हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पनवेल – कर्जत वरून प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी असल्यामुळे या मार्गांवरील रेल्वेचे जाळे सुरु करण्यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर पनवेल – कर्जत रेल्वेमार्गाचा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे येथील प्रवास अजून सोपा होणार असून प्रवाश्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
पनवेल – कर्जत मार्गाचा अडथळा दूर करण्यासाठी उच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दाखवला आहे. मात्र हे प्रकरण नेमक काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर पनवेल – कर्जत मार्गाचे काम सुरु आहे. या मार्गावर दोन रुळ टाकले जात आहेत. त्यातील एक रुळ हा खालापूर येथील एका शाळेला धोका पोहोचण्याची शक्यता होती. त्यामुळे यास विरोध करण्यात येत होता. हे प्रकरण थेट कोर्टात पोहोचले. या शाळेने या कामावर्ती याचिका दाखल केल्यामुळे हे काम थांबवण्यात आले होते. मात्र आता कोर्टाने कोणताही धोका नसल्याचे सांगितल्यामुळे हा अडथळा दूर झाला आहे.
रेल्वेने भिंत उभारण्याचा केला दावा
रेल्वे रुळाच्या कामामुळे शाळेला धोका पोहचेल यामुळे ही याचिका सादर करण्यात आली होती. मात्र रेल्वे अधिकारी आणि शाळा प्रशासनाने प्रत्यक्ष जावून शाळेजवळील रेल्वेचा ट्रॅक कसा बांधता येईल याची पाहणी केली. याचा एक आराखडा रेल्वेने प्रस्तुत केल्यानंतर रेल्वेने दावा केला की, दहा फूट भिंत उभारली जात असल्याचे सांगितले. त्यामुळे यावर न्यायालयाने निर्णय देत या कामास सुरुवात करावी असे सांगितल्यानंतर कामास वेग आला आहे.
2025 पर्यंत पूर्ण होणार मार्ग
पनवेल – कर्जत ही मार्गीका तयार झाल्यानंतर प्रवाश्यांचा वेळ वाचणार आहे. या प्रकल्पास 2016 सालीच मंजुरी देण्यात आली होती. या मार्गिकेसाठी तब्बल 2,783 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पनवेल वरून कर्जतला जाण्यासाठी या मार्गीकेमुळे आर्धा तासाचा वेळ वाचणार आहे. नवीन तयार होणारी ही लोकल रेल्वे मार्गीका ऐकूण पाच स्थानकांना जोडली जाणार आहे. त्यामध्ये पनवेल, चौक, मोहापे, चिखले व कर्जत यांचा समावेश असणार आहे. ही मार्गीक एकुण 9.6 किमीची आहे.