पाकिस्तानी व्यक्तीने रबाबवर वाजवली ‘जन गण मन अधिनायक’ची धून, Video आला समोर

Video Viral
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘अमृत महोत्सव’ साजरा करत असताना पाकिस्तानमधून एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये एक व्यक्ती पाकिस्तानी रबाबवर भारताच्या राष्ट्रगीत ‘जन गण मन अधिनायक’ची धून वाजवताना दिसत आहे. भारत आणि शेजारी देश यांच्यातील संबंधांच्या प्रकारानंतर एका पाकिस्तानी व्यक्तीने असे केल्याने भारतीयांनासुद्धा मोठा धक्का बसला आहे. या व्यक्तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या रबाब मास्टरला कोणी पाकिस्तानी ट्रोल का करत नाही, असा प्रश्न लोकांना पडला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता कि, एक पाकिस्तानी व्यक्ती रबाब घेऊन बसला आहे आणि त्याच्या मागे सुंदर वाद्यं दिसत आहेत. हा माणूस आपल्या वाद्याने भारताचे राष्ट्रगीत जन गण मन वाजवत आहे. स्वातंत्र्याचा उत्सव सुरू असताना रबाबमधील या सुराने भारतीयांना भुरळ घातली आहे. या व्यक्तीने आपल्या कृतीच्या माध्यमातून भारतीयांची मने जिंकली आहेत.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होताच त्याच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा भडिमार झाला आहे. भारतीयांना हा व्हिडिओ इतका आवडला की ते त्यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. एका पाकिस्तानी माणसाने ज्या सहजतेने रबाबवर राष्ट्रगीत वाजवले, त्यामुळे तुमच्या आत्म्याला खरोखरच दिलासा मिळेल. या व्यक्तीचे नाव सियाल खान असे आहे. त्याच्या फेसबुक प्रोफाइलवरून तो पाकिस्तानातील पेशावरचा रहिवासी असल्याचे समजत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?