पंजाबमध्ये राजकीय भूकंप; मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस आमदारांच्या बैठकीत सहभागी न होताच त्यांनी राज्यपालांची भेट घेण्यासाठी ते पोहोचले. राज्यपालांच्या भेटीनंतर अमरिंदर सिंग यांनी राजीनामा सूपर्द केला

अमरिंदर सिंग यांच्या विरोधात 40 आमदारांनी दंड थोपटल्यानंतर आज संध्याकाळी काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे. यात विधीमंडळ नेता निवडण्यात येणार आहे. सर्व प्रयत्न करूनही अमरिंदर सिंग आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील राजकीय युद्ध संपू शकले नाही. अपमानासह काँग्रेसमध्ये राहू शकत नाहीत,” असे अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधी यांना म्हंटल होत.

 

दोन महिन्यात काँग्रेस आमदारांची दिल्लीत तिसऱ्यांदा बैठक बोलावण्यात आली आहे. याचा अर्थ असा की आता माझ्यावर विश्वास राहिला नाही किंवा मी सरकार चालवू शकलो नाही. मात्र, यामुळे मला अपमानित झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आता हवं त्याला मुख्यमंत्री करा’, अशी संतप्त प्रतिक्रिया कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिली आहे.

You might also like