पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर लैगिंक शोषणाचे आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला असून कर्णधार बाबर आझम याच्यावर एका महिलेनं लौगिंग शोषणाचे आरोप केले आहेत. या महिलेनं स्वत:ला बाबर आजमची शाळेतील दोस्त असल्याचं सांगितलं. या महिलेनं पत्रकार परिषद घेत बाबर आजमवर लैगिंग शोषणाचे आरोप केले आहेत. बाबर आजमला वेळप्रसंगी आर्थिक मदत केल्याचा दावाही या महिलेनं केला आहे.

महिला म्हणाली की, बाबर आझमला मी शाळेत असल्यापासून ओळखतेय. २०१० मध्ये बाबर आजमनं लग्नासाठी मला प्रपोज केलं होतं. माझाही होकार होता. मात्र आमच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे २०११ मध्ये बाबर मला पळवून घेऊन गेला. त्यानं मला वेगवेगळ्या ठिकणावर ठेवलं. काही दिवसानंतर त्यानं लग्न करण्याचा आपला निर्णय बदलला. इतकेच नाही तर पोलिसांत गेल्याच जिवे मारण्याची धमकीही दिली होती.

 

बाबर आझम पाकिस्तानचा भरवशाचा फलंदाज असून पाकिस्तान क्रिकेटचे भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे पाकिस्तान बोर्ड याकडे कशा पद्धतीने बघते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like