मुंबई । महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दरी वाढवण्यास कारणीभूत ठरलेले पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या ५ नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. पारनेर नगर पंचायतीचे राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ५ नगरसेवक पुन्हा एकदा शिवसेनेत परतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते आज स्वगृही परतले.
या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याची चर्चा होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर हा माघारीचा निर्णय झाला आहे. हे सर्व नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत. अखेर आज त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेनंतर पहिल्या वर्षातच अंतर्गत रंगलेला हा फोडाफोडीचा खेळ चर्चेचा विषय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या घडामोडींमुळं कमालीचे नाराज झाले होते. आमचे फोडलेले नगरसेवक परत करा, असा निरोप ठाकरे यांनी अजित पवारांना दिला होता. त्यानंतर आज महत्त्वूपर्ण घडामोडी घडल्या. या नगरसेवकांना मुंबईत बोलावण्यात आले. तिथं प्रथम पवार आणि नंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली. त्यानंतर त्यांना मातोश्रीवर जाण्यास सांगण्यात आले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”