परभणी प्रतिनिधी। गजानन घुंबरे
नियमबाह्य काम आणि आपली मनमानी करण्यासाठी, स्वाभिमानी शेतकरी संघटना दादागिरी करत असल्याचा आरोप करत, परभणी कृषी अधीक्षक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज निषेध आंदोलन केल आहे. काळ्या फिती बांधून कामकाज चालू ठेवल असल तरी स्वाभिमानीच्या काल झालेल्या आंदोलनाच्या विरोधात. आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर रब्बी पिकांसह फळपिकांचे नुकसान झाले असून पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत यासाठी ५ फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयांमध्ये जिल्हा कृषी अधीक्षकांच्या खुर्चीला चपलांचा हार व सडलेले संत्रे टेबलवर फेकून देत आंदोलन करण्यात आले होते. यावेळी सदरील आंदोलकांनी पीक वीमा मिळावा यासाठी, कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी केली होती. याप्रकरणी आता शेतकरी संघटना नियमबाह्य काम करण्यासाठी दादागिरी करत असल्याचे म्हणत जिल्हा कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन करत काळ्या फिती लावून दिवसभर कामकाज केल आहे . यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हा कृषी अधीक्षक एस.बी.आळसे असे म्हणाले की, हवामान आधारित फळपीक विमा भेटण्यासाठी कृषी विभागाच्या पंचनाम्याची गरज नसून निकषानुसार ते शेतकऱ्यांना मिळत असते . परंतु मागील काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे नियमबाह्य काम करण्यासाठी आमच्यावर दबाव टाकत आहेत .त्यामुळे या दादागिरीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.