हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्यावर्षी व यंदा मोठ्या प्रमाणात पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यावर्षी तर नुकत्याच आलेल्या चक्री वादळामध्ये कोकणातील शेतकऱ्यांच्या फळबागांचे, शेतांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीवरून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. कोकण किनारपट्टी तसेच इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे चक्री वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे त्याचे कंबरडे मोडले आहे. या शेतकऱ्यांना केवळ काकडावरचे आदेश व पोकळ घोषणा राज्य सरकारने देऊ नये, अशी टीका भांडारी यांनी केली आहे.
कोकणातील नुकसानी संदर्भात आज भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी माहिती घेतळी. यावेळी त्यांनी माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते पुढे म्हणाले, “मागील वर्षीची नुकसान भरपाईही अजून शेतकयांना मिळालेली नाही. या सरकारकडे आंबा-कोकम-काजू, नारळ-पोफळी आणि मच्छीमारी तसेच पर्यटन व्यवसायावर जगणाऱ्या कोकणी माणसासाठी कसलेही धोरण नाही.”
मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह चक्री वादळाचा फटका हा कोकणष राह्यच्या किनारपट्टीला बसला आहे. किनारपट्टीवरील जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या फळ बाग, पिकांचे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदतीसाठी प्रत्यक्ष पॅकेज द्यावे. केवळ घोषणा करू नये,, अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भांडारी यांनी केली आहे.