परभणी रेल्वे स्थानकावर करोना विशेष कक्षाचे उद्घाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

मुंबई आणि पुणे येथे करोनाची मोठ्या प्रमाणात संसर्ग होत असल्याने मूळचे परभणीचे असलेले नागरिक, आता परत येऊ लागले आहेत. या नागरिकांनी घाबरून न जाता संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य कारण्याचे आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी केले आहे.

परभणी रेल्वे स्थानकावर यासाठी विशेष कक्षाचे उद्घाटन करण्यात आले असून, यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी, बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांशी संवाद साधला.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी मुगळीकर म्हणाले, ‘कोरोना हा बरा होणारा आजार असून नागरिकांनी न भीता स्वतःची काळजी घ्यावी. तसेच सॅनिटायजरने हात स्वच्छ करण्याचे सांगितले. जेणेकरून करोनाचा विषाणू पसरणार नाही. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून काळजी घ्यावी’ असे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment