हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PAN-Aadhaar Link : जर आपण आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या. कारण आता असे न केल्यास आपल्याला दुप्पट दंड भरावा लागेल. हे लक्षात घ्या कि, पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 होती. यानंतर यासाठी दंडासह 30 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
आता 30 जून ही शेवटची तारीखही या महिन्याच्या शेवटी येणार आहे. आणि यानंतर दुप्पट दंड भरावा लागेल. हे लक्षात असू द्यात कि, 31 मार्चनंतर 500 रुपये लेट फीस आकारण्यात आली आहे. म्हणजेच आता 30 जूनपर्यंत पॅन आणि आधार लिंक केले नाही तर 1000 रुपये दंड भरावा लागेल. ही लेट फीस Challan No ITNS 280 द्वारे देखील भरता येऊ शकेल. PAN-Aadhaar Link
केंद्र सरकार कडून पॅन-आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर असे न करणाऱ्याचे पॅन कार्ड बंद केले जाईल. पॅन कार्ड बंद झाल्यानंतर आपल्या अडचणी वाढतील. कारण आता जवळपास सर्वच ठिकाणी पॅन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच जर आपल्याकडे पॅन कार्ड नसेल तर आपल्याला डिमॅट खाते किंवा बँक खाते उघडता येणार नाही किंवा म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यासाठी खाते देखील सुरू करता येणार नाही. त्यामुळे लगेचच आपले आधार कार्ड पॅनशी लिंक करा. PAN-Aadhaar Link
लिंक कसे करावे ते जाणून घ्या ???
पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी इन्कम टॅक्स ई-फायलिंग https://incometaxindia.gov.in/ वेबसाइटला भेट द्या.
फॉर्ममध्ये पॅन आणि आधार क्रमांक टाका
तुमच्या आधार कार्डानुसार आपले नाव टाका
जर आधार कार्डवर फक्त तुमचे जन्म वर्ष नमूद केले असेल तर तुम्हाला बॉक्सवर खूण करावी लागेल
आता व्हेरिफाय करण्यासाठी इमेजमध्ये दिलेला कॅप्चा कोड एंटर करा
यानंतर “Link Aadhaar” बटणावर क्लिक करा
तुम्हाला एक पॉप-अप मेसेज दिसेल की, तुमचा आधार तुमच्या पॅनशी यशस्वीपणे लिंक झाला आहे. PAN-Aadhaar Link
हे पण वाचा :
PM Kisan: 11वा हप्ता चुकलेल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर !!! सरकारने e-KYC ची मुदत वाढवली
Multibagger stock : अवघ्या काही महिन्यांत ‘या’ 5 पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना दिला 2700% रिटर्न !!!
Gold Price : सोन्याच्या स्पॉट किंमतीत घट, सोन्यामध्ये गुंतवणूक कशी करावी हे समजून घ्या
EPF कि NPS यापैकी रिटायरमेंटसाठी कोणती योजना चांगली आहे हे समजून घ्या
‘DUNKI’ म्हणजे काय??? शाहरुख खानच्या ‘या’ चित्रपटाच्या थीमविषयी जाणून घ्या !!!