हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बहीण खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याचे बोललं जातं होत. मात्र पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत हा दावा खोडून काढत आम्ही नाराज नाही असं स्पष्ट केले. तसेच टीम देवेंद्र, टीम नरेंद्र असं भाजपला मान्य नाही असेही पंकजा मुंडे यांनी म्हंटल.
पंकजा मुंडे म्हणाल्या, टीम देवेंद्र, टीम नरेंद्र असं भारतीय जनता पक्षाला मान्य नाही . प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष त्यानंतर मी असं धोरण आहे. ‘मी’ पणा भाजपात नाही. आम्ही, आपण ही संस्कृती भाजपात आहे आणि भाजपाच्या संस्कृतीला मानणारी मी पक्षाची सामान्य कार्यकर्ता आहे .
मी नेतृत्व नाही तर कार्यकर्ता आहे. पक्षाने घेतलेला निर्णय मला मान्य आहे त्यामुळे मी आणि प्रीतम नाराज असल्याचे कारण नाही असे पंकजा मुंडे यांनी म्हंटल.मला वाटत नाही की भाजपला मला संपवायच आहे असं म्हणत त्यांनी सामना अग्रलेखातील दावा खोडुन काढला.