मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळांने आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली “ही” मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुस्लिमांना दिलेले आरक्षण मागे पडले. ते आरक्षण पुन्हा मिळावे, यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न करावेत, या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने दिल्लीत आमदार चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. त्यात राज्याचे उपाध्यक्ष इब्राहिम शेख, विदर्भ विभागाचे अध्यक्ष ओयस कादरी, औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष अहमद चाऊस, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष अहमद जब्बार, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नदीम मुजावर, काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष झाकीर पठाण आदी उपस्थित होते.

आमदार चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मराठा समाजाला 16 टक्के, तर मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण दिले होते. आमदार चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मराठा समाजाला 16 टक्के, तर मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण दिले होते; पण कालांतराने आरक्षणाला आव्हान दिल्याने त्याला स्थगिती मिळाली. भाजपच्या काळात दोन्ही आरक्षण रद्द झाली. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना आमदार चव्हाण यांच्या सरकारचा आहे. तसा अहवाल विधानसभेत मांडला व नंतर पारित करून मंजूर केला. त्यामध्ये मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा कोणताही उल्लेख नव्हता. ते आरक्षण पुन्हा द्यावे, यासाठी मुस्लिम समाजातील शिष्ठमंडळाने आमदार चव्हाण यांच्याशी संवाद साधला.

आमदार चव्हाण म्हणाले, ”माझ्या काळात राणे समिती गठीत केली होती. त्या समितीने दोन्ही समाजाचा सखोल अभ्यास करून अहवाल तयार केला. मराठा समाजासह मुस्लिम समाजाला त्यानुसार आरक्षण दिले गेले; पण पुढील सरकारच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे आरक्षण अस्तित्वात आले नाही. आम्ही आरक्षण दिल्यानंतर काहींना फायदा झाला; पण नंतर आव्हान दिले गेले. पुन्हा एकदा आरक्षणासाठी समाजाने एकत्र राहात विचारांची व न्यायालयीन लढाई करून आरक्षण मिळविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी माझे सहकार्य कायमच राहील व मी प्रयत्नशीलही राहीन.”