…तो पर्यंत फेटा बांधणार नाही; पंकजा मुंडेनी बांधली खूणगाठ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी । ‘जोपर्यंत बीडमधील सर्व उमेदवारांना गुलाल लागणार नाही. तो पर्यंत मी फेटा बांधणार नाही’, अशी खूणगाठ भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत बांधली. त्या आष्टी मतदार संघातील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार सुरेश धस आमदार भीमराव धोंडे, यांची उपस्थिती होती. पंकजा मुंडे यांनी यावेळी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.

‘माझ्या निवडणुकीकडे राज्याच लक्ष लागलय. हे काही नवीन नाही, स्व.गोपीनाथ मुंडे असताना देखील सगळ्या राज्याचे लक्ष इकडेच लागायचे.राष्ट्रवादीची लोक खोटा प्रचार करतात की, पंकजा मुंडेना भीती वाटते. मी महाराष्ट्रात प्रचार करुन माझा मतदारसंघ सांभाळते मला चिंता महाराष्ट्राची आहे. बीड जिल्ह्यात एकही बंडखोरी नाही. पाच वर्षांत पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यात कारभार नाही तर संसार केला’, अस पंकजा मुंडे सभेत म्हणाल्या.

प्रतिस्पर्धी असलेले आपले बंधू धनंजय मुंडे यांच्यावर पंकजा यांनी आपल्या खोचक टिकेतून निशाणा साधला. त्या म्हणाल्या कि,’धनंजय मुंडेसारखे कर्तृत्वान नेते राष्ट्रवादीत गेल्यामुळ राष्ट्रवादीचा भोपळा झाला. माझी निवडणूक काही अवघड नाही. विजय निश्चित आहे,’असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment