धक्कादायक! वयाच्या 36 व्या वर्षी ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटपटूचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शहजाद आजम राणा (shahzad azam rana) याचा वयाच्या 36 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. ह्दयविकारच्या झटक्याने शहजाद आजम राणाचा (shahzad azam rana) मृत्यू झाला आहे. शहजाद आजम राणा (shahzad azam rana) हा डावखुरा वेगवान गोलंदाज होता. इतक्या कमी वयात ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने कुटुंबीय, मित्र परिवार सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

शहजाद आजम राणा याची कारकिर्द
शहजाद (shahzad azam rana) पाकिस्तानात 95 फर्स्ट क्लास सामने खेळला आहे. तसेच त्याने पाकिस्तानकडून 58 लिस्ट ए आणि 29 टी 20 च्या मॅचेस सुद्धा खेळल्या आहेत. शहजाद आजम राणाने आपल्या प्रोफेशनल करिअरमध्ये 496 विकेट घेतल्या आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 388 विकेट आहेत. लिस्ट ए मध्य् त्याने 81 आणि टी 20 क्रिकेटमध्ये 27 विकेट घेतल्या आहेत. तसेच शहजाद आजम राणा (shahzad azam rana) हा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसोबत देखील क्रिकेट खेळला होता.

शेवटचा सामना आणि त्यातील कामगिरी
शहजाद आजम (shahzad azam rana) आपला शेवटचा फर्स्ट क्लास सामना आणि लिस्ट ए मॅच 2018 मध्ये खेळला होता. शेवटच्या लिस्ट ए मॅचमध्ये आजमने 5 विकेट काढल्या होत्या. तसेच तो शेवटचा टी 20 सामना 2020 मध्ये खेळला होता. इस्लामाबादसाठी खेळणाऱ्या शहजाद 2017-18 साली खरा प्रकाश झोतात आला होता. या वेगवान गोलंदाजाने इस्लामाबादसाठी 7 मॅचमध्ये 26 विकेट घेतल्या. त्यानंतर 2018-19 वनडे कपमध्ये इस्लामाबाद संघासाठी सर्वात जास्त विकेट घेतल्या.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती