दिलासादायक! परभणीत ‘त्या’ कोरोनाग्रस्त तरूणाच्या संपर्कातील ४३ जणांच्या टेस्ट निगेटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
दोन दिवसापूर्वी परभणी शहरामध्ये पाहुण्यांना भेटायला आलेला २१ वर्षाचा तरुण कोरोना पॉझिटिव्ह सापडला होता. त्यानंतर ग्रीनझोन मध्ये असणाऱ्या परभणी शहरांमध्ये ३ दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवारी उशीरा सदरील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांपैकी ४३ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासन व आरोग्य विभागाला धीर मिळाला आहे.

१६ एप्रिल रोजी पुणे येथून मोटरसायकलवरून प्रवास करत आलेला हिंगोली जिल्हातील जवळाबाजार येथील तरुण एमआयडीसी भागात पाहुण्यांच्या घरि राहत असताना कोरोना (covid-19 )संसर्गग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले होते . त्यामुळे आतापर्यंत ग्रीन झोन मध्ये असणाऱ्या परभणी जिल्हामध्ये एकच खळबळ उडाली होती. यानंतर परभणी शहरामध्ये तात्काळ तीन दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली होती. आज संचारबंदी चा दुसरा दिवस असून शुक्रवारी उशिरा जिल्हावाशीयांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे.

या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ४९ जणांचे तपासणी अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवले असता त्यापैकी ४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहीती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. अजून ६ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. दरम्यान जिल्ह्यातील सर्वच चेक पोस्टवर कसून तपासणी करण्यात येत आहे .जिल्ह्यात चोरून लपून येणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यात आले असून अशा व्यक्तींना आश्रय देणाऱ्या लोकांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलयं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment