गडचिरोली प्रतिनिधी | कोरची तालुक्यापासून ४ किमी यांचे वेळीच रुग्णवाहिका न पोहोचल्यामुळे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार कुरेशी शकील शेख यांची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्यांच्या मुलांनी ग्रामीण रुग्णालय कोरची येथे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ग्रामीण रुग्णालय कोरची येथे संपर्क होऊ शकला नाही. नंतर माहिती काढली असता ग्रामीण रुग्णालय येथील दोंनी रुग्णवाहिका भंगार अवस्थेत असल्याचे आढळून आल्यानंतर 108 क्रमांकाचे रुग्णवाहिकेला सकाळी आठ वाजता संपर्क केले असता ती सुद्धा सकाळी 10 वाजता आली म्हणून रुग्णाला भरती करण्याकरिता झालेल्या उशीरामुळे रुग्णांचे जीव गेल्याची माहिती रूग्णाच्या नातेवाईकाकडून देण्यात आली.
ग्रामीण रुग्णालय कोरची येथील भोंगळ कारभार काही नवीन बाब नाही कित्येकदा तक्रारी करून सुद्धा परिस्थिती जैसे थे. या ग्रामीण रुग्णालयात दोन रुग्णवाहिका देण्यात आले आहेत. 102 आणि 104 क्रमांकाच्या रुग्णवाहिका देण्याचे कारण म्हणजेअतिदुर्गम क्षेत्रात मोडणाऱ्या कोरची तालुक्यातील जनतेला वेडीच सुविधा मिळावी म्हणून, परंतु 104 क्रमांकाची रुग्णवाहिका मागील कित्येक महिन्यापासून भंगार अवस्थेत असून याबाबत दोन महिन्यापूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी भ्रष्टाचार निवारण समिती कोरची च्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली असता फक्त मिळाले ते खोटे आश्वासनच. 104 क्रमांकाची रूग्णवाहिका भंगार अवस्थेत असतानाच मागील पाच दिवसापासून 102 क्रमांकाची रुग्णवाहिका सुद्धा त्याच अवस्थेत असल्याने देखरेखीचे पैसे जातात कुठे? असा प्रश्न निर्माण होतो.
दिनांक 23 एप्रिल ला कुरेशी शकील शेख यांना सकाळी दहा वाजता भरती करण्यात आले होते डॉक्टर राऊत, ग्रामीण रुग्णालय कोरची यांनी सांगितल्याप्रमाणे शेख यांना किडनीचा त्रास, रक्त सरकरयाचा त्रास, रक्तदाबाचा त्रास वाढल्यामुळे आम्ही प्रयत्न करून सुद्धा रूग्णाला वाचवू शकलो नाही, तसेच 102 क्रमांकाची रुग्णवाहिका मागील पाच दिवसांपासून बंद अवस्थेत आहे असे सांगीतले.
रुग्णाला मृत घोषित केल्यानंतर रुग्णाला घरी घेऊन जाण्याकरिता सुद्धा रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली नाही नंतर रुग्णांच्या नातेवाईकांना स्वखर्चाने रुग्णाला गाडी करून देण्यात आले जे कोरची तालुक्यासाठी खूप मोठी शोकांतिका आहे. येथील ग्रामीण रुग्णालयाचे भोंगळ कारभार सतत सुरू असून रुग्णांचे हाल होताना नेहमी दिसत असते.
याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिल रुडे यांच्याशी चर्चा करण्याकरिता संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
याबाबतची माहिती मिळताच भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देविकार, कोरची तालुका अध्यक्ष जितेंद्र सहारे, तालुका उपाध्यक्ष तथा निरीक्षक आशिष अग्रवाल यांनी ग्रामीण रुग्णालय कोरची येथे भेट देऊन रुग्णांचे नातेवाईक सोबत तसेच डॉक्टर राऊत यांच्याशी चर्चा केली.