ज्येष्ठ तबलावादक पंडित विनायकराव थोरात यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – ज्येष्ठ तबलावादक पंडित विनायकराव थोरात यांचे वयाच्या ८५व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांनी पुण्यातील खाजगी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी प्रमिला आणि शिष्य असा परिवार आहे. हडपसर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘छोटूकाका’ या नावाने ते संगीत क्षेत्रात सगळ्यांना परिचित होते.

पंडित विनायकराव थोरात यांच्याविषयी
पंडित विनायकराव थोरात यांचा जन्म १८ मे १९३५ रोजी झाला. त्यांचे बालपण दौंड येथे गेले. वडील तबलावादक असल्याने त्यांना लहानपणीच तबल्याची गोडी लागली. त्यांनी तबल्याचे शिक्षण यशवंतबुवा निकम यांच्याकडे शास्त्रोक्त पद्धतीने घेतले. त्यानंतर त्यांनी रामकृष्णबुवा पर्वतकर यांच्याकडे पुढील शिक्षण घेतले. ते तबला वादनाचे कार्यक्रम करत असत.

तरुणपणात शास्त्रीय संगीतातील दिग्गज गायक मंडळींना त्यांनी उत्तम साथ दिली. यामध्ये मोगुबाई कुर्डीकर, पं.जसराज, पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. फिरोज दस्तूर,ज्योत्स्ना भोळे, वसंतराव देशपांडे, राम मराठे यांचा समावेश आहे. मात्र १९६२ नंतर त्यांनी आपले लक्ष नाट्यसंगीताकडे वळवले. त्यानंतर त्यांनी छोटा गंधर्व जयमालाबाई शिलेदार, कीर्ती शिलेदार यांच्या सोबत तब्बल ४५ वर्ष काम केले. राज्य शासनाचा”आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार यांच्यसह त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Comment