मी मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे ही तर अफवा, पंकजा मुंढेंचे स्पष्टीकरण

0
64
Pankaja Mundhe
Pankaja Mundhe
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावरुन रान उटलेले असताना भाजपा नेत्या पंकजा मुंढे मराठा आरक्षणावरुन नाराज असल्याचं वृत्त सोशल मिडियामधे व्हायरल झाले होते. यावर मुंढे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधल. ‘मी मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे ही तर अफवा’ असं विधान करत त्यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या आपल्या भुमिकेचे स्पष्टीकरण दिले आहे.

मराठा समाजाचे परळी येथील मैदानात आरक्षणासंदर्भात जे आंदोलन झाले तेव्हा मी तिथं जाऊन यासंर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलून आरक्षणाचा पाठपूरावा करेण असा शब्द दिला होता. त्यामुळे ‘मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन पंकजा मुंढे नाराज’ अशी चुकीची बातमी लावून लोकांच्या मनामधे मनभेद करण्याचा प्रयत्न टाळावा अशी मी विनंती करते’ असे मुंढे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तुम्ही नाराज होऊन बैठकीतून उठून गेला होतात? असे विचारले असता, ‘मराठा समाजाच्या आरक्षणाच्या उपसमितीची मी मुळात सदस्यच नाही. त्यामुळे बैठकीतून नाराज होऊन उठून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’ असे स्पष्टीकरण मुंढे यांनी दिले.

मराठा अारक्षणावर आपली भुमिका काय आहे असे विचारले असता, ‘आरक्षणाच्या विषयावर आज मुख्यमंत्री खुलासा करणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहीजे, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलं पाहिजे. मुख्यमंत्री स्वत: सुद्धा याच मताचे आहेत. आणि मला पुर्ण विश्वास आहे की ते योग्य आणि प्रबळ निर्णय घेतील’ असे मत व्यक्त केले.

मी मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे हि तर अफवा - पंकजा मुंढे | Maratha Reservation| Pankaja Mundhe

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here