इस्लामाबाद । पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे माजी सहाय्यक आणि अनुभवी नोकरशहा वकार मसूद खान म्हणाले की,”चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढेल. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये, त्याला चालू खात्यातील तूट 12-17 अब्ज डॉलरचा सामना करावा लागू शकतो.”
डॉन या वृत्तपत्राच्या रिपोर्ट नुसार, खान यांनी बुधवारी कराची येथील इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एडमिनिस्ट्रेशन (IBA) येथे एका पुस्तक लोकार्पण कार्यक्रमात सांगितले की,”पाकिस्तानचे पेमेंट संकट गंभीर होण्याची शक्यता आहे.”
अर्थव्यवस्थेवर दबाव आहे
त्यांना रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे की, “चालू आर्थिक वर्षात वाढत्या पेमेंटच्या संकटामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था दबावाखाली राहील. 2021-22 साठी देशाला चालू खात्यातील तूट 12 अब्ज अमेरिकन डॉलर ते 17 अब्ज डॉलर्स इतकी असेल.”
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कार्यक्रम पुन्हा लागू झाल्यानंतर देशाने व्याजदर, विनिमय दर, कर आकारणी आणि ऊर्जा धोरणांमध्ये मोठ्या बदलांची अपेक्षा करावी असे खान म्हणाले. खान यांनी अलीकडेच पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक (महसूल आणि वित्त) पद सोडले. त्यांनी 2013 ते 2017 पर्यंत फेडरल फायनान्स सेक्रेटरी म्हणून काम केले.
पाकिस्तान कर्जाच्या जाळ्यात अडकला
पाकिस्तान कर्जाच्या जाळ्यात अडकला आहे. पाकिस्तान ट्रिब्युनने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की,”पाकिस्तान सरकारचे संरक्षण आणि व्याजाचे पेमेंट गेल्या आर्थिक वर्षात (2020-2021) 4.1 ट्रिलियन पाकिस्तानी रुपयांवर पोहोचले आहेत. ही रक्कम पाकिस्तानच्या निव्वळ उत्पन्नापेक्षा 538 अब्ज रुपये अधिक आहे.”
26 ऑगस्ट रोजी या प्रकरणाची माहिती देताना, पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की,” कमाई आणि खर्च यातील फरक 3.4 ट्रिलियन रुपये आहे. किंवा असे समजा की, ते एकूण GDP च्या 7.1 टक्के होते. तूट सरकारी उद्दिष्टापेक्षा जास्त झाली आहे पण गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत जीडीपीच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे.” राज्य सरकारांकडून 3.3 अब्जांची बचत असल्याचे यामागील कारण सांगितले जात आहे.
तीन वर्षांपूर्वी जेव्हा इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ सरकार सत्तेवर आले, तेव्हा एकूण बजट तूट 2.2 ट्रिलियन रुपये किंवा GDP च्या 6.6 टक्के होती. सेंट्रल बँकेने व्याजदर 13.25 टक्क्यांपर्यंत वाढवल्यामुळे आणि दरवर्षी कर वसुलीचे लक्ष्य चुकल्यामुळे सरकार त्यावर नियंत्रण ठेवू शकले नाही.