टीम, HELLO महाराष्ट्र । सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा आणि महत्वाचं म्हणजे झटपट तयार होणारे “ओल्या नारळाचे पराठे” तयार करण्यासाठी लागणार साहित्य पाहुयात ,
साहित्य :- अर्ध्या नारळाचा चव , एक वाटी कणीक , एक वाटी मैदा , तेल आणि तूप , चार-पाच हिरव्या मिरच्या , कोथिंबीर आणि थोडं जिरं यांचं वाटण , एक चमचा साखर , चवीनुसार मीठ .
कृती :-
१) नारळाचा चव नारळाचंच पाणी घालून बारीक वाटून घ्यावा .
२) मैदा आणि कणीक एकत्र करून त्यात वाटण , मीठ , साखर घालून दहा मिनिटं घट्ट भिजवून ठेवावं .
३) मोठया लिंबाएवढा गोळा घेऊन प्लास्टिक पेपरवर छोटे पराठे लाटावे आणि तूप सोडून नॉनस्टिक तव्यावर खमंग भजावे .
४) साखरे ऐवजी दोन पेढे बारीक करून घातल्यास छान चव येते .