परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
परभणीतील पाथरी येथील संत साईबाबा मंदिर परिसर विकास योजनेअंतर्गत जमीन संपादन तसेच विविध विकासकामांसाठी रस्ते रुंदीकरण व जमीन संपादनाची वास्तविक मोजणी चा शुभारंभ आज आमदार व श्रीसाई मंदिर विकास कृती समितीचे अध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते करण्यात आला.
महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने पाथरी येथे साई मंदिरच्या विकासासाठी १९८ कोटी रुपये दिले आहेत. श्री संत साईबाबा विकास योजनेत नमूद केल्यानुसार शहरातील रस्त्यांची रुंदी आणि साई बाबा मंदिरापासून परीसरातील ४० मीटर पर्यंतच्या रस्त्यांचे रुंदीकरण १२ मीटर केले जाईल. मंदिर संकुलाच्या विकासासाठी भूसंपादनाच्या वास्तविक सर्वेक्षण कामाचे उद्घाटन बुधवारी १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना आमदार दुर्रानी म्हणाले की, “सर्व साई भक्तांना संत साईबाबांच्या जन्म मंदीर परीसराचा विकास हवा आहे. मंदिर परिसर विकासासाठी सर्व नागरिक जमीन देण्यास तयार आहेत. काम विकास आराखड्यानुसार राज्य सरकार लवकरच निधी उपलब्ध करुन देईल . विकासासाठी नगरपालिका पाथरी व भूमी अभिलेख कार्यालय यांच्या संयुक्त गठीत पथकाकडून गणनेची कामे लवकरच पूर्ण झाल्यावर विकासाची कामे सुरू केली जातील असेही त्यांनी जाहीर केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”