परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशभरामध्ये लॉक डाऊन करण्यात आले. प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून हे सर्व केले जात आहे. यादरम्यान हे सर्व सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी केले जात असताना काहीजण मुद्दामून किंवा अनावधानाने याचं पालन करत नाहीयेत .त्यामुळे या विषाणूची बाधा होण्याची शक्यता वाढली आहे .पण काही लोक असेही आहेत की जे स्वतःहून दोन यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत आहेत .परभणी जिल्ह्यातील सेलु तालुक्यातील येणाऱ्या रायपुर येथील ग्रामस्थांनी स्वतःहुन पुढाकार घेत प्रशासनाला मदत करण्याचे ठरवले आहे.
त्यांनी गावातून कोणी बाहेर जायचं नाही ,आणि बाहेरच्यांनी गावात यायचं नाही! असे ठरवले असून त्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी गावात येणाऱ्या तीनही मुख्य रस्त्यांचे प्रवेश बंद करण्यात आले आहेत. याठिकाणी रस्त्यामध्ये मोठमोठी लाकडे आडवी टाकत, प्रतिबंध करण्यात आलायं. त्यामुळे या गावातून चारठाणा ,हातनुर ,वालूर या गावचा जाण्याचा संपर्क तोडण्यात आला आहे. गावकऱ्यांनी ही घराच्या बाहेर निघू नये, अशी विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे गावातील लहान मोठी मंडळी आता घरातच बसून आहे. युवकांनी एकत्र येत हा सर्व प्रयत्न केला आहे .सोबतच गाव परिसरामध्ये निर्जंतुकीकरण करण्यात साठी फवारणीही करण्यात आली आहे.
युवा गावकरी राजेंद्र गाडेकर, माणिक काजळे, वैभव गाडेकर, गुलाब गाडेकर,आन्वर लाला,पप्पु गाडेकर यांनी पुढाकार घेत लॉक डाऊन यशस्वी करण्याचा जणू चंग बांधलाय . इतरही गावांनी व युवकांनी शासन प्रशासन याला सहकार्य करत ,असा प्रकारे प्रेरणादायी पुढाकार घेत आपल्या गावांमध्ये लॉक डाऊन यशस्वी केल्यास कोरोना विषाणू गावात प्रवेश करणार नाही व खऱ्या अर्थाने आपण कोरोनाशी लढा देऊ हे दाखवून दिले आहे.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.