परभणी प्रतिनिधी। जमिनीचा जुना वाद विकोपाला गेल्याने पाथरी तालुक्यातील उमरा येथे सात जणांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे गाव आणि परिसरामध्ये दहशतीचं वातावरण तयार झाल आहे. पाथरी तालुक्यातील उमरा गावात राहणाऱ्या, शेळके कुटुंबाला त्याच गावातील काही जणांनी जमिनीच्या जुन्या वादातून जबर मारहाण केली.
मारहाणीत शेळके कुटुंबातील तीन महिलांसह, पुरुष जखमी झालेत. जखमींना परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आहे.जखमींमध्ये वंदना हनुमान शेळके, स्वाती मारोती शेळके, मारोती यशवंत शेळके, बाळासाहेब यशवंत शेळके, यशवंत काशीबा शेळके यांचा समावेश आहे. मारहाण झालेल्या महिलापैकी एक महिला चार महिन्याची गरोदर असल्याची माहिती समोर येत आहे.
पाथरी पोलिस ठाण्यात शेळके कुटुंबियांना मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अजून कुणाच्या अटकेची माहिती मिळाली नसून,पोलीस तपास सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
इतर काही बातम्या-
सणासुदीच्या मुहूर्ताला यंदा ‘मंदी’चे विघ्न; वस्तू ,प्रॉपर्टी खरेदीबाबत ग्राहकांचा निरुत्साह
वाचा सविस्तर – https://t.co/j7QSyoeXIc@INDIANECONOMY3 @Economyae @narendramodi #Economyslowdown #EconomyCrisis
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 9, 2019
फोटोग्राफर बनणार का आमदार? संघर्षमय परिस्थितीत लढणाऱ्या किशोर तुपारेंची लढत लक्षवेधी
वाचा सविस्तर – https://t.co/KoKVSbOiMx@adhogati @BJP4Maharashtra @Bahujan4India #vidhansabha2019#maharashtraelection2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 9, 2019
उदयनराजेंच्या संपत्तीत पाच महिन्यांत दीड कोटींची भर
वाचा सविस्तर – https://t.co/ghVcSIbAag@Chh_Udayanraje @BJP4Maharashtra @NCPspeaks #loksabha2019#Vidhansabha2019 #electioncommison
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 9, 2019