परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे |
परभणी शहरसह जिल्हामध्ये रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. बुधवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या पाऊसाने जिल्ह्यात सर्वदूर जोरधार पडत पाणी पाणी केलयं. यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, पाऊस झाला आहे. झालेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका, जिल्ह्यातील तालुक्यांना जोडणाऱ्या वाहतुकीवर झाला असून, परभणी – जिंतूर आणि परभणी – गंगाखेड रोडच्या रखडलेल्या कामामुळे, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या दोन्ही महामार्ग रस्त्याचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरु असून, ते पूर्ण होऊ शकलेले नाही. यामुळे दुचाकी आणि पायी प्रवास करणार्या नागरिकांना, रस्त्यावर साठलेल्या या पाण्यामधून रस्ता काढावा लागत आहे. तर मोठी वाहने पाण्यामधून जाऊ शकत नसल्याने, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
जिल्ह्यात रात्री एकूण ३३ .६५ मिमी पावसाची नोंद झालीय. यात सर्वाधिक मानवत तालुक्यात ६१ मीमी पाऊस झाला आहे.त्या पाठोपाठ परभणी तालूका ४८ .३८, पाथरी ४८. ३३, सेलू ३२ .२०, सोनपेठ २६ , पालम २३ .६७, पूर्णा २३ .२०, गंगाखेड २१, तर सर्वात कमी जिंतूर मध्ये १८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आलीय. दरम्यान १ जुन पासुन आतापर्यंत जिल्ह्यात ७० .३४ मिमी पावसाची नोंद असुन सर्वाधिक ११३.६६ मिमी पाऊस पाथरी तालुक्यात तर सर्वात कमी जिंतुर तालुक्यात ३७ .१६ मीमी पावसाची नोंद झाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.