पुणे । ATM मशीनमधून पैसे चोरल्याचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतीलच मात्र ATM चा स्फोट करुन लाखोंची चोरी केल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? पुण्यामध्ये बुधवारी अशीच घटना उघडकीस आली आहे. पुण्यालगतच्या पिंपरी-चिंचवड येथे बुधवारी सकाळी चोरट्यांनी एटीएम मशीनचा स्फोट केला आणि 35 लाख रुपये घेऊन पळ काढला. हा स्फोट इतका जोरदार आणि शक्तिशाली होता की ATM मशीन तसेच ATM च्या बाहेरील दरवाजाही उडून गेला. या स्फोटाची बातमी समजताच पोलिस आणि बॉम्ब विरोधी पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्याबाबत आता पुढील तपास सुरु आहे.
या संपूर्ण घटनेत दिलासा दायक ही बाब होती की, या स्फोटात कुणालाही इजा झालेली नाही. पिंपरी-चिंचवडच्या डीसीपीच्या मते ATM मध्ये स्फोट करून चोरी करण्याची ही पहिलीच घटना आहे. रात्री उशिरा 1 ते 2 या दरम्यान आरोपींनी हा गुन्हा केल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी दोन दिवस आधी पुणे ग्रामीणमध्ये ATM लुटण्याचा प्रयत्न झाला होता. सुमारे 40 ते 45 लाख रुपये या ATM मध्ये होते.
चोरटयांनी स्फोट करुन पैशांची चोरी केल्याची घटना घडवून आणली. मात्र, अंधारामुळे 10 ते 12 लाख रुपये जमिनीवरच राहिले आणि सुमारे 30 लाख रुपयांची चोरी झाली.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group