Saturday, December 20, 2025
Home Blog Page 773

SSC HSC Result Date | दहावी-बारावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट, ‘या’ दिवशी निकाल होणार जाहीर

SSC HSC Result Date

SSC HSC Result Date | 2023 – 2024 याशैक्षणिक वर्षातील दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक करिअरमधील दहावी आणि बारावीचा हा टप्पा खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण इथून पुढे त्यांच्या करिअरला खरी सुरुवात होत असते. यावर्षी महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेली आहे. परंतु आता सगळ्यांचे लक्ष हे निकालाकडे लागलेले आहे. आता निकाल नक्की कधी लागणार आहे? याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत? अशातच या दहावी आणि बारावीच्या निकाला संदर्भात एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून हे निकाल जाहीर होणार आहे. परंतु आधी बारावीचा निकाल जाहीर होऊ शकतो.(SSC HSC Result Date) आणि त्यानंतर दहावीचा निकालही होऊ शकतो आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हा निकाल पाहता येणार आहे.

यावर्षी बारावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती, तर दहावीची परीक्षा ही एक मार्चपासून सुरू झालेली होती. बारावीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून तब्बल 14 लाख 28 हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. असे एकूण 31 लाख विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे फॉर्म भरलेले आहेत. यातील 3320 परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा घेण्यात आली, तर 5086 केंद्रांवर बारावीची परीक्षा घेतली घेण्यात आलेली आहे.

निकाल कधी लागणार ? | SSC HSC Result Date

दहावी आणि बारावीचा निकालाचे काम आता शेवटच्या टप्प्यात आलेले आहेत. आणि लवकरच जाहीर तारखा देखील जाहीर होणार आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल लागणार आहे. निकाल लागल्यानंतर आता सगळीकडे प्रवेशासाठी गडबड सुरू होणार आहे. त्यानंतर येत्या काही दिवसातच दहावीचा निकाल देखील जाहीर होणार आहे.

केजरीवाल यांना मोठा दिलासा!! अखेर न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अहिं लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) काळात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Suprime Court) केजरीवाल यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. येत्या 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन (Interim Bail) मंजूर करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. यामुळे ईडीला (ED) मोठा झटका तर अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या 21 मार्च रोजी दारु धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना अटक केली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत होते.

सध्या अरविंद केजरीवाल हे तिहार जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळीच न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आजच्या सुनावणीत न्यायालयाने 1 जूनपर्यंत हा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी ही एक जूननंतर होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, केजरीवाल यांचा जामीन मंजूर करण्यात येऊ नये म्हणून ईडीने प्रतिज्ञापत्र सादर केले होते.

अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला ईडीने तीव्र विरोध दर्शवला होता. याचबरोबर केजरीवाल यांना प्रचार करण्याचा मौलिक आणि संविधानिक अधिकार नसल्याचे ईडीने म्हटले होते. परंतु असे असतानाही सर्वोच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या कार्यालयात जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. तसेच पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या जल्लोषाच्या घोषणा दिल्या जात आहेत.

दरम्यान, ईडीच्या प्रतिज्ञापत्रावर आम आदमी पक्षाने आक्षेप घेतला होता. AAP च्या टीमने एक प्रेस रिलीज जारी करून माहिती दिली होती की, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये औपचारिक तक्रार दाखल करण्यात आले आहे. या सर्व घडामोडींमध्येच सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांचा जामीन मंजूर केला आहे.

Gold Buying Rules : 2 लाखापेक्षा अधिक किंमतीचे सोने खरेदी करताय? जाणून घ्या ‘हा’ महत्वाचा नियम

Gold Buying Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gold Buying Rules) आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा अक्षय तृतीयेचा शुभ सण आहे. हिंदू मान्यतेनुसार, आजच्या या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी केल्यास घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि भरभराट होते. त्यामुळे आजच्या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्व आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये आजच्या दिवशी सोने खरेदीसाठी मोठी गर्दी दिसते. बरेच लोक सोने खरेदीसाठी या दिवसाची वाट पाहत असतात. भारतात सोने खरेदी करणे याकडे गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. त्यामुळे देशात सोने खरेदी करण्याकडे लोकांचा विशेष कल दिसतो.

त्यामुळे आज आपण सोने खरेदीच्या एका अत्यंत महत्वाच्या नियमांबाबत जाणून घेणार आहोत. ज्याबद्दल सोने खरेदी करताना तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. (Gold Buying Rules) आपल्याकडे एका ठराविक रकमेपेक्षा अधिक रकमेचे सोने खरेदी करताना ओळखपत्र देणे बंधनकारक आहे. अर्थात आधार कार्ड किंवा पॅन कार्ड दिल्याशिवाय एका विशिष्ट रकमेपेक्षा जास्त सोने खरेदी येत नाही. याबाबत आयकर विभागाचा नेमका काय नियम आहे ते जाणून घेऊया.

सोने खरेदीबाबत आयकर विभागाचा महत्वाचा नियम (Gold Buying Rules)

प्राप्तिकर कायद्याच्या कलम 269 ST मध्ये नमूद केल्यानुसार, एका दिवसात २ लाख रुपयांपेक्षा अधिक रोख व्यवहारांवर बंदी आहे. अर्थात, जर तुम्ही एखाद्या दिवशी २ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे सोन्याचे दागिने रोखीने खरेदी केलात तर तुम्ही आयकर कायद्याचे उल्लंघन करताय असे गृहीत धरले जाते.

(Gold Buying Rules) आयकर कायद्याच्या कलम 271 D मध्ये देखील या संदर्भात महत्त्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. या कलमानुसार, एका दिवशी २ लाख रुपयांपेक्षा जास्त रोखीने व्यवहार केलेल्या रकमेवर दंड भरावा लागतो. त्यामुळे, २ लाखांपेक्षा जास्त किंमतीचे सोने खरेदी करताना आधार कार्ड आणि पॅन कार्ड देणे अनिवार्य आहे.

.. तर दंडात्मक कारवाई होईल

जर एखाद्या ज्वेलरने या नियमाचे उल्लंघन करून ग्राहकाकडून २ लाख रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम कॅशने स्वीकारली तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होते. (Gold Buying Rules) अर्थात, जर एखाद्या ग्राहकाने २ लाखांपेक्षा जास्त रकमेचे सोने खरेदी केले आणि ही रक्कम त्याने कोणत्याही ओळखपत्राशिवाय म्हणजेच आधार वा पॅनचा पुरावा न देता दिली तर संबंधित ज्वेलर्सवर दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्ये त्याला ३ लाख रुपयांचा दंडदेखील भरावा लागू शकतो.

ओळखपत्र देणे बंधनकारक

तुम्ही २ लाख वा त्याहून अधिक रकमेचे सोने खरेदी करत असाल तर ज्वेलर्सला पॅन तपशील देणे बंधनकारक आहे. नियमानुसार, या व्यवहारासाठी तुम्ही कॅश वा ऑनलाईन पेमेंट पद्धतीचा वापर जरी केला तरीही २ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल तर ओळखपत्र देणे अनिवार्य आहे. (Gold Buying Rules)

Oukitel WP35 : 11000mAh च्या महाशक्तीशाली बॅटरीसह लाँच झालाय हा स्मार्टफोन; पहा किंमत आणि फीचर्स

Oukitel WP35 smartphone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या या टेक्नॉलॉजीच्या जगात बाजारात सतत नवनवीन मोबाईल येत असतात. ग्राहकांच्या सुद्धा अपेक्षा वाढत असून नवं काहीतरी मोबाईलमध्ये असावं अशी त्यांची अपेक्षा आहे. आत्तापर्यंत तुम्ही स्लिम मोबाईल, फोल्डेबल मोबाईल बघितले असतील परंतु आता प्रसिद्ध कंपनी Oukitel ने मार्केट मध्ये अतिशय मजबूत आणि रग्ड स्मार्टफोन लाँच केला आहे. Oukitel WP35 असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये तब्बल 11000mAh ची महाशक्तीशाली बॅटरी देण्यात आली आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स आणि किमतीबाबत जाणून घेऊयात …..

6.6-इंचाचा डिस्प्ले –

Oukitel WP35 मध्ये 6.6-इंचाचा 2.4K डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन देण्यात आलंय जे डायमंड पॅटर्न स्टाईलमध्ये बनवले आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity chipset बसवली असून यामध्ये अल्ट्रासेव्ह ३.०+ टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलाय. मोबाइलमध्ये 8 GB रॅम असून हि रॅम 24 GB पर्यंत वाढवता येते. हा मोबाईल कसाही वापरला तरी त्याला काहीही होणार नाही.

कॅमेरा – Oukitel WP35

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Oukitel WP35 मध्ये 64MP चा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा नाईट व्हिजन कॅमेरा आणि समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 32-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 11000mAh बॅटरी दिली असून हि बॅटरी 60 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम देऊ शकते. Oukitel च्या या मोबाईलला मजबुती दर्शवणारे IP68, IP69K, आणि MIL-STD-810H प्रमाणपत्र मिळालं आहे.

किंमत किती?

Oukitel WP35 ची किंमत $179.99 (अंदाजे रु. 15,000) आहे. हे AliExpress वरून खरेदी केले जाऊ शकते. येत्या 13 मे पासून मोबाईलच्या विक्रीला सुरुवात होणार आहे. 13 ते 17 मे दरम्यान हा स्मार्टफोन खरेदी केल्यास त्यावर अतिरिक्त डिस्काउंट मिळेल असेही सांगण्यात आले आहे.

1 जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससंदर्भात नवीन नियम लागू; चालकाला करावे लागेल या अटींचे पालन

driving licenses

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| ड्रायव्हिंग लायसन्स (driving licence) काढण्यासाठी बरीच प्रोसेस करावी लागते. यामध्ये वाहन चालकाला लेखी परीक्षेपासून ते वाहन चालवण्याची चाचणी द्यावी लागते. या सर्व प्रक्रियेत हमखास 1 आठवडा तर नक्कीच निघून जातो. परंतु आता वाहन चालकाची या सर्व प्रक्रियेतून सुटका होणार आहे. कारण की, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्सबाबतच्या नियमात मोठे बदल केले आहेत. या नियमानुसार, आता RTO कार्यालयात जाऊन व्यक्तींना ड्रायव्हिंग चाचणी देण्याची गरज पडणार नाही.

1 जून 2024 पासून नियम लागू

मिळालेल्या माहितीनुसार, खाजगी संस्थांना चाचण्या घेण्यास आणि प्रमाणपत्र देण्यास सांगण्यात आले आहे की, ते प्रशिक्षणार्थींना ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकतात. हा नियम येत्या 1 जून 2024 पासून लागू होणार आहे. या नव्या नियमानुसार, वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवली तर चालकाला एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल. तसेच एखादा अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना पकडला गेल्यास त्याला 25 हजार रुपये दंड भरावा लागेल.

इतकेच नव्हे तर, ज्या व्यक्तीचे वाहन आहे त्या व्यक्तीचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाईल. या नियमानुसार वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत अल्पवयीन मुलांना ड्रायव्हिंग लायसन्स काढता येणार नाही. यासह खाजगी दुचाकी वाहन चालक प्रशिक्षण केंद्राकडे किमान एक एकर जमीन असायला हवी. तर मोटार वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे दोन एकर जमीन असायला हवी. याबरोबर वाहन चालकाच्या चाचणीसाठी आवश्यक सुविधा प्रशिक्षण केंद्राकडे असायला हव्यात.

दरम्यान, प्रशिक्षण केंद्राकडे प्रशिक्षकांकडे हायस्कूल डिप्लोमा गरजेचे असेल. तसेच त्याच्याकडे किमान पाच वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव असायला हवा. प्रशिक्षकांना बायोमेट्रिक्स आणि माहिती तंत्रज्ञान प्रणालीशी संबधित सर्व माहिती असायला हवी. या सर्व बाबी तपासूनच प्रशिक्षकाची निवड केली जावी. या सर्व नियमानमुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल तसेच लहान मुलांकडे गाडी देण्याच्या प्रमाणात ही होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मोदींची शरद पवार- उद्धव ठाकरेंना सर्वात मोठी ऑफर; राजकारणात पुन्हा भूकंप??

modi offer to pawar thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना NDA मध्ये येण्याची खुली ऑफर (PM Modi Offer To Sharad Pawar And Uddhav Thackeray) दिली आहे. येत्या काळात काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं विधान शरद पवारांनी काही दिवसापूर्वी केलं होते. हाच धागा पकडून काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा NDA मध्ये या असं आवाहन मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना केल आहे. नरेंद्र मोदी यांची आज महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी नंदुरबारमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

गेल्या 40 ते 50 वर्षांपासून महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते राजकारणात सक्रीय आहेत. ते सध्या काहीही बोलत आहेत. “बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवार (Sharad Pawar) चिंतेत आहेत. नकली शिवसेना, NCP ने काँग्रेसमध्ये विलीन होण्याच मन त्यांनी बनवलय. परंतु त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावे आणि उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत यावे, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील अशी ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिली आहे.

शरद पवार दिले हे उत्तर –

नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ऑफरनंतर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या व्यक्तीचा, पक्षाचा आणि त्यांच्या विचारधारेचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वास नाही. मग ते सत्ताधारी असतील किंवा इतर… अशा लोकांसोबत असोसिएशन होणार नाही… व्यक्तीगत संबंधाचं सोडा… पण राजकीय संबंध प्रस्थापित करणं हे माझ्याच्यानं कधी होणार नाही, असं म्हणत शरद पवारांनी मोदींची ऑफर धुडकावून लावली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री यांना अटक करून तुरुंगात टाकलं. यामागे केंद्रीय नेतृत्वाचा, केंद्र सरकारचा सहभाग असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. म्हणजेच यातून एक गोष्ट स्पष्ट होतेय की, लोकशाही पद्धतीवर त्यांचा विश्वास नाही असं म्हणत पवारांनी मोदींवर टीका केली.

HUDCO अंतर्गत “सहाय्यक कार्यकारी” पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; पगार आणि अर्जाची अंतिम तारीख पहा

job opportunity

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत (HUDCO) एकूण 13 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. या भरती अंतर्गत “सहाय्यक कार्यकारी” पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छूक उमेदवारांनी 19 मे 2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा. तसेच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सविस्तर बातमी वाचावी.

मिळालेल्या माहितीनुसार, गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम प्रायव्हेट लिमिटेड एकूण 13 रिक्त जागांसाठी तरुणांची भरती करणार आहे. या भरती अंतर्गत सहाय्यक कार्यकारी पदासाठी तरुणांची निवड केली जाईल. तसेच, इच्छुक उमेदवाराला रिक्त जागेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पद्युत्तर पदवी असावी.

इतकेच नव्हे तर, रिक्त पदांसाठी 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवाराला पाचशे रुपये फी भरावी लागेल. रिक्त जागेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे नाही आहे. भरती संदर्भात अधिक माहिती https://hudco.org.in/ या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 65,000/- रुपये इतका पगार मिळेल. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता त्वरित या रिक्त जागेसाठी अर्ज सादर करावा.

Form 15G And 15H : बँकेत FD आहे? तर सगळ्यात आधी ‘हे’ फॉर्म भरा; नाहीतर, पैसे गेले म्हणून समजा

Form 15G And 15H

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Form 15G And 15H) आजकाल सेविंगच्या हिशोबाने प्रत्येकाचं कोणत्या न कोणत्या बँकेत किमान एक तरी अकाऊंट असतं. त्यात गुंतवणूकदारांचा सर्वाधिक कल FD कडे आहे. त्यामुळे गेल्या काही काळात FD धारकांची संख्या वाढली आहे. जर तुम्हीही FD धारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण बँकेत एक महत्वाचा फॉर्म भरणे गरजेचे आहे. जो न भरल्यास कदाचित तुमच्या अकाउंटमधील पैसे कापले जाऊ शकतात. या फॉर्मविषयी जर तुम्हाला माहिती नसेल तर लगेच जाणून घेण्याची गरज आहे, हे लक्षात घ्या.

(Form 15G And 15H) कोणत्याही बँकेत मुदत ठेव (FD) असल्यास हा फॉर्म त्वरित भरून बँकेत सबमिट करणे गरजेचे आहे. आता हा फॉर्म नक्की कोणता आहे? आणि इतका गरजेचा का आहे? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

तर खात्यातून पैसे कापले जाणार..

तुम्ही तुमच्या बँकेत एफडी केली असेल तर फॉर्म 15G आणि फॉर्म 15H (Form 15G And 15H) भरून सबमिट करणे आवश्यक आहे. जर तुम्ही हा फॉर्म भरला नाही तर तुमचा TDS कापला जाऊ शकतो. मुदत ठेव ग्राहकांना आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला दरवर्षी हे फॉर्म सबमिट करावे लागतात. हा फॉर्म भरल्याने व्याजावर TDS कापला जात नाही. फॉर्म 15G अंतर्गत वयवर्षे ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे ग्राहक कर सवलतीचा दावा करू शकतात. तर ज्यांचे वय वर्ष ६० पेक्षा अधिक आहे त्यांना फॉर्म १५ एच वापरून सवलतीचा दावा करता येईल.

15G/H फॉर्म कुणासाठी? (Form 15G And 15H)

ज्या लोकांचं वय ६० वर्षांपेक्षा कमी आहे आणि त्यांनी मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केली आहे ते ग्राहक फॉर्म १५जी भरू शकतात. हा फॉर्म भरल्यास FD व्याजावरील कर अर्थात TDS कापला जाणार नाही. हा फॉर्म आयकर कायदा 1961च्या कलम 197A अंतर्गत उपलब्ध असून याद्वारे बँकेला तुमच्या वार्षिक उत्पन्नाची माहिती मिळते. तसेच ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ग्राहकांना करकपातीशिवाय व्याज मिळवायचे असेल तर ग्राहकांनी फॉर्म 15H सबमिट करणे गरजचे आहे. असे केल्यास तुम्हाला तुमच्या जमा केलेल्या पैशांवर कोणत्याही कर कपातीशिवाय व्याज मिळेल.

फॉर्म 15G/H सबमिट करणे बंधनकारक आहे का?

मुळात, फॉर्म 15G/H सबमिट करण्याचा कोणताही नियम नाही. (Form 15G And 15H) मात्र, एखाद्या आर्थिक वर्षात तुम्हाला ४० हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळत असेल तर मात्र हा फॉर्म भरणे तुमच्यासाठी गरजेजे ठरेल. अर्थात तुम्ही जर दरवर्षी फॉर्म १५G/H सबमिट केलात तर तुम्हाला टीडीएस भरावा लागणार नाही. म्हणजेच तुम्ही जमा केलेल्या पैशांवर कोणतीही करकपात होणार नाही. साहजिक आहे याचा फायदा ग्राहकांनाच होणार आहे.

Ginger Cultivation | अशा पद्धतीने करा आल्याची लागवड, प्रति हेक्टरी होईल 200 क्विंटलपर्यंत उत्पादन

Ginger Cultivation

Ginger Cultivation | भारतीय जेवणांमध्ये आल्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आले ही एक औषधी वनस्पती आहे. आल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस आणि विटामिन सी यांसारखे अनेक गुणधर्म असतात. सुक्या आल्याची देखील बाजारात खूप मागणी आहे. वर्षभर आल्याची (Ginger Cultivation) मागणी बाजारात कायम राहिलेली असते. त्यामुळे आजकाल अनेक शेतकरी देखील आल्याची लागवड करत आहे. कारण याच्या लागवडीचे शेतकरी शेतीतून मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकतो. आज आपण आल्याचे लागवड कशी करावी? त्यासाठी योग्य हवामान कसे लागते? त्यातून किती कमाई होईल? याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

योग्य माती आणि हवामान | Ginger Cultivation

आल्याच्या शेतीसाठी वालुकामय चिकणमाती माती सर्वोत्तम मानली जाते, या जमिनीत त्याचे पीक चांगले वाढते आणि शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळते. आले लागवडीसाठी मातीची पीएच पातळी 6.0 ते 7.5 दरम्यान चांगली मानली जाते. 25 ते 35 सेल्सिअस तापमान आले रोपांसाठी सर्वात योग्य मानले जाते. त्याच्या झाडांना चांगली आर्द्रता आणि योग्य सिंचन आवश्यक आहे. आल्याची पेरणी मार्च-एप्रिलमध्ये केली जाते आणि त्याचे उत्पादन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये केले जाते, जेव्हा त्याची झाडे पूर्णपणे विकसित होतात.

शेणखताचा वापर

आल्याच्या (Ginger Cultivation ) शेतातून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेणखत वापरावे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कुजलेले शेणखत, निंबोळी आणि गांडूळ खत घालून ते शेताच्या जमिनीत चांगले मिसळावे. यानंतर, माती समतल करावी. आता शेतकऱ्यांना ते लहान-लहान वाफ्यात विभागून हेक्टरी 2 ते 3 क्विंटल बियाणे घेऊन शेतात पेरणी करावी लागते. दक्षिण भारतात, आल्याची पेरणी मार्च-एप्रिलमध्ये केली जाते आणि त्यानंतर सिंचन केले जाते.

कमाई लाखात होईल

बियाणे पेरल्यानंतर 8 ते 9 महिन्यांनी त्याचे पीक पूर्णपणे तयार होते. आल्याचे पीक योग्य प्रकारे पिकल्यावर त्याची वाढ थांबते आणि पिके पिवळी पडून सुकायला लागतात. आल्याची लागवड केल्यास शेतकऱ्यांना हेक्टरी 150 ते 200 क्विंटल उत्पादन मिळू शकते. बाजारात यापैकी एक किलोची किंमत सुमारे 40 रुपये किंवा त्याहून अधिक आहे. त्याची लागवड करून शेतकरी 3.5 ते 4 लाख रुपये सहज कमवू शकतात.

Mumbai News : अनोखी श्रद्धांजली ! मुंबईतील ‘ या’ चौकाला दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे नाव

shreedevi

Mumbai News : अप्रतिम अभिनयाने आपली वेगळीच छाप सोडणाऱ्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे नाव आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 80 -90 चे दशक अक्षरश: श्रेदेवी यांनी गाजवले. त्या काळात त्या अनेकांच्या गळ्यातील ताईत बनल्या होत्या. ‘हिम्मतवाला’, ‘मवाली’ ‘लाडला’, ‘लम्हे’, ‘चालबाज’, ‘चांदनी’, ‘मिस्टर इंडिया’ ते अगदी ‘इंग्लिश विंग्लिश ‘ असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत. आजही त्या आपल्यात नाहीत ही न पटणारी गोष्ट वाटते. 24 फेब्रुवारी 2018 मध्ये त्यांचे दुबईत निधन झाले. आता श्रीदेवी यांचे नाव मुंबईतल्या (Mumbai News) एका चौकाला दिले असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , श्रीदेवी यांनी केलेल्या कामासाठी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी बृहन्मुंबई नगर (Mumbai News) निगमनं लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एका चौकाचं नाव त्यांच्या नावावर ठेवण्यात येणार आहे. बीएमसीने लोखंडवाला कॉम्प्लॅक्समधील एका विशिष्ट चौकाला ‘श्रीदेवी कपूर चौक’ ठेवले आहे. हे श्रीदेवी यांना श्रद्धांजली देण्यासाठी आहे. खरंतर ही मागणी रहिवासी आणि पालिकेकडून करण्यात आली होती. लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या त्या चौकाचे नाव श्रीदेवी कपूर ठेवण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. कारण श्रीदेवी या इथल्याच ग्रीन एकर्स टॉवरमध्ये राहत होत्या. इतकंच नाही तर त्यांचे पार्थीव देखील त्याच ठिकाणाहून नेण्यात आले होते.

आणि बायोपिकला मिळाला पूर्णविराम (Mumbai News)

दरम्यान श्रीदेवी यांच्या मृत्यू नंतर त्यांच्यावर आधारित बायोपिक बनवण्याच्या चर्चाना उधाण आले होते. मात्र त्यांचे पती बोनी कपूर यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “ती एक खासगी व्यक्ती होती आणि त्याप्रमाणेच तिचे आयुष्य हे खासगी राहायला हवं. या कारणामुळे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी हे होऊ देणार नाही”. त्यामुळे बायोपिकच्या चर्चाना पूर्णविराम मिळला. मात्र आता मुंबईतल्या (Mumbai News) चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

यापूर्वी अनेक ठिकाणांना कलाकारांची नावे (Mumbai News)

एखाद्या चौकाला किंवा भागाला कलाकारांचे नाव देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सिक्किममध्ये एक वॉटरफॉल आहे. त्याचं नाव ‘बिग बी’ असं आहे. त्याशिवाय सिंगापुरच्या एका आर्किडचं नाव ‘डेंड्रोबिम अमिताभ बच्चन’ असं आहे. कॅनडाच्या एक रस्त्याचं (Mumbai News) नाव ‘राज कपूर क्रेसेन्ट’ असे आहे.