याला म्हणतात आयडियाची कल्पना!! झोपेसाठी तरुणाने ट्रेनमध्ये बांधली चक्क बेडशीटची झोळी (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय लोक केव्हा कधी कुठे काय करतील ह्याचा नेम नाही. मग ती ट्रेन असो किंवा अजून कोणते ठिकाण. परिस्थिती कोणतीही असो त्यातून मार्ग काढणार नाही तो भारतीय कुठला. सध्या असाच एक व्हिडीओ सोशियल मीडियावरती प्रचंड वेगाने व्हायरल होताना दिसून येत आहे. या विडिओ मध्ये एक रेल्वे प्रवाशाने जागा नसल्याने झोपेसाठी ट्रेनमध्येच चक्क बेडशीटची झोळी बांधल्याचे दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओ हा 21 ऑगस्ट रोजी एका इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला होता. या विडिओ मध्ये आपण पाहू शकता कि, एका ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रचंड गर्दी दिसत आहे. यावेळी बसण्यासाठी जागा नसल्यामुळे एका तरुणाने चक्क बेडशीट ट्रेनच्या स्लीपिंग सीटला एका झोळी प्रमाणे बांधून त्यात लहान मुलासारख झोपी गेला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये काही लोक आपल्या बॅग डोक्याखाली घेऊन झोप घेतानाही ह्यामध्ये दिसून येत आहे. सध्या हा विडिओ जोरदार चर्चेत येत आहे.

https://www.instagram.com/reel/CwZo434pvOS/?utm_source=ig_embed&ig_rid=50a5e0c4-bc52-460b-899f-d8baa4bf3f75

का होतेय व्हिडीओची चर्चा?

भारतीय रेल्वे ही प्रवासासाठीचे उत्तम साधन मानले जाते. परंतु ह्यामध्ये होणारी अतिरिक्त माणसांची गर्दी ही व्यक्तीला रेल्वे प्रवासापासून दूर ठेवते. ह्या व्हिडीओ मध्ये तेच दाखवण्यात आले आहे. प्रचंड गर्दी असल्या कारणामुळे तरुणाने मधला मार्ग काढत बेडशीटची झोळी करत रेल्वेची खरी स्थिती दाखवून देण्याचा जणू काही प्रयत्न केला असावा. अशी चर्चा आता नेटकऱ्यांमध्ये होताना दिसून येत आहे.

विडिओ वर काय बोलतायते नेटकरी?

हा व्हिडीओ पाहून अनेकजणांनी त्यावर काही मेजशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील एकजण म्हणतो, “ह्या व्यक्तीला ट्रेनपेक्षा जास्त त्याच्या ब्लॅंकेटवर विश्वास असावा ” तसेच इतर लोक बोलतायत की “हा व्यक्ती सर्वात सुखी आहे ” तर एकजण लिहितो की “अशीच परिस्थिती मी तिरुपतीला जाताना झाली होती.” अश्याप्रकारच्या अनेक नेटकऱ्यानी कंमेंट बॉक्स मध्ये आपलं मत व्यक्त केलं आहे. आत्तापर्यंत ह्या व्हिडीओला तब्बल 950k लाईक्स मिळाल्या आहेत. तर 3708 लोकांनी ह्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच 575k लोकांनी हा व्हिडीओ लोकांमध्ये शेअर केला आहे.