हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत ही नागरिकांच्या पसंतीस चांगलीच पडत आहे. त्यामुळे त्यामध्ये अजून कोणत्या चांगल्या सुविधा प्रवाश्यांना देता येतील याकडे रेल्वेचे लक्ष आहे. असे असताना शिर्डी – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस तुन प्रवास करणाऱ्या एका प्रवाश्याने रेल्वेतील मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
कोणी केली तक्रार?
मुंबईत राहणाऱ्या कमलाकर शेनॉय हा शिर्डी – मुंबई या एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असताना त्यांनी जेवण मागवले. मात्र त्यामध्ये त्यांना जाड आणि कडक पोळ्या, दही आंबट, डाळीमध्ये डाळ नसल्याने तसेच भात खाण्यासाठी लाकडी चमच्याची सुविधा नाही त्यामुळे ते खाणे आव्हानात्मक होत. अशी तक्रार त्यांनी सोशल मीडिया अकॉउंटवर केली आहे.
Absolute substandard food in Vande Bharat train 7.55 pm from Nasik road to Mumbai. Chapati thick hard, curd sour, wooden spoon how can we eat rice. No dal. No wash basin outside. Should a commuter wait to wash hands if there is que for using toilet. Visionless planning pic.twitter.com/F23i4Jgv9B
— Kamlakar Shenoy (@Kamlakar_Shenoy) November 5, 2023
वॉश बेसिंगही नाही
एकीकडे वंदे भारत ही सुविधानी नटलेली दाखवत दुसरीकडे प्रवाश्यांकडून रेल्वेच्या गैरसुविधेबाबत तक्रारी येताना दिसून येत आहेत. शेनॉय यांनी जेवणाबाबत तक्रार केली असताना त्यांनी त्यात वॉश बेसिंगचीही नोंद केली आहे. रेल्वेत स्वछतागृह आहेत मात्र प्रत्येक डब्यात स्वछता गृहच्या बाहेर वॉश बेसिंग नसल्याने हात धुण्यासाठी रांगेत थांबावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
IRTC ने दिला प्रतिसाद
शेनॉय यांच्याशी तक्रारीनंतर IRTC ने प्रतिसाद देत सांगितले की “तुमच्या तक्रारीवर लवकरच उपाययोजना केल्या जातील. ही तक्रार संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोहचवली जाईल.” या प्रतिसादामुळे प्रवाश्यांना अश्या घटनेला समोर जावं लागणार नाही अशी आशा व्यक्त केली जात आहे.