एक वर्ष पूर्ण होऊनही आपण काय काम केलं याबाबत एकही मंत्री सांगू शकला नाही ; फडणवीसांचा सरकारवर घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेने विश्वासघात करत तीन पक्षाचे सरकार स्थापन केलं. आता या सरकारला एक वर्ष झालं. पण एक वर्षात आपण काय काम केलं याबाबत एकही मंत्री सांगू शकला नाही” असा घणाघात हल्ला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केला आहे. नागपूर पदधीवर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपकडून पूर्व विदर्भ पदवीधर मेळावा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, या मेळाव्यात संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

“तीन पक्ष एकत्र येऊन भाजपला एकटं पाडू, असा या सरकारने प्रयत्न केला. मात्र भाजपवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे काहीच फरक पडत नाही. भाजपने कोरोना काळातसुद्धा देशभरात झालेल्या निवडणुका जिंकल्या”, असं फडणवीस म्हणाले.

“हे सरकार आहे की तमाशा? कोण काय करतं ते दुसऱ्याला माहीत नाही. मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान होत आहे”, असा घणाघाती आरोप फडणवीस यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like