पाकिस्तानने आपला मित्र चीनला दिला जोरदार धक्का, टिकटॉक अ‍ॅपवर पुन्हा घातली बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इस्लामाबाद । चीनला मोठा धक्का देत पाकिस्तानने पुन्हा एकदा टिकटॉक अ‍ॅपवर बंदी घातली आहे. आक्षेपार्ह कन्टेन्ट दिल्याबद्दल पाकिस्तानने बुधवारी टिकटॉक अ‍ॅपवर बंदी घातली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, पाकिस्तानी कोर्टाच्या आदेशानंतर या अ‍ॅपवर दोन दिवस बंदी घालण्यात आली होती. तथापि, इथले बरेच वकील देशातील सरकारी सेन्सॉरशिप आणि इंटरनेट आणि माध्यमांवर वेळोवेळी पाकिस्तानच्या नियंत्रणाबाबत टीका करीत आहेत.

चिनी अ‍ॅप टिकटॉकवर बंदी आणण्याबाबत इथल्या टेलिकॉम अ‍ॅथॉरिटीने म्हटले आहे की,”टिकटॉकवर सतत आक्षेपार्ह कन्टेन्ट अपलोड केला जात होता आणि तक्रारी दिल्या असूनही कोणतीही कारवाई केली जात नव्हती’ म्हणून ही कारवाई केली गेली. ” टिकटॉक च्या लोकप्रतिनिधींकडून अद्याप काहीही सांगितले गेले नाही.

पाकिस्तानात टिकटॉकचे युझर्स मोठ्या संख्येने आहेत. इथले बरेच लोक या अ‍ॅपचा वापर ऑनलाईन वस्तू विक्रीसाठी करतात. पाकिस्तानमध्ये टिकटॉकवर टीकाही होत असली तरी टिकटॉकने अश्लील आणि LGBTQ कन्टेन्ट दिल्याचा आरोप आहे. जून महिन्यात टिकटॉक ने सुमारे 6 मिलियन व्हिडिओ डिलीट केले. सामान्य युझर्स कडून आणि अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

त्यापैकी 15 टक्के व्हिडिओ अश्लील असल्याने हटविले गेले होते. ही माहिती कंपनीनेच दिली आहे. पाकिस्तानमधील प्रशासनाने यापूर्वी यूट्यूबला देखील आक्षेपार्ह कन्टेन्ट ब्लॉक करण्यास सांगितले होते. तसेच अनेक डेटिंग अ‍ॅपवरही बंदी घेतली गेली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group