हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांच्यात अध्यक्षांच्या निवडीवरून चांगलाच वाद रंगला असताना संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी केल्या जाणाऱ्या नवीन विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा फॉर्मुला सांगितला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचे नियम बदलण्यात आलेले आहे. अध्यक्षांची निवड ही हात उंचावून किंवा आवाजी मतदानाने केली जाणार असल्याची माहिती मंत्री परब यांनी दिली.
मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांची निवड हि लवकर केली जाणार आहे. यासाठी महाविकास आघाडीमधील नेते आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यांच्याकडे आम्ही अध्यक्षांच्या निवडीबाबत वेळ आणि तारीख ठरवण्याचा प्रस्ताव पाठविलेला आहे. आम्ही अधिवेशनाच्या शेवटची तारीख अध्यक्षांच्या निवडीबाबत निवडणूक घेण्याची दिलेली आहे. त्यामुळे आता राज्यपाल याबाबात काय तो निर्णय घेतील.
एसटी कामगारांकडून विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या एक महिन्यापासून आंदोलन केले जात आहे. कामगार हे आमचेच आहेत. त्यांना आम्ही अनेकवेळा विनन्ती केली आहे की तुम्हाच्या लवकर कामावर रुजू व्हावे. आम्ही काय कामगारांचे वैरी नाही. त्यामुळे कामगारांनी अजूनही संप करून विलीनीकरणाचा मुद्दा ताणू नये. लवकर कामावर हजर होऊन काम सुरु करावे, असे आवाहन, यावेळी मंत्री परब यांनी केले.