भारतात कोरोनावरील Remdesivir औषधाचा तुटवडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील नामांकित फार्मा कंपनी असलेली आता सिप्ला पुढील एक ते दोन दिवसांत कोरोना विषाणूवरील रूग्णांच्या उपचारासाठी प्रभावी असलेले ‘रेमडेसिव्हिर’ या औषधाचे आपले वर्जन सादर करेल. या कंपनीने एका वृत्त वाहिनीला याबाबतची माहिती दिली. सिप्लाच्या रेमेडीसीव्हर या औषधाची पहिली बॅच ही दमणमधील सॉवरेन फार्मा यांच्या प्लांटमधून बाहेर आली आहे. कंपनीने रेमडेसिव्हिरचे हे स्वदेशी वर्जन तयार करण्यासाठी सॉवरेन फार्माशी करार केला आहे. अमेरिकन औषध नियामक यूएसएफडीएने आपत्कालीन परिस्थितीत कोविड -१९ च्या रूग्णांना रेमडेसिव्हिर देण्याची मान्यता दिली आहे.

सिप्लाने मुंबईतील बीडीआर फार्माशी रेमेडिसिव्हिर तयार करण्यासाठी करार केला आहे, जी या औषधासाठी अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल घटक (एपीआय) तयार करते. त्याच वेळी, बीडीआर फार्माने तयार केलेला डोस आणि पॅकेजिंगसाठी सॉवरेन फार्माशी करार केला आहे. सिप्लाचे सीएफओ केदार उपाध्याय यांनी एका वृत्त वाहिनी बोलताना सांगितले की, आम्ही येत्या 1-2 दिवसात रेमडेसिव्हिर लाँच करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही अद्याप याच्या एकूण पुरवठ्यावर कोणतेही भाष्य करू शकत नाही, परंतु बाजारातील मागणीपेक्षा असलेल्या या पुरवठ्यात मोठी तफावत आहे.

गिलियडचे पेटंट असलेल्या या औषधाची रेमडेसिव्हिरला भारतात कोविड -१९ च्या रूग्णांच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. हे औषध अद्यापही क्लिनिकल ट्रायल मध्ये आहे, मात्र या औषधाने गंभीर कोविड -१९ च्या रूग्णांमध्ये व्हायरलचा लोड कमी करण्याचे पुरावे दर्शविले आहेत. सॉवरेन फार्माने पाठवलेल्या या औषधांच्या कुपींचा आकडा अद्याप उघडकीस आलेला नाही. कंपनीने याबाबत म्हटले आहे की, याचे उत्पादन दरमहा 95,000 कुपीपर्यंत वाढवण्याची क्षमता आहे. अलीकडेच, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (सीडीएससीओ) सॉवरेन फार्माच्या प्लांटची पाहणी केली आणि एका आठवड्यातच हे औषध तयार करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी घेतली.

सिप्ला,सिप्रेमी या ब्रँड नावाने रेमडेसिव्हिर प्रति बाटली 4,000 रुपये दराने विकेल. उपाध्याय यांनी खुलासा केला की, कंपनी रिमोडवीर उत्पादन सुविधा सुरू करण्याच्या प्रगतीत होती. आतापर्यंत हेटरो फार्मा ही एकमेव अन्य कंपनी आहे ज्याने प्रति बाटली 5,400 रुपये दराने हे औषध बाजारात आणले आणि त्यांनी आतापर्यंत भारतात 20,000 कुपी पुरवल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment