दारू पी आणि…; वैद्यकीय अधिकाऱ्याने केला सहकारी डॉक्टरचा विनयभंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – एका डॉक्टरने सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग (Debauchery) केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना 2 जून 2021 रोजी घडली होती. जितेंद्र वानखेडे असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. न्यायाधीश डी. एन चामले यांनी गुरुवारी या प्रकरणी निकाल दिला.

रात्री साडेबारा डॉक्टर आला अन्…
आरोपी डॉ. जितेंद्र वानखेडे हा पहूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याने 2 जून 2021 रोजी आपल्याच सहकारी महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग (Debauchery) केला. यानंतर याप्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेच्या दिवशी 2 जून 2021 रोजी पीडित महिला ही ड्युटीवर होती. यावेळी रात्रीच्या सुमारास साडेबारा वाजता डॉ. वानखेडे हा तिथे आला. त्याने त्याच्या बायकोचा वाढदिवस असल्याने काही पदार्थ खाण्यासाठी आग्रह केला. त्यावेळी आरोपी हा दारुच्या दशेत होता. म्हणून पीडितेने पार्सल घेतले आणि दार बंद केले.

महिला डॉक्टरला दारू प्यायला सांगू लागला…
यानंतर आरोपीने पुन्हा या महिला डॉक्टरला रात्री 1च्या सुमारास फोन केला. आणि तिला व्हॉट्सअॅपवर ऑनलाईन यायला सांगितले. त्यावेळी आरोपी हा रात्रभर तिला दारू प्यायला सांगत होता. या संपूर्ण प्रकारला ती कंटाळली. यानंतर तिने पहूर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी डॉक्टर जितेंद्र वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी डॉ. जितेंद्र वानखेडेवर विनयभंगाचा (Debauchery) गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने काल याप्रकरणी निकाल दिला. यामध्ये न्यायालयाने आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

हे पण वाचा :

तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन

वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ आहे; फडणवीसांच्या सभेनंतर राऊतांचे ट्विट

उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब

Leave a Comment