परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटना आयोजित महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद किशोर व किशोरी कबड्डी निवड चाचणी स्पर्धेत परभणीच्या दोन्ही गटातील संघानी उत्कृष्ठ कामगिरी करत यश संपादन केलं आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटना यांच्या वतीने दि. २३ ते २५ जानेवारी दरम्यान महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद किशोर व किशोरी या दोन गटांसाठी कबड्डी निवड चाचणी स्पर्धा अहमदनगर येथे यशस्वी रित्या संपन्न झाल्या. यामध्ये परभणी जिल्हा किशोर गट ( मुले) व किशोरी गट ( मुली )कबड्डी संघाने चांगली कामगिरी करुन जिल्हाचा नावलौकिक केला.यावेळी मुलींच्या किशोरी गटाने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला तर किशोर गट मुलांनी अतिशय अटीतटीची झुंज देत तिसरा क्रमांक पटकावला.
सदर निवड चाचणीत 16 वर्षाखालील व 55 किलो वजन गटामध्ये राज्यातील 25 जिल्ह्यातील मुलामुलींच्या सघांनी सहभाग नोंदवला होता.ज्यामध्ये परभणी जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत यशस्वी मजल मारली. स्पर्धेतील अंतिम सामना मुलींचा किशोरी गट परभणीविरुद्ध मुबंई उपनगर झाला. या सामना जिकून मुलांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर मुलांचा किशोर गट सर्व सामन्यांमध्ये उत्कृष्ट चढाई व क्षेत्ररक्षण करत सेमी फाईनलमध्ये सहभागी झाला. यावेळी सेमी फाईनल परभणी विरुद्ध ठाणे झाला. अतिशय अटीतटीच्या सामन्यात परभणी जिल्ह्याने तिसरा क्रमांक पटकावला.
दरम्यान दोन्ही गटात उत्कृष्ट खेळ दाखवत यावेळी खेळाडूंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नुकताच परभणी जिल्हा किशोर गटाचा 22 दिवसांचा कॅम्प सोसियल युनिटी फाउंडेशन ने परभणी जिल्हा क्रिडा संकुलात घेतला होता यावेळी कबड्डी चे प्रशिक्षण दिले गेले होते. याचा खेळांडूना कामगिरी करताना फायदा झाल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले.
सदरील संघाना मंगल पांडे , माधवराव शिंदे, गोविंद अवचार, अभिजित जाधव, सुनिल शिंदे, योगेश जोशी, कलिम, किशोर भोसले, सुर्यकांत सातपुते,परमेश्वर जाधव यांचे मार्गदर्शन तर परभणी जिल्हा पोलीस सहकारी मित्र, जिल्हा क्रिडा अधिकारी पवार यांचे विशेष सहकार्य होते. यावेळी दोन्ही संघानी चांगली कामगिरी करुन जिल्हाचा नावलौकिक केल्या बद्दल कबड्डीचे प्रशिक्षण देणारे जिल्हातील सर्व क्रीडा मंडळे,क्लब, मार्गदर्शक, प्रायोजक व परभणी जिल्हा कबड्डी संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक एकता संघटना व परभणी जिल्हा पोलीस यांनी अभिनंदन केलं आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
बाईट देतो पण बुट घेवू द्या; पंकजांच्या उपोषणात देवेंद्र फडणवीसांना बूट चोरी जाण्याचीच धास्ती
आमदार जयकुमार गोरेंची शिवीगाळ व दमदाटी तर शिवसेना नेते शेखर गोरेंवर अपहरणाचा गुन्हा दाखल
आमदार जयकुमार गोरेंची शिवीगाळ व दमदाटी तर शिवसेना नेते शेखर गोरेंवर अपहरणाचा गुन्हा दाखल