मुंबई | अमित येवले
केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत’- (प्रधानमंत्री जन आरोग्य) योजनेचा देशभरात २३ सप्टेंबरला शुभारंभ होणार आहे. महाराष्ट्रात हा लोकार्पण सोहळा राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
आयुष्मान भारत योजनेमुळे दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. आयुष्यमान भारत योजनेसोबतच महाराष्ट्र सरकारतर्फे ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ एकत्रितपणे राबविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी याबाबत दिली.
केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी #आयुष्मानभारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’ चा देशभरात २३ सप्टेंबरला शुभारंभ.
महाराष्ट्रात राज्यपाल चे. विद्यासागरराव, मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या उपस्थितीत होणार लोकार्पण. #PMJAYlaunch pic.twitter.com/tH6r0SXqeR— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 21, 2018