‘द फॅमिली मॅन 2’ ‘या’ दिवशी होणार रिलीज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी याच्या द फॅमिली मॅन या वेबसीरिजला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. त्यानंतर द फॅमिली मॅनच्या निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. ‘द फॅमिली मॅन’चा पुढील भाग याच महिन्यात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

जानेवारीमध्ये ‘द फॅमिली मॅन 2’ चा टीजर लाँच करण्यात आला होता. तेव्हापासून या सीरिजचे प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने वाट बघत होते. हि सिरीज अमेझॉन प्राईमवर रिलीज होण्याची शक्‍यता आहे. हि सिरीज मागेच रिलीज करण्यात येणार होती पण काही कारणामुळे ती पुढे ढकलण्यात आली.

या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री समांथा अक्किनेनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘द फॅमिली मॅन 2’ चा टीजर पाहिल्यानंतर मनोज वाजपेयीचा बदललेला अंदाज तुमच्या लक्षात येईल. या नव्या सीझनमध्ये मुसा जिवंत आहे की मेला, याचा उलगडा होणार आहे.

You might also like