मतिमंद अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात आरोपींची संख्या वाढली

पाटण | पाटण येथील मतीमंद अल्पवयीन मुलीला बाहेर फिरायला आणि खायला देण्याच्या बहाण्याने नेवून बलात्कार झाल्याची घटना उघडकीस गेल्या आठवड्यात उघडकीस आलेली होती. याप्रकरणी पाटण पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून याप्रकरणी 9 आरोपींना 12 तासात अटक करण्यात आली होती. सर्व आरोपींना कोर्टात हजर केले असता 8 जणांना 10 दिवसाची तर महिलेस 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता महिलेच्या पोलिस कोठडीत आणखी वाढ करण्यात आलेली आहे. तर एका 60 वर्षीय वृध्दासह दोघांना अटक करण्यात आल्याने आरोपींची संख्या 11 झालेली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटण येथील एका महीलेने दि. 27/01/2022 रोजी ते 18/2/2022 या दरम्यान तिच्या परीचयाच्या एका अल्पवयीन व मतीमंद मुलीचा गैरफायदा घेवून तिला बाहेर फिरायला नेण्याचे बाहेर खाऊ खायला देण्याचे व पैसे देण्याचे आमीष दाखवुन तिला बाहेर घेवून गेली. मुलीला पाटण व आजुबाजुचे परीसरातील लोकांशी ओळख करून देवुन त्यांचेशी शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. सदर पाटण व आजुबाजुचे परीसरातील 10 लोकांनी सदर अल्पवयीन व मतीमंद पिडीत मुलीवर वेळोवेळी व वेगवेळ्या ठिकाणी नेवुन वारंवार बलात्कार केला आहे.

याबाबत यातील पिडीत अल्पवयीन मतीमंद मुलीचे आईने दिले तक्रारीवरून पाटण पोलीस सदर गुन्हयातील सर्व 9 आरोपींना अटक करण्यात आली होती. आता यामध्ये आणखी दोघांना अटक करण्यात आलेली असून आरोपींच्यात 60 वर्षीय वृध्दाचाही समावेश आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.