाभोळकरांवर गोळी झाडल्याचा दावा सीबीआयने केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू होती. 2021 साली न्यायालयात पाचही जणांवरील आरोप निश्चित करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपींवर हत्या, हत्येचा कट रचणे, युएपीए अंतर्गत गुन्हे निश्चित झाले होते. मात्र, या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांच्या विरोधात पुरावे सादर करण्यास पोलिसांना अपयश आले. (Dr. Dabholkar Case Verdict) त्यामुळे आज झालेल्या सुनावणीत या तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आहे.

मराठी सिनेविश्वाचा परदेशात डंका; अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे 100 शोज HOUSEFULL

Swargandharva Sudhir Phadke Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। ‘गीतरामायणा’ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात हा चित्रपट यशस्वीही झाला. केवळ प्रेक्षकच नाही तर श्रीधर फडके, आशा भोसले यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. समीक्षकांनीही ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ला आपली पसंती दर्शवली.

परदेशात १०० शोज हाऊसफुल्ल

एकंदरच काय तर चोहोबाजुंनी चित्रपटात तुफान कौतुकाचा वर्षाव होत आहे. असे असताना आता सातासमुद्रापार परदेशातही ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. अमेरिकेत या चित्रपटाचे १०० शोज ‘हाऊसफुल’च्या दिशेने वाटचाल करत आहेत. तर चित्रपटाला अनेकांनी ५ स्टार्स रेटिंगसुद्धा दिले आहेत. त्यामुळे हा चित्रपट ग्लोबली ‘सुपरहिट’चे बिरुद मिरवत आहे. इतकेच नाही तर हा चित्रपट दुबई, लंडन आणि जर्मनीमध्येही हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

बाबूजी हे नावच इतके मोठे आहे की…

या यशाबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, ‘परदेशात चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच काही शोज हाऊसफुल्ल झाले होते. महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच परदेशातील प्रेक्षकही इतके प्रेम या चित्रपटावर करत आहेत, हे खरंच भारावणारे आहे. बाबूजी हे नावच इतके मोठे आहे की, त्यांची ख्याती जगभरात आहे. आजही त्यांची गाणी अजरामर आहेत. तरुणाईही त्यांची गाणी तितक्याच आत्मीयतेने ऐकते. चित्रपटाबद्दल अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. सगळ्याच कलाकारांचे कौतुक होत आहे. एका टीमला यापेक्षा जास्त काय हवे. मी सगळ्याच प्रेक्षकांचा मनापासून आभारी आहे’.

सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Mushroom Cultivation | मशरूमची शेती करून होईल लाखोंची कमाई, कमी वेळात मिळेल तिप्पट नफा!

Mushroom Cultivation

Mushroom Cultivation | आजकाल शेतकरी हे पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. आणि त्यांचे हे प्रयोग यशस्वी देखील होताना दिसत आहे. शेतकरी भाजीपाला पिकवण्यासोबतच इतर अनेक नवनवीन पिके घेत आहेत. आणि चांगले पैसे कमवतात. अशातच आता मशरूमची शेती देखील चांगली लोकप्रिय होत चाललेली आहे. शेतकरी मशरूमची लागवड करून चांगला पैसा कमावतात. मशरूमच्या लागवडीसाठी कमी जमीन पाणी आणि वेळ देखील कमी लागतो. त्याचप्रमाणे मशरूमच्या लागवडीचा खर्च देखील कमी असतो. त्यातून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळते. मशरूमला आजकाल बाजारात खूप मागणी आहे. कारण मशरूममध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्वे, जीवनसत्त्व, प्रथिने आढळतात. त्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदा होतो. आता या मशरूमची शेती (Mushroom Cultivation) कशी करायची? त्यात किती कमाई होईल? हे आपण पाहणार आहोत.

मशरूमच्या लागवडीयोग्य 70 जाती | Mushroom Cultivation

मशरूमची लागवड करण्यापूर्वी तुम्ही अशा जातींची निवड करावी ज्यातून तुम्ही कमी वेळात चांगले उत्पन्न मिळवू शकता. याशिवाय मशरूमची लागवड करण्यापूर्वी तुमच्या जवळच्या बाजारपेठेच्या मागणीनुसार मशरूमचे उत्पादन करावे. मशरूमच्या लागवडीयोग्य 70 जाती जगभरात आढळतात. परंतु भारतात पांढरा बटर मशरूम, शिताके मशरूम, धिंगरी (ऑयस्टर मशरूम), पॅडीस्ट्रा मशरूम आणि मिल्की मशरूम या जाती पिकवल्या जातात, त्यांची लागवड करून शेतकरी चांगला व भरघोस नफा कमावतात.

मशरूम शेती

मशरूमची लागवड (Mushroom Cultivation) करण्यासाठी शेतकऱ्यांना विशिष्ट तापमानाचीही काळजी घ्यावी लागते. या पिकाच्या लागवडीसाठी 15 ते 17 अंश सेल्सिअस तापमान चांगले मानले जाते. त्याच्या लागवडीसाठी, गवताच्या छताचा एक संच तयार केला जातो आणि त्याच्या खाली कंपोस्टचा बेड तयार केला जातो. आता त्यात मशरूमच्या बिया टाकून त्याची लागवड केली जाते. हे खत तयार करण्यासाठी शेतकरी गव्हाचा कोंडा, निंबोळी पेंड, पोटॅश, युरिया, कोंडा आणि पाणी मिसळून एक ते दीड महिना कुजवू देतात. कंपोस्ट तयार झाल्यावर, एक जाड बेड तयार केला जातो आणि त्यात मशरूमच्या बिया पेरल्या जातात. बिया पेरल्यानंतर ते झाकले जाते आणि सुमारे एक महिन्यानंतर मशरूम बाहेर येऊ लागतात.

कमाई लाखात होईल

चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी मशरूमची लागवड हा उत्तम पर्याय मानला जातो. त्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या शेताची गरज नाही, तर त्यासाठी एक खोली पुरेशी आहे. कमी खर्चात आणि कमी जागा असूनही, शेतकरी शेती करून एकूण खर्चाच्या तिप्पट कमाई सहज करू शकतात. एका खोलीत मशरूमची लागवड करण्यासाठी 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो आणि त्यातून 3 ते 4 लाख रुपयांचे उत्पन्न सहज मिळू शकते.

Ye Re Ye Re Paisa 3 : मॅड कॉमेडीसाठी व्हा तय्यार!! ‘ये रे ये रे पैसा 3’ सिनेमाचं पहिलं पोस्टर लॉन्च; धमाल येणार

Ye Re Ye Re Paisa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ye Re Ye Re Paisa 3) मॅड कॉमेडी असलेल्या ‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटाच्या सिरीजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. ‘ये रे ये रे पैसा’ मग ‘ये रे ये रे पैसा २’ यानंतर आता ‘ये रे ये रे पैसा ३’ चित्रपट येऊ घातला आहे. दिग्दर्शक संजय जाधव यांनी नुकतीच ‘ये रे ये रे पैसा ३’ या नव्याकोऱ्या धमाल कॉमेडी सिनेमाची घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनोरंजनाच्या पावसात भिजायला तयार व्हा. कारण येत्या दिवाळीमध्ये पुन्हा एकदा मॅड कॉमेडी आणि धावपळीची धमाल रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले असून चांगलेच व्हायरल झाले आहे.

पहा पोस्टर (Ye Re Ye Re Paisa 3)

सोशल मीडियावर ‘ये रे ये रे पैसा ३’ या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ज्याच्या बॅकग्राऊंडला ‘ये रे ये रे पैसा’ सिनेमाचे शीर्षक गीत लावण्यात आले आहे. एक गुलाबी रंगाची स्कुटी आणि पैशाचा पाऊस असे काहीसे हे मोशन पोस्टर आहे. जे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात सक्षम आहे. अत्यंत कमाल आणि धमाल असे हे पोस्टर सिनेमबाबतची उत्सुकता वाढवते आहे. सोशल मीडियावर अभिनेता उमेश कामतने देखील हे पोस्टर शेअर केले आहे. ज्यावर प्रेक्षकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

तगडी स्टारकास्ट

अमेय विनोद खोपकर एलएलपी, उदाहरणार्थ निर्मित आणि न्युक्लिअर अॅरो पिक्चर्स या निर्मिती संस्थांचे सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, कुमार मंगत पाठक, ओमप्रकाश भट्ट, नासिर शरीफ यांनी ‘ये रे ये रे पैसा ३’ (Ye Re Ye Re Paisa 3) या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर निनाद नंदकुमार बत्तीन सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा व दिग्दर्शन संजय जाधव यांचे आहे. चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची तर संवाद लेखन अरविंद जगताप यांचे आहे. चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

मनोरंजनाचा पाऊस पडणार

पैसा मिळवण्यासाठीची धडपड आणि त्यातून होणारे गोंधळ या पूर्वीच्या दोन्ही चित्रपटात पाहायला मिळाले होते. या दोन्ही चित्रपटांचा प्रेक्षकांची तुफान प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता ‘ये रे ये रे पैसा ३’ (Ye Re Ye Re Paisa 3) मध्ये आणखी काय वेगळी कथा दाखवली जाणार याची उत्सुकता आहे. उत्तम अभिनेते या चित्रपटात असल्यानं हा चित्रपट प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणार यात काहीच शंका नाही.

पृथ्वीपासून 388 ट्रिलियन किलोमीटरवर जीवसृष्टीसाठी पोषक वातावरण; NASA ने दिली माहिती

Super Earth planet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले शास्त्रज्ञ हे अवकाशाबाबत नेहमीच नवनवीन शोध घेत असतात. अनेकांना या अवकाशात नक्की काय काय गोष्टी असतात? त्याचे गूढ जाणून घेण्यासाठी खूप कुतुहूल निर्माण होत असते. शास्त्रज्ञ आणि अभ्यासक देखील या विश्वाची उत्पत्ती कशी झाली? अवकाशात काय हालचाली होतात? या संदर्भातील माहिती वेळोवेळी देतच असतात. अशातच आता ही संशोधक पृथ्वी व्यतिरिक्त दुसरीकडे जीवसृष्टी शोधताना दिसत आहे

सूर्यमालेमध्ये नुकतेच संशोधन करण्यात आले. आणि अशाच एका ग्रहाची माहिती मिळालेली आहे. जिथे जीवसृष्टीचे संकेत मिळत आहेत. कारण तेथील वातावरण हे मानव वस्तीसाठी पूरक असल्याचे दिसत आहे. हा गृह पृथ्वीपासून तब्बल 388 ट्रिलियन किलोमीटर एवढा दूर आहे. म्हणजेच 41 प्रकाश वर्ष दूर असणार्‍या या एक्सो प्लॅनेटचे नाव 55 cancrie हे आहे. NASA च्या वतीने करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आलेले आहे.

या ग्रहाची घनता पृथ्वीपेक्षा देखील कर कमी आहे. आकाशगंगेमध्ये सूर्यमालेसारख्याच एका ताऱ्याभोवती हा परिभ्रमण करत असतो. हाती आलेल्या माहितीनुसार या ग्रहाच्या वातावरणामध्ये कार्बन-डाय-साइड आणि कार्बन मोनाऑक्साईड यांचे प्रकार प्रमाण अधिक आहे. सध्या एक्स्ट्राफिजिक्ससिस्टीमच्या माहितीनुसार त्यांनी या ग्रहाची गणती सुपर अर्थ विभागात केलेली आहे. या ठिकाणचे तापमान 2300° C पर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे सध्या जीवसृष्टीचे पुरावे सापडलेले नाहीत. परंतु नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपिया दुर्बिणीतून करण्यात आलेल्या संशोधनानुसार वातावरणाचा दाट थर असलेल्या पर्वतीय रचनांच्या इतर ग्रहांमध्ये ही जीवनसृष्टी अस्तित्वात असू शकते.

SBI Recruitment | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी; तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांची होणार भरती

SBI Recruitment

SBI Recruitment | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. अनेक विद्यार्थ्यांना बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आणि आता त्यांची ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Recruitment) कडून एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत 12000 कर्मचाऱ्यांची भरतीची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये अनेक विभागांमध्ये उमेदवारांना काम करण्याची संधी मिळणार आहे. बँकेच्या (SBI Recruitment) विविध शाखांमध्ये आयटी विभागात या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन दिनेश खारा यांनी दिलेली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Recruitment) ही देशातील एक सर्वात मोठी बँक आहे. या बँकेमध्ये 2023 आणि 2024 या वर्षाच्या शेवटी बँकेमध्ये 2 लाख 32 हजार 296 कर्मचारी होते. ही संख्या 2022-23 मध्ये कमी होती. बँकेमध्ये जवळपास 11 ते 12000 कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तीमाहित बँकेचा नफा हा 24 टक्क्यांनी वाढवून आता 20 हजार 698 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. अशी माहिती देखील चेअरमन दिनेश खारा यांनी दिलेली आहे.

जे कर्मचारी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नव्याने रुजू होतील त्यांना प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. त्यांनी विविध शाखांमध्ये नियुक्ती करण्याचे देखील सांगितलेली आहे. त्यातील काही कर्मचाऱ्यांना प्रामुख्याने आयटी विभागात नियुक्ती करण्यात येणार असल्याचे देखील सांगितलेले आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर; पहा कोणाकोणाचा समावेश

Sri Lanka T20 World Cup Team

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुन महिन्यात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंका यंदाचा T20 वर्ल्डकप खेळणार आहे. चरित असलंका उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल. श्रीलंकेच्या या संघात आयपीएल मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या मथिशा पाथिराना आणि महिष थेक्षाना या युवा खेळाडूंना सुद्धा स्थान देण्यात आलेलं आहे.

ड गटात श्रीलंकेचा समावेश आहे

T20 विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा संघ ड गटात समावेश आहे, ज्यामध्ये बांगलादेश, नेपाळ, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका यांचाही समावेश आहे. श्रीलंकेचा संघ ३ जूनला न्यूयॉर्कमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने विश्वचषक स्पर्धेचा श्रीगणेशा करेल. यानंतर संघ 8 जून रोजी डलास येथे बांगलादेशशी खेळेल. ग्रुप स्टेजच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये श्रीलंकेचा 12 जूनला नेपाळ आणि 17 जूनला सेंट लुसिया येथे नेदरलँड्सचा सामना होईल.

पथिराना दुखापतीमुळे बाहेर होता

पाथिराना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळतो, परंतु या मोसमात एका सामन्यात तो जखमी झाला आणि स्पर्धेतून बाहेर पडला. दुखापतीमुळे पाथिराना कोलंबोला परतला. यंदाच्या आयपीएल हंगामात त्याने चेन्नईसाठी सहा सामने खेळले ज्यात त्याने 13 विकेट घेतल्या. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट ७.६८ होता. महत्वाच्या क्षणी बळी मिळवण्यात पथीराना माहीर आहे.

टी-20 विश्वचषकासाठी श्रीलंकेचा संघ-

वानिंदू हसरंगा (कर्णधार), चारिथ असलंका (उपकर्णधार), कुसल मेंडिस, पथुम निसांका, कामिंदू मेंडिस, सदिरा समरविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, धनंजय डी सिल्वा, महिश थेक्षाना, दुनिथ वेलागे, दुष्मंथा चमीरा, नुवान तुषारा, मथिशा पाथिराना आणि दिलशान मदुशंका
राखीव खेळाडू : असिथा फर्नांडो, विजयकांत व्यासकांत, भानुका राजपक्षे, जनिथ लियानागे.

Akshaya Tritiya 2024 | अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीवर विशेष सवलत!! टॉप ब्रँड देतायत खास ऑफर

Akshaya Tritiya 2024

Akshaya Tritiya 2024 | हिंदू धर्मामध्ये अनेक सण असतात. आणि त्या प्रत्येक सणाला एक इतिहास आहे आणि एक महत्त्व देखील आहे. अशातच आज म्हणजेच 10 मे 2024 रोजी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेच्या सणाला देखील हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि अनेक लोक या दिवशी सोने आणि चांदीची खरेदी करतात. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या आधी सोन्या-चांदीच्या भावामध्ये वाढ होत असते. अनेक लोक या दिवशी सोनं चांदीची खरेदी करत असतात. त्यामुळे यावर्षी देशातील अनेक टॉप ज्वेलरी ब्रँडनी काही ऑफर दिलेल्या आहेत. अक्षय तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2024) मुहूर्तावर आता ग्राहकांना सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करताना त्याच्या मेकिंग चार्जेसवर 25% सूट मिळणार आहे. आता कोणत्या ब्रँडने किती टक्के सूट दिलेली आहे? हे आपण पाहणार आहोत.

तनिष्कने 20% सूट दिली आहे | Akshaya Tritiya 2024

तनिष हा एक हिऱ्यांचा प्रसिद्ध ब्रँड आहे. या ब्रँडने अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांच्या ग्राहकांसाठी खास ऑफर दिलेली आहेत. कंपनीने ग्राहकांना सोने आणि हिऱ्यांच्या दागिने यांच्या मेकिंग चार्जेस सर्विसवर 20 टक्के सूट दिलेली आहे. ही ऑफर त्यांनी 2 ते 12 मेपर्यंत ठेवलेली आहे.

मलबार गोल्डमध्ये मोठ्या प्रमाणात सूट

मलबार गोल्ड ब्रँड त्यांच्या ग्राहकांना अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी दागिन यांच्या मेकिंग चार्जेसवर 25% सूट दिलेली आहे. ही ऑफर त्यांनी 27 एप्रिल ते 12 मे पर्यंत ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी हिऱ्याच्या दागिऱ्यांच्या मेकिंग चार्जेसवर देखील 25% सूट दिलेली आहे. तर एसबीआय क्रेडीट कार्ड धारकांना 25 हजार रुपयांच्या किमान खरेदीवर 5% कॅशबॅकचा देखील लाभ मिळत आहे ही. ऑफर त्यांनी 1 मे ते 10 मे पर्यंत ठेवलेली आहे.

जॉयलुक्काची विशेष सवलत

जॉयलुक्का हा ब्रँड अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांना विशेष सवलत देत आहे. या कंपनीने एक खास ऑफर आणलेली आहे. ती म्हणजे आता 50000 रुपयांपेक्षा जास्त सोन्याच्या खरेदीवर ग्राहकांना 1 हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर मिळत आहे. 13 मे पर्यंत ठेवलेली आहे तसेच 10 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर ग्राहकांना 500 रुपयांचे गिफ्ट देखील मिळत आहे.

त्याचप्रमाणे 50 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हिऱ्यांच्या दागिन्यावर 2 हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर ठेवलेले आहे. ही ऑफर त्यांनी 26 एप्रिल ते 13 मे पर्यंत ठेवलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर सोन्याने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही लवकरात लवकर या ज्वेलरी ब्रँडला भेट देऊन तुमच्या सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर सूट मिळवू शकता.

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Mumbai Pune Expressway Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचा महामार्ग असलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे (Mumbai Pune Expressway Accident) वर अपघाताचे सत्र सुरूच आहे. आजही भल्या पहाटे या महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात झाला. वेगात जाणारी कार, पाईप वाहून नेणारा ट्रक आणि कोंबड्याना घेऊन जाणारा टेम्पो ही ३ वाहने एकमेकांना धडकली. हा अपघात इतका भीषण होता कि यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शुक्रवारी पहाटे सव्वाचार वाजेच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवे (Mumbai Pune Expressway Accident) वरील खोपोलीजवळ बोरघाटात पाईप वाहून नेणारा ट्रक आणि कोंबड्या वाहून नेणारा टेम्पो आणि एक भरधाव वेगात असलेली कार यांची एकमेकांना धडक बसली. हि धडक इतकी जोरदार होती कि तिन्ही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचे पाहायला मिळाले. या भीषण अपघातात ३ जणांना आपला प्राण गमवावा लागला. तर ८ जण गंभीर जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

वाहतूक काही काळ ठप्प – Mumbai Pune Expressway Accident

या अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. तिन्ही गाड्या रस्त्यावर आडव्या झाल्याने वाहतूक व्यवस्था काही काळ ठप्प पडली होती. मात्र पोलिसांकडून सध्या वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. गेल्या काही महिन्यापासून मुंबई पुणे महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. अनेक उपाययोजना करूनही अपघाताचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेईन त्यामुळे हि मोठी चिंतेची बाब म्हणावी लागेल.